धोनीच्या निवृत्ती निमित्ताने
लेखनप्रकार
गेल्या काही क्रिकेट खेळाडुंच्या निवृत्तीनंतर असे लेख आणि प्रतिक्रिया वाचण्यात आल्या की झाले .. आता क्रिकेट जग बुडले. क्रिकेट बघण्यात काही राम राहिलेला नाही. अरेरे, माझा प्रियतम खेळाडू त्याचे नाव इथे टाका> कसोटी / एक दिवसिय /व-वीस (टी-ट्वेंटीचे मराठी रुपांतर) सोडून आता निवृत्त्त जीवन जगणार. आपले इतके दिवस कमावलेले पैसे मनसोक्त भोगणार, आपल्या कुटुंबासमवेत, मुलांबरोबर, मित्रांसमवेत मजा करणार. माझे काय व्हायचे आता ? कोणाला दूरचित्रवाणीवर मी रात्र रात्र जागून, (दिवसा सामना असेल तर) हातातले काम बाजूला टाकून क्रिकेट खेळतांना पाहणार ?
छे छे, मी या सगळ्या लेखकांना, प्रेक्षकांना, चाहत्यांना वाईट म्हणत नाही हो. मी ही त्यातलाच. क्रिकेट म्हटले की तहान भूक विसरून तासन्तास मैदानावर किंवा दूरचित्रसंचासमोर बसणारा. तुम्ही म्हणता त्या प्रत्येक खेळाडूचा चाहता.
पण एक माझ्या लक्षात आले आहे - आणि तुमच्याही आले असेलंच - कोणी निवृत्त झालं, संघातून काढलं गेलं, दुखापत झाल्यामुळे बाजूला पडलं, तरी क्रिकेट थांबत नाही. एक सुर्य मावळला तर दुसरा ऊगवतोच. एक सचिन निवृत्त झाला तर विराट पुढे येणारंच. धोनी जातो म्हणतो तर वृद्धिमान त्याची जागा घ्यायला तयार आहेच.
आणि आपण चाहते तरी कसे निर्लज्ज असतो - सचिन पुर्वी मारायचा हो चांगले, पण हा विराट त्यापेक्षाही चांगले मारतो की हो - असे म्हणायला तय्यार.
पण काही चाहते - भक्त म्हणा हवं तर - कट्ट्र असतात हां. विराट सचिनपेक्षा छान खेळतो म्हटले तर .. अरे तुम्ही गावसकरला पाहिले नाहीत - काय तन्त्र होते राव त्याचे, असे लगेच. त्या युगातुन बाहेर पडायला तयार नाहीतच. मला त्यांचेपण कौतुक वाटते. कारण सरळ आहे - इतिहास आठवायला डोक्याला जास्त कष्ट होतात, वर्तमानात जगण्यापेक्षा.
तर .. धोनी. तो म्हणाला की पुरे झाले आता. शरीर, मन आणि मेन्दू साथ देत नाही आता. दर सामन्याच्या शेवटी तेच - त्याच प्रश्नांना तीच ऊत्तरे. हो हो - पुढच्या सामन्यात खेळू चांगले. पुढचा सामना जिंकू आम्ही. आमचे चाहत्यांचे आशिर्वाद, शुभेच्छा आहेत आमच्या पाठीमागे.
हे असे किती वेळ चालणार हो ? त्यापेक्षा गेलेलेच बरे.
काही वर्षांपुर्वी - जेव्हा सचिन, राहूल, सौरव आणि लक्ष्मण नुकतेच संघात आले होते - त्या सुमारास आपण सगळे चाहते सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर संघातून गेल्याचं दु:ख वाटून घेत होतो. आता पुन्हा हीच वेळ आली आहे. नवी फळी तयार होते आहे. नवे तारे क्षितीजावर ऊगवत आहेत. विराट, विजय, धवन, पुजारा, यादव, आरोन, राहूल शर्मा, राहणे - हे सगळे ऊत्साहाने, जोषाने पुढे सरसावले आहेत.
नवी फळी ऊभी राहते आहे.
वाचने
3009
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
बरं मग ?
In reply to बरं मग ? by उगा काहितरीच
मग काय ?
क्रिकेट अति झालंय आता
In reply to क्रिकेट अति झालंय आता by पैसा
बरोबर ..
In reply to बरोबर .. by शेखर काळे
आम्ही बघतो ब्वा!
In reply to बरोबर .. by शेखर काळे
पण त्याला पर्यायी खेळ काय ?
In reply to पण त्याला पर्यायी खेळ काय ? by नगरीनिरंजन
>> प्रचंड सहमत.
कोण धोनी?
In reply to कोण धोनी? by सोत्रि
आपला हो ..
In reply to आपला हो .. by शेखर काळे
(No subject)
राहूल शर्मा?
In reply to राहूल शर्मा? by स्पार्टाकस
बरोबर
जे.