Skip to main content

पेशावरमधील शाळेवर हल्ला - पेरले तेच उगवले

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 16/12/2014 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज पाकिस्तानात पेशावरमधील 'आर्मी पब्लिक स्कूल' या शाळेत ७-८ तेहरिक्-ए-तालिबान च्या अतिरेक्यांनी घुसून अंदाधुंद गोळीबार केला. आतापर्यंत या अतिरेकी हल्ल्यात अंदाजे १२३ मुले व ९ इतर जण मृत्युमुखी पडले असून ६ अतिरेक्यांना पाकिस्तानी लष्कराने कंठस्नान घातले आहे. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान ४० मुलांची प्रकृती गंभीर आहे. 'मलाला'ला काही दिवसांपूर्वीच नोबेल पारितोषिक मिळाल्याचा संताप येऊन तालिबानी अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. तालिबानचा जन्मदाता पाकिस्तानच आहे. जे भयंकर विष पाकिस्तानने पेरले तेच आता त्यांच्यावर उलटले आहे. १९४७ साली स्वतंत्र देश मिळाल्यावर देशाचा विकास करण्याऐवजी पाकिस्तानने गेली ६७ वर्षे फक्त काश्मीर या एकाच विषयावर लक्ष केंद्रीत करून युद्ध, अतिरेकी हल्ले, धर्मांध प्रचार अशा भयंकर मार्गांनी येनकेनप्रकारेण काश्मीर परत मिळवायचा प्रयत्न केला. आपल्या देशाचा विकास व्हावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा, उद्योगधंदे वाढावेत, देशाची आर्थिक स्थिती सुधारावी इ. महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त लष्कर, शस्त्रास्त्रे, युद्ध, दहशतवाद इ. वरच पाकिस्तानने भर दिला. भारताबरोबर ४ वेळा युद्ध करून हात पोळून घेतले. १९८९ पासून सातत्याने भारतात दहशतवादी पाठवून भारताला 'हजार जखमा' करून त्रास द्यायचा प्रयत्न केला. भारतात दहशतावादी कृत्ये करणार्‍या दाऊद, टायगर मेमन, भटकळ बंधू, हफीझ सईद, मसूद अझर इ. भयंकर दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना शस्त्रास्त्रे, आर्थिक मदत व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे समर्थन केले. लहान कोवळ्या मुलांना आधुनिक शिक्षण देण्याऐवजी त्यांना मदरशात पाठवून सतत धर्म व जिहाद चे ब्रेनवॉशिंग करून अनेक तरूण पिढ्या बरबाद केल्या. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माईंड हफीज सईद, मुंबई बॉम्बस्फोटाचे सूत्रधार दाऊद व मेमन बंधू, भारतात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट करणारे भटकळ बंधू अशा दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देऊन पाकिस्तान भयंकर घोडचूक करीत आहे. आज पाकिस्तानला आपल्याच कृत्याची भयंकर किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तानला आवरणारा या जगात कोणताच देश नाही का? खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे. पाकिस्तानला अजूनही सुधारण्याची संधी आहे. दहशतवाद्यांची मदत बंद करून व मदरशातून दिले जाणारे धार्मिक व जिहादी शिक्षण बंद केले तर अजूनही पाकिस्तान योग्य त्या मार्गावर जाऊ शकतो. अन्यथा असे हल्ले परत परत होत राहतील व कधी पाकिस्तानातील, कधी भारतातील तर कधी इतर कोणत्यातरी देशातील निरपराध नागरिकांना याची भयंकर किंमत मोजावी लागेल.

वाचने 36334
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे. असे एखादे उदाहरण आहे का जगाच्या इतिहासात..? (सिरीयसली विचारलेला प्रश्न आहे - उपरोध नाहीये)

In reply to by श्रीगुरुजी

याच्या जवळपास जाणारे एक उदाहरण आहे. १९९० च्या दशकात इंडोनेशियातून पूर्व टिमूर बेटाला स्वातंत्र्य हवे होते व स्वतःचा वेगळा देश हवा होता. इतर इंडोनेशियन जनतेचा याला विरोध होता व इंडोनेशियाचा सर्वेसर्वा सुहार्तो याने दडपशाहीचे सर्व मार्ग वापरून त्यांची स्वातंत्र्याची चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा अत्याचार फार मोठ्या प्रमाणावर झाले तेव्हा १९९९ मध्ये पाश्चात्य देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून सुहार्तोवर दबाव आणून पूर्व टिमूर बेटावर संयुक्त राष्ट्रसंघाची शांतीसेना पाठविण्याची परवानगी घेतली व शांतीसेनेच्या देखरेखेखाली पूर्व टिमूर बेटाला अधिकृत स्वातंत्र्य मिळून एक नवीन देश निर्माण झाला. पाकिस्तानबाबतीत असेच काहीसे करणे खूप अवघड असले तरी अगदीच अशक्य नाही. पाकिस्तानी लष्कर व अतिरेक्यांचे साटेलोटे असल्याने हा देश १०-१२ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सैन्याच्या ताब्यात देऊन अतिरेक्यांच्या पूर्ण नि:पाताचा प्रयत्न करता येईल. अन्यथा हे अतिरेकी निव्वळ भारत किंवा पाकिस्तानला धोकादायक न ठरता संपूर्ण जगाला तापदायक ठरतील.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही सांगितलेला उपाय तर्कशुद्ध वाटला तरी त्यात बरेच व्यावहारिक अडथळे आहेत. (अ) ...पाकिस्तानी लष्कर व अतिरेक्यांचे साटेलोटे असल्याने... ; (आ) पाकिस्तानचे नागरी शासन लष्कराचे बाहुले असल्यामुळे आणि (इ) पाकिस्तानची लोकसंख्या, क्षेत्रफ़ळाचा आकार, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती; या सर्वांचा विचार करता (संयुक्त राष्ट्रसंघाची किंवा इतर कोणत्याही देशाची) उघड लष्करी कारवाई तेथे यशस्वी होण्याची शक्यता नाही. शिवाय अशी उघड कारवाई करण्यासाठी जो आर्थिक खर्च, मनुष्यहानी आणि जागतिक विरोध होईल तो सोसण्याची ताकद आणि धाडस आजमितीला कोणत्याही एका देशाकडे वा संयुक्त राष्ट्रसंघाकडेही नाही. हे जेवढे जगाला माहित आहे तेवेढेच ते "अतिरेकी + पाकिस्तानी लष्कराला"ही माहित आहे; म्हणूनच सर्वसामान्य पाकिस्तानी जनता आणि भारतासारखे देश भरडले जात आहेत आणि पाश्चिमात्य देश "स्वतःची कातडी बचावली, खूप झाले" असा पवित्रा घेऊन आहेत. दुसर्‍या महायुद्धानंतर बदललेल्या लष्करी कारवाई करण्याच्या पद्धती, जागतिक जनमताचा प्रभाव, माध्यमांचा (मेडियाचा) प्रभाव, जागतिक राजकारण इत्यादीमुळे कोणत्याही देशाला/राष्ट्रसंघाला इतर कोणत्याही मोठ्या देशात शिरून तेथे यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे* शक्य झाले नाही. कुवेत व पूर्व टिमोर या दोन छोट्या देशांत वर दिलेल्या कारणांच्या अभावाने असे शक्य झाले. याविरुद्ध, इराक आणि अफगाणिस्तानमधिल अमेरिका/राष्ट्रसंघाचे भूतकाळातले आणि अजूनही चालू असलेले अनुभव या दृष्टीने मार्गदर्शक आहेत. काही रोग बळावलेल्या अवस्थेत गेले की त्यांचा आक्रमक पद्धतिने उपचार करण्याने रोग्याला मूळ रोगापेक्षा जास्त धोका संभवतो. शिवाय काही रोगांवर आजमितीला उपाय सापडलेले नाहीत. पाकिस्तानातील सद्य परिस्थिती हा जगाला झालेला याच प्रकारातिल रोग आहे. ------------------------------- * यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे : यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे म्हणजे पायदळाने सर्व भूमी व्यापून तिच्यावर पूर्ण सुरक्षित ताबा ठेवणे होय. हे युद्धाचे उद्दिष्ट्य साध्य केले तरच त्या भूमीवरच्या सर्व विरोधी/अतिरेकी कारवायांचा नायनाट करणे शक्य होते. दुसर्‍या महायुद्धात हे यशस्वीपणे केले गेले. यात जर्मनी आणि जपान या दोन देशांमधिल सामाजिक-राजकिय-धार्मिक परिस्थितीचेही योगदान आहे. इराक आणि अफगाणिस्तान युद्धांनी "केवळ कार्पेट बाँबिंग केले म्हणजे नंतर पायदळाला सर्व भूमी व्यापून तिच्यावर पूर्ण सुरक्षित ताबा ठेवणे शक्य होईल" हा समज फोल आहे, हे शिकवले आहे. बांगलादेश युद्धात शत्रुराष्ट्राकडून लेखी शरणागती लिहून घेतल्यानंतरही सुरुवातिला दिलेल्या कारणांमुळे भारताच्या सेनेने बांगलादेश व्यापणे आणि त्याच्यावर संपूर्ण ताबा ठेवणे तर सोडाच पण त्या देशाला स्वतंत्र करूनही त्याला आपला भरवश्याचा मित्रदेश बनवणेही शक्य झाले नाही. -------------------------------

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इराक आणि अफगाणिस्तान युद्धांनी "केवळ कार्पेट बाँबिंग केले म्हणजे नंतर पायदळाला सर्व भूमी व्यापून तिच्यावर पूर्ण सुरक्षित ताबा ठेवणे शक्य होईल" हा समज फोल आहे, हे शिकवले आहे.
ते असे नाहीये एक्का साहेब, पाश्चात्य समाजात गेली १५० वर्ष प्रचंड प्रमाणावर आपल्याकडच्या समाजवाद्यांसारखा बुद्धीभेद बळावला आहे. ही लोक स्वताच्याच देशाच्या सैन्याला शिव्या घालतात आणि त्यांना खलनायक ठरवतात. त्यामु़ळे सैन्याच्या इच्छाशक्तीवर फार परीणाम झाला आहे. ह्याच अमेरिकेने ३०० वर्षापूर्वी इराक वर हल्ला केला असता तर ५० टक्के लोक मारुन टाकले असते आणि ५० टक्क्यांना गुलाम म्हणुन अमेरिकेत घेउन गेले असते. भारतावर इंग्रजांच्या ऐवजी जपानी लोक राज्य करायला आले असते तर भारतात स्वातंत्र्य मागायला भारतीय माणसे शिल्लक ठेवली नसती.

In reply to by प्रसाद१९७१

भारतावर इंग्रजांच्या ऐवजी जपानी लोक राज्य करायला आले असते तर भारतात स्वातंत्र्य मागायला भारतीय माणसे शिल्लक ठेवली नसती.
+१०००. यावरूनच मिपावरच्या काही जुन्या चर्चांची आठवण झाली :)

In reply to by प्रसाद१९७१

मूळ मुद्द्यात अवांतर टाळण्याकरिता मी असे सांगितले... दुसर्‍या महायुद्धानंतर बदललेल्या लष्करी कारवाई करण्याच्या पद्धती, जागतिक जनमताचा प्रभाव, माध्यमांचा (मेडियाचा) प्रभाव, जागतिक राजकारण इत्यादीमुळे कोणत्याही देशाला/राष्ट्रसंघाला इतर कोणत्याही मोठ्या देशात शिरून तेथे यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे* शक्य झाले नाही. ...त्याचा अर्थ तोच आहे. ते तुम्ही तुमच्या भाषेत सांगितलेत. इतकेच :) शिवाय प्रत्येक युद्धात स्थानिक लोकांच्या मनोवृत्तीचा प्रचंड प्रभाव कोणत्याही युद्धाच्या वाटचालीवर आणि निकालावर असतो. जर्मनी, जपानमध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्याने झालेले युद्धाच्या युद्धोत्तर चिरफाडीचे विश्लेषण आणि त्यावरचे उपाय इराक, अफगाणिस्तानमधल्या युद्धानंतर दृष्टीपथात असलेल्या भविष्यातल्या स्वप्नातही शक्य आहेत काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

>>> (इ) पाकिस्तानची लोकसंख्या, क्षेत्रफ़ळाचा आकार, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती; या सर्वांचा विचार करता (संयुक्त राष्ट्रसंघाची किंवा इतर कोणत्याही देशाची) उघड लष्करी कारवाई तेथे यशस्वी होण्याची शक्यता नाही. पाकिस्तानातील दहशतवादी व तालिबानी पेशावर, खैबर व वायव्य प्रांतात एकवटले आहेत. उर्वरीत पाकिस्तानात त्यांचे अस्तित्व खूप कमी प्रमाणात आहे (चूभूदेघे). उदा. कराची त्यामुळे जर जागतिक समुदायाने पाकिस्तानमधील दहशतवाद संयुक्तरित्या संपविण्याचा निर्धार केला तर याच भागात त्यांना लक्ष केंद्रीत करावे लागेल. हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही.

पाकिस्तान दुध देणारी गाय असती तर केव्हाच अमेरिकेने धावा बोलला असता! पण रोजच्या चहा पाण्याच्या खर्चाला अमेरिकेलाही बंदुके/हत्यारे विकत घेणारे रोज हवे असतात ना!

पेरावे तेचं उगवते हा धडा पाकिस्तानला मिळालाय बासं. लहान मुलं मरायला नाही पाहिजे होती. -_-

विश्वास नांगरे पाटील लातुरात असतानाचा किस्सा आठवला."भारतातील तरुणाला फक्त सिमेवर उभा करा बंदुक न देता. आपोपाप सगळा बदल घडेल.

"सेटन मे साइट व्हर्सीज"या म्हणीचा(=अधिपत्य गाजवण्यासाठी सैतान धर्मग्रंथाचाही आधार घेतो) प्रत्यय येतो आहे.

बाकी ठीके, पण
तालिबानचा जन्मदाता पाकिस्तानच आहे.
हे कै खरं वाटत नाही. अमेरिकेचा हात होता ना त्यामागे?

आपल्यासाठी काय होते ते समजले असेल आज त्यांना!

In reply to by भाते

जे मारले गेले ते सामान्य नागरीकच होते ना, मुख्यतः शाळेतली मुलेच होती ना? त्यांच्याबद्दल त्यांच्या पालकांबद्दल तरी या धाग्यावर धुलवड व्हायला नको असे कळकळीने सांगावेसे वाटते (तुम्हाला एकटयालाच नाही, सर्वांनाच).

छ्या : तुम्हीपण ना श्रीगुरुजी ... माझा शतकी मुद्दा ढापलात ... :-/ ह्या अन सिडनी हल्ल्याविषयी... ह्यातल्या दहशतवाद्यांची नावे पाहुन मी घरी जाऊन धागा काढणार होतो "दहशतवादाला धर्म नसतो म्हणे " *lol*

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो आजचा प्रकार बघता खरेच म्हणायला लागेल की दहशतवादाला धर्म नसतो. मरणारेही मुसलमान आणि मारणारेही मुसलमान.

In reply to by मृत्युन्जय

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. ते मारणारे लोक कट्टर मुसलमान होते आणि (त्यांच्या दृष्टीने) कमी कट्टर मुसलमानांना मारत होते. यातला मूळ धागा धर्म हाच आहे. उगीच "सर्वधर्मसमभाव" टाईप विधाने करू नका.

In reply to by काळा पहाड

करेक्ट
ते मारणारे लोक कट्टर मुसलमान होते आणि (त्यांच्या दृष्टीने) कमी कट्टर मुसलमानांना मारत होते. यातला मूळ धागा धर्म हाच आहे. उगीच "सर्वधर्मसमभाव" टाईप विधाने करू नका.
अगदी हेच म्हणणार होतो .

In reply to by प्रसाद गोडबोले

कमी कट्टर मुसलमानांना मारत होते.
हे कसे कळले तुम्हाला. ती मारली गेलेली मुले मोठी झाल्यावर एकतर पाक आर्मी मधे गेली असती किंवा तालेबानी झाली असती. भारतासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच

In reply to by प्रसाद१९७१

तसं वाटत नाही. ही मुलं आर्मी पब्लिक स्कूल मध्ये होती. थोडक्यात, मध्यम व उच्च मध्यम वर्ग आणि आर्मी ऑफिसर्स ची मुलं. अपवाद वगळता पाकिस्तानी आर्मी आजही प्रो-वेस्टर्न आणि प्रोफेशनल आहे.

In reply to by काळा पहाड

पाकिस्तानी आर्मी आजही प्रो-वेस्टर्न आणि प्रोफेशनल आहे. >>>>> वेस्टर्न कपडे घातले आणि इंग्लिश बोलले म्हणजे वेस्टर्न होते काय? आणि वेस्टर्न असो वा इस्टर्न, भारत द्वेष च भरला आहे. ती पाक आर्मी असो, तालिबान असो वा पाकी चॅनल असो, डॉक्टर असो - सगळे सारखेच. सिडनी मधला अतिरेकी वकील होता.

In reply to by प्रसाद१९७१

वेस्टर्न असो वा इस्टर्न, भारत द्वेष च भरला आहे. ती पाक आर्मी असो, तालिबान असो वा पाकी चॅनल असो, डॉक्टर असो - सगळे सारखेच.
जोरदार अनुमोदन . प्रसाद , तुम्ही कधी मध्यपुर्वेत विशेशतः सौदीत पाक लोकांच्या सोबत राहिला आहात काय ? तुमचे अन माझे ह्या बाबतीतले विचार तंतोतंत जुळत आहेत म्हणुन विचारले.

In reply to by टवाळ कार्टा

@प्रगो - मध्यपूर्वेत कधी राहीलो नव्हतो, पुढे ही कधी जायची वेळ येउ नये ही इच्छा! भारतीयांनी पण पर्यटनासाठी दुवई वगैरे ला जावु नये अश्या टोकाच्या मताचा मी आहे. त्यांनी खर्च केलेल्या पैश्याचा थोडा भाग भारताच्या जवानांना मारण्यासाठी वापरात येतो. @ट्.का. दोन्ही प्रसाद नक्की वेगळे आहेत.

In reply to by काळा पहाड

प्रोफेशनल असू शकते की. मी लिहीले होते की पाक आर्मी काय आणि तालीबान काय, भारतासाठी दोन्ही तितक्याच धोक्याच्या. माझा हा प्रतिसाद सुद्धा दिला होता कारण कोणीतरी कमी कट्टर असा शब्द वापरला होता. माझ्या मते सगळेच एकाच लेव्हलचे कट्टर असतात. कोणी गावरान असेल, तर कोणी फाडफाड इंग्लिश बोलत असेल. मनात एकच असते.

In reply to by प्रसाद१९७१

मीच तो वापरला होता. तालिबानी कट्टर म्हणजे दाढी, बुरखा, कन्व्हर्जन इत्यादी. अशा प्रकारचा कट्टरपणा पाक आर्मी कडे आहे काय? बाकी आपण शत्रू असल्याने त्यांना इकडे गोळाबारी करणे क्रमप्राप्तच आहे. पण त्यांचा विरोध धार्मिक आहे कि प्रादेशिक? तसं असतं तर त्यांनी अमेरिकेला पाकिस्तानात पाय टाकू दिला असता का?

In reply to by काळा पहाड

तसं असतं तर त्यांनी अमेरिकेला पाकिस्तानात पाय टाकू दिला असता का? >>>>>> पहील्यांदी, अमेरिका पाय टाकू का विचारत नाही, त्यांना जे करायचे ते अमेरीका करते. आणि अमेरिकेकडुन प्रचंड पैसा येतो. दाढी, बुरखा, कन्व्हर्जन इत्यादी. अशा प्रकारचा कट्टरपणा पाक आर्मी कडे आहे काय? >>> आहे, आहे आणि आहे. १००% आहे.

In reply to by काळा पहाड

तालिबानी कट्टर म्हणजे दाढी, बुरखा, कन्व्हर्जन इत्यादी. अशा प्रकारचा कट्टरपणा पाक आर्मी कडे आहे काय?
अहो कट्टरपणा दाढीमध्ये नाही तर मनात असतो.इतकी वर्षे पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान गळ्यात गळे घालून असतील तर लष्करात कट्टरपणा नाही असे कसे शक्य आहे?

In reply to by क्लिंटन

पाकिस्तान देशाचे आणी लष्कराचे इस्लामीकरण जन झिया उल हक यांनी सुरु केलं.गंमत म्हणजे लष्करात पाच वेळेस नमाज पढण्यासाठी अधिकार्याच्या वैयक्तिक गोपनीय अहवाल (ACR) मध्ये गुण होते. त्यामुळे एक आमचे वरिष्ठ (मित्र) नौदलाचे अधिकारी अडमिरल बंगारा पाकिस्तानात राज्दुतावासात अधिकारी होते. तेथे त्यांच्या बरोबरचे पाकिस्तानी अधिकारी दुपारी मेस मध्ये बियर पिता पिता मध्येच उठून नमाज पढण्यासाठी जात असत. (पूर्ण लष्करी गणवेश उतरवून सलवार कमीज चढवून नमाज पढायचा आणी परत गणवेश चढवायचा). ते पाकी अधिकारी हसत म्हणाले का करणार ACR मध्ये गुण कमी व्हायला नकोत. सर्वाना इस्लाम बद्दलचे शिक्षण देण्यासाठी मौलवी सुद्धा नेमले होते. विचारवंत माणूस यातून सुटू शकेल परंतु मध्य आणी निम्न स्तरावरील लोकांचे धृविकरण बर्यापैकीझाले हि वस्तुस्थिती आहे.

In reply to by प्रसाद१९७१

मी कदाचित चुकत असेन पण पाक आर्मी = तालिबान हे लॉजिकली बरोबर वाटत नाही. आर्मीच्या परंपरा असतात, प्रोसेसेस असतात. माझ्या मते त्यात कडवेपणा झिरपू शकतो पण सर्व आर्मी जिहादी विचारांची असं नक्कीच नसावं. असो. मी या बाबतीत आर्म चेअर अ‍ॅनॅलिस्टची भूमिका वठवू इच्छित नाही. इथले आर्मी एक्स्पर्ट्स काय म्हणतात ते ऐकायला मला आवडेल.

In reply to by काळा पहाड

हा सुहास डोक्यावर पडलाय . अभ्यास नाय काय नाय , उगाचच कशाला पण काय पण चिकटवतो . डॉ.बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळेस इस्लामचा स्विकार का केला नाही ह्यावर जर वाचन कर रे भावा ! बामियानच्या बौध्द मुर्ती फोडणारे कोण होते ह्याचा जरा अभ्यास कर. उगाचच पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदुर्वर जळजळ काढणारी तुझ्यासारखी मंडळी आहेत म्हणुन मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास असुनही कठीण वज्रास भेदु ऐसे व्हावे लागते ! तुजप्रत कल्याण असो .

In reply to by प्रसाद गोडबोले

हा सुहास डोक्यावर पडलाय . >>> बाबा रे ! अजुन प्रताप माहीत नाहीत बहुधा तुला माझे ! मी किती डोक्यावर पडलोय हे अजुन मिपावर तरी दाखविले नाही .. अभ्यास नाय काय नाय , उगाचच कशाला पण काय पण चिकटवतो . >> जर का अभ्यास जगातल्या कुठल्याही दोन धर्मांमध्ये दरी वाढविणार असेल तर तसला अभ्यास तुमचा तुम्हालाच लखलाभ होवो डॉ.बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळेस इस्लामचा स्विकार का केला नाही ह्यावर जर वाचन कर रे भावा ! >>> आणि धर्मांतर केले कशासाठी होते ? कुठल्या धर्माने त्रास दिला होता आम्हा दलीतांना ? उगा इतिहास उगाळु नका .भावना भडकावु नका ...... पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदुर्वर जळजळ काढणारी तुझ्यासारखी मंडळी आहेत >> गप्पे !! पुरोगामित्व बघीतलय जस्ट नाऊ मुटेकाकांच्या धाग्यावर, त्यामुळे बेगड्या हिदुंत्वावर ही गफ्फा नकोत आणि पुरोगामित्वावर ही ... ( वाटचाल बघा झरा स्वःताची , मिसळपावचा निख्खळ आनंद मारुन टाकला साल्ला या सगळ्या चर्चांनी )

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो.. इथे लहान मुलांची क्रुर हत्या झालीय आणि तुम्हाला शतकी मुद्द्याचे पडलेयं असा समज होत आहे तुमच्या प्रतिक्रियेवरून... . अर्थात तुमचा तसा उद्देश नाही आहे हे सर्वांना माहित आहे. तसेच दहशतवादाला धर्म नसतो म्हणे या नंतर स्मायलीचीही गरज नव्हती. अशावेळी सर्वांनी आपापल्या भावनांवर आवर घालणे हे उत्तम.. दहशतवाद्यांचा तीव्र निषेध आणि मरण पावलेल्यांना श्रद्धांजली..!!

In reply to by योगी९००

अशावेळी सर्वांनी आपापल्या भावनांवर आवर घालणे हे उत्तम
भावनांना आवर ह्या वरुन सुचले हे ... योगी, तुमच्या गल्लीतलया मुस्लिमलोकांनी भारत पाकिस्तान मॅच मधे भारत हरल्यावर फटाके वाजवल्याचे पाहिले आहे का हो कधी ? किंव्वा तुमच्या ओळखीतल्या कोणी हातावर "लादेन" असा टॅटु करुन घेतला आहे का हो ? क्किंव्वा तुमच्या रुममेटने कधी "९-११" प्रकारात तालिबानचा दोष नव्हताच तो अमेरिकेचा खोटारडेपणा आहे लादेन निर्दोष होता अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ? किंवा तुमच्या कलीगने कधी "काश्मीर मधे भारतीय सेनाच गरीब बिचार्‍या लोकांना त्रास देते , तिथे दहशतवादी नाहीयेतच" अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ? किंववा तुमच्या टीममॅटने कधी "चलो तुम्हारा नाम आज से अब्दुला खान करके तुम्हे कन्व्हर्ट कर देते है " असे विधान केले आहे का ? मी पण लय जग पाहिलय योगीराव , भावना कशा आवरायच्या मला व्यवस्थित माहीत आहे , माझा प्रतिसाद भावनेच्या भरात दिलेला नसुन सारासार विचार करुनच दिलेला आहे :)

मृतांचा आकडा १६० वर पोहोचला आहे. अरेबिक बोलणार्‍या ८ अतिरेक्यांपैकी चौघांनी स्वतःला बॉम्बने उडवून दिले व दोघांना लष्कराने गोळ्या घालून मारले आहे. अजून दोन अतिरेकी शाळेतच असून त्यांनी अजून २० शिक्षक व ३४ विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले आहे. अशाच स्वरूपाचा हल्ला काही वर्षांपूर्वी रशियातील उत्तर ओसेशिया प्रांतातील बेस्लन येथे झाला होता. त्या हल्ल्यात ३२ चेचन अतिरेक्यांनी एका शाळेवर हल्ला करून १००० विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले होते. रशियन लष्कराने त्यांना सोडविण्यासाठी केलेल्या प्रतिहल्ल्ल्यात ३३० जणांचा मृत्यु झाला होता. योगायोग म्हणजे ४३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १६ डिसेंबर १९७१ ला भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्करून बांगलादेशाचा जन्म झाला होता.

तालिबान हा एक भस्मासूर बनला आहे. रशियाशी लढत असताना मुजाहदिन लोक शौर्याचे मूर्त रुप म्हणून गौरवले जात होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन ह्यांनी ह्या लोकांची अमेरिकेचे संस्थापक मंडळींशी (वॉशिंग्टन प्रभृती) तुलना करून त्यांना फार वरच्या पातळीवर नेऊन ठेवले होते. पण आता हा भस्मासूर त्यांना पोसणार्‍या अमेरिका, पाकिस्तानवर उलटला आहे. निष्पाप मुलांना मारणे हे कुठल्याही संस्कृतीला पटणारे नाही. पण धर्माची अतिरेकी नशा चढलेल्या लोकांना हे भान असणार नाही.

दुर्दैवी घटना . हि घटना मुस्लिम कट्टर धर्मान्धानी घडवून आणली हे च सत्य . पण या घटने मधून माझ्या देशाने काय धडा घ्यायला हवा ? धर्मांध हे धोकादायकच असतात . मग ते कुठल्याही धर्माचे असो . आपल्या कडच्या अनेक हिंदू धर्मांधाना सौदी अरब किंवा पाकिस्तान चे एक सूक्ष्म आकर्षण असत . ते म्हणजे ते बघा कसे कट्टर आहेत त्यांच्या धर्माबद्दल . नाही तर आपण किती मवाळ आहोत ? पण हिंदू धर्मांध सोयीस्कर पणे विसरतात कि १९७१ मध्ये याच सेकुलर देशाने एका कट्टर धर्मांध देशाला दोन तुकड्यात विभाजित केल होत . भारतासारख्या प्रचंड वैविध्य असणार्या देशासमोर , सगळ्या जाती धर्मा च माहेर घर असणार्या देशासमोर आव्हान आहे ते धर्मांधता न वाढू देण्याच . मग ती iSIS असो , LTTE असो , किंवा RSS असो . आता सध्या देशात ओवेसी , रामझादे वाली साध्वी , साक्षी महाराज , या लोकांची चलती आहे . दुसऱ्या धर्माच्या धर्मान्धांवर टीका करताना आपण आपल्या धर्माच्या धर्मांधाना थारा देत आहोत का याची खातरजमा आपण च करून घ्या . नाही तर महा शक्ती असण्याची क्षमता असणारा हा देश दुसरा पाकिस्तान बनेल यात काही शंका नाही . पंतप्रधान बनल्यावर मोदी ना हे नक्कीच कळले असेल पण भक्ताना ज्या दिवशी हे कळेल तो सुदिन . कुठेही मोदी भक्तांना खेचून आणता का अशी टीका होईल पण हा प्रतिसाद माझा देश कट्टर धर्मांध होऊ नये या तळमळीतून आला आहे

In reply to by पिंपातला उंदीर

तालिबान्यांनी केलेल्या ह्या निर्घृण हल्ल्याचा वापर करून हिंदुत्त्ववाद्यांना झोडपून काढण्याचा हा प्रकार निंदनीय व अज्ञानमूलक आहे. सब घोडे बारा टक्के असा न्याय लावून जसे तालिबानी तसेच हिंदुत्त्ववादी असे पुरोगामी समीकरण लावणे चूक आहे. १९७१ मधे पाकिस्तानचे दोन तुकडे केले ते केवळ भारताचे कर्तृत्त्व नव्हते. तर पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानच्या लोकांवर अत्याचार केले. बंगाली समाजाला हे कळले की निव्वळ मुस्लिम असल्याने आपली नाळ दुसर्‍या पाकिस्तानशी जोडली जाऊ शकत नाही. आपली संस्कृती वेगळी आहे. आणि भौगोलिक अंतर त्यामुळे हे घडले. ज्या प्रमाणात आज मुस्लिम अतिरेकीपणा बोकाळला आहे त्याचे कारण त्या धर्मात कुठल्याही सुधारणा करणे नामंजूर आहे. तसे करणार्‍याला पाखंडी म्हणून मृत्यूदंड दिला जाऊ शकतो. बाकी सर्व धर्म एक तर मवाळ स्वभावाचे आहेत (जसे जैन) किंवा त्यांनी आपणात सुधारणा केल्या आहेत (जसे ख्रिस्ती धर्म) कुठल्या धर्माच्या अमलाखाली असणार्‍या देशात त्या धर्माविरुद्ध टीका करणार्‍यांना मृत्यूदंड आहे? अगदी अतिरेकी हिंदू म्हणवले जाणारे मोदीही भारतात असा कायदा आणू इच्छित नाहीत. लोकगीते, नाटके ह्यात हिंदू देवांचीही चेष्टा केली जाते. मुस्लिम धर्मात असे शक्य नाही. नुसते भोंगळपणे सगळ्यांना एकाच मापात तोलणे म्हणजे १ इंच हे अंतर आणि १ मैल हेही अंतरच म्हणून दोन्ही सारखे म्हणण्यापैकी आहे. माझे असे म्हणणे आहे की कितीही प्रयत्न केला तरी हिंदू धर्म हा मुस्लिम धर्माइतका कट्टर होऊ शकत नाही. त्या धर्माची मांडणी तसे होण्यापासून त्याला परावृत्त करतील. उदा. बहु ईश्वरवाद, कुठल्या एकमेव धर्मग्रंथाचा अभाव, कुठल्या एकमेवाद्वितीय प्रेषिताचा वा दैवी व्यक्तीचा अभाव, कुठलीही मूलतत्त्वे नाहीत (मूर्तीपूजा योग्य की अयोग्य, पुनर्जन्म आहे का नाही, स्वर्ग नरक आहे का नाही इ.) कितीही कट्टर झाला तरी धर्माच्या प्रभावाखाली (हे महत्त्वाचे) येऊन कुठला हिंदू विमान अपहरण करू शकेल असे मला वाटत नाही, कुठल्या शाळेवर (अगदी मदरसा असली तरी) बेछूट गोळीबार करून शेकडो मुले मारूच शकणार नाही. एखादे उन्मादमूलक कृत्य जसे दंगल व थंड डोक्याने कारस्थान आखून केलेले कृत्य ह्यात फरक आहे. मुस्लिम धर्माचे अतिरेकी हे थंड डोक्याने, योजना आखून विध्वंसक, हिंसक कृत्ये पार पाडतात असा आजवरचा इतिहास आहे. ह्या धर्मात सुधारणा झाल्या तरच त्याला आळा बसेल.

In reply to by असंका

ते हेच सांगतायत की हे चांगलं किंवा वाईट नसतं. अशी चेष्टा करणारे सुद्धा हिंदूच असतात पण त्यामुळे ते धर्मबाह्य ठरत नाहीत.

In reply to by काळा पहाड

चांगलं किंवा वाईट नसतं? खरंच? आपल्या श्रद्धास्थानांची चेष्टा कुणी केली तर ते चांगलंही झालं नाही किंवा वाईटही झालं नाही? इतके स्थितप्रज्ञ आहात आपण?

In reply to by असंका

मुक्त समाजात विविध प्रकारचे लोक रहातात. कुणी सच्चे धर्मभक्त असतात, कुणी स्वार्थापुरतेच धर्मभक्त असतात तर कुणी ठार नास्तिक असतात. कुणी वेगळ्या धर्माचे असतात. ह्या सर्वांना आपापल्या मतांचे स्वातंत्र्य असायला हवे. तो काय नास्तिक आहे, तो तमक्या धर्माचा आहे त्याला आमचा धर्म काय कळणार तो अशी चेष्टा करणारच, दुर्लक्ष करा इतपत समजून घ्यायची परिपक्वता असेल तर त्याला स्थितप्रज्ञ वगैरे फार मोठी नावे द्यायची गरज नाही. याउलट अशा प्रकारे टीका करणार्‍यांना जाळून, ठेचून वा भोसकून ठार मारावे असा कायदा करणे कितपत योग्य आहे? अशा प्रकारे राक्षसी कायदे असतील तर ते वापरून अनेकदा नास्तिक वा अन्य धर्मीय लोकांना ब्ल्याकमेल केले जाते. वेळप्रसंगी मारलेही जाते. उदा. हिंदू पुराणात अनेक हास्यास्पद वाटणार्‍या गोष्टी आहेत. त्यावरून कुणी टिंगल टवाळी केली तर संबंधित व्यक्तीला शिक्षा द्यावी का आणि किती? मला वाटते कुठलीही शिक्षा देऊ नये. पण हे फक्त एकाच धर्माला लागू नसावे. नाहीतर त्या स्वातंत्र्याला अर्थ नाही. असो, विषयांतर पुरे.

In reply to by असंका

हिंदू धर्मातल्या एखाद्या गोष्टी बद्दल हिंदू धर्मातल्या लोकांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे. बाकीच्या धर्मातल्या लोकांनी मात्र लांब रहावं कारण ते मुळातच या धर्माच्या विरूद्ध्ह असणार. त्यामुळे हिंदू धर्मातल्या वाईट गोष्टी दाखवणार्‍या बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र दाभोळकरांना माझा पाठिंबा असणारच कारण ते आमचेच लोक आहेत. पण एम एफ हुसेनसारख्याला मात्र ठोकायलाच हवं असं मला वाटतं.

In reply to by काळा पहाड

बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र दाभोळकर हे जे बोलायचे त्याला अभ्यास आणि मुद्देसूद बोलणे असायचे

In reply to by हुप्प्या

हुप्प्या यांच्या प्रतिसादाशी सहमत...!! तालिबान्यांनी केलेल्या ह्या निर्घृण हल्ल्याचा वापर करून हिंदुत्त्ववाद्यांना झोडपून काढण्याचा हा प्रकार निंदनीय व अज्ञानमूलक आहे. सब घोडे बारा टक्के असा न्याय लावून जसे तालिबानी तसेच हिंदुत्त्ववादी असे पुरोगामी समीकरण लावणे चूक आहे. +१०००० सहमत...!!

In reply to by हुप्प्या

तालिबान्यांनी केलेल्या ह्या निर्घृण हल्ल्याचा वापर करून हिंदुत्त्ववाद्यांना झोडपून काढण्याचा हा प्रकार निंदनीय व अज्ञानमूलक आहे. सब घोडे बारा टक्के असा न्याय लावून जसे तालिबानी तसेच हिंदुत्त्ववादी असे पुरोगामी समीकरण लावणे चूक आहे.
हा असला आडाणी प्रकार बघितला की तळपायाची आग मस्तकात जाते.आणि असे करणारे लोक मोठे धर्मनिरपेक्ष म्हणून मिरविले जातात त्याचा आणखी संताप येतो. आजच निखिल वागळेंचा टिवटिवाट जसाच्या तसा पेस्ट करतो:"Peshawar incident tells us how religious fanatics behave. RSS Parivar is not Taliban today, but can become one if they get chance" . या असल्या शतमूर्खांना एक गोष्ट कशी कळत नाही हेच समजत नाही.रा.स्व.संघाचे लाखांनी सदस्य आहेत आणि काल-आजपासून नव्हे तर गेल्या ९० वर्षांपासून सुरवात होऊन.तालिबान्यांनी केलेल्या कृत्यांप्रमाणे किती कृत्ये रा.स्व.संघाच्या सदस्यांनी केली आहेत? मी रा.स्व.संघाचा समर्थक आहे अशातला भाग नाही पण असला पुरोगामी बिनडोकपणा बघितला तर भविष्यात रा.स्व.संघाचा कट्टर समर्थक व्हायची शक्यताही नाकारता येणार नाही :) मागेही टाईम्स ऑफ इंडियामध्ये काश्मीरविषयी "हॉक्स" कोण आणि शांतीची कबुतरे कोण याचे फोटो आले होते.त्यात हॉक्सच्या यादीत गिलानीपेक्षा अडवाणींचा फोटो पहिला होता.आता बोला.

In reply to by क्लिंटन

"Peshawar incident tells us how religious fanatics behave. RSS Parivar is not Taliban today, but can become one if they get chance"
डोक्याला शॉट ... अक्कल कुठे गहाण टाकुन आलेत हे पुरोगामी लोक ? *dash1*

In reply to by प्रसाद गोडबोले

चान्स मिळाला तर काहीही होऊ शकतं ना. अगदी अल कायदासुद्धा शांतिसेना होऊ शकते, हाफिझ सईद संत बनू शकतो. तद्वतच डार्क साईडलाही माणूस जाऊ शकतो. त्यात इशेश ते काय. चान्स मिळाला की मोदीविरोधकांचे मोदीभक्तही होतात. त्यामुळे यात तत्त्वतः अशक्य काहीच नाही.

In reply to by प्रचेतस

नाही
आम्ही म्हणतो तोच खरा इस्लाम अन बाकी सारे काफीर
असे म्हणाणार्‍यांची मनोवृत्ती अन
मी म्हणतो तोच हेवन बाकी सारा भास
अन
जगातल्या सगळ्या वाईट गोष्टीं पेक्षा जास्त वाईट गोष्टी मुळ हिंदु धर्मातच आहेत
असे प्रतिपादन करणारी मनोवृत्ती ह्या तिन्ही वृत्ती तात्विक दृष्ट्या समानच आहेत इतकेच दाखवुन द्यायचे होते :D

In reply to by क्लिंटन

Peshawar incident tells us how religious fanatics behave. RSS Parivar is not Taliban today, but can become one if they get chance
निखिल वागळेंच्या या टिवटिवाटाला श्रीहर्ष पेरला नावाच्या एका ट्विटरेटीने दिलेले उत्तर वाचून हसून हसून खुर्चीवरून पडायची वेळ आली. त्याचे उत्तर "Tehelka incident tells us how left fanatics behave. @waglenikhil is not a rapist today, but can become one if they get chance"

In reply to by क्लिंटन

कुमार केतकरसुद्धा निखिल वागळेंसारखेच अडाणी आहेत. अशा संतापजनक व्यक्तींना मी 'निधर्मांध' म्हणतो. दूध व शॅम्पेन यांना एकसमान मानणे हा जितका मूर्खपणा आहे तितकाच मूर्खपणा तालिबानी व संघाला एकसमान मानताना होतो हे यांच्या गुडघ्यात कधी शिरतच नाही.

काही पाकिस्तनी व्यक्तिंशी बोलणं झालं होतं आणि त्यन्च्या कडुन हे कळालं कि बरीच कुटुंब स्थलांतरित होउन दुसर्या देशांमध्ये गेली आहेत. पण अजुनही बरीच अभगी लोकं तिथेच आहेत ज्यांना दुसरी कडे जाणं शक्य नाही. बाकी सर्वसामन्य पकिस्तानी नागरीकांची स्वप्नं , ईच्छा , आकांक्षा हि अपाल्यासरख्याच आहेत.

प्रॉब्लेम असा आहे.की असे शेकडो हल्ले इस्लामी जगता अंतर्गत (त्यांच्यावरच) झाले..तरी (त्यात मेलेल्यां..उरलेल्या सहीत) कुणालाही हे पटत नाही..कि हे सर्व आपल्या धर्मामुळे होतं आहे. आमच्या वैदिक(हिंन्दु) धर्मात जसं "खरा" ब्राम्हण-याच्या भरपूर संज्ञा/व्याख्या निघतात..कारण मुळात "खरा" ब्राम्हण ही कल्पनाच खोटी आणि लबाड आहे.(म्हणूनच मी म्हणत असतो,की मी ब्राम्हण-असणं, हे धर्म शास्त्रानीच अशक्य करून ठेवलेलं आहे.) तद्वतच "सच्चा मुसलमान" कुणीच(असू शकत..) नसल्यामुळे, सावरकर म्हणायचे तसं..ज्याची लाठी बलवान तोच(त्या वेळी..) खरा..,हा न्याय तिथे लागू पडतो. म्हणूनच या असल्या खर्‍या लोकांच्या हतात राज्य आणविण्यासाठी हे हल्ले आणि धर्मयुद्ध लढवली जातात..आणि याच "खर्‍या" लोकांनीच ही धर्मशास्त्रे देवाची नावे घेऊन लिहिली आहेत..फक्त ती सामान्य जनतेला भुलवणार्‍या भाषेत व तत्त्वात लिहिली आहेत..आश्या अर्थानी पाहिलं,तर ह्या सर्व सोई धर्मशास्त्रेच करून ठेवत असतात,हे सहज कळतं..परंतू, हे सामान्य(मरणार्‍या) जनतेला उमगत नाही..म्हणून (प्रत्येक धर्मातली..) तीच "बिचारी" सामान्य जनता कायम म्हणत रहाते,,,
धर्म "चांगला" आहे,फक्त(?) "ते" वाईट आहेत.

कुणी कुणाला मारली पाचर?,मागे पुढे पत्ता नाही सामान्यांचे खुळे मेंदू,धर्माशिवाय सत्ता नाही.


In reply to by अत्रुप्त आत्मा

आता विषयांतर झालेच आहे म्हणुन..
आमच्या वैदिक(हिंन्दु) धर्मात जसं "खरा" ब्राम्हण-याच्या भरपूर संज्ञा/व्याख्या निघतात..
अशा अनेक संज्ञा, शक्यता, कल्पना निघणं हे प्रगतीच्या स्कोपचं लक्षण आहे. मानवी प्रगतीचे मापदंड मूलतः सब्जेक्टीव्ह्च असायला हवेत.
कारण मुळात "खरा" ब्राम्हण ही कल्पनाच खोटी आणि लबाड आहे.
हा अत्यंत चुकीचा निश्कर्ष आहे. खरेपणा कितीही बदलत गेला तरी त्याच्या सच्चेपणाला बाध येत नाहि.
(म्हणूनच मी म्हणत असतो,की मी ब्राम्हण-असणं, हे धर्म शास्त्रानीच अशक्य करून ठेवलेलं आहे.)
तसं असण्यात काहिही गैर नाहि.
तद्वतच "सच्चा मुसलमान" कुणीच(असू शकत..) नसल्यामुळे
प्रॉब्लेम कोण सच्चा आणि कोण झुटा हा नाहिच मुळी. आपण जसं इतरांचं मुल्यमापन करतो तसं इतरांना आपलं मुल्यामापन करु द्यावं काय, आणि इतरांना स्खलनशील समजताना आपणही त्याच मातिचे बनलो आहोत हे स्विकारणं आपल्याला शक्य आहे काय, इतका साधा प्रश्न आहे.

In reply to by अर्धवटराव

नाही हो नाही .. काही तरी गैर समज होतोय. मी ज्याच्या बद्दल बोलतोय, त्या संद्न्या धर्माच्या पोथ्यंमधे लबाडनि केलेल्या स्वत:च्या सोई बद्दल... सर्व सामान्य माणसे धर्माचा जो "चांगला" अर्थ घेतात त्याबद्दल नाही. असो....अत्ता वेळ नाही. दुपारी आल्यावर सविस्तर लिहिन.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा , काही अत्यंत विनम्र प्रश्न : तुमचा इस्लामचा अभ्यास किती ? इस्लामचा उदय कसा झाला ? इस्लामपुर्व अरब जगतात मक्का येथे काय होते ? हुबाल म्हणजे कोण ? वहाबी , शिया , सुन्नी,, अहमदीया , बोहरा , सुफी ह्यातील मुख्य फरक काय ? पवित्र कुराण आणि हदीथ च्या मते सच्चा मुसलमान कोणाला म्हणायचे ? दार-उल-हर्ब आणि दार अल इस्लाम म्हणजे काय ? आपला वैदिक धर्माचा 'अभ्यास' आहे असे गृहीत धरत आहे . पण इस्लामचा अभ्यास केल्याशिवाय तौलनिक प्रतिक्रिया देवु नयेत ही अति नम्र विनंती !

संपादित


In reply to by प्रसाद गोडबोले

बुवांचा इस्लामविषयक अभ्यास अतिशय चांगला आहे. शेषराव मोरे, हमीद दलवाई, कुरुंदकर आदी ते कोळून प्यायले आहेत. बाकी हिंदू धर्मसुद्धा अतिशय हिणकस रूढींनी भरलेला आहे असे नमूद करतो.

In reply to by प्रचेतस

बरं
बाकी हिंदू धर्मसुद्धा अतिशय हिणकस रूढींनी भरलेला आहे असे नमूद करतो.
ओके . मग हिंदु अतिरेक्यांनी शाळेत घुसुन १५० पोरं मारली असली एखादी घटना सांगा .

In reply to by प्रसाद गोडबोले

पेशावर मधे घडलेली ही नृशंस घटना आणि वैदिक धर्मातलया तथाकथित हिणकस रुढी ह्यांची तुलना उगाच कै च्या कै अस्थानी आहे इतकेच म्हणु इच्छितो !

In reply to by प्रसाद गोडबोले

मी रूढींनी म्हटलंय मित्रा. पोरे मारण्याचा इथे काय संबंध? बाकी अगदीच ताणायचे म्हटले तर कंसाने देवकीचे आठ पुत्र मारले, गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाचा निर्वंश केला. =))