Skip to main content

टोमॅटो राईस

लेखक मनिमौ यांनी सोमवार, 22/12/2014 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
1 साहित्य 2 वाटया बासमती तांदुळ 5 मिडियम टोमॅटो प्युरी करून 2 मोठे कांदे 3 मिरच्या आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे. साजूक तूप 1/2 वाटी पाव वाटी काजू मीठ साखर कोथिंबीर (सजावटीसाठी) कृती प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवा. कांदा बारीक व उभा चिरा. छोट्या कुकरमध्ये तुप घालुन जिरं व कांदा घालून परतून घ्या.त्यात तांदूळ घालून परतावे.नंतर मिरचीचे तुकडे आणी आलं लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. थोडा वेळाने 5 वाट्या गरम पाणी घालावे. भात अधर्वट शिजल्यावर टोमॅटो प्युरी घालावी. चवीपुरते मीठ व किंचित साखर घालून झाकण लावून ठेवावे. साधारण 10 मिनिटात भात तयार. काजू पाकळ्यांची सजावट करून गरमागरम सर्व करा. 2

वाचने 32362
प्रतिक्रिया 138

प्रतिक्रिया

आमच्या सा.बा. चं आणि आमचं अजिबात पटत नसल्यामुळे हा टोमॅटोभात अजिबात खाणार नाही. (सौ.पण अजिबात बनवणार नाहीत. "मिपावरची रेसिपी ना? मग करत बसा तुम्हीच!" हे मला तिने बोलण्याआधीच ऐकू येतंय..!) बादवे, इथल्या कुणा अनाहितांना आमच्यासारख्यांची दया आली आणि एखादं अर्धंमुर्धं आवतण भ्येटलंच तरच कायतरी चानस् हाय! -(आशाळभूत), मीच तो! (रच्याकने, शंभरला अजून किती कमी आहेत? टोभा मिळाल्यास १०० काय, २०० ची पण सुपारी घेतो. बोला... आमचें येथें धाग्याचीं शंभरी भरवायचें कंत्राट स्वीकारलें जाईल - म्हणजें शंभर प्रतिसाद हो! तुम्हांला कांय वाटलें?)

पाटावरच्या पांढर्‍या पाकिटात काय आहे हे कळायला मान खूऽऽऽऽऽऽपच म्हणजे खूपच तिरकी करावी लागली तेव्हा वाचता आले! :-P ते मीठ, साखर आणि कोथिंबिर काही नव्हती 'साहित्य' च्या लिस्टमध्ये. संमं, ते पण करून टाका चला! ;-)

In reply to by एस

अहो पांढर्‍या पाकीटावर काय लीहीलय ते मान तीरकी करूनही दीसत नाहीये. पूर्ण वटवाघळासारखे लटकावे लागणार तेव्हा दिसेल. नाहीतर लॅपटॉप उल्टा करावा लागेल. :)

In reply to by खटपट्या

बरोबर... मी पण लॅपटॉप उल्टा करूनच बघीतले. ती "आले-लसूण" पेस्ट आहे.

In reply to by दिपक.कुवेत

मग शिरसान करुन "योगा" प्रेमी असल्याचे ऑफिस मधल्या मंडळींना पटवुन ध्या ! :P

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihant

टोभा सारखा सारखा अपडेट होतो आहे, कोथिंबीर कमी पडली काय ? *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

ह्म्म फोटो आले. शेवटल्या फोटोत दोन वाडग्यांच्या मधले दह्याचे शिंतोडे आणि डाव्या बाजूला खालच्या कोपर्‍यात पडलेली कोथिंबीर वगळता फोटो मस्त आलाय.

In reply to by सूड

@दह्याचे शिंतोडे आणि डाव्या बाजूला खालच्या कोपर्‍यात पडलेली कोथिंबीर वगळता फोटो मस्त आलाय.>>>> घेतालान सूड मेल्यान! :-D

In reply to by सूड

मी चित्राहुती च म्ह्ट्ले आहे. चित्रावती नाही काय *sad* नकी शब्द काय आहे *unknw* *DONT_KNOW*

In reply to by त्रिवेणी

तुम्ही चित्राहुतीच म्हटले हो, आम्ही अपभ्रंश करुन चित्रावती म्हणतो.

भातावर आणि त्याला अनुसरुन ईतर विषयांवर उलथापालथ झालेली दिसतेय. असो. आता टोरा बद्दल. मला खुप आवडतो हा भात पण मी भात वेगळा शीजवून नंतर टोमॅटो पेस्ट मधे अ‍ॅड करतो. फोडणीत शेंगदाणे, उडीद डाळ, कडिपत्ता, सुख्या लाल मिरच्या मस्ट. कुकर आणि पाण्याचा अंदाज चुकल्यास वरील भाताचा कुकर मधे गोळा होण्याची शक्यता आहे. टोमॅटो प्युरीच्या मानाने भाताचा कलर फारच फिका वाटतोय.

इथे काही लिहिले आहे. सर्व सुचना वाचल्या त्या नुसार पुढील वेळेस सुधारणा करेन. @ दिपक टोमॅटो देशी असल्याने रन्ग फिका आला आहे.

हो,मने आपल्या टोमॅटोने दर वेळी गडद लाल रंग येतोच असे नाही.पहिल्या प्रयत्नाच्या मानाने छानच लिहिलं आहेस गं.लक्षात नाही आलं तू प्रथमच लिहिते आहेस.मस्त.अजून येऊ दे छान पाकृ.

मनी मौ काल च रात्री तुझा टो भा केला गं ! छान झाला एकदम … मी पण थोडे दाणे, उडीद डाळ आणि दह्यातल्या मिरच्या घातल्या फोडणीत , सोपा करायला एकदम आणि चव पण आम्हाला खूप आवडली . मी जोडीला पालक सूप , मिरगुंड आणि थोड्या भाज्या स्टीम करून घेतल्या … मजा आली काल तुझ्या राइस नी :)

In reply to by टवाळ कार्टा

सासूबै किती घेतल्या टवाळ सासू छटाकभर सूड घेणारी सासू चिमूटभर आणि अत्रुप्त सासू चवीपुरती

In reply to by भिंगरी

सासु ही सासु असते. तिचे प्रकार नसतात. पण सासु नसलेल्याला कसे बरे समजेल? :P

In reply to by भिंगरी

भिंगरी ताई , विनोदी सासू राहिली की , ती घातली फोडणी ला … काय खमंग झाला म्हणून सांगू भात ;)

In reply to by भिंगरी

>>सूड घेणारी सासू चिमूटभर
हम्म ही चिमूटभरपण फार झाली, चवीपुरती घेत चला पुढल्यावेळेपासनं.

सूनबाया अनाहितात चालतात तर सूनबुवा का नाही चालणार??अाणि अनाहितासाठी वेल क्वालिफाइड म्हणजे साबा साबु आहेत,टोभा करता येतो.अजून काय असणारे अनाहितात? सूनबुवा घेण्याचा विचार व्हावा.कसें?

मौ, सकाळी पटकन करून, मुलांच्या डब्यात देता येईल आणि मुलांना हमखास आवडेल अशा पाकृच्या यादीत टोराचा समावेश करण्यात आला आहे.

टोभाचा धागा शंभरी गाठू लागल्याचे पाहून ड्वाले पानाव्ले :) ;) हा नव्य्याणवावा. टाका शंभरावा कोणीतरी आणि घ्या श्रेय ! +D

In reply to by टवाळ कार्टा

लागला की काय दगड विनोदाला.... दगडाला कळले नाही समोर कोण ते

In reply to by प्यारे१

च्च च्च च्च. प्यारेमहाराजांनी भगवी वस्त्रे टाकून अशी एकदम भवसागरात उडी घेतल्याचं पाहून वाईट वाटलं.

In reply to by बॅटमॅन

सच्चाई छुप नही सकती बनावट के उसुलोंसे... की कै तरी म्हणुनच गेलयं ना कुणीतरी...

In reply to by पिलीयन रायडर

सच्चाई छुप नही सकती बनावट के उसुलोंसे..
कविवर्य रामदास आठवल्यांची कविता आहे की काय ;) "सच्चाई छुप नही सकती बनावट के उसुलोंसे मोसंबी नही हो सकती गोड कभी संत्रोंसे".

In reply to by बॅटमॅन

=)) रामदास आठवलेंच्या नावावर फिरणार्‍या कविता तूच लिहीतोस असा मला सौंशय आहे!!!

In reply to by पिलीयन रायडर

नाय बा. मी र ला ट जोडणारा कवी, ते कालिदासासम काव्य आपल्याला या जन्मी तरी जमणे नाही.

In reply to by बॅटमॅन

प्यारेमहाराजांनी भगवी वस्त्रे टाकून अशी एकदम भवसागरात उडी घेतल्याचं पाहून वाईट वाटलं.
अरेरे :( हे अधःपतन पाहुन एकदम प्यासारामबापुच सॉरी सॉरी आसारामबापुच डोळ्यासमोर आले माझ्या !

In reply to by प्रसाद गोडबोले

खिक्क टु बॅमॅ, पिरा आणि पश्या! सो स्वीट ऑफ ऑल ऑफ यु ;)

३४ चे एकदम १३४ पाहुन वाटलं टोभात नवीन काय आलं. उघडलं तर असं वाटतय की अनाहिताचं लॉगिन बंद पडले असावे २/३ दिवस म्हणुन ही म्हैलाट्रेन इकडं वळती झाली की काय ?;)

(साबांनी नाही, त्यांच्या मुलीने...) केला  (व्हेरिएशन : सद्या मिळणारे ताजे मटारचे दाणे टाकले होते !) आणि चट्टामट्टा पण केला...

ह्या भातात मिर्च्या एवजी लाल तिखट घालावे. टोमॅटो प्युरी बरोबार टोमॅटो काप पण घालावेत. तिखटा मुळे कलर छान येतो