>> नेतृत्वबदल होईल?
शक्यता कमी कारण राणे मुख्यमंत्री होणार नाही या अटीवर प्रतिभाताइ ना पाठींबा होता
>>>पण जर नेतृत्वबदल झाला तर मुख्यमंत्रीपद राणेंना मिळेल की अन्य कोणाला
सुशीलकुमार शिंदे किंवा कुणीही राणे सोडुन
नाना
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये आक्रमक आणि लोकप्रिय नेता नाही तो राणेंच्या रुपाने काँग्रेसला मिळाला. आगामी मुख्यमंत्री एकच नारायण राणे.
आपला
कॉ.विकि
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये आक्रमक आणि लोकप्रिय नेता नाही तो राणेंच्या रुपाने काँग्रेसला मिळाला. आगामी मुख्यमंत्री एकच नारायण राणे.
१००% सहमत
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणतो!
आमचा नेता नारायण राणे! अहो तसं बघायला गेलं तर सगळेच एका माळेचे मणी आहेत, चोर आहेत, लबाड आहेत!
पण मग त्यातल्या त्यात राणे बरा असं आमचं मत आहे! निदान आमच्या कोकणकडे तरी लक्ष ठेवेल! :)
आपला,
(शिंदुदूर्ग जिल्ल्यातला) तात्या.
तात्या,
कोकणातला माणूस मुख्यमंत्री होणं ही कोकणासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. पण आज जे काही पेपरात वाचलं त्यावरून नारायणरावांपासून मुख्यमंत्रीपद अजून तरी खूप दूर दिसत आहे. कारण हायकमांडनी फक्त त्यांचा उद्वेग ऐकून घेतला आहे. त्याला प्रतिसाद दिलेला नाही.
दुसरीकडे माननीय मुख्यमंत्र्यांना नारायणरावांशी 'जमवून'घ्यायला सांगितले आहे. याचाच अर्थ एवढ्यात नेतृत्वबदल होणार नाही असा होतो.
नारायणरावांच्या बंडाचे टायमिंगच नव्हे तर पद्धतही चुकली अशी बातमी सकाळने मुखपृष्ठावर दिली आहे.
कदाचित या बंडाचा फायदा नेतृत्वबदल होईल तेव्हा नारायणरावांऐवजी दुसरा कोणीतरी घेऊन जाईल अशी चर्चाही वर्तमानपत्रात वाचायला मिळाली.
बापु
प्रतिक्रिया
>>
मुख्यमंत्री राणे
सहमत !!
हेच,
तात्या
बरोबर