Skip to main content

एकटा

लेखक Yash यांनी मंगळवार, 16/12/2014 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
बघतो आहे वाट ती आता तरी येईल, आलीच अगदी वेळेवर तरी पुढे काय होईल... तिचे ते डोळे अन् ती मोहक अदा, ते रेशमी केस पाहून झालोय मी फिदा... तिच जागा आणि वेळ पाळण्याचा विक्रम मी रचला, "पेहली नझर का प्यार" वर विश्वास माझा बसला... इतकं सगळं झालं तरी बोलणं काही होत नाही, समोर जरी आली तरी लक्ष मात्र देत नाही.. सरली अशीच दोन वर्षे आता तरी बोलावं, थेट समोर जाउन आता प्रपोजच करावं... मग विचार केला की कसे तिचे मन वळवू, समोर जाऊन बोलण्यापेक्षा पत्रानेच कळवू... एक छान पत्रं मी लिहिले अन् हिमतीने नेउन दिले, न वाचताच तिने ते फाडून फेकूनही दिले... ती निघून गेली अन् डोळ्यासमोर अंधारी पसरली, पाहिलेली लाखो स्वप्नं खाणार्धात विखुरली... प्रेम वगैरे खोटं असतं, प्रयत्न माझा होता खरा.. आता कुणी नको मी आपला एकटाच बरा !!
लेखनविषय:

वाचने 3606
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मस्त ! प्रेम वगैरे खोटं असतं, प्रयत्न माझा होता खरा.. आता कुणी नको मी आपला एकटाच बरा !! हे आधी लक्षात येत नाही, म्हणुनच तर लोच्या होतो ना... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt Oil's Price Decline Weighs On High Yield Debt U.S. shale junk debt tumbles amid oil crunch

छान कविता. अवांतरः ते नझर आणि प्रपोज हे दोन शब्द खटकले.

लिहित राहा. प्रेम वगैरे खोटं असतं, प्रयत्न माझा होता खरा.. आता कुणी नको मी आपला एकटाच बरा !! अजून तरी खोटं बिटं वाटलेलं नाही. :) -दिलीप बिरुटे (आत्ता तरी एकटा)

पत्र तिने न वाचता फोडून टाकून गेली ही गोष्ट बघत बसलो तर आपणाला त्रासाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. त्यापेक्षा कवितेतील इतर गोष्टी पण आहेत त्यातून आपणाला आनंद मिळू शकतो.... असं मला वाटतं.

मस्तच ....... खुप छान लिहील आहे...