Skip to main content

वांगे पावटे भाजी

लेखक hitesh यांनी शनिवार, 20/12/2014 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य .. हिरवी वांगी पाव किलो , पावटे पाव किलो तेल , मोहरी , जिरे , हळद एक कांदा , एक टोमॅटो , लसूण पाकळ्या , कढीपत्ता. कांदा व टोमॅटो किसुन घ्यावे. तिखट , मीठ , गूळ , गरम मसाला / भाजी मसाला दोन चमचे दही. ------------------------------------------- कृती.. पावटे उकडुन बाजुला ठेवावेत. थोड्या तेलात मोहरी व जिर्‍याची फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या व कढीपत्ता घालावा.हळद घालावी. मग कांद्याचा कीस घालुन परतावे. मग टोमॅटो कीस घालुन परतावे. या मसाल्यात वांग्याच्या फोडी थोडे पाणी घालुन शिजवावे. वांगी अर्धवट शिजली की उकडलेले पावटे घालावेत. थोडे पावटे क्रश करुन त्याची पेस्ट करुन घालावी. सर्व शिजले की मीठ , तिखट , गूळ व गरम मसाला घालावा. शेवटी गॅस बंद केला की दोन चमचे दही घालुन मिसळुन घ्यावे. ________________________ 1

वाचने 16341
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

In reply to by खटपट्या

अरे बाबा,,, त्यांनी स्वतःला मायबोलीवर "काउ" हे नांव घेतले आहे... आता "काउ" म्हणजे चिमणरावांची "काउ" असा समज पण लोकांनी करून घेतला तर.... अवतारी मंडळी काय वाट्टेल ती नावे घेवू शकतात...

@कंजुस काका, टमाटा फ्रिजर मध्ये टाकुन त्याचा खिस करता येईल.नायतर जुलीयन टाईप बारीक कापायचा. अवांतर-हितेसभाय,मस्त आमच्या नानालापण आवडायची वांगे पावट्याची भाजी.

आम्ही याला वरणं वांगं म्हणतो. बाकी टोमॅटो कसा काय किसला समजलं नाही. आणि भाजीला टोमॅटोचा रंगही दिसत नाही.

In reply to by विनोद१८

बाकी तुमचे कसे काय सुरु आहे? फेब्रुवारी महिन्यात फ्री आहात ना?

In reply to by विनोद१८

सहमत आहे... मिपावरचे सगळ्यात भारी अवतारी आहेत हे... अशा अवतारांना भेटायला मला पण आवडेल...

अहो तिकडे काऊने ने मायबोलीवर हीच भाजी टाकली आहे. वांगे फॅन क्लब : वांगे अमर रहे ! या नावाने. काउ हा तुमचा मायबोलीवरील आयडी आहे का? की तुमच्या "प्रिय व्यक्तीचा"?

..मी 'किसलेला तांबाटु व दोन चमचे दही' इ. साहित्य सहर्ष आणु शकेन, बाकीचे साहित्य इतर आणतीलच.

In reply to by सूड

च्यायला मी कन्नडमध्ये दोन शब्द बोलले की वशाडी येते आणि हिते तर गुजराथी र्‍याम्पेज चालले आहे. चोलबे ना!

माई मोड आॅन: अरे हितेशा, भाजी चांगली आहे पण ह्यांना टमाट्याने अॅसिडिटी होते. वर परत वांगं,पावटे आणि दही पण. म्हणजे आम्लपित्तनाशक आणि वातनाशक काढे घेऊनच ही भाजी बनवावी लागेल! माई मोड आॅफ. बाकी पाकृ चांगली आहे!पुपाप्र!

हितेश्भाई आमच्या जागो मोहन प्यारेंचे अवतार हैत होय. आम्ही उगाच इतर आयडींवर संशय घेउन राह्यलतो. असो. इतर आयडी पण एकाच मूळ आयडीचे अवतार असण्याची शक्यता नाकारता येत नाहिच म्हणा. चिकाटी लय दांडगी हाय हे मात्र मान्य करायला हवे

In reply to by मृत्युन्जय

खुलासा सुरु - प्यारे आणि जागोमोहन प्यारे हे दोन वेगवेगळे आयडी आहेत. - खुलासा संपला.