आज पाकिस्तानात पेशावरमधील 'आर्मी पब्लिक स्कूल' या शाळेत ७-८ तेहरिक्-ए-तालिबान च्या अतिरेक्यांनी घुसून अंदाधुंद गोळीबार केला. आतापर्यंत या अतिरेकी हल्ल्यात अंदाजे १२३ मुले व ९ इतर जण मृत्युमुखी पडले असून ६ अतिरेक्यांना पाकिस्तानी लष्कराने कंठस्नान घातले आहे. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान ४० मुलांची प्रकृती गंभीर आहे.
'मलाला'ला काही दिवसांपूर्वीच नोबेल पारितोषिक मिळाल्याचा संताप येऊन तालिबानी अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. तालिबानचा जन्मदाता पाकिस्तानच आहे. जे भयंकर विष पाकिस्तानने पेरले तेच आता त्यांच्यावर उलटले आहे. १९४७ साली स्वतंत्र देश मिळाल्यावर देशाचा विकास करण्याऐवजी पाकिस्तानने गेली ६७ वर्षे फक्त काश्मीर या एकाच विषयावर लक्ष केंद्रीत करून युद्ध, अतिरेकी हल्ले, धर्मांध प्रचार अशा भयंकर मार्गांनी येनकेनप्रकारेण काश्मीर परत मिळवायचा प्रयत्न केला. आपल्या देशाचा विकास व्हावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा, उद्योगधंदे वाढावेत, देशाची आर्थिक स्थिती सुधारावी इ. महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त लष्कर, शस्त्रास्त्रे, युद्ध, दहशतवाद इ. वरच पाकिस्तानने भर दिला. भारताबरोबर ४ वेळा युद्ध करून हात पोळून घेतले. १९८९ पासून सातत्याने भारतात दहशतवादी पाठवून भारताला 'हजार जखमा' करून त्रास द्यायचा प्रयत्न केला. भारतात दहशतावादी कृत्ये करणार्या दाऊद, टायगर मेमन, भटकळ बंधू, हफीझ सईद, मसूद अझर इ. भयंकर दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना शस्त्रास्त्रे, आर्थिक मदत व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे समर्थन केले. लहान कोवळ्या मुलांना आधुनिक शिक्षण देण्याऐवजी त्यांना मदरशात पाठवून सतत धर्म व जिहाद चे ब्रेनवॉशिंग करून अनेक तरूण पिढ्या बरबाद केल्या. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माईंड हफीज सईद, मुंबई बॉम्बस्फोटाचे सूत्रधार दाऊद व मेमन बंधू, भारतात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट करणारे भटकळ बंधू अशा दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देऊन पाकिस्तान भयंकर घोडचूक करीत आहे.
आज पाकिस्तानला आपल्याच कृत्याची भयंकर किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तानला आवरणारा या जगात कोणताच देश नाही का? खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे.
पाकिस्तानला अजूनही सुधारण्याची संधी आहे. दहशतवाद्यांची मदत बंद करून व मदरशातून दिले जाणारे धार्मिक व जिहादी शिक्षण बंद केले तर अजूनही पाकिस्तान योग्य त्या मार्गावर जाऊ शकतो. अन्यथा असे हल्ले परत परत होत राहतील व कधी पाकिस्तानातील, कधी भारतातील तर कधी इतर कोणत्यातरी देशातील निरपराध नागरिकांना याची भयंकर किंमत मोजावी लागेल.
वाचने
36334
प्रतिक्रिया
121
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिणकस रुढी आणि निष्पाप
In reply to मी रूढींनी म्हटलंय मित्रा. by प्रचेतस
मत्स्य न्याय
परफेक्टली लॉजिकल ! वैदिक धर्म प्रचंड लॉजिकल आहे ... तुमच्या हिंदु धर्माचे माहीत नाही :Dहिंदू धर्मसुद्धा अतिशय हिणकस
In reply to बुवांचा इस्लामविषयक अभ्यास by प्रचेतस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलितइस्लामचे उपद्रवमूल्य वादातीत
In reply to हिंदू धर्मसुद्धा अतिशय हिणकस by मदनबाण
स्वतःच्या घरात काय जळते आहे
In reply to इस्लामचे उपद्रवमूल्य वादातीत by प्रचेतस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलितबदल झाला आहे, होत आहे आणि
In reply to स्वतःच्या घरात काय जळते आहे by मदनबाण
येथे इस्लामचे समर्थन करण्याचा
In reply to बदल झाला आहे, होत आहे आणि by प्रचेतस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलितहा धागा ब्राम्हण-अब्राम्हण
In reply to येथे इस्लामचे समर्थन करण्याचा by मदनबाण
येक्झ्यॅक्टली
In reply to हिंदू धर्मसुद्धा अतिशय हिणकस by मदनबाण
हिंदु धर्मीयांनी प्रोअॅक्टीव्हली केलेल्या हिंसेचे एक उदाहरण द्या
हा माझा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे ! ( एक पुष्यमित्र शुंगाचे नाव घेता येते पण त्याने केलेले हिंसा हे अशोकाच्या आतातायीपणाला दिलेली रीईक्शन होती असे मानायला लईच वाव आहे )गुप्तांच्या वैभवशाली
In reply to येक्झ्यॅक्टली by प्रसाद गोडबोले
मत्स्य न्याय
In reply to गुप्तांच्या वैभवशाली by प्रचेतस
असहमत.
In reply to गुप्तांच्या वैभवशाली by प्रचेतस
आय मीन, अरबांच्या
In reply to असहमत. by बॅटमॅन
सहमत आहेच रे.
In reply to असहमत. by बॅटमॅन
हां ते आहेच. या वाक्यातून
In reply to सहमत आहेच रे. by प्रचेतस
ओह्हो.
In reply to हां ते आहेच. या वाक्यातून by बॅटमॅन
तुम्ही दोघं सारखं असं लिंबोत
In reply to हां ते आहेच. या वाक्यातून by बॅटमॅन
आमची चर्चा वेगळ्या
In reply to तुम्ही दोघं सारखं असं लिंबोत by प्रसाद गोडबोले
तदुपरि इथे मुद्दा कोण भरकटवते
In reply to आमची चर्चा वेगळ्या by बॅटमॅन
हिंदू धर्मात हिणकस रूढी आहेतच
In reply to तदुपरि इथे मुद्दा कोण भरकटवते by प्रसाद गोडबोले
फक्त इथे त्यांचा उल्लेख
In reply to हिंदू धर्मात हिणकस रूढी आहेतच by बॅटमॅन
आता ह्या विषयी बोलायचे झालेच
In reply to फक्त इथे त्यांचा उल्लेख by प्रसाद गोडबोले
अंशतः असहमत.
In reply to आता ह्या विषयी बोलायचे झालेच by बॅटमॅन
अशी बायनरीछाप प्रतिक्रिया या
In reply to अंशतः असहमत. by प्रसाद गोडबोले
अतृप्त बुवांची प्रतिक्रिया
In reply to अशी बायनरीछाप प्रतिक्रिया या by बॅटमॅन
मलाही
In reply to फक्त इथे त्यांचा उल्लेख by प्रसाद गोडबोले
येस्स!!
In reply to मलाही by क्लिंटन
मध्ययुगीन भारताचा हा इतिहास
In reply to गुप्तांच्या वैभवशाली by प्रचेतस
मुळात "खरा" ब्राम्हण ही
In reply to प्रॉब्लेम असा आहे.की असे by अत्रुप्त आत्मा
ऑपरेशन दर्ब ए अर्ज
सर्व प्रथम या भ्याड हल्ल्याचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलिततुम्हा लोकांना खरेच असे वाटते
In reply to सर्व प्रथम या भ्याड हल्ल्याचा by मदनबाण
>>> भविष्यातला भयानक धोका :-
असे झाले तर अमेरिका व इतर
In reply to >>> भविष्यातला भयानक धोका :- by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलितअजूनपर्यंत हाफिझ सईद किंवा
In reply to असे झाले तर अमेरिका व इतर by मदनबाण
जूनपर्यंत हाफिझ सईद किंवा
In reply to अजूनपर्यंत हाफिझ सईद किंवा by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित>>> अच्छा,म्हणजे अमेरिका
In reply to जूनपर्यंत हाफिझ सईद किंवा by मदनबाण
नक्कीच. जोपर्यंत आपल्याला
In reply to >>> अच्छा,म्हणजे अमेरिका by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित>>> परत चूक... अमेरिकाच अश्या
In reply to नक्कीच. जोपर्यंत आपल्याला by मदनबाण
बाकी मुंबईत सिसिटीव्ही कॅमरे
In reply to जूनपर्यंत हाफिझ सईद किंवा by मदनबाण
घंटा....त्याऐवजी...हाम्रिका
In reply to >>> भविष्यातला भयानक धोका :- by श्रीगुरुजी
काल रात्री
तरीही पाकिस्तानी सैन्य
In reply to काल रात्री by भाते
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित>>> काल, १६ तारखेला अश्या
In reply to काल रात्री by भाते
झालेल्या दु:खद घटनेवर काही
घटना दुर्दैवी आहे.
ह्या घटनेनंतर पाकीस्तान
In reply to घटना दुर्दैवी आहे. by प्यारे१
मी भारताच्या अथवा
In reply to ह्या घटनेनंतर पाकीस्तान by क्लिंटन
छे हो तसे काही होणार नाही.
In reply to मी भारताच्या अथवा by प्यारे१
+ १
In reply to छे हो तसे काही होणार नाही. by क्लिंटन
तालिबान्यांच्या हल्ल्यात
लेख