छान आहे ... असे काही बघताना नकळत तुलना केली जातेच
आणि आपल्या इतिहासा बद्दल आपण किती बेपर्वा आहोत याची खंत वाटते ...
म्हणूनच कोहिनूर हिरा, आणि भवानी तलवार अजूनही ब्रिटीश म्युझियम मधे आहेत ..
लेख आवडला, एकदम खुसखुशीत व नेटकाच जमला आहे ...
बर्यापैकी चिंतन करायला लावणारा लेख, छान वाटले वाचुन व थोडे विचारात पडलो ...
>> आपला इतिहास हा आपणच जपायचा असतो.
+१, सहमत आहे ...
(आस्वादक व विचारशील ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
छान सोहळा आहे रे...
इतिहासाबद्दल लिहिलंयस ते बरोबर आहे. मला असं वाटतं की आपण इतिहासाबद्दल अभिमान तर नाहीच बाळगत पण 'दुराभिमान' मात्र जरूर बाळगतो. इतिहासाबद्दल अभिमान असेल तर आपण त्या वारश्याची जपणूक करू, त्यापासून योग्य बोध घेऊ. पण दुराभिमान आहे म्हणून आपण फक्त पुतळे आणि मारामार्या एवढ्यापुरताच त्याचा उपयोग करतो. आपलाच करंटेपणा, दुसर्यांना बोलून काय उपयोग.
बिपिन कार्यकर्ते
बिपीनभौंशी सहमत.
युकेमधे पुराणा असेल तर मडक्याचा तुकडाही एवढा जपून ठेवतात आणि पैसे घेऊन दाखवतात आणि आपण ... शिवाजीचे गुरू कोण यावरून भांडतो पण त्याच शिवाजीच्या किल्ल्यांची काय दुरवस्था झालेली आहे ते सह्याद्रीत पाहिलं की फार वाईट वाटतं.
अतिशय उत्तम लेख.
आपला इतिहास हा आपणच जपायचा असतो. ह्या मताशी पुर्ण पणे सहमत पण याच्या आड येणारी गोष्ट ही भारतीयांचा आळस किंवा दुर्लक्ष नसुन ब्रिटीशांच्या तालमीत तयार झालेले भारतीय पुरातत्व खाते हेच होय असे माझे प्रत्यक्ष अनुभवाअंती झालेले मत आहे.
भारतीय पुरातत्व खाते
http://asi.nic.in/index.asp
त्यांचे त्रासदायक कायदे
http://asi.nic.in/asi_legislations.asp
नाना
सुनील,
चांगली माहिती दिलीत. पण मला एक गोष्ट समजली नाही.
<<राजा आठवा हेन्री आणि पोप यांचे बिनसले. त्याने पोपच्या धार्मिक सत्तेची राजसत्तेतील लुडबूड, वर्चस्व मानण्यास नकार दिला. जेव्हा तत्कालीन पोप तिसरे पॉल यांनी त्यास धर्मबहिष्कृत केले तेव्हा त्याने प्रोटेस्टंट चर्च ऑफ इंग्लंड्ची स्थापना करून रोमची धार्मिक सत्ता झुगारून दिली.
राजापाठोपाठ प्रजादेखिल हळू हळू प्रोटेस्टंट पंथ स्वीकारू लागली होती पण काही कट्टर कॅथलीक अजूनही समाजात होतेच. गाय फॉक्स हा त्यांपैकीच एक.
सन १६०५. गाय फॉक्स आणि त्याच्या अकरा सहकार्यांनी एक धाडसी योजना आखली. तत्कालीन राजा पहिला जेम्स हा पार्लमेंटच्या अधिवेशनाचे उद्घाटन करणार होता. त्याचवेळेस स्फोट घडवून जेम्स आणि अन्य उमराव यांना मारण्याचा "गनपावडर प्लॉट" ह्या नावाने ओळखला जाणारा कट मोठ्या साहसीपणाने रचण्यात आला.>>
म्हणजे.. आठवा हेन्री याने कॅथलीक पोपाविरुद्ध जाउन प्रोटेस्टंट चर्च ऑफ इंग्लंड्ची स्थापना केली. मग राजा जेम्स हा कॅथलीक राहिला होता का? त्याची हत्या करण्याचा कट का रचला?
हा वारसा ( म्हणजे गाय फॉक्स डे ) जर धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्याच्यातील संघर्षाचे प्रतीक आहे , तर जेम्सला मारणारे कोण होते?
कॅथलीक पोपाला अपमानित का केले जाते?
मला समजल्याप्रमाणे जेम्स कॅथलीक असावा आणि तो कॅथलीक पोपा च्या सांगण्याप्रमाणे कारभार करत असावा.
कॄपया अधिक खुलासा करावा..
हलकेच घ्या.. हेतू शुद्ध चर्चेचा आहे.
आणि माझ्या भाष्यामुळे तुमच्या लेखनाचे आणि त्यात व्यक्त झालेल्या भावनेचे महत्व कमी होत नाही.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
माझ्या लेखातील खालील परिच्छेद पहा -
राजापाठोपाठ प्रजादेखिल हळू हळू प्रोटेस्टंट पंथ स्वीकारू लागली होती पण काही कट्टर कॅथलीक अजूनही समाजात होतेच. गाय फॉक्स हा त्यांपैकीच एक.
गाय फॉक्स कॅथलीक होता तर जेम्स प्रॉटेस्टंट. तुमचा गोंधळ का व्हावा हे समजले नाही. असो.
अवांतर - आठव्या हेन्रीने प्रॉटेस्टंट पंथ स्वीकारल्यानंतर एकही कॅथलीक व्यक्ती राजा/राणी पदावर बसली नाही. तशी व्यवस्थाच आहे.
अति अवांतर - अमेरिकेत तशी व्यवस्था नाही. तरीही जॉन केनेडींचा अपवाद वगळता एकही कॅथलीक व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसलेली नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आणि हो एक विचारायचं राहूनच गेलं. बियर कोणती प्यालात? लागर की सेडार?
गेल्यावर्षी म्यान्चेस्टरला. मे महिन्यात मनसोक्त लागर ढोसली होती. त्याची तुम्ही आठवण करुन दिली.
;)
हेनरी आठवा हा महालफडेबाज राजा. हा शेखर कपूरच्या राणी एलिझाबेथ पहिलीचा बाप. हेनरीच्या पहिल्या बायकोपासून, राणी कॅथरीनपासून, पोप क्लेमेंट त्याला वेगळे होण्याची परवानगी देत नव्हता. ही कॅथरीन म्हणजे ब्लडी मेरीची (मेरी क्वीन ऑफ स्कॉटलंड. हिचे केस लाल होते) आई. त्याला एलिझाबेथच्या आईशी, अॅनशी, लग्न करायचे होते. कारण मुलगा हवा होता. नंतर कुठलाही सबळ पुरावा नसताना राजद्रोह, विवाहबाह्यसंबंध ठेवणे (अॅडल्टरी) हे गुन्हे सिद्ध करण्यात येऊन अॅनचाही शिरच्छेद करण्यात आला. अॅननंतरही त्याने अनेक लग्ने केली.
कसला आलाय धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोघांतला संघर्ष! हेनरीच्या स्वतःच्या खाजेपायी, गरजेपायी प्रॉटस्टंट पंथ स्थापन झाला.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मी राजा आठवा हेन्री आणि पोप यांचे बिनसले ह्या एका वाक्यात उरकलेल्या प्रसंगाचा तुम्ही चांगलाच विस्तार केलात!!
पोप क्लेमेंट त्याला वेगळे होण्याची परवानगी देत नव्हता
यातच सर्व काही आले नाही का? आता सांगा, इंग्लंडच्या राजाला आपल्या पत्नीपासून वेगळे होण्यासाठी दूर वॅटिकनमध्ये बसलेल्या पोपच्या परवानगीची गरजच काय? ही धार्मिक सत्तेची राजसत्तेतील लूडबूड नव्हे काय? मग कारण काहीही असो.
असो, माझ्या लेखाचा मूळ उद्देश वेगळाच होता!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
त्याने पोपच्या धार्मिक सत्तेची राजसत्तेतील लुडबूड, वर्चस्व मानण्यास नकार दिला. जेव्हा तत्कालीन पोप तिसरे पॉल यांनी त्यास धर्मबहिष्कृत केले तेव्हा त्याने प्रोटेस्टंट चर्च ऑफ इंग्लंड्ची स्थापना करून रोमची धार्मिक सत्ता झुगारून दिली.
हे फारच अर्धवट वाटले आणि अनावश्यक उदात्तीकरणही. चर्च ऑफ इंग्लंडची स्थापना करणारा राजा हेनरी मार्टिन लूथर किंग नव्हता. (हा सिविल राइट्सवाला अमेरिकन संत मार्टिन लूथर किंग नाही बरे)
इंग्लंडच्या राजाला आपल्या पत्नीपासून वेगळे होण्यासाठी दूर वॅटिकनमध्ये बसलेल्या पोपच्या परवानगीची गरजच काय?
धार्मिक गरज. अॅनची इच्छा. अॅन कॅथरीनसोबतचा विवाह रद्द झाल्याशिवाय हेनरीशी लग्न करायला तयार नव्हती.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अहो रोमन कॅथलिक पोपशी जाहिर पणे फारकत घेणार्यात पुढे असणारा मार्टिन ल्यूथर..... मार्टिन ल्यूथर किंग नाही हो... मार्टिन ल्यूथर किंग एकमेवच आहे.
बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद. मार्टिन लूथर हवे होते. पण माझा मुद्दा तुम्हाला कळला असण्याची शक्यता आहे काय?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
प्रतिक्रिया
निरीक्षण ..आणि वर्णन
मस्त लेख ...
छान!
अतिशय
आपला
छान सोहळा
सहमत
आवडला..
अतिशय
उत्तम लेख
पेशवेकालिन घटना.
सुनील, चांग
खुलासा
अरे ती ओळ ?
छान लेख..
लागर बियर?
छान लेख
छान लिहिले आहे.
सुनील
कसला आलाय धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोघांतला संघर्ष!
मूळ उद्देश
कसला आलाय विस्तार
मार्टिन ल्यूथर किंग नाही हो...
धन्यवाद