दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १
प्रसंग १-
वेळः २ महिण्यापुर्वीची.
स्थळ:एका बँक मॅनेजरची केबिन.(मॅनेजर रिटायमेंटला वर्ष कमी असताना नागपुरातुन थेट बदली होऊन लातुरात आलेला)
ग्राहक-आत येउ का सायेब
मॅ- या
ग्रा- सायेब आपल्याला ते हे पीक कर्ज पायजे.
...मॅनेजर कागदपत्र पाह्तो.
मॅ- किती कर्ज पाहिजे ?
ग्रा- द्या कि एक लाख काय.
मॅ- एक लाख !! काय करणार एवढ कर्ज घेउन ? फेडण होणार आहे का ?
ग्रा- सायेब आता तुमच्या पासुन काय लपवायच,एका लाखापेकी ३६,००० ची म्हस घ्याची. १४,००० चा कडबा घ्याचा.
आन राहीलेला पन्नास तुमच्या बँकेत यफडी करु. काय !!
मॅ- आहो पण हे परवडणार आहे का तुम्हाला.पिककर्ज वर्षभरात फेडाव लागेल ७% व्याजासहित कळतय का ?
ग्रा- ते कळतय ओ आपल्याला. आता तुमास्नी कळत नसेल तर सांगतो.
आता ३६,००० ची म्हस घेतली.म्हस २०० दिवस रोज ५ लिटर दुध देते. दुधाचा भाव ४० रु.लिटर.
मंजे रोजचे २०० रु.झाले. २०० दिवसाच उत्पन्न ४०,००० झाल,
नंतर म्हस गाभण राहील,तीला रेडकु झाल तर ईकुन टाकायच ५,००० ला.मंजे वर्सभरात म्हसन ४५,००० दिल कमवुन.
आता तुमच्या बँकेतील यफडी केलेल्या पयशाच बोलु.बँक ९ % याज दिल.मंजे ५०,००० ला ४,५०० याज मिळल. बाजपता करा ठोक हिसोब,काय!!!
मॅ- आता ते पण तुमीच सांगा.
ग्रा-सायेब म्हसीन ४५,००० दिले.बँकेच्या यफडी ने ५४,५०० दिले टोटल झाली कि ९९,५०० काय.
वरुन म्ह्स बि राहिली कि घरात बोनस म्हनुन,काय!!
मॅनेजर - पण तुम्हाला व्याज भराव लागेल कि पिककर्जावर ७,००० त्याच काय?
ग्रा- ह्यां... नियमीत कर्ज फेड केली तर सरकार निम्म याज भरतय की.. आणी..
मॅ- आणी काय आता ?
ग्रा- आणी दुस्काळ जाहीर झाला तर याज बी माफ व्हईल.आन प्यॅकेज आल तर संमद कर्ज बी माफ व्हईल. काय!!!!!
मॅ-*shok*
==========================================================================
प्रसंग २-
स्थळ-तलाठी कार्यालय
वेळ-पंधरा दिवसापुर्वीची..
शेतकरी-मालक नुस्कान लय जास्त झालय आन तुमी पंचनामा लय कमी केलाय जरा वाढवा की पिकवीम्याची रोक्कम ?
तलाठी-अरे धोंडीबा,मी काय करणार सरकारी निकषात ६०००/- मिळतील तुला. सरकार ठरवल ते घ्याच.
शेतकरी- तेच म्हणतो आहे..सरकार काय बांधावर येऊन बघणार हाय का किती नुस्कान झाल ते,तुमीच आमच सरकार
बघा काय तरी करा..जरा चार पयशे सुटु द्या गरीबाला.
तलाठी- हम्म.. हे बघ आता मी काय सांगतो ते आईक.. तुझ्या पीकाच्या नुकसानीचा पंचनामा मी बदलुन देतो.
६,०००/- च्या जागी १०,०००/- करतो पण ८,०००/- तुझे आणी २,०००/- माझे. पटतय का बोल ?
शेतकरी- मालक २ मंजे जास्त झाल जरा कमी करा..
तलाठी-हे बघ धोंडीबा, हे पीकविम्याची रक्कम आहे. पुढे दुष्काळ जाहीर झाला तर आणखीन मदत मिळेल.
त्या पॅकेज मधे करु कमी जास्ती.....
.
.
.शेतकरी गपचुप १०,०००/- पंचनामा घेऊन बाहेर पडतो.
============================================================================
प्रसंग ३-
स्थळ - आमचा नेहमीचा कट्टा.
वेळ - विधानसभेत ४ दिवसापुर्वि दुष्काळावर चर्चा चालु होती तो दिवस.
एक- देवा काय वाटत...यावेळेस कितीच पॅकेज जाहीर व्हईल ?
दुसरा- आर सरकारी तिजोरित खडखडाट हाय म्हन..काय जास्त अपेक्षा नाय ठेवाच्या आपण..सोयाबीनं माती खाल्ली यंदा.
तिसरा- आर चांगल पाच धा हाजार कोटीच जाहीर व्हायला पायजे..म्या तर लाईट बिल भरला नाय आजुन
यावर्सीच..च्या आयला....दणकुन पॅकेज नाय मीळाल तर आपुन हाय आन हे सरकार हाय बघुन घ्यु..
=============================================================================
( लेखाद्वारे कुणाच्या भावना दुखावायचा हेतु नाही..गावपातळीवर परिस्थीति भिषण आहे..)
Book traversal links for दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रतिसाद क्र्मांक १
दंडवत घ्या सरजी...
आरं बाबा...
+१११
सुंदर किस्से!
हो...
पॅकेजपतित
दरवर्षी पॅकेज
जेपी,
परिणाम
असे किस्से घडतात हे खरं आहे;
हे असे परत परत घडू नये म्हणून.....
अजून actionable result
actionable result oriented
योजना
well done abba
हो आठवत
काय मिळते ते>>
आहे असं खरं. वर आतिवास ताईंनी
७५०००
एक किस्सा
सरकारी दफ्तरात भ्रष्टाचार आहे
पण आपण आग लागे पर्यंत का थांबावे?
तेव्हा पासून सरकारे यावर का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseया सगळ्या प्रतीसादावर एक
आवडल
भारी किस्से
अशीच पेन्शन महाराष्र्ट्रातही
दुष्काळ , शेतकरी आणी आत्महत्या
भारी किस्से
!!!
सरकारी पॅकेज म्हणजे जखम
आत अबीपी माझावर द्राक्ष
गुंतवणुक हा शब्द काही सांगुन
हे सर्व मान्य !!
मी सरकारच्या नावाने गळा काढणे
@ खटपट्याएखाद्या खाजगी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseतेच ना यार, शेतकरी दिसला की
बाण साहेब
@ खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseलेखात उअपस्थित केलेले मुद्दे
१०० आणे सच बात!
आत्महत्येचे उदात्तीकरण
आत्महत्येचे उदात्तीकरण थांबविले पाहिजे. सिर सलामत तो पगडी पचास हे बिंबविले गेले पाहिजे. आणि आत्महत्येची धमकी देऊन कोणी काही कार्यभाग साधायचा प्रयत्न केला तर त्याचा उदोउदो सुद्धा करणे बंद केले पाहिजे.१००% सत्य ! मात्र हे होणे जरा कठीण आहे... कारण त्यावरच काही जणांचा ब्रेड-बटर (आणि जाम सुद्धा) अवलंबून आहे :(माझा आक्षेप लहान शेतकर्
@खटपट्या-एक एकर द्राक्ष बाग
अगदी मान्य !!
खटपट्या आपल्याला द्राक्ष
माहीतीबद्द्ल धन्यवाद
(तापलेला)जेपी
तापलेले जेपी - आधी थंड व्हा.