Skip to main content

तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia }

लेखक मदनबाण यांनी सोमवार, 13/10/2014 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी आता अ‍ॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अ‍ॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत. हा धागा लुमियाचे अनुभव / अ‍ॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :) अ‍ॅप्स :- १} Transfer my Data :- नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अ‍ॅप आहे, हे अ‍ॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अ‍ॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात. २} Authenticator :- विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अ‍ॅथंटिकेटर अ‍ॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अ‍ॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला. सध्या जसे जसे अ‍ॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अ‍ॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अ‍ॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अ‍ॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे. मायक्रोसॉफ्ट अ‍ॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps

मदनबाण.....


वाचने 129707
प्रतिक्रिया 280

प्रतिक्रिया

In reply to by मोदक

मी १२० पर्यंत गेलो, मग अनइन्स्टॉल केला, परत खेळलो परत अनइन्स्टॉल केला. काल परत नविन व्हर्जन इनस्टॉल केले ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt Oil's Price Decline Weighs On High Yield Debt U.S. shale junk debt tumbles amid oil crunch

माझ्याकडे अजुनही विंडोज विस्ता प्रणाली आहे. आंजावर बरेच संशोधन (?) केल्यावर समजले कि लुमिया फोनसाठी विंडोज ७, ८/८.१ या प्रणालीची आवश्यकता आहे. पुढल्या वर्षी विंडोज १० आल्यावर सध्याचे डबडे बदलायचा विचार आहे. तोपर्यंत थांबून मग लुमिया फोन घेऊ का एखादा अ‍ॅन्ड्रॉइड (मोटो जी) घेऊ? मी लुमिया ७३० किंवा १३२० घ्यायच्या विचारात आहे. १३२० साठी डेनिम अपडेट आली आहे का?

In reply to by भाते

पुढल्या वर्षी विंडोज १० आल्यावर सध्याचे डबडे बदलायचा विचार आहे. तोपर्यंत थांबून मग लुमिया फोन घेऊ का एखादा अ‍ॅन्ड्रॉइड (मोटो जी) घेऊ? अँड्रॉइड फार वाईट आहे असं मी अजिबात म्हणणार नाही,पण नेव्हिगेशनच्या दॄष्टीने विंडोज ८.१ अधिक जलद आहे, तुम्हाला जे अ‍ॅप उघडायचे आहे त्याच्यासाठी पाने उलटवत बसण्याची गरज यात लागत नाही. मी अ‍ॅन्ड्रॉइडच्या बॅग्राउंडला चालु राहणार्‍या प्रोसेसमुळे लवकर बॅट्री ड्रेन होण्याच्या त्रासाला कंटाळलो होतो, जो विंडीज मधे अजिबात जाणवला नाही. काही गोष्टी मात्र नक्कीच अ‍ॅन्ड्रॉइड मधे फायदेशीर आहेत, त्यातले अर्थात पहिले म्हणजे अ‍ॅप्स { आता बरेचसे विंडोजवर देखील उपलब्ध आहेत / होत आहेत.} आणि दुसरा मला जाणवलेला, म्हणजे इंनफर्मेशन शेअरिंग, यात अजुन विंडोज जरा मागे आहे, पण सुरक्षतेचा विचार केल्यास विंडोज हा नक्कीच अ‍ॅन्ड्रॉइडला मागे टाकतो. १३२० साठी डेनिम अपडेट आली आहे का? या बद्धल एव्हढा अंदाज नाही, बहुतेक डेनिम अपडेटचे अ‍ॅप उपलबध आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }

जुना महागडा(!) नेक्सस-४ पडला आणि त्याचे पॉवर बटन निकामी झाले. दुरुस्तीला बराच खर्च येत होता. तेव्हा वाट पाहिली नंतर महिन्याभरात आणखी एकदा पडला तर व्हॉल्युम बटन बंद पडले. आता रिपेअर करण्याऐवजी फुटण्याची वाट पाहतोय (ग्लास कन्स्ट्रक्शन असल्याने तेही होईलच.) शेवटी तो रिपेअर करत बसण्याऐवजी ही चर्चा वाचून रिपेअरच्या कॉस्टमध्ये येईल असा एक स्वस्तातला नोकिया लुमिया (५२०) घेतला. खूपच आवडला. घेतला तेव्हा विंडोज-८ होते. अपडेट करुन ८.१ आले. बॅटरी लाईफ खूपच चांगली. विशेष म्हणजे किंमतीच्या मानाने फारच चांगला आहे. ५१२ एमबी रॅम असूनही अत्यंत स्मूथ आणि फास्ट. मी वापरतो ते व्हॉट्सॅप, इमेल, मॅप्स, रेडिओ, म्युझिक वगैरे सगळे व्यवस्थित चालते. वर्षभर चालला तरी पैसे वसूल. पडला झडला तरी फार दुःख होणार नाही. इतर फालतू अॅप्स व गेम्समध्ये फारसा रस नाही. त्याबाबत पास. कोर्टाना तर जबराच आहे बॉ. तिला रोज एक जोक सांगायला लावतो.

In reply to by आजानुकर्ण

तुम्ही वापरत असलेले अ‍ॅप्स / गेम्स सुचवले तर आनंदच होइल. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

In reply to by मदनबाण

थर्ड पार्टी अॅप विशेष वापरत नाही. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी एमएसएन वेदर वापरतो. मायक्रोसॉफ्ट हेल्थही चांगले वाटले. जीपीएस अतिशय उत्तम दर्जाचा आहे. मॅप डाऊनलोड करुन ऑफलाईन वापरता येतात. मिक्स रेडिओ छान वाटले. गाणी फुकट डाऊनलोड करुन ऐकता येतात. बाकी इमेल्स, व्हॉट्सअॅप वगैरे. वयोमानाने नवीन अॅप्स झेपत नाहीत. ;)

मला लुमिआचे (५२५,७२० ,५३५ )वगैरेंचे स्पे॰ पटले फक्त एक सोडून =कैमरा आस्पेक्ट रेशो 4:3 नसून16:9 आहे. लांबुडके फोटो क्लोजअपला काय कामाचे ?ते बदलायचा पर्याय ठेवला आहे का ? 4:3मध्ये आपण पोट्रेट आणि आडवे लैँडस्केप दोन्ही काढू शकतो.

In reply to by कंजूस

कॅमेर्‍याच्या सेटिंग मधे आस्पेक्ट रेशो बदलण्याचा पर्याय आहे. { निदान माझ्या मोबल्या मधे तरी आहे.} 16:9 हा वाईड स्क्रीन फोटो घेण्यासाठी अधिक उपयुक्त आहे. लुमिया धारकांसाठी काही महत्वाचे दुवे देवुन ठेवतो :- Nokia Pro Camera now available for Lumia 920, 925, and 928 Can changing the aspect ratio on the Nokia Lumia 920 sharpen images? Nokia Lumia 930 Camera Tips & Tricks Lumia Creative Studio 4 ways to improve your photos with Nokia Creative Studio 6.0 Windows Phone 8.1 Tips, Tricks and How To

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

७३०मध्ये ? शिवाय या लांबुडक्यांचे प्रिंटस काढतांना चांगलीच फोडणी बसेल.

५" स्क्रीन आणि ड्युअल सिम असे कोणते मॉडेल आहे काय ? ४.५" स्क्रीन थोडा लहान वाटतो.

In reply to by धर्मराजमुटके

शेवटी मला हवा असलेले फिचर्स घेऊन मायक्रोसॉफ्ट लुमिया ५३५ आला रे आला. ५" स्क्रीन, ड्युअल सिम, १जीबी मेमरी आणि ८ जीबी स्टोअरेज. नोकीयाच्या ऐवजी मायक्रोसॉफ्टची नाममुद्रा आहे. एक आठवडा थांबून, प्रतिक्रिया बघून घ्यावा म्हणतो.

१)याच ५३५ ,५२५ वगैरेचे जिएसेम अरेना'मधले स्पेसि॰ वाचल्यास 'जावा सपोर्ट := नाही' असे लिहिले आहे .याचा अर्थ काय ?विंडोमध्ये जावा गेम्स चालत नाहीत का ? का आणखी काही अर्थ आहे ? २)लुमिआ ६३०ची SAR VALUE 1.55 आहे जी जास्तीच्या मर्यादेच्या =1.8जवळ आहे तर काही इतर फोन्सची 1.0च्या आसपास असते याने काय धोका वगैरे असतो का याविषयी कूपया जाणकारांनी इथे अथवा वेगळ्या धाग्यात प्रकाश टाकावा ही विनंती.

lumia 535 जबरा फोन. मला हवी ती सगळी फिचर्स आहेत. किमतीला जड जातोय पण या महिन्यात येईल हातात.

lumia 535 १० डिसेंबरपासून उपलब्ध होईल असे अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर लिहिले आहे. फ्लिपकार्ट्वरही हे सध्या उपलब्ध नाही. हे मॉडेल दुकानातून मिळायला लागले आहे का? अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टवर याची किंमत ९१९९ दिली आहे. दुकानातून मिळत असल्यास यापेक्षा कमी किंमतीला मिळेल का?

In reply to by श्रीगुरुजी

lumia 535 सध्यातरी विकायला नाही.आज nokia care मध्ये पाहायला मिळाला.महिनाखेर विकत मिळेल. किमंत सर्वत्र सारखी आहे. 9199 /- मला हीच सांगितली आहे दुकानात.

In reply to by जेपी

धन्यवाद! कदाचित अ‍ॅमेझॉनवर १० डिसेंबरपासून मिळेल असं वाटतंय. फ्लिपकार्टवर ८ ते १२ डिसेंबरपर्यंत १०% सवलत मिळणार आहे. बघूया तिथे हे मॉडेल ९१९९ पेक्षा कमी किंमतीत मिळतंय का.

५३०/५३५ च्या तोडीचा विंडोजचा फोन लावा कंपनीकडुन कडून निम्या किंमतीत, फक्त ५ हजारात येतो आहे.

In reply to by भाते

होय पण १)नोकिआच्या फोनमधल्या कैमरावर (प्रिंटस चांगले येतात)भरोसा आहे तेवढा कोणत्याही दुसऱ्या फोनवर नाही. २)लावा आजारी पडला तर कोणत्या ससाण्याकडे जायचे? ३)एचटीएमेल नोटस (वन नोट) आहे का? ४)ऑफलाइन मैपस नाही मिळणार. ५)१५जीबी फ्री ऑनलाइन स्टॉरेज कोण देणार? आता लावा हिशेब ५ हजारांचा.

In reply to by वेल्लाभट

लावा च्या साईट वर स्पेक्स दिलेली असता, जावा = नो असं आहे. त्याचा काय अर्थ? Java apps are not and will not be supported in Windows Phone

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

आजचे अ‍ॅप्स :- १} Photosynth :- हे मायक्रोसॉफ्टचे panorama अ‍ॅप आहे. सोप्पे आणि मस्त. २} Office Lens:- हे सुद्धा मायक्रोसॉफ्टचे अ‍ॅप आहे, याचा उपयोग तुमच्या डॉक्युमेंटचे / व्हाइट बोर्डचे वाचता येण्या सारखे फोटो काढण्यासाठी होतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे

2 डिसेंबर रोजी 9200 रु. मधे घेतला,मस्तच आहे आधीच्या 720 च्या तुलनेत मोठी स्क्रीन,जास्त रॅम आणि किंमत कमी.सध्या हाच वापरतो आहे.

In reply to by रवीराज

अ‍ॅमेझॉनवरून बुक केलाय. ११ ते १३ तारखेपर्यंत घरी येईल. आतापर्यंत वाचलेले रिव्ह्यू चांगले आहेत. या मॉडेलवर तुमचाही फीडबॅक लिहा.

कसा आहे? नुकताच आलाय. स्पेक्स भारी आहेत. सेलकॉनचाही विंडोज फोन आलाय याच किमतीत. त्यापेक्षा लाव्हा चांगला वाटला मला कागदावर व चित्रांमधून.

In reply to by वेल्लाभट

इतर विंडोज फोनची स्पेक्स वरुन तुलना करताना हे स्पेक्स हार्डवेअर डिपेंड असतात हे नेहमी लक्षात ठेवावे. इतर फोनच्या तुलनेत मायक्रोसॉफ्ट {एक्स नोकिया } हे केव्हाही सरस ठरेल. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

In reply to by मदनबाण

गॉट इट! माझ्या कव्वा चालणा-या ६२० चं भवितव्य अंधारात आहे. म्हणून चाचपतोय. नाईलाजाने. बसमधे बसलो असताना खिशातून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केलान त्याने. का ते त्यालाच ठाऊक. ते टचस्क्रीन वर बेतलंय त्याच्या. कोण जाणे नीट होतो का नाही आता. ५३५ महाग आहे चायला. मोअर सो, कारण ६२० ला वर्ष पूर्ण व्हायला काही दिवस असताना हे असं झालंय. म्हणून ५३५ ची किंमत मोठी भासतेय. बघू !

ल्युमियाचा सि डी एम ए फोन उपलब्ध आहे का भारतात / मुंबईत? बजेट साधारण २०-२५ हजारच्या मधे आहे. नोकिया प्रायॉरिटी मधे गेलो असता नोकिया सि डी एम ए फोन बनवत नाही असं सांगितलं पण आं.जा. वर बनवतं असं दिसतंय म्हणून गोंधळ उडाला. कुणाला अनुभव आहे का?

बहुतेक नोक्या आधी बनवायची...पण आत्ताच ठावुक नाही. बाकी कंपन्यांचे मोबाइल मॉडेल्स इतर कंपन्यांचे आहेत. अधिक इकडे :- http://shop.rcom.co.in/ { इथे काही सीडीएमए मोबाइल दिसत आहेत. }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'

In reply to by मदनबाण

एच टि सि डिझायर ५१६ सी घेण्यात आलेला आहे. माझ्या रेंज मधे असलेला फोन हाताळायला फारच मोठा असल्याने हा घेतला. मस्त आहे फोन.

आजचे अ‍ॅप :- Gestures Beta :- With Gestures you can control some of the functionalities of your phone without touching the display.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt Oil's Price Decline Weighs On High Yield Debt U.S. shale junk debt tumbles amid oil crunch

वॉट्स अ‍ॅप आणि विंडोज फोनचे वाकडे आहे का? माझ्या फोनवर चुकून कधीतरी सुतासारखे चालते आणि कधीतरी एकदम १००-१५० मेसेज बदाबदा येऊन पडतात. कधीतरी फोन रिस्टार्ट करा म्हणून आज्ञा येते. काही उपाय आहे का? दुसर्‍या कोणत्याही अ‍ॅपला असला प्रॉब्लेम नाही.

In reply to by पैसा

फोनचे माहिती नाही, परंतु वत्स अप्प जर सारखे चेक करत नसाल आणि दिवसभरात एकदाच चेक करायचे अशा पंथातील असाल तर पीशीवरही वत्स अप्प इन्स्टॉल करता येते- ब्ल्यूस्टॅक्स नामक अँड्रॉईड इम्युलेटर इन्स्टॉल करून त्याद्वारे वत्स अप्प इन्स्टॉल करून बघता येते.

In reply to by बॅटमॅन

तो उपद्व्याप केला आहे. पण पीसीवर कायम वॉट्स अ‍ॅप ठेवणे शक्य नाही. कारण पीसी चालू नसतो बराच वेळ. तसेच मोबल्यावर दर मिनिटाला चेक करणे शक्य नसतेच. पण कधी कधी लोकांनी पाठवलेले मेसेजेस सकाळचे रात्री पोचतात म्हणून विचारले की निदान कोणाचा मेसेज आहे ते पाहून बघायचा की नंतर पाहिला तरी चालेल हे ठरवता येते.

In reply to by पैसा

वॉट्स अ‍ॅप आणि विंडोज फोनचे वाकडे आहे का? अगदीच वावडे असे नाही,पण जरासे स्लो आहे. माझ्या फोनवर चुकून कधीतरी सुतासारखे चालते आणि कधीतरी एकदम १००-१५० मेसेज बदाबदा येऊन पडतात. बॅटरी सेटिंगचा हा परिणाम असु शकतो... व्हॉट्सअअ‍ॅप ओपन करण्याच्या आधी पावर सेटंग ऑफ करुन पहा काही फरक पडतो आहे का ते...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Make In India

In reply to by पैसा

स्मार्टफोन टेक्नॉलॉजी आता 'फुलथ्रॉटल' मोडमध्ये गेल्याने भल्याभल्यांची फोन वापरताना पंचाईत होते.

आजची अ‍ॅप्स :- MX Player :- हा प्लेअर आता विंडोज फोनवर सुद्धा उपलब्ध झाला आहे. :) SDCard Tube Downloader :- या अ‍ॅप ने यूट्युबवरचे व्हिडीयो डाउनलोड करता येतात. जरी याच्यात एसडी कार्डवर फाइल सेव्ह करण्याचा ऑप्शन दिला असला तरी तो अजुन नीट चालत नाही. यावर उपाय म्हणजे फोन मधल्या डाउनलोड फोल्डर मधे व्हिडीयो सेव्ह करणे आणि तिथुन एसडी कार्डवर मूव्ह करणे. याचा वापर करुन मी Make In India हा व्हिडीयो आणि लोकमान्य { एक युगपुरुष } या आगामी मराठी चित्रपटातले "गजानना" गाणे व्हॉट्सअ‍ॅप वर शेअर करुन पाहिले आहे,इट वर्क्स ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गजानना गजानना :- लोकमान्य { एक युगपुरुष } Releasing 2nd January, 2015

एक आठवड्यापूर्वी ल्युमिया ५३५ घेतला. मस्त फोन आहे. अ‍ॅन्ड्रॉईड फोन याच्या तुलनेत खूप नीरस वाटायला लागलेत. फोटोसुद्धा खूप चांगले येताहेत.

In reply to by कंजूस

मायक्रोसॉफ्ट नविन ब्राउजर मार्केट मधे आणणार आहे अश्या बातम्या सध्या जालावर आहेत. या नव्या ब्राउजरचे नाव "Spartan " असेल. अधिक इकडे :- Microsoft Is Reportedly Working On A Completely New Web Browser Microsoft is building a new browser as part of its Windows 10 push

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing businessMake in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market

@मदनबाण तुमच्या सहीत आर्थीक बातम्या अद्ययावत होत असतात त्याचा एक "उलाढाल" धागा काढणार का? आणि थोडक्यात त्याचे महत्त्व टाकलेत तर मजा येईल. उदा रूबलचे अवमुल्यन का होतंय अमेलिकेचं कर्ज का वाढतंय ?इत्यादी. मराठी पेपरांतले असले लेख डोक्यावरून जातात अथवा काही शंका निरसन नंतर होत नाही.

In reply to by कंजूस

@मदनबाण तुमच्या सहीत आर्थीक बातम्या अद्ययावत होत असतात त्याचा एक "उलाढाल" धागा काढणार का?थोडक्यात त्याचे महत्त्व टाकलेत तर मजा येईल. हम्म... आयड्या चांगली हाय, पण सध्या सही रे सही... असंच राहु द्याव अस वाटतया... आपल्या सारखी मंडळी सहीतले दुवे वाचण्याचे कष्ट घेत आहेत हे पाहुन हा उध्योग अगदीच वाया जात नाही याचा आनंद वाटला. :) उदा रूबलचे अवमुल्यन का होतंय अमेलिकेचं कर्ज का वाढतंय ?इत्यादी. मराठी पेपरांतले असले लेख डोक्यावरून जातात अथवा काही शंका निरसन नंतर होत नाही. ह्म्म्म,,, एक बातमी अशीही :- No, China does not hold more than 50 percent of U.S. debt Foreign Holdings of Federal Debt {पीडीएफ}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market

In reply to by मदनबाण

मदणबाण यांचा अभ्यास आर्थिक, सामाजिक, तांत्रीक, सौंदर्य (तसेच गाण्यांच्या अंगाने शारिरीक) या क्षेत्रात फार मोठा आहे. त्यांना 'मिपाचे सर्व-संदर्भ व्यक्तिमत्व' हा पुरस्कार देण्यात यावा यासाठी मी सर्व सदस्यांकडे मागणी करतो.

ड्रॉपबॉक्सचे ऑफिशिअल अॅप आता विंडोज फोनसाठी उपलब्ध झाले आहे.

मदनबाण यांचे वरील प्रतिसाद वाचून मला वाटतं ते खरंच लेखन थांबवतील आता इथे या लेखात मी पण शेवटचे डकवतोय विंडोज १० अपग्रेड लवकरच ८.१साठी येत आहे : trustedreviews dot com/news/ लिंक इथे जयहिंद.

५३५ एक महीना वापरतोय फोटो छान येतात फ्रन्टसुध्दा विशेष करुन दिवसा Here maps works best special mention is it's offline Rest all features are competitive

आजच 535 मिळाला. बजेट मध्ये बसला. असो या टायमाला तो नाल्यात जिव देणार नाही याची काळजी घेईन. नविन माहिती कळवत राहीन.

नवीन लुमिया येतोय. http://www.microsoft.com/en-in/mobile/phone/lumia640-dual-sim/specifica… १ जीबी रॅम, उत्तम रिझॉल्युशन आणि बॅटरी आणि आवश्यक ते सर्व सेन्सर्स. लुमियाच्या सर्वच फोन्सचा फॉर्म फॅक्टर फारच छान आहे.
    • Lumia 640 Dual SIM
    • Lumia 640 Dual SIM
    • Lumia 640 Dual SIM
    • Lumia 640 Dual SIM
    72.2mm
    • Lumia 640 Dual SIM
    • Lumia 640 Dual SIM
    • Lumia 640 Dual SIM
    • Lumia 640 Dual SIM
    141.3mm
    8.8mm
  • Front camera:
    HD 0.9 MP wide angle 
  • Flash type:
    LED flash 
  • Processor type:
    Quad-core 1.2GHz 
  • Maximum talk time (3G):
    20.3 h
  • Maximum standby time with dual SIM:
    35 days
  • Free cloud storage1:
    30 GB

In reply to by श्रीगुरुजी

भारतातील किंमत १०००० च्या आत असावी असं वाटतंय. किंमत नवीन मोटो ई (एलटीई) च्या आसपासच राहील.

In reply to by श्रीगुरुजी

http://au.ibtimes.com/microsoft-lumia-640-lumia-640-xl-dual-sim-variant… इथं ल्युमिया 640 ची किंमत 4,683 अ‍ाणि 640 एक्सएलची किंमत 6,410 आहे असं आलंय. स्पेसिफिकेशनच्या तुलनेत हे फोन फारच स्वस्त आहेत.

640 XLफैबलट पण काढलाय . 640XL मधला कैमरा कार्ल जाइसचा सर्वोत्तम आहे.रेजलुशन १२८० X७२० आहे.डिसेंबरपर्यँत नवीन विंडोज १०ला अपग्रेड करतील. ६३० मधला क्वॉलकॉम स्नैपड्रैगन ४०० क्वॉडकोर प्रसेसर तापतो फार. विंडोज फोन८.१ मध्ये फाईल मैनेजर नाही आणि वेबपेजिज ऑफलाइन सेव होत नाहीत. माहितीसाठी माइक्रोसॉफ्टची ही एक लिंक पाहा

In reply to by कंजूस

फाईल मॅनेजर अ‍ॅप स्टोअर वर मिळतात. त्यातल फाईल एक्स्प्लोरर वापरा. पहिल्या वापराच्या वेळी फाईल रिड करायला साधारण ५-१० मिनिट लागतात अ‍ॅपला. पण एकदा १००% सिंक झालं की पी.सी. एवढचं सोपं पडतं.

२ एक महिन्यापूर्वी लावा आयरिस विन वन घेण्यात आलेला आहे. Network Technology GSM / HSPA Launch Announced 2014, December Status Available. Released 2014, December Body Dimensions 125 x 64.3 x 11 mm (4.92 x 2.53 x 0.43 in) Weight - SIM Dual SIM (Mini-SIM, dual stand-by) Display Type Capacitive touchscreen, 16M colors Size 4.0 inches (~56.7% screen-to-body ratio) Resolution 480 x 800 pixels (~233 ppi pixel density) Multitouch Yes Platform OS Microsoft Windows Phone 8.1 Chipset Qualcomm Snapdragon 200 CPU Quad-core 1.2 GHz Memory Card slot microSD, up to 32 GB Internal 8 GB, 1 GB RAM Camera Primary 5 MP, 2592 х 1944 pixels, autofocus, LED flash Features Geo-tagging, panorama Video Yes Secondary VGA Sound Alert types Vibration; MP3, WAV ringtones Loudspeaker Yes 3.5mm jack Yes Comms WLAN Wi-Fi 802.11 b/g/n, Wi-Fi Direct, hotspot Bluetooth v3.0, A2DP GPS A-GPS Radio FM radio USB microUSB v2.0 Features Sensors Accelerometer, proximity Messaging SMS (threaded view), MMS, Email, Push Email, IM Browser HTML5 Java No - OneDrive (15 GB cloud storage) - MP3/WAV/eAAC+/WMA player - MP4/H.264/WMV player - Document viewer - Video/photo editor Battery Li-Ion 1950 mAh battery रंग Black किंमत ५०००

चांगला वाटतोय लावा आइरीस विन पाच हजारात. एकंदरीत "विंडोज फोन ८.१" ओएस वगैरे डोकेफोड आहे. १)दुसरा फास्ट ब्राउजर या ओएसवर उपलब्ध नाही आणि आइ ११ IE11 सिमच्या नेटवर फारच स्लो चालतो. २)हिँदी देवनागरी कीपैड पर्याय आहे परंतू त्यात मराठीतले अनुस्वार देता येत नाहीत. इन्डिआ(इंडिआ) गङगा (गंगा)असे लिहावे लागते. ३) IE 11 डेटा फार खातो. ४)पूर्ण ऑफिस वर्ड एक्सेल वगैरे ऑफलाइन चालते हा एक प्लसपॉइंट आहे लुमिआ फोनमध्ये.

In reply to by कंजूस

क्र. १ शी तितकासा सहमत नाही. टकाटक चालतो ब्राउझर क्र. २ शी मुळीच सहमत नाही. उत्तम टायपिंग होते. बग एकच आहे हिंदी कीबोर्ड मधे की ऑ टाईप करताना दुसरा कान्हा सुटा येतो. बघून कळतं, पण तरीही. क्र. ३ असेल ब्वा. क्र ४. नक्कीच. लावा आयरिस विन वन मधेही काही सोयींचा अभाव आहे. पण ५००० मधे अजून काय हवं!

क्र १सिम कार्ड २जी/३जी आणि एअरिआवर फरक पडत असेल क्र २ लावाचे कीपैड चांगले दिसतंय वेबपेज ऑफलाइन सेव झाल्यास फार उपयोग होईल पुन्हा पुन्हा लोड करायला नको. ५)माईकरोसॉफ्टचं AAC वरचं प्रेम आणिWAV शी वाकडं का आहे ?साउंड रेकॉर्डीँग WAVमध्ये करायचा पर्याय हवा होता AMR कशाला ?नाहीतरी मेमरी कार्डावरच जाणार ना ? ६)लुमिआतले दुसरे सिम फोन बंद न करताच टाकता /काढता येते (मेमरी कार्डासारखे) हे आवडले.