देवास
महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या तथाकथित पुढार्यांनी हा व्हिडिओ जरुर पहावा. नुसतेच राजकारण करुन सरकारच्या नावाने गळा काढून पॅकेज मागणे सोडून असे काहीतरी करावे म्हणजे शेतीमुळे आत्महत्येची वेळ येणार नाही. यावर कोणी म्हणेल की येथेही शेततळी आहेत पण प्रमाण बघा व ती चळवळ बघा. पण आपल्या पुढार्यांना (जे शेतकरीच आहेत) त्यांना हे नको आहे कारण मग यांच्या पदरात काय पडणार ? उरला प्रष्न अतीवृष्टीचा. जर या व्हिडिओत दाखवलेली शेती असेल तर मला नाही वाटत शेतकरी एकदुसर्या संकटाने डगमगून जाईल. नुसतीच आंदोलने करणार्या संघटनांपासून शेतकर्यांना वाचव ही प्रार्थना करण्याची वेळ आता आली आहे हे निश्चित. कारण शेतकरी जर यांच्या मागे गेले तर मला खात्री आहे हे पुढारी त्यांना वेळ आल्यावर ( व आपली राजकीय तुंबडी भरल्यावर) त्यांना बेवारशी सोडून देतील. शेतकर्यांनी देवासला जावे व हे कसे काय केले आहे याचा अभ्यास करावा......
देवासच्या शेतकर्याचा खर्च महाराष्ट्रातील शेतकर्याच्या खर्चापेक्षा कमी असायचा कारण नसावे. अर्थात पानाच्या टपर्यांवर उभे न राहता ( हे मी स्वतः आळंदीला पाहिले आहे म्हणून लिहिले आहे) ते स्वतः शेतात राबतात त्यामुळे कामगारांचा खर्च कमी असावा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
मस्त लिंक..
जय जवान आणि जय किसान
छान आहे हा व्हिडीओ.
पॅकेजकरिता दरवर्षी टाहो
हा हा, जकु काका,
महाराष्ट्रात प्रॉब्लेम काहि वेगळा असेल...
मुटे साहेबांच्या
ते इथे प्रतिसाद देण्याची
खूपच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ
देवासबद्दल
काल कार्यक्रम बघितला. निश्चित
वर्मावर बोट ठेवलंय.