माचीवरचा बुधा वाचले आहे?
नसेल तर मिळेल तेथून घ्या व वाचा.
* पुस्तके वाचने म्हणजे मी काय वाचले हे सांगण्यापेक्षा, मला काय भावले हे त्यात असणे महत्त्वाचे आहे. ते आधी लिहला.
चांगला उद्देश आणि माहिती, धन्यवाद!
पुस्तकविश्व इथेही भेट द्या, इथलेच (आणि इतरही बरेचसे) पुस्तकवेडे या संग्रहणीय संस्थळावर पुस्तकचर्चा करतात. (पूर्वी मिपावर त्याचा दुवा असायचा, आता दिसत नाही.)
तुम्ही दिलेल्या पुस्तकांमध्ये बहुतांश पुस्तके अनुभव / घटना / चरित्रे / आत्मचरित्रे आहेत म्हणून मी वाचलेली व आत्ता लगेच आठवणार्या त्या प्रकारच्या पुस्तकांची यादी देतोय.
अ डबल लाईफ - अॅलेक पदमसी.
अॅलेक पदमसी या अॅड गुरूचे आत्मचरित्र, MRF, लिरील पासून ते KS पर्यंत अनेक जाहिराती कशा तयार झाल्या यांची गोष्ट आणि अॅलेक पदमसी यांनी शेखर कपूरच्या गांधी चित्रपटामध्ये महमद अली जिनांची भूमीका केली त्याचा उल्लेख वाचनीय.
बुलेट फॉर बुलेट - जे एफ रिबेरो.
ज्युलिनो एफ रिबेरो या एका पोलीस अधिकार्याचे आत्मचरित्र. ऑपरेशन ब्लू स्टार ते रूमानियातील राजदूत व नंतर निवृत्ती या संपूर्ण प्रवासातील थरारक घटनांचे चित्रण. शीख अतीरेक्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून यांच्यावर दोनदा प्राणघातक हल्ला केला आहे.
मेड इन जपान - अकिओ मोरीता.
"सोनी" ची कहाणी.
आयकोका - ली आयकोका.
फोर्ड, क्रायसलर या कंपन्या गाळातून वर काढून स्थिरस्थावर करूनही दोन्ही कंपन्यातून हकालपट्टी झालेला एक लिजंड..
लूजींग माय व्हर्जिनीटी - रिचर्ड ब्रॅन्सन.
व्हर्जिन मोबाईल च्या मालकाचे आत्मचरित्र - पुस्तक मोठे आहे - अवश्य वाचा.
जॅक - स्ट्रेट फ्रॉम द गट्
जॅक वेल्श - जीई कंट्रीवाईडच्या एका हाय प्रोफाईल सीईओचे आत्मचरित्र. जीई कंपनीवर आणि पर्यायाने संपूर्ण मार्केटवर सत्ता गाजवणार्या जॅक वेल्शचे आत्मचरित्र.
या पुस्तकामध्ये "गो होम मिस्टर वेल्श" नावाचा चॅप्टर आवर्जून वाचा. मार्केटलीडर जीई चा आपला प्रतिस्पर्धी हनीवेल ला टेकओव्हर करण्याचा प्रस्ताव युरोपीयन कमीशनर्स नी कसा उधळून लावला, जॅक वेल्श ने कशा बालीश चुका केल्या ते सगळे दिले आहे. (कल्पना करा दोन्ही अमेरीकन कंपन्या आणि त्यांच्या मर्जर / टेक ओव्हर ला युरोपीयन कमीशनर्स नकार देत आहेत.)
स्टीव्ह जॉब्स - by walter isaacson
तुमच्या जवळ खूप पेशन्स असतील तर जरूर सुरूवात करा. मोठे पुस्तक आहे.
मॉंक व्हू सोल्ड हिस फेरारी - रॉबीन शर्मा
हे पुस्तक मला झेपलेले नाही. तुम्ही वाचलेत तर जरूर परिक्षण लिहा.
कोल्ड स्टील.
आर्सेलर मित्तल मर्जर दरम्यान काय काय अचाट गोष्टी घडल्या त्यावर हे पुस्तक आहे.
बिझीनेस लीजंड्स, बिझीनेस महाराजे - गीता पिरामल.
भारतीय उद्योजकांची अप्रतीम व्यक्तीचित्रे - मराठी अनुवाद अशोक जैनांनी केला असल्याने अप्रतीम झाला आहे.
माझंही एक स्वप्न होतं - वर्गीस कुरीयन.
अमूलची जन्मगाथा.
टाटांच्या इतिहासाबद्द वाचायचे असल्यास - रोमान्स ऑफ टाटा स्टील, रूसी मोदी - द मॅन व्हू ऑल्सो मेड स्टील. टाटा- अ स्टोरी असे काहीतरी एक अप्रतीम पुस्तक आहे - पुस्तक पाहून सवडीने नाव कन्फर्म करेन.
९० मिनीट्स अॅट एंटबे.
ऑपरेशन थंडरबोल्ट ही अशक्य धाडसी कारवाई करणार्या इस्राईलच्या जवानांची, त्यांच्या कडव्या देशप्रेमाची आणि प्रतिकुल परिस्थितीलाही नमवणारी कहाणी.
पुस्तकाच्या शेवटी UN च्या सभेमध्ये केलेले त्यांच्या प्रतिनिधीने केलेले भाषण वाचताना डोळ्यासमोर उभे राहते.
जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज - पंडीत शिवकुमार शर्मा.-
शुभ्र काही जीवघेणे - अंबरीश मिश्र.
हे नक्क्की वाचाच. संगीतक्षेत्रातील दिग्गजांची चरित्रे आहेत.
गाए चला जा - शिरीष कणेकर.
लेखकाच्या नावावर जावू नका ;-), काही चरित्रे चांगली जमली आहेत. (राजेश खन्नाची प्रस्तावना असलेले पुस्तक हेच ना..?)
कार्यरत, प्रश्न आणि प्रश्न, धागे उभे आडवे ही अनिल अवचटांची रिपोर्ताज स्टाईलची पुस्तके.
कार्यरत मधील पान नंबर १९४ आणि १९५ चुकवू नका. ("आम्हा घरी धन - भाग १" मध्ये ते सापडेल तुम्हाला)
गुण गाईन आवडी, मैत्र, गणगोत, आपुलकी - पुलं
पुलंनी चितारलेली त्यांच्या सुहृदांची व्यक्तीचित्रे.
तीळ आणि तांदूळ - गदिमा
गदिमांनी लिहिलेली त्यांच्या सुहृदांची व्यक्तीचित्रे.
आहे मनोहर तरी, सोयरे सकळ - सुनिताबाई.
फोटोबायोग्राफीज आवडत असल्या तर..
चित्रमय स्वगत - पुलं.
बाळासाहेब
महाराष्ट्र देशा - उद्धव ठाकरे.
पहावा विठ्ठल - उद्धव ठाकरे.
वारी एक आनंदयात्रा - संदेश भंडारे
कविता वाचायच्या असल्यास.
समग्र बोरकर - खंड १ व २
जिप्सी, बोलगाणी - मंगेश पाडगांवकर
आज आत्ता मिळत असतील तर लगेचच - "दुनीया तुला विसरेल" हे भाऊसाहेब पाटणकरांच्यावरती असलेले पुस्तक घ्या.
आणि वरचे काहीच मिळाले नाही तर रोज "दासबोध" - एक पुस्तक म्हणून वाचत चला.. :-)
माझं वाचन एवढं दांडगं नाही. पण यातली काही पुस्तकं वाचायच्या यादीत आहेत. माँक हू सोल्ड फेरारी मलाही आवडलं नाही. परिणामकारक तर मूळीच नाही असं आपलं मला वाटतं.
मी इडली आणि ऑर्कीड, उद्योजक मी होणारच ही विठ्ठल कामतांची पुस्तकं वाचली पण इतकी नाही आवडली; थोडी विस्कळीत वाटली. इरावती कर्वेंच युगांत वाचून धक्का बसला. थोडसं नकारात्मक वाटलं तरीपण कटू सत्य फार रोखठोक पणे मांडलं आहे असं वाटलं.
अल्केमिस्टची गोष्ट मात्र कधीही वाचावी अशी आहे, असं वाटतं. खांडेकरांचं अमृतवेल मात्र खूप आवडलं छोटेखानीच आहे पण बरचं काही सांगून जातं असं वाटतं.
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस)
... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.
वॉर्ड नंबर ५ के ई एम - रवी बापट. असेच डॉक्टर बापटांच्या अनुभवांचे पुस्तक आहे.
हृदस्थ वाचले असेलच - तसेच डॉ. अलका मांडके यांचे "हृदयबंध" नावाचे पुस्तक आहे. मी शोधतो आहे हे पुस्तक.
दशानना - प्लीज नोट! ;-)
तुम्हाला नक्की कोणत्या विषयावर सध्या वाचायचे आहे ते सांगा शक्य झाले तर..
(1) अंताजीची बखर आणि (2) बखर अंतकाळाची - नंदा खरे
The case of rotten mangoes - Mohommad Hanif
Six suspects - Vikas Swarup
(आत्ता टंकाळा आला आहे म्हणून इतकंच, बाकीचं नंतर)
गोनीदांची सर्वच पुस्तके खूप छान आहेत. तरी त्यातही सर्वश्रेष्ठ म्हणायचीच तर पडघवली, जैत रे जैत, माचीवरचा बुधा, दुर्गभ्रमणगाथा, कादंबरीमय शिवकाल, त्या तिथे रूखातळी...जौ द्याना, यादी लैच मोठी आहे.
मी वाचलेल्या पहिल्या तीन कादंबर्या गोनीदांच्या होत्या: मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो आणि तुका आकाशाएव्हढा. यातील पहिल्या दोन संग्रही आहेत.
जर गोनिदांनी "विष्णूदास नामा" अशा काहीशा नावाने कादंबरी लिहिली असती तर ती मी वाचलेली चौथी कादंबरी ठरली असती. :)
अशी ही धरतीची माया - के. शिवराम कारंथ. अनु. रं. शा. लोकापूर
मरळि मण्णिगे ह्या मूळ कन्नड कादंबरीचा सुरेख अनुवाद.
वंशवृक्ष - भैरप्पा - अनु. उमा कुलकर्णी
तपळी शिवशंकर पिल्लै - दोन शेर धान (केरळमधील कुट्टनाड ह्या ठिकाणच्या समुद्रसपाटीच्याही खाली असणार्या जमैनीत भातशेती करणार्या मजुरांवर आधारीत कादंबरी)
सध्या हे पुस्तक मी वाचतो आहे. कथानायकाच्या वडीलांच्या आणि अमेरिकास्थित नातेवाईकांच्या हत्येचा आंतरराष्ट्रीय कट आणि त्या कटाची पालेमुळे शोधून काढण्यासाठी कथानायक आणि त्याच्या मैत्रिणीने केलेला प्रयत्न- अशी ही कथा आहे. कथेची पक्की मांडणी, ओघवती आणि वर्णनात्मक भाषा ह्यामुळे पुस्तक सुरवातीपासूनच मनाची पकड घेतं.
आहा.. एक नितांत सुंदर कादंबरी.
अनेक जुने राजकिय घडामोडी व घटना यांचा सुंदर असा वापर या कादंबरीमध्ये केला गेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जो वेग आहे तो खरच अफाट आहे कादंबरीला.
अहो ही कादंबरी कुठे मिळेल? मी दोन-तीन नेहेमीच्या दुकानांत पाहिलं तर औट ऑफ प्रिंट आहे असं त्यांनी सांगितलं. टेपा लावत होते की काय कळायला मार्ग नाही, कारण पूर्वीही एक-दोनदा असा अनुभव आला आहे (स्वतःजवळ प्रती शिल्लक नाहीत आणि दुसर्याला धंदा मिळू नये म्हणून असं बिनधास्त ठोकून देतात).
वाचलेच पाहिजे असे,
"डोह" लेखक श्रीनिवास कुलकर्णी, प्रकाशक मौज.
मिपावरील प्रत्येकाने वाचावेच असे पुस्तक, मिळवून वाचा अशी शिफारस करतो मी.
त्याच सोबत नेहमीचीच... तोत्तोचान, माचीवरचा बुधा, पवनाकाठचा धोंडी ही तर प्रत्येक मराठी माणसाने वाचावीत अशी पुस्तके आहेत.
जर जाहिरात करतो आहे असे वाटत असेल तर हा प्रतिसाद काढून टाकला तरी चालेल, चिंचवड येथे लिंक रोडवर, डोके उद्यान येथे "पुस्तकजत्रा" पुस्तक प्रदर्शन चालू आहे माझे, वरील पुस्तके जवळपास सर्व पुस्तके माझ्याकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन देखील आहेत, व्यनि केल्यावर त्याची मी लिंक देईन.
दशानन
तुम्ही तुमच्या "पुस्तकजत्रा" बद्दल सांगितले. यात वावगे काहीच नाही.
aparna akshay ,
गोनीदांच्या पवनाकाठचा धोंडीबद्दल लिहिले आहे. माचीवरला बुधा, शितूचाही उल्लेख केलेला आहे.
पुस्तकांची नावे देताना फक्त लेखकाचे नाव न देता पुस्तकाबाबत थोडकी माहिती द्यावी.
असे धागे कुठल्या ना कुठल्या मराठी संस्थळावर थोड्या थोड्या दिवसांनी येतच राहातात, नेमकं होतं काय ही अशी पसरलेली नावं घेऊन दुकानात जाता येत नाही ना...
मोदका (तू एक्सेल मास्टर म्हणून म्हटलं) ह्याची एखादी एक्सेल बनवून गुगल डॉक्स वर टाकता येईल का.. पुस्तकाच नाव, लेखकाच नाव, प्रकाशकाच नाव, वर्गीकरण (ऐतिहासिक, कादंबरी, आत्मचरित्र, कवितासंग्रह, अनुवाद वगैरे)
जर शंभर एक लोक जमले तर एकदमच मेगा ऑर्डर देऊन टाकु मग ;)
मुंबईत घडलेल्या आणि घडणार्या बर्याचश्या गोष्टींचि माहिती लेखकाने अनुभवुन जशीच्या तशी पुस्तकात सादर केली आहे! बरेचसे धक्कादायक सत्य दोल्यासमोर येते आणि विचार करायला लावते!
सद्ध्या खेळता खेळता आयुष्य ही गिरीश कर्नाडांची आत्मकथा वाचत आहे.मूळ कन्नडमध्ये असलेल्या पुस्तकाचा उमा कुलकर्णी ह्यांनी केलेला हा अनुवाद. नवीनच पुस्तक आहे आणि बर्याच जणांना वाचायचे असेल, तर डिटेल्स देत नाही, पण अत्यंत प्रामाणिकरीत्या लिहिलेले पुस्तक आहे, इतके म्हणते. हे पुस्तक वाचणे हा एक सुरेख अनुभव ठरतो आहे.
दोन महिन्यांपुर्वी या पुस्तकातला काही भाग लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये वाचला होता. त्यात गिरीश कर्नाड यांनी त्याच्या महाविद्यालयीन जीवनातल्या दिवसांवर लिहले होते.
रॉबिन कुकचे मेडिकल थ्रिलर्स.
कन्टेजन, कोमा, क्रायसिस, टोक्सिन, सीज्रर, क्रिटिकल आणि एक नॉन मेडिकल पण भन्नाट पुस्तक..स्फिंक्स.
जयवंत दळवी यांचे चक्र, (मधु मंगेश कर्णिक यांचे 'माहीमची खाडी' पण 'चक्र' बरोबर वाचा.. झोपड्पट्टी मधील लोकांच्या जीवनाचे भेदक वास्तवदर्शी चित्रण) सारे प्रवासी घडिचे, धर्मानंद
अॅलिस्टर मॅकलीनचची सर्व अनुवादित.. समुद्रप्रवास, जहाजे वगैरेशी संबधित थ्रिलर्स..
दिलीप प्रभावळकर यांचे हसगत (वेगळ्या ढंगाच्या निखळ विनोदी कथा), हसगत
द. मा. मिरासदार यांची कोणतीही.. नाना चेंगट, बाबु पैलवान, गणामास्तर, रामा खरात, शिवा जमदाडे, आनशी वगैरे मंडळीना भेटुन मज्जा येते.
सिडने शेल्ड्न, आर्थर हेली यांची सर्व अनुवादित..
पॅपिलॉन, बँको (तुरुंगातुन पलायन..सत्यकथा), नॉट विदऊट माय डॉटर (अमेरिकन महिलेचे ४ वर्षाच्या मुलीला घेउन इराण्मधुन नव्रर्याच्या तावडीतुन यशस्वी पलायन), सत्तर दिवस (अँडीज पर्वतात विमान कोसळल्यावर त्यातुन वाचलेल्या आणि ७० दिवसांनी माणसात येणार्या प्रवाशांची सत्यकथा)
गोडबोलेंचं "अर्थात" चांगलं आहे. बाकीच्या पुस्तकांमध्ये अजिबात दम नाही. मनात तर खुपच बालिश आहे. आयटीच्या भाषेत सांगायचं तर नुसतं कॉपी पेस्ट आहे हे पुस्तक.
गोडबोलेंचं "मुसाफीर" हे आत्मचरीत्र आवर्जून वाचावं असं आहे. त्यांचा पानापानांवर डोकावणारा "मी" खटकणारा असला तरी त्यांचा सोलापूरचा एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा ते माहिती तंत्रज्ञान उद्योगातील एक प्रभावी व्यक्तिमत्व हा प्रवास थक्क करणारा आहे. ते ज्या ठीकाणावर पोहचले त्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्याला तोड नाही.
मनात तर खुपच बालिश आहे
लोकसत्ता-लोकरंगमधे 'मनात' प्रसिद्ध होत होते तेव्हाच हे मनात आले होते.
हे एक जमेल तसे संकलन आहे. त्यामानाने सुबोध जावडेकर यांचे मानसशास्त्रावरचे लेखन नवीन माहिती देणारे वाटते.
दुसरी गोष्ट बाबाची. अनिल अवचट यांचाही अनेक संस्थांमधे काम करताना लोकांच्या 'मनाचा' चांगला अभ्यास जाणवतो.
बा द वे
'बोर्डरूम' सारखी गोडबोलेंची छान आहेत.
आपल्याला आठवते "दिवसेंदिवस"? मी मसापच्या ग्रंथालयात वाचून हसून हसून अख्खे ग्रंथालय ढवळून टाकले होते. मग कित्येक वर्षांनी एका प्रदर्शनात दिसल्याबरोबर उचलली. तोवर मी आतल्या गोष्टी विसरलो होतो. पुन्हा वाचल्यावरसुद्धा मला तशी आवडली, पण एक एक गोष्ट आवडायचे एक एक वय असते हे जाणवलं.
हल्ली वाचन कमी. मोदक यानी दिलेली यादी मस्त आहे.अनिल अवचट ,अच्यूत गोडबोले,मीना प्रभू, मोहन आपटे यांची सर्वच पुस्तके संग्रही असावीत असे वाटते.
माझ्या स्मरणात ठाण मांडलेली काही.
विज्ञानातील क्रांत्या.- ले डॉ, वसंत चिपळोणकर
आर डॉक्युमेंट- आयर्विंग वॅलेस
१९८४ जॉर्ज ओरवेल
फ्रीडम अॅट मिडनाईट- लॅरी कोलिन्स
नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि स वा़ळिंबे.
सॉरी शक्तीमान.
ते मी वाचलेच नाही. वालिम्ब्यांचे आहे एक म्हणल्यावर दुसरे वाचलेच नाही. बादवे त्यांची सगली पुस्तके अभिजीत वालिम्बे दिजितलाइज करनार होते त्याची काही कल्पना आहे का?
एके काळी हे पुस्तक मला खूप आवडलं होतं पण जेव्हा मी विल्यम शिररचं 'Rise and Fall of the Third Reich ' वाचलं तेव्हा कानिटकरांनी त्याचं भाषांतर केलं पण ते भाषांतर किंवा अनुवाद आहे असं जाहीर केलेलं नाही हे लक्षात आलं. शिररच्या पुस्तकाचा त्यांनी संदर्भग्रंथ म्हणून उल्लेख केलेला आहे. प्रत्यक्षात ते भाषांतर आहे. त्यामुळे हे पुस्तक मनातून उतरले.
ओसामा बिन लादेनला जी योजनाबध्द मोहिम आखून संपविले, त्या 'ऑपरेशन नेपच्यून स्पिअर' ह्या मोहीमेचं हे घटनापुस्तक. हे पुस्तक 'ऑपरेशन नेपच्यून स्पिअर' ह्याच्या टिम लीडरनं - मार्क ओवेन आणि केव्हीन मॉव्हरर ( सहलेखक) ह्यांनी लिहिलं आहे. साधारण तीनशे पानी हे पुस्तक आहे.
मिसळपाववर हात-पाय आपटत देव, धर्म, पुनर्जन्म, विज्ञान, मानसशास्त्र वगैरे गोष्टींवर कीबोर्ड बडवणार्यांसाठी:
देववादी आणि दैववादी:
१. कर्माचा सिद्धांत
२. मृत्यूचे माहात्म्य
दोन्ही पुस्तके हीराभाई ठक्कर यांनी लिहिली आहेत. मुळ पुस्तकं गुजराती असली तरी इंग्रजीसहीत बर्याच भारतीय भाषांमध्ये रुपांतरीत. पुस्तकांचा विषय काय असेल हे नावावरुनच कळते.
३. जिवात्म जगाचे कायदे (द लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड) - खोर्शेद भावनगरी: मुंबईतील एका पारशी कुटुंबातील दोन सख्खे भाऊ खोपोलीजवळ कार अपघातात मृत्यूमुखी पडतात. आई वडील अतोनात दु:खात असताना एका मांत्रिक बाईच्या मदतीने मृत भावांपैकी एकाचा आत्मा आपल्या आईशी स्वयंलेखन (ऑटोमेटीक रायटींग) पद्धतीने आपला म्रूत्यूनंतरचा प्रवास कथन करतो असा काहीसा साचा आहे या पुस्तकाचा.
४. मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स - डॉ. ब्रायन वेसः मराठीत उपलब्ध. व्यवसायाने मानसोपचारतज्ञ असलेल्या ब्रायन कडे एक मुलगी तपासणीसाठी येते. आपल्या नेहमीच्या उपचारांबद्दल पुर्ण खात्री असलेल्या ब्रायनचे इलाज या पेशंटवर चालत नाही. शेवटी तो तिला संमोहन अवस्थेत नेतो. या अवस्थेत त्या मुलीला "मास्टर्स" तिच्या ८६ जन्मांबद्दलची माहिती देतात. प्रचंड गाजलेलं पुस्तक.
५. लाईफ बिफोर लाईफ - जिम टकरः पुनर्जन्म या विषयावरचं मोस्ट ऑथेंटिक लेखन असूनही "पुनर्जन्म आहे" असा दावा न करणारे हे पुस्तक आहे. डॉ. इयान स्टीव्हन्सन या अमेरिकेतील युनिव्हरसीटी ऑफ व्हर्जिनिसाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुखाचे चाळीस वर्षाच्या संशोधनाचे फलित म्हणजे हे पुस्तक. डॉ. स्टीव्हन्सननी चाळीस वर्षात जगभरातील तत्कालीन पुनर्जन्मांच्या केसेसचा अभ्यास केला. त्यांच्या नोंदी केल्या. या नोंदी त्याच्या कनिष्ठ सहकार्याने, जिम टकरने पुस्तक रुपात मांडल्या आहेत. या विषयावरील हे "द वन" पुस्तक आहे.
अजून खुप पुस्तकं आहेत. पण ब्रेक के बाद.
सर्वांना एक नम्र विनंती.
पुस्तक आणि लेखकाचे नाव यापेक्षा आपण वाचले असल्यास पुस्तकाबद्दल अगदी थोडक्यात काही लिहिले तर बरे होइल. धाग्याच्या सुरुवातीला मी तशाच प्रकारे लिहिले आहे. धन्या आणि दत्ता काळे यांचा सविस्तर प्रतिसादही अतिशय उपयुक्त आहे. अनेकदा पुस्तकाचे नुसते नाव दिल्याने ते वाचण्याची उत्सुकता निर्माण होतेच असे नाही.
(आपुन विनम्र है) जोग
चिंतन – ले. कविवर्य मंगेश पाडगावकर. हे कवितांचं पुस्तक नसून गद्य आहे. कविवर्यांनी काही पुस्तकांची मराठीत भाषांतरं केली. संत सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या रचना, तसंच शेक्सपियरची तीन नाटकं, आणि बायबल. ही भाषांतरं करताना त्यांनी प्रत्येक रचनाकारांचाही संशोधनात्मक सखोल अभ्यास केला. या प्रत्येक ग्रंथाला लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनांचं संकलन म्हणजे हे पुस्तक. अत्यंत रसाळ भाषा. सोपं, तत्त्वचिंतनात्मक. त्या त्या काळाचं, समाजाचं चित्र. एका वेगळ्या पाडगावकरांची आपल्याला ओळख होते.
एक धागा सुताचा – कमला काकोडकर याचं (डॉ. अनिल काकोडकरांच्या मातोश्रींचं) आत्मचरित्र. राजकीय वलय लाभलेल्या पतीने संसाराच्या ऐन उमेदीच्या काळात उभ्या केलेल्या वादळाला सामोरं जाताना, जुन्या वळणाच्या त्या माउलीने धैर्याने सगळा संसार सावरलाच, त्याचबरोबर मुलाच्या (अनिलच्या) शिक्षणात खंड न पडू देता त्याच्यावर उच्च मूल्यसंस्कार करून त्याचं भविष्य घडवलं, हे वाचताना आपण आदराने नतमस्तक होतो. एक अत्यंत सात्त्विक, सोज्वळ व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर जिवंत उभं राहतं. जणू सुती धाग्याने विणलेलं भरजरी वस्त्रच.
नादवेध – ले. अच्युत गोडबोले. शास्त्रीय संगीतातल्या रागांवर साध्यासोप्या भाषेत लिहिलंय. त्या त्या रागांवर आधारित असलेली, मराठी आणि हिंदी भाषांतल्या प्रसिद्ध सिने/भाव/भक्ति/नाट्यगीतांची यादीही दिली आहे. शास्त्रीय संगीताबद्दल (रागांबद्दल) विनाकारण निर्माण झालेल्या भीती दूर व्हायला मदत होईल. (‘धन्या’च्या प्रतिसादात ‘मुसाफिर’चा उल्लेख आल्यामुळे त्याबद्दल लिहीत नाही.)
चकवाचांदणं – वनऋषी मारुती चितमपल्लींचं आत्मचरित्र. जाडजूड (साडेसहाशे पानांचा) ग्रंथ. सुरुवातीची काही प्रकरणं वैयक्तिक आयुष्याबद्दल, नंतर मात्र पूर्ण ‘जंगली’. वनकारकिर्दीत आलेले थरारक अद्भुत अनुभव, चिकित्सक वृत्तीने केलेलं संशोधन, त्यांना भेटलेली माणसं आणि त्याचं मार्गदर्शन याबद्दल अतिशय मोकळ्या भाषेत. ‘मी’पण कुठेही जाणवत नाही. चुका, दोष याबद्दल खोटाखोटा प्रांजळ पश्चात्तापही जाणवत नाही. अतिशय निर्मळ निवेदन.
बदलता भारत – ले. भानू काळे. जागतिकीकरणामुळे बदललेल्या परिस्थितीला आणि नव्या आव्हानांना विविध राज्यं (र्ज्यांची सरकार आणि जनता) कशा प्रकारे सामोरी गेली, त्याचा आढावा. विविध राज्यांचा स्वत: दौरा करून त्यावर आधारित.
सुधांशुनूलकर
नेगल भाग १ व २ कुणी वाचलेत का ? याच प्रकारचे सोनाली सिंहीणीवरचेही डॉ. पूर्णपात्रे यांचे पुस्तक आहे. त्याला चांगली लोकप्रियता लाभली.
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' नावाचा चित्रपट आला होता. त्यावेळी बापू वाटवे यांनी लिहिले दादासाहेब फाळकेंवर लिहिलेले पुस्तक मुद्दाम मिळवून वाचले होते. चित्रपटापेक्षा पुस्तक रंजक आणि रोमांचक आहे. विशेषतः वाटाण्याचे रोप वाढत जाते त्याची चित्रफीत फाळके तयार करतात. ते पुस्तकातले वर्णन चित्रपटापेक्षा शतपटीने भावते.
एका लग्न ठरलेल्या मुलीला आपल्याला कुष्टरोग झाल्याचे कळते . लग्न मोडते. नंतर रोगाची वाढ . मग तिच्या मनाची उलघाल , बरे होण्याची धडपड व शेवटी जीवनाचा जोडीदार मिळणे. अशी ही सत्य हकिकत. ...पानगळीचे झाड. माझ्या आठवणी प्रमाणे कोणी तरी जैन आडनावाची लेखिका आहे.
माणूस-मनोहर तल्हार
आयुष्य पेलताना-मधुकर तोरडमल
परजित-अपराजित-वि.स.वाळींबे
पृथ्वीवर माणूस उपराच-सुरेशचंद्र नाडकर्णी
तराळ अंतराळ-शंकरराव खरात
बनगरवाडी-माडगुळकर
माझा प्रवास-गोडसे भटजी
वैदीक संस्क्रुतीचा इतिहास-तर्कतीर्थ लक्षमंणशात्री जोशी(अप्रतीम ग्रंथ)
फकिरा-अण्णाभाउ साठे
झाडाझडती-विश्वास पाटील
इजिप्तायन-मिना प्रभू
माझी लंडनवारी-आनंद पाटील
याशिवाय पु.लंचे सर्व साहीत्य,नारायण धारपांच्या सर्व कथा,आणी अर्थातच सु.शि.
मसापचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळवणारे हे एकमेव जोडपे.
प्रतिभा रानडे आणि फिरोझ रानडे यांचे अफगाणिस्तान, पाकिस्तानविषयक जे लिखाण आहे त्याला मराठीत तोड नाही.
प्रतिभा रानडे यांनी त्यांच्या काबूलमधील १९७२ च्या वास्तव्यावर अफगाण डायरी हे पुस्तक लिहिले. काबूल म्हणजे जुने पुणे हे वाक्य फार भावले. अफगाणिस्तानातील स्त्रिया एके काळी शिकत असत. नोकरी करत असत. इंजिनीयर म्हणून काम करणार्या स्त्रियाही तेथे होत्या. असे सगळे वर्णन त्यात येते.
--
वाचकांना धर्माच्या नावाखाली अश्मयुगात ढकलला गेलेला अफगाण माहीत आहे.
पाकिस्तानात जो इतिहास सांगितला जातो त्यावर 'मर्डर ऑफ हिस्टरी' नावाचे पुस्तक पाकिस्तानात लिहीले गेले आहे.
लेखक आहेत के के अझीझ.
याचा मराठी वा हिंदीमधे अनुवाद असेल तर हवा आहे.
माचीवरचा बुधा वाचले आहे?
पुस्तकविश्व
तुम्ही दिलेल्या पुस्तकांमध्ये
In reply to तुम्ही दिलेल्या पुस्तकांमध्ये by मोदक
एकंदर धागा आणि बरेच प्रतिसाद आवडले
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस) ... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.वॉर्ड नंबर ५ के ई एम - रवी बापट. असेच डॉक्टर बापटांच्या अनुभवांचे पुस्तक आहे. हृदस्थ वाचले असेलच - तसेच डॉ. अलका मांडके यांचे "हृदयबंध" नावाचे पुस्तक आहे. मी शोधतो आहे हे पुस्तक. दशानना - प्लीज नोट! ;-) तुम्हाला नक्की कोणत्या विषयावर सध्या वाचायचे आहे ते सांगा शक्य झाले तर..In reply to मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम by मोदक
ही सगळी पुस्तके आता माझ्याकडे
In reply to मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम by मोदक
नरेंद्र जाधव - मी आणि माझा
(1) अंताजीची बखर आणि (2) बखर
In reply to (1) अंताजीची बखर आणि (2) बखर by आदूबाळ
.
In reply to . by आशु जोग
माझा नाही हो शब्द असाच
In reply to (1) अंताजीची बखर आणि (2) बखर by आदूबाळ
टंकाळा
संभव असंभव
In reply to संभव असंभव by आनन्दा
निरंजन घाटेंच्या इतर
मस्त धागा.
गोनिदांबद्दल नाही लिहीलं कोणी
In reply to गोनिदांबद्दल नाही लिहीलं कोणी by स्पंदना
गोनीदांची सर्वच पुस्तके खूप
In reply to गोनीदांची सर्वच पुस्तके खूप by प्रचेतस
वाघरु?
In reply to वाघरु? by यशोधरा
हो.
In reply to हो. by प्रचेतस
ह्म्म.. गोनिदांची सगळीच
In reply to ह्म्म.. गोनिदांची सगळीच by यशोधरा
गोनिदांची सगळीच पुस्तके,
गोनिदांची सगळीच पुस्तके, त्यातली भाषा, विषय भुरळ पाडणारे, लोभस असेच आहे+१ याप्रमाणेच, "स्मरणे गोनिदांची", "स्मरणगाथा" आणि "आशक मस्त फकीर" ही गोनिदांविषयी असलेली पुस्तकेही अप्रतीम आहेत. आम्हा घरी धन प्रमाणेच आवडलेल्या पुस्तकांचा एखादा धागा काढा. :-)In reply to गोनिदांची सगळीच पुस्तके, by मोदक
मी वाचलेल्या पहिल्या तीन
In reply to मी वाचलेल्या पहिल्या तीन by धन्या
'मृण्मयी ' राहिली !
In reply to 'मृण्मयी ' राहिली ! by सस्नेह
एक आवडीचं राहिलं.
In reply to 'मृण्मयी ' राहिली ! by सस्नेह
'मृण्मयी ' राहिली !
In reply to 'मृण्मयी ' राहिली ! by भ ट क्या खे ड वा ला
गो नि दांचे मला सर्वात
गोनिदांचं 'कृष्णवेध' आणि 'दास डोंगरी राहतो' .........
अशी ही धरतीची माया - के.
श्री.ना. पेंडसे - तुंबाडचे
लॉक ग्रिफिन - वसन्त वसन्त लिमये
In reply to लॉक ग्रिफिन - वसन्त वसन्त लिमये by दत्ता काळे
आहा.. एक नितांत सुंदर कादंबरी
In reply to लॉक ग्रिफिन - वसन्त वसन्त लिमये by दत्ता काळे
अप्रतिम
In reply to लॉक ग्रिफिन - वसन्त वसन्त लिमये by दत्ता काळे
अहो ही कादंबरी कुठे मिळेल? मी
In reply to अहो ही कादंबरी कुठे मिळेल? मी by आदूबाळ
हे वसन्त वसन्त लिमये म्हणजे
In reply to हे वसन्त वसन्त लिमये म्हणजे by मोदक
हो तेच ते. त्यांची मुळशी जवळ
In reply to हो तेच ते. त्यांची मुळशी जवळ by आदूबाळ
माझ्याकडे आहे स्टॉकला.
In reply to अहो ही कादंबरी कुठे मिळेल? मी by आदूबाळ
बुक गंगा
In reply to अहो ही कादंबरी कुठे मिळेल? मी by आदूबाळ
लॉक ग्रिफिन मला बुकगंगा वर
वाचलेच पाहिजे असे,
In reply to वाचलेच पाहिजे असे, by दशानन
सुरेख आहे हे पुस्तक.
In reply to सुरेख आहे हे पुस्तक. by यशोधरा
काय विषय आहे या पुस्तकाचा?
In reply to काय विषय आहे या पुस्तकाचा? by धन्या
जरुर.
जर जाहिरात करतो आहे असे वाटत
In reply to जर जाहिरात करतो आहे असे वाटत by दशानन
ऑ??? वाट चुकलात की काय?
.
लिस्ट..
In reply to लिस्ट.. by उपास
कल्पना चांगली आहे.
In reply to कल्पना चांगली आहे. by मोदक
आपण मेगा ऑर्डर वर मेगा
मॅक्सिमम सिटि - सुकेतु मेहता
सद्ध्या खेळता खेळता आयुष्य ही
In reply to सद्ध्या खेळता खेळता आयुष्य ही by यशोधरा
दोन महिन्यांपुर्वी या
रॉबिन कुकचे मेडिकल थ्रिलर्स.
शन्ना,
- दिवसेंदिवस शं.ना.नवरे- एक हळूवार प्रेम कथा
- ऑक्टोपस अप्रतिम कादंबरी- आठवत नाहीत.(सेकंड वर्ल्ड वॉर ची पार्श्वभुमी अप्रतीम)
- एम टी आयवा मारू- अनंत सामंत
- ररांग ढांग लेखक क्षमस्व आठवत नाही
- मरणात खरोखर जग जगते बाळ सामंत
आणि काही अलिकडची पुस्तके. अच्युत गोडबोलेंची सर्व पण विशेष उल्लेखनिय म्हणजे -In reply to शन्ना, by कापूसकोन्ड्या
•ररांग ढांग लेखक क्षमस्व आठवत
In reply to शन्ना, by कापूसकोन्ड्या
ऑक्टोपस - श्री ना पेंडसे
In reply to शन्ना, by कापूसकोन्ड्या
गोडबोलेंचं "अर्थात" चांगलं
In reply to गोडबोलेंचं "अर्थात" चांगलं by धन्या
"अर्थात" मध्ये जरा सरधोपटीकरण
In reply to "अर्थात" मध्ये जरा सरधोपटीकरण by आदूबाळ
मुसाफिर चांगले आहे, वरती
In reply to गोडबोलेंचं "अर्थात" चांगलं by धन्या
.
मनात तर खुपच बालिश आहेलोकसत्ता-लोकरंगमधे 'मनात' प्रसिद्ध होत होते तेव्हाच हे मनात आले होते. हे एक जमेल तसे संकलन आहे. त्यामानाने सुबोध जावडेकर यांचे मानसशास्त्रावरचे लेखन नवीन माहिती देणारे वाटते. दुसरी गोष्ट बाबाची. अनिल अवचट यांचाही अनेक संस्थांमधे काम करताना लोकांच्या 'मनाचा' चांगला अभ्यास जाणवतो. बा द वे 'बोर्डरूम' सारखी गोडबोलेंची छान आहेत.In reply to शन्ना, by कापूसकोन्ड्या
आपल्याला आठवते "दिवसेंदिवस"?
In reply to शन्ना, by कापूसकोन्ड्या
...
हल्ली वाचन कमी..
In reply to हल्ली वाचन कमी.. by चौकटराजा
राजासाब नाझी भस्मासुर इनामदार
In reply to राजासाब नाझी भस्मासुर इनामदार by अभ्या..
'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वि
In reply to 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वि by प्रचेतस
सॉरी शक्तीमान.
In reply to सॉरी शक्तीमान. by अभ्या..
नाय ब्वा.
In reply to 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वि by प्रचेतस
विल्यम शिरर
In reply to हल्ली वाचन कमी.. by चौकटराजा
आयर्विंग वॅलेस चे 'द सेवेन्थ
In reply to हल्ली वाचन कमी.. by चौकटराजा
आर डॉक्युमेंट
नो ईझी डे - मार्क ओवेन / केव्हीन मोव्हरर
मनात - लेखक - अच्युत गोडबोले
मिसळपाववर हात-पाय आपटत देव,
In reply to मिसळपाववर हात-पाय आपटत देव, by धन्या
फारच मस्त यादी आहे, या
In reply to मिसळपाववर हात-पाय आपटत देव, by धन्या
भारी...
In reply to भारी... by पुष्कर जोशी
वर्तक म्हंजे तेच का ते
.
काही पुस्तकं,,, वाचायलाच हवीत अशी
.
In reply to . by आशु जोग
चित्रपटापेक्षा पुस्तक`
पानगळीचे झाड....
माणूस-मनोहर तल्हार
रानडे पती पत्नी
In reply to रानडे पती पत्नी by आशु जोग
...
विश्वास पाटलांच युगंधर आणी इरावती कर्वे बाईंच युगांत ......
In reply to विश्वास पाटलांच युगंधर आणी इरावती कर्वे बाईंच युगांत ...... by बाबा पाटील
.
In reply to . by आशु जोग
युगंधर एकवेळ सोडा पण युगांत
In reply to युगंधर एकवेळ सोडा पण युगांत by बॅटमॅन
+१
In reply to विश्वास पाटलांच युगंधर आणी इरावती कर्वे बाईंच युगांत ...... by बाबा पाटील
युगंधर शिवाजी सावंतांचं आहे
In reply to युगंधर शिवाजी सावंतांचं आहे by प्रचेतस
+१.
In reply to विश्वास पाटलांच युगंधर आणी इरावती कर्वे बाईंच युगांत ...... by बाबा पाटील
युगंधर पाटलांचं आहे कि सावंतांचं ?
.