✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ती...........

ल — लीलाधर, Fri, 11/11/2011 - 08:30
ती..... ती आहे हलकी, ती आहे फुलकी, ती नाही परकी अन् ती नाही बोलकी, पण तरीही तीची आपल्यावर असते मात्र मालकी..... अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी हलकी फुलकी डुलकी.............. तुम्ही कुठेही असा तीचा हाच आहे वसा, कारण तीला लागत नाही व्हीसा, ती ठसवते तीचा आपल्यावर ठसा, अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी हलकी फुलकी डुलकी कारण ती नाही तुम्हा आम्हाला परकी........... एक डुलकी एक डुलकी, करते वेळ हलकी फुलकी एक डुलकी! (चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका)

प्रतिक्रिया द्या
5135 वाचन

💬 प्रतिसाद (19)

वा... दुपारी हळुच एक डुलकी

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 09:14 नवीन
वा... दुपारी हळुच एक डुलकी काढावी म्हणतो ! ;)
  • Log in or register to post comments

कोणत्या वयोगटासाठी कविता आहे

नगरीनिरंजन
Fri, 11/11/2011 - 13:44 नवीन
कोणत्या वयोगटासाठी कविता आहे हेही नमूद करत चलावे अशी विनंती आहे.
  • Log in or register to post comments

कोणत्या वयोगटासाठी कविता आहे

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 13:47 नवीन
कोणत्या वयोगटासाठी कविता आहे हेही नमूद करत चलावे अशी विनंती आहे. हे यामुळे का ? (चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

डुलकी काढताना हि कविता सुचली वाटतं.

किसन शिंदे
Fri, 11/11/2011 - 13:51 नवीन
ते टिंब टिंब जरा कमी करत चल कि रे.
  • Log in or register to post comments

...

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 13:52 नवीन
... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आमचे भट्जीगिइरीतले एक सहकारी

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/11/2011 - 20:53 नवीन
आमचे भट्जीगिइरीतले एक सहकारी तुमच्याशी कनेक्ट करुन द्यावे,अश्या विचारात मी काल पर्वापर्यंत होतो.अता मात्र त्या आमच्या शब्दभुभू'ला तुमची भेट कर्वुन दिलीच पाहीजे. त्याची मदत घेतल्यास बंब,पंप,संप असे बरेच शब्दांचे मनोरे व ताजम-हाल तुमच्या हती लागतील... ;-)
  • Log in or register to post comments

आचार्य नमो नमः

लीलाधर
Sat, 11/12/2011 - 09:00 नवीन
लवकरच भेटीच्या प्रतिक्षेत आहे. आम्ही देखील उत्सुक आहोत तुमच्या शब्दभुभूंच्या भेटीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आचार्य नमो नमःपराग भटजींना

धन्या
Sat, 11/12/2011 - 09:39 नवीन
आचार्य नमो नमः
पराग भटजींना कुणीतरी चाणक्य सिरीयल श्टाईलमध्ये "आचार्य नमो नमः" हे चित्र नजरेसमोर आलं आणि बेक्कार हसायला आलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

नमस्कार

लीलाधर
Sat, 11/12/2011 - 10:11 नवीन
नमस्कार धनाजीराव, कुणीतरी वगैरे नाही बरं का त्या तुमच्या पराग भटजींना त्यांच्या धाकट्या बंधूंनी केलेला आदरार्थी नमस्कार आहे बरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हे चित्र नजरेसमोर आलं आणि

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/13/2011 - 13:27 नवीन
हे चित्र नजरेसमोर आलं आणि बेक्कार हसायला आलं. :-D ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा... असा अवाज आला असेल ना मनातल्या मनात ;-) चान चान चांगल हाय... आम्हाले केस भादरुन 'शेंडी' लावल्याबद्दल धण्यवाद :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तुमच्या शब्दभुभूंच्या

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/13/2011 - 13:33 नवीन
तुमच्या शब्दभुभूंच्या भेटीला--->>> फेसबुकवर त्यांना शोधुन नित्र बनवा... त्यांचे नाव व्यनीत पाठवतो आहे... सुचना गांभिर्यानी-घेतल्याबद्दल धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

झाली बरे भेट

लीलाधर
Sun, 11/13/2011 - 18:42 नवीन
झाली बरे आमची आणि तुमच्या शब्दभुभूंची चेपूवर भेट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/12/2011 - 11:22 नवीन
अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी हलकी फुलकी डुलकी..............
च्यायला =)) =)) मी आधी 'डुरकी' वाचले. मला वाटले वळू मधल्या डुरक्याच्या आयटमवरतीच कविता लिहीली आहे. बाकी 'कविता वाचता वाचता डुलकी लागते' असे मदनबाणाला म्हणायचे आहे का ? असा प्रश्न पडून गेला. नवलेखकांना प्रोत्साहन न देता अशी खिल्ली उडविणार्‍या मदनबाण उर्फ किलवर राजा ह्यांचा निषेढ !
  • Log in or register to post comments

नाही नाही

लीलाधर
Sat, 11/12/2011 - 14:13 नवीन
उलट माझ्या मित्राशी बोलता बोलता त्याच्या हाफीसात एकंदरीत डुलक्या काढण्याच्या सवयी वरून ही मला सुचली एवढच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अर्रर्र......

प्रचेतस
Sat, 12/27/2014 - 19:46 नवीन
अर्रर्र...... ही कविता वाचलीच नव्हती.
  • Log in or register to post comments

आम्ही याआधी वाचली होती. मात्र

सतिश गावडे
Sun, 12/28/2014 - 10:20 नवीन
आम्ही याआधी वाचली होती. मात्र आपल्या मिनी कट्टयाच्या कवी लीलाधर यांच्या कवितांचे काव्यवाचन करताना पुन्हा एकदा आनंद लुटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

बॅटमॅन
Mon, 12/29/2014 - 18:07 नवीन
अगदी अस्सेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ती.......

जयन्त बा शिम्पि
Mon, 12/29/2014 - 13:00 नवीन
बरं झालं कविता आटोपशीर शब्दात आटोपली, नाहीतर वाचता वाचता लागली असती ' डुलकी ' प्रयत्न छान आहे , लगे रहो ! !
  • Log in or register to post comments

>>चालः एक झोका एक झोका चूके

सूड
Mon, 12/29/2014 - 18:15 नवीन
>>चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका
हे कहर आहे राव... चचुकडी रॉक्स !! =))))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा