मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अकारण

सार्थबोध · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पेशावर येथील १६ डिसेंबर २०१४ रोजी शाळेतील मुलांवर झालेल्या प्राणघातक अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध... सुंदर बगीचे साजिरे, भवताल सारे गोजिरे प्राजक्त मुक्त बहरले, गंध तयाचे दरवळे ll १ ll कोण सैतान आले, विचार क्रूर तयांचे खोटे गंध प्राजक्ताचे, ओरडून सांगू लागले ll २ ll प्राजक्त तरीही बहरले, गंध उधळू लागले विकृत विचारी सैताने, विचित्र सारे योजिले ll ३ ll हल्लाबोल केला प्रहारे, प्राजक्त वृक्ष ताडिले सांडले घोष प्राजक्त, तरीही दरवळू लागले ll ४ ll अन्य ठावे सैतान गेले, उजाडून झाड अवघे क्रूरतेने काय साधले, प्राजक्त अकारण ओघळले ll ५ ll पडल्या कळ्या पाकळ्या, मातीसही न दुखविले उरल्या एकल्या फांद्यांची, माणुसकी; काय करील सांत्वने ? ll ६ ll http://www.saarthbodh.com/2014/12/blog-post_17.html - सार्थबोध

वाचने 1085 वाचनखूण प्रतिक्रिया 2