श्री चतुरंग ह्यांचे 'होता खमंग, होता चकणाहि खास बाकी' हे विडंबन वाचले. त्यावरून लिहावेसे वाटलेले एक विडंबन :)
(श्री विठ्ठल वाघांची क्षमा मागून त्यांच्या 'काळ्या मातीत मातीत' ह्या कवीतेचे/ गीताचे विडंबन करण्याचा प्रयत्न)
काळ्या पिशवीत पिशवीत बॉटल हालते
बॉटल हालते बॉटल हालते
बाईल थयथया नाचते दोस्त घरी बोलवितो
घरी बोलवितो दोस्त घरी बोलवितो
घरन बाबा हाकलतो छंदी फंदीच्या जोडीला
जिभे सरसती नाचे घोट जाताच पोटाला
तरतरी मना येते मती न्हाती धूती होते
रंगीत पान्याच्या वासाची चाहूल आवशीला जाते
भय जिवाला पडते वाट दोस्ताची लागते
दोस्त बॉटल झाकतो मी चकना लपवितो
दोस्ता र आता कलटी र आता पळूया र माझ्या राज्या
पानी खिडकीतन वोतून वाट गुत्त्याची चालूया
तिथे उधार चालेना नगद लागते
अन्ना शेट्टीच्या गूत्त्यात चाल 'पेया'च पूजन
तिथ डोलकर हालती जनू करती भजन
जवा रंगीत पान्यात सोन चांदी लकाकते
सोन चांदी लकाकते आस जिवाला लागते
चाले पानी-चकन्याचा पाठशिवनीचा खेळ
खुर्ची बूडाला लागेना झाला कसला हा गोंधळ
काळ्या टेबला खालन डोला सपान पाहतो
डोला सपान पाहतो अन्ना गालात हासतो
काटा लागतो जिवाला स्वप्न पान्यात सांडत
स्वप्न पान्यात सांडत दुकान अन्नाच चालत
चू भू द्या घ्या
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2588
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिभे सरसती
पूर्वी वाचलेली
अरेच्चा
हाहाहा..
जबरा जमलय
वा वा!
मस्त... बिपि