घंटाघर चौक प्रवेशद्वार. जालियांवाला बागेपासुन या मार्गाने अगदी ५ मिनिटात आपण या द्वाराशी येउन ठेपतो. डाव्या अंगाला पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था आहे तर पुढे प्रवेशद्वारजवळ सामान सुमान ठेवायचा कक्ष आहे. प्रवेशद्वारासमोरचा परिसर विस्तिर्ण आहे. प्रवेशद्वारासमोरच अगदी उथळ म्हणजे केवळ पाऊल बुडेल अशी कुंडे आहेत. त्यात पाय धुवायचे आणि मग मंदिरात प्रवेश करायचा. प्रवेशद्वाराचे रक्षक हे येणार्या प्रत्येकावर दोन गोष्टींसाठी नजर ठेवुन असतात - मस्तक झाकलेले असणे आणि पाय धुवुन मगच प्रवेश करणे.
प्रवेशद्वारासमोर येताच सुवर्णमंदिराचे पहिले दर्शन होते. प्रवेशमार्गावर सर्वत्र देणगीदारांची नावे असलेल्या संगमरवरी पाट्या आहेत. दात्यांमध्ये लष्करी अधिकारी व पलटणींचा मोठा वाटा आहे.
आयताकृती तलावात म्हणजे 'अमृतस्रोवरात' (यावरुनच अमृतसर असे नाव पडले) मंदीर आहे. उजवीकडे कमानदार प्रवेशद्वारातुन मंदिर प्रवेशाचा मार्ग आहे. उंच सोनेरी कळ्स दिसत आहेत ते अकाल तख्त आणि केशरी ध्वज असलेली वास्तु म्हणजे निशान साहिब.
प्रवेशाद्वारालगतची म्हणजे डाव्या अंगाला शिख वस्तु संग्रहालयाची इमारत आहे.
मंदिराकडे पाहुन भाविक माथा टेकतात आणि सरोवराचे पाणी तिर्थ म्हणुन प्राशन करतात. या जागेवर बहुतेक लोक मंदिराच्या पार्श्वभूमिवर स्वतःची छबी टिपुन घेताना दिसत होते.
सरोवर स्वच्छ राखण्यासाठी बहुधा मासे पाळले गेले असावेत. या माशांना खायला न घालण्याच्या व सरोवर स्वच्छ राखण्याच्या सुचना आहेत. आपल्याला सरोवरात अभय असल्याचे मासे मंडळींना माहित असावे, ते बिनदिक्कत कठालगत फिरताना व माणसे जवळ आली तरी वावरताना दिसत होते.
मंदिराची मागची बाजु. शिख धर्मात बोराच्या झाडाला विशेष महत्व असावे. परिसरात बोराची अनेक झाडे आहेत तसेच 'बेरी बाबा बुध साहिब' देखिल एका पुरातन बोरीच्या झाडाखाली आहे.
मागच्या अंगाला दोन उंच मनोरे आहेत व त्यांमध्ये लंगर आहे. या मनोर्यांना रामगढिया बुंगे म्हणतात. हे उंच मनोरे रामगढिया वंशातील योद्धा सरदार जस्सासिंह याने मंदिराच्या संरक्षणार्थ उभारले.
'सेवादार' - मंदिराच्या परिसरात गस्त घालणारे रक्षक. अगदी साठी उलटलेले रक्षक देखिल सहजगत्या भाला पेलत फिरताना दिसत होते. एका भिंतीलगत एक घोळका बसला होता, त्यातल्या काहींची पाठ मंदिराकडे झाली होती. रक्षक त्यांच्या पुढ्यात जाउन उभा राहिला व त्याने फक्त पालथ्या पंजाने ताणलेली बोटे गोल फिरवली. ताबडतोब पाठ फिरवुन बसलेले मंदिराभीमुख झाले.
प्रत्येक अंगाकडुन मंदिराचे वेगळे रुप दिसते. मंदीर आणि त्याचे सोनेरी प्रतिबिंब फार मोहक दिसते.
मागच्या अंगाला मंदिराला एक सुंदर सज्जा आहे. अगदी वरच्या बाजुला मधोमध अध्ययन करणारे गुरू आणि चवरी ढाळणारा सेवक पत्र्यावर कोरला आहे
जवळुन पाहिले असता मंदिराच्या बाह्य बाजुवरील नक्षिकाम ताजमहालावरील नक्षींशी विलक्षण साधर्म्य दाखवते.
कळसावरील सोन्याची झळाळी डोळे दिपवते
प्रदक्षिणा करताना सर्व बाजुंनी मंदीर डोळे भरुन पाहुन घेतले.
इतका प्रशस्त् परिसर, हजारो माणसांचा राबता तरीही आश्चर्य कारक वाटावी इतकी शांतता आणि स्वच्छता. प्रदक्षिणेच्या आयताकृती मार्गावर चारही कोपर्यांमध्ये भाविकांना पाणी देण्यासाठी जे लोक असतात ते पगारी नोकर असून स्वखुषीने व सेवाभावाने करणारे भक्त आहेत हे त्यांना पाहताच समजते. सर्वत्र अखंड व अथकपणे ओल्या फडक्याने संगमरवरी जमीन पुसली जात असते. प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश करताना दिंड्या घेउन आलेले आणि आपापले आलेले भाविक यांना प्रवेशासाठी स्वतंत्र रांगा आहेत. प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत मंद आवाजात प्रसन्न अशी धार्मिक गीते वाजत असतात आणि बहुसंख्य भाविक ती स्वतः देखिल गात असतात.
मंदिरात प्रसादाची व्यवस्था आणि पद्धत फारच उत्तम आहे. प्रवेशद्वारासमोर जरा अलिकडे प्रसाद मिळतो. दहा रुपये देउन पावती घ्यायची आणि ती दाखविल्यावर साजूक तुपातला अगदी तूप निथळणारा जाडसर शिरा प्रसाद म्हणुन मिळतो. आम्ही घेतला आणि खायला सुरुवात केली. काही वेळाने लोक आमच्या कडे पाहत् आहेत असे लक्षात आले. एक मुलगी आणि तिची आई आमच्या जवळ आल्या आणि त्यांनी माहिती दिली की तो प्रसाद घेउन दर्शनाला जायचं, आणि दर्शन घेतल्यावर मग प्रसाद खायचा. प्रसादाची पद्धत फारच उत्तम - आत जाताना प्रसाद जमा करायचा, सेवक आपल्या कृपाणाने त्यातला काही भाग काढुन घेतात आणि उरलेला आपल्याला प्रसाद म्हणुन देतात. तो ठेवायला पिश्वीही तत्परतेने दिली जाते. ज्यायोगे भक्तांना चिकट हात घेउन वा हातात द्रोण घेउन मंदिरात जायला लागु नये. आतमध्ये नैवेद्य प्रसाद वगैरे प्रकार नाही. फक्त दर्शन घ्यायचं आणि यायचं
वातावरण अगदी प्रसन्न आणि विलक्षण समाधान देणारं. इथुन पाय निघत नाही. आपण निघतो ते पुन्हा एकदा यायचच अस म्हणत.

वाचने
15765
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
फारच सुंदर
ते खरेच सोने आहे
In reply to फारच सुंदर by दिपक.कुवेत
माहितीपूर्ण लेख, धन्यवाद!
फोटो आणि वर्णन आवडले !!
अप्रतिम फोटो आणि छान लेख !
वाह वाह ।पहिला भाग कधी झाला ?
हा घ्या दुवा...
In reply to वाह वाह ।पहिला भाग कधी झाला ? by कंजूस
आणि थँक्यू ....
In reply to वाह वाह ।पहिला भाग कधी झाला ? by कंजूस
अप्रतिम मंदिराचे सुंदर फोटो,
मस्त...
स्वच्छता, सुंदरता, शांतता व पवित्रता यांचे प्रतिक
मस्तच....
वाहे गुरु दा खालसा........
अप्रतीम. परवाच डिस्कव्हरीवर
छान
धन्यवाद
तरणतारणचा गुरूद्वारा
In reply to धन्यवाद by सर्वसाक्षी
....सुवर्णमंदिरातील पत्रे हे अस्सल सोन्याचेच आहेत.
सुवर्णमंदिर म्हणजे
सुरेख !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गजानना गजानना :- लोकमान्य { एक युगपुरुष } Releasing 2nd January, 2015स्वच्छता, सेवक/भक्तांचे
मंदिरे पैसे कमावण्याच्या व्यवसायाच्या ठिकाणांऐवजी,,,,,
In reply to स्वच्छता, सेवक/भक्तांचे by डॉ सुहास म्हात्रे
सहमत

सुंदर..
लेख फार छान आहे.
सुधारणा होत आहेत.