✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

व
विवेकपटाईत यांनी
Mon, 12/08/2014 - 20:23  ·  लेख
लेख
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७ भगवंत म्हणतात: १. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे २. कर्मफळ माणसाच्या हातात नाही. ३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच. बहुतांना असे वाटते हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो. पण हे खरे नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर त्याचे फळ मिळायलाच पाहिजे. हेच योग्य आणि न्यायपूर्ण. जर कर्माचे फळ मिळणार नसेल तर कर्म कशाला करायचे, असा प्रश्न मनात येणारच. मग भगवंतांनी गीतेत कर्म फळावर, कर्म करणार्याचा अधिकार नाही, हे का म्हंटले आहे? हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पाहतोच मुलाने उत्तम अभ्यास केला तर त्याला परीक्षेत उत्तम गुण मिळतात. उत्तम अभ्यास = उत्तम गुण सहज सोपी नियम आहे. पण नेहमीच असे होत नाही. कुणी विद्यार्थी आजारी पडतो आणि पेपर देऊ शकत नाही. कुणाला अपघात होतो, परीक्षा केंद्रावर पोहचू शकला नाही. कुणाला पेपर तपासताना क्वचित होणाऱ्या चुकी मुळे ९० च्या जागी ०९ मार्क मिळतात. तो चक्क नापास होतो. SSCचा टायपिंगचा पेपरात नेहमीचेच आहे, प्रत्येक केंद्रात २-३ परीक्षार्थी केवळ टाईपरायटर खराब झाल्या मुळे अयशस्वी होतात. त्यांना सरकारी नौकरी मिळत नाही. त्यांची तैयारी व्यर्थ जाते. शेतकरी ही उत्तम बियाण्यांची पेरणी करतो, शेतात जातीने लक्ष देतो, खत, पाणी व मशागत सर्व उत्तम प्रकारे करतो, पिक ही भरपूर येते, पण कित्येकदा गारपीट, अवेळी पावसामुळे त्याचे अतोनात नुकसान होते. त्याला ही पाहिजे तसे फळ मिळत नाही. वरील उदाहरणांनी एक बाब स्पष्ट होते, सर्वांनी उत्तम कर्म केले पण तरी ही त्यांना फळ मिळाले नाही. कर्म करणे माणसाच्या हातात आहे, पण आपल्या कर्मावर प्रभाव टाकणाऱ्या इतर बाबींवर आपले नियंत्रण नसते. देश, काळ, राजनीतिक परिस्थिती एवं इतरांच्या कर्मांचा प्रभाव ही आपल्या कर्मांवर पडतो. समर्थांनी या आपल्या कर्मांवर प्रभाव टाकणार्या इतर बाबींचे वर्णन, "अध्यात्मिक ताप" (देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या संयोगाने होणारे ताप - शारीरिक व मानसिक व्याधी इत्यादी ) आणि "आधिभौतिक ताप" ( सर्व पंचभूतांच्या संयोगाने जे त्रास होतात अर्थात सर्व प्रकारचे बाह्य कारणे - अपघात, सर्पदंश, चोरी, डकैती, आग, अतिवृष्टी, पूर, परचक्र, राजा एवं अन्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून छळ इत्यादी) [दशक ३, समास ६ आणि ७] असे केले आहे. या सर्व बाबींवर कर्म करणार्याचे नियंत्रण नसते, म्हणूनच भगवंतानी म्हंटले आहे, कर्मफळावर कर्म करणाऱ्याचा अधिकार नाही, केवळ कर्मावर त्याचा अधिकार आहे. कर्मांचे फळ मिळाले नाही तर माणूस निराश होतो. आज ह्या मुळेच अनेक शेतकरी आत्महत्या करतात, पेपर मध्ये नापास झाल्याने विद्यार्थी ही आत्महत्या करतात. किंवा लोक कर्म करणे सोडून देतात. मृत्युलोकाला 'कर्मलोक' ही म्हणतात, इथे कुणाला ही कर्म चुकलेले नाही. कर्म हे करावेच लागणार, त्या शिवाय या लोकात कुणी जगू शकत नाही. म्हणूनच भगवंतानी गीतेत म्हंटले आहे, अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे. असे कर्म केल्याने आपल्या कर्माचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळाले नाही तरी ही आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार नाही. कर्माची अपेक्षा न ठेवता उत्तम रीतीने कर्म करणे, हे जर शेतकरी राजाला कळले, तर तो कुठल्या ही परिस्थितीत निराश होणार नाही. आत्महत्या न करता पुन्हा पुढच्या पिकाच्या तैयारीला लागेल. विद्यार्थी ही पुन्हा जोमाने अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. हेच भगवंताना गीतेत सांगायचे असेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
79430 वाचन

💬 प्रतिसाद (136)

प्रतिक्रिया

तुम्ही आत्म्याची संकल्पना

प्रसाद गोडबोले
Tue, 12/09/2014 - 11:47 नवीन
तुम्ही आत्म्याची संकल्पना मानता, मी मानत नाही.
बुवा उर्फ अत्रुप्त आत्मा आपल्याल्या प्रत्येक कट्याला याचि देही याचि डोळा भेटतात तरीही तु आत्मा मानत नाहीस ... दांभिक साला .... ल्मिसळपाववर नाव काढशील :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तू अभद्र वाणी उच्चारली आहेस.

सतिश गावडे
Tue, 12/09/2014 - 11:52 नवीन
तू अभद्र वाणी उच्चारली आहेस. या कर्माचे फळ तू अपेक्षा नाही केलीस तरीही तुला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तू अभद्र वाणी उच्चारली आहेस

प्रसाद गोडबोले
Tue, 12/09/2014 - 12:20 नवीन
तू अभद्र वाणी उच्चारली आहेस
भद्र अभद्र असं काही नसतं ... प्रतिसाद डीलीट झाला तर समजायचं की ते अभद्र होतं एरव्ही सगळं भद्रच ;) मॅटीनी शो ची कविता वाचलीयीस का तु ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

कोणती कविता???

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 12:28 नवीन
कोणती कविता???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अकुंचा मॅटिनी शो!

संजय क्षीरसागर
Tue, 12/09/2014 - 12:31 नवीन
*smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

या श्लोकानं भारतीय मानसिकतेत द्वंद्व निर्माण केलंय

संजय क्षीरसागर
Tue, 12/09/2014 - 10:34 नवीन
पाश्चिमात्य मानसिकतेत असा बखेडा नसल्यानं (म्हणजे, तुझा कर्मावर अधिकार आहे पण फलावर नाही. फलाभिमुख न होता कर्म कर आणि (तरीही) कर्मविन्मुख होऊ नकोस!...) पाश्चिमात्य लोक कोणतंही काम समरसून करतांना दिसतात आणि ते निश्चितपणे फलाप्रत जाईल अशी योजना करतात. कर्माप्रती त्यांचा दृष्टीकोन अत्यंत निर्वैयक्तिक दिसतो आणि कामाची प्रतवारी (जी आपल्याकडे उघड दिसते) ती त्यांच्याकडे दिसत नाही. त्यांचाकडे कर्म आणि ते करण्याच्या पद्धती स्टँडर्डाइज होऊन फलाप्रती निश्चितता निर्माण करण्यात आलीये आणि आपल्याकडे कर्मापेक्षा फलालाच महत्त्व आलंय. फलापेक्षेनं कार्यरत होऊन देखिल त्यांच्याकडे कॅब ड्रायवर स्वतःचं काम सन्मानानं करतांना दिसतो आणि आपल्याकडे फलावरनं, कर्माची आणि कर्त्याची सामाजिक स्थिती ठरते. या श्लोकाच्या फंडातच गोंधळ आहे, जर बाह्यपरिस्थिती संपूर्णपणे कर्त्याच्या आवाक्याबाहेर असेल तर प्राप्त कर्म आणि ते फलाप्रत नेणारी सर्व साधनं सुद्धा त्याच्या आवाक्याबाहेरच आहेत. त्यामुळे प्राप्त कर्मावर कर्त्याचा अधिकार असणं असंभव आहे. अशात मग उर्वरित श्लोकाला संदर्भ राहात नाही.
  • Log in or register to post comments

:)

क्लिंटन
Tue, 12/09/2014 - 10:41 नवीन
या श्लोकाच्या फंडातच गोंधळ आहे
या श्लोकाच्या फंडात नव्हे तर तुम्हाला त्या श्लोकाचा जो अर्थ समजला आहे त्यात मात्र प्रचंड गोंधळ दिसतच आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

खालच्या प्रतिसादातला गोंधळ उपप्रतिसादातून

संजय क्षीरसागर
Tue, 12/09/2014 - 11:11 नवीन
सविस्तरपणे दर्शवला आहे. वाचनाचा आनंद (सर्वांनी आणि मनसोक्त) घ्यावा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

लेख आवडला

क्लिंटन
Tue, 12/09/2014 - 10:38 नवीन
लेख आवडला हे वेगळे सांगायलाच नको. याविषयी मे २००९ मध्ये विकास यांचा एकम सत नावाचा लेख आला होता त्यावेळी त्या चर्चेवर मी काही प्रतिसाद लिहिले होते.तेच इथे चिकटवतो. १. डेल कार्नेगी हे अमेरिकेतील विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आद्य ’सेल्फ हेल्प’ वाले. त्यांनी How to stop worrying and start living हे एक नितांत सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी अमेरिकेतील मॉलमध्ये सर्वत्र असलेल्या J.C.Penny या साखळीचे मालक जेम्स कॅश पेनी यांच्याविषयी लिहिले आहे.पेनी म्हणतात,"I wouldn't worry if I lost every dollar I have because I don't see what is to be gained by worrying. I do the best job I possibly can; and leave the results in the laps of the gods". भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ यापेक्षा काही वेगळे नाही.पेनींनी भगवद्गीता हे नावही ऐकले असायची शक्यता कमीच आहे.पण त्यांनी नकळतपणे का होईना भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ अंमलात आणली होती.आणि मला वाटते सर्व क्षेत्रातील यशस्वी आणि आघाडीच्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हीच शिकवण आचरात आणावी लागत असेल इतकी ही शिकवण सर्वव्यापक आहे. आता हा विषय निघालाच आहे म्हणून त्यावर अजून थोडे लिहितो.मला स्वत:ला अमेरिका सोडून भारतात परत यावे लागले आणि त्या अर्थी मी अपयशी ठरलो असे मला वाटले.त्यावेळी मी महर्षि दयानंदांचे भगवद्गीतेवरील 'The teachings of Bhagavad Gita' हे पुस्तक अजून खोलात वाचले होते.त्यात ते म्हणतात की कर्मण्येवाधिकारस्ते चा अनेकदा चुकीचा अर्थ लावला जातो.फळाची अपेक्षा न करता कर्म करा असा याचा अर्थ नाही.तसे असेल तर स्वत: भगवान कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तेव्हा ती शिकवण अर्जुनाला कळेल ही अपेक्षा न ठेवता सांगितली असाही अर्थ निघू शकेल.महर्षि दयानंदांच्या मते ते तसे नाही.दयानंदांनी त्याच्या लावलेल्या अर्थावर मी स्वत: विचार केला आणि मला त्यांच्या म्हणण्याचा अर्थ पुढीलप्रमाणे असावा असे वाटते. हे गणिताच्या परिभाषेत लिहितो. समजा A=संचित (मागील जन्मांतील unfulfilled कर्म). म्हणजे मागील जन्मात आपण काही चांगले/वाईट केले असेल पण त्याचे चांगले/वाईट फळ आपल्याला मिळाले नसेल तर ते संचित यात मोडते. B=प्रारब्ध (या जन्मातील unfulfilled कर्म) C=कोणत्याही गोष्टीसाठी केलेल आपले प्रयत्न आणि R हे आपल्याला मिळणारे फळ असेल (Result) तर R=f(A,B,C). म्हणजेच आपल्याला मिळणारे फळ या तीनही घटकांवर अवलंबून असते.यापैकी पहिल्या घटकाची आपल्याला अजिबात कल्पना नसते.दुसरा घटक माहित असायची शक्यता असते पण त्याविषयी आपण काहीही करू शकत नाही कारण ती गोष्ट आधीच घडून गेलेली असते. आपल्या हातात केवळ तिसरा घटक असतो. तसेच f या फलनाचे (function) चे स्वरूपही आपल्याला माहित नसते. तेव्हा आपल्याला शक्य तितके चांगले प्रयत्न करावेत.आणि देवाला माहित असलेल्या गणिती सूत्रानुसार आपल्याला फळ मिळेल. हे दयानंदांच्या म्हणण्याचे माझे interpretation झाले. दयानंदांनी ’प्रसादबुध्दी’ ही एक संकल्पना त्याच पुस्तकात लिहिली आहे.ते म्हणतात की आपण देवळात गेलो आणि आपल्याला प्रसाद म्हणून खडीसाखर मिळाली की सफरचंद, आपण ते देवाचा प्रसाद म्हणून स्विकारतो.खडीसाखर मिळाली तर ’मला सफरचंद का दिले नाही’ असा उलटा प्रश्न आपण विचारत नाही. त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांना येणारे फळ हा ’देवाचा प्रसाद’ म्हणून स्विकारावे असेही दयानंद म्हणतात.म्हणजेच दयानंदांच्या मते आपण चांगल्या फळाची अपेक्षा ठेवत आपले सर्वात चांगले प्रयत्न करावेत. पण त्याचे परिणाम देवावर सोडावेत आणि परिणाम जरी आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आले तरी स्वत:ला अपयशी मानू नये. जे.सी.पेनी पण काही वेगळे म्हणत आहेत असे वाटत नाही. २. दयानंद सुध्दा आपल्या कर्माचे फळ नक्की काय हा अधिकार केवळ देवाचा आहे असे म्हणतात. म्हणजेच आपण केलेल्या कर्माचा परिणाम काय होईल याचा निर्णय करायचा अधिकार आपल्याला कधीच नाही असाच होतो.कर्मण्येवाधिकारस्ते चा अर्थ फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करावे असा लावला जातो.दयानंद म्हणतात तो तसा नाही तर कर्मणि एव अधिकार: ते म्हणजे तुझा कर्म करण्यापुरताच अधिकार आहे आणि मा फलेषु कदाचन म्हणजे तुझ्या कर्माची फळे काय हे ठरवायचा नाही. यात ठरवायचा हा शब्द मुद्दामून अधोरेखित केला आहे. म्हणजेच मी परीक्षेसाठी अभ्यास करतो ते मला चांगले मार्क मिळतील ही अपेक्षा ठेऊनच.पण माझ्या A,B,C या घटकांप्रमाणे देवाला माहित असलेल्या गणिती समीकरणाप्रमाणेच मला फळ मिळणार आहे.याचा अर्थ मी अभ्यास करताना चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेऊन अभ्यास करावा असा होत नाही.तर मी चांगले मार्क मिळावेत म्हणून माझ्या परिने चांगला प्रयत्न करावा आणि परिणाम देवावर सोडावा.आणि जो काही परिणाम देव मला देईल तो खळखळ न करता स्विकारावा.म्हणजेच माझा अधिकार अभ्यास करण्यापुरताच आहे.त्याचा परिणाम काय होईल हे ठरवायचा नाही.पण याचा अर्थ मी अभ्यास करताना चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेवता अभ्यास करावा हा होत नाही.
  • Log in or register to post comments

सुरेख ज्योक !

संजय क्षीरसागर
Tue, 12/09/2014 - 11:09 नवीन
समजा A=संचित (मागील जन्मांतील unfulfilled कर्म). म्हणजे मागील जन्मात आपण काही चांगले/वाईट केले असेल पण त्याचे चांगले/वाईट फळ आपल्याला मिळाले नसेल तर ते संचित यात मोडते.
म्हणजे मागच्या जन्मीचा बॅकलॉग या जन्मी भरुन काढायचा? आणि असं किती जन्म मागे जायचं? आणि हे रेकॉर्ड नेमकं कुठे असतं आणि कोण ठेवतं?
B=प्रारब्ध (या जन्मातील unfulfilled कर्म)
म्हणजे पुन्हा या जन्मातही कामं पेंडींग! त्याचं ओझं म्हणजे प्रारब्ध! (लै भारी! पेंडींग कामाचं जे टेंशन असतं त्याला प्रारब्ध म्हणायचं!)
C=कोणत्याही गोष्टीसाठी केलेल आपले प्रयत्न
निदान एका तरी गोष्टीला लॉजिक दिसतंय.
आणि R हे आपल्याला मिळणारे फळ असेल (Result) तर R=f(A,B,C). म्हणजेच आपल्याला मिळणारे फळ या तीनही घटकांवर अवलंबून असते.
म्हणजे मागच्या जन्मातला बॅकलॉग, या जन्मात रखडलेली कामं आणि या सगळ्या गोंधळात केलेला प्रयत्न (C!) आणि त्याचा रिझल्टंट काय तर R! इतक्या गोंधळात काय होत असेल आणि काय रिझल्ट येत असेल? म्हणजे किमान कामावर फोकस तरी होता येईल का असा प्रश्न आहे!
म्हणजेच मी परीक्षेसाठी अभ्यास करतो ते मला चांगले मार्क मिळतील ही अपेक्षा ठेऊनच.पण माझ्या A,B,C या घटकांप्रमाणे देवाला माहित असलेल्या गणिती समीकरणाप्रमाणेच मला फळ मिळणार आहे
आता इतक्या बाळबोध लॉजिकला देवबाप्पाची मदत लागणारच! लगे रहो! माझा मुद्दा आता वेगळा स्पष्ट करण्याची गरज उरली नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

स्टीव्हन कोव्हे ने ७ हॅबिट्स

विजुभाऊ
Tue, 12/09/2014 - 10:55 नवीन
स्टीव्हन कोव्हे ने ७ हॅबिट्स मधे जसं म्हंटलय की प्रोअ‍ॅक्टिव्हीटी बद्दल संगताना तो म्हणतो. की तुम्ही कार्य काहीही करा त्याचे फळ मिळतेच. एव्हरी अ‍ॅक्षन हॅज इट्स क्वान्सिक्वन्सेस. इनअ‍ॅक्षन इज अल्सो अ‍ॅन अ‍ॅक्षन. क्रीया केल्यावर प्रतिक्षीप्त क्रीया येतेच. कोणताही निर्णय घ्या त्याचे परीणाम होतातच. निर्णय न घेणे हा सुद्धा एक प्रकारचा निर्णयच असतो. जसे पेन्सीलचे एक टोक उचलल्यावर दुसरे टोकदेखील उचलले जातेच. तद्वत तुम्ही कार्य करता त्याचे फळ मिळतेच. कार्य न करणे हे सुद्धा एक कार्यच आहे त्याचेही त्यामुळे फल मिळणारच आहे तर मग प्रोअ‍ॅक्टीव पणे आपण एखादी कृती केली तर त्याचे फळ आपण ठरवु शकतो.
  • Log in or register to post comments

एक शंका

आयुर्हित
Wed, 12/10/2014 - 13:26 नवीन
प्रोअ‍ॅक्टीव पणे आपण एखादी कृती केली तर त्याचे फळ आपण ठरवु शकतो यावरून जर उद्या पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्याने आजच बी पेरून ठेवले तर आपण ठरवलेले फळ मिळेलच याची काय शाश्वती? किंवा सोन्याचे भाव वाढणार आहेत म्हणून एखाद्याने भरपूर सोने घेवून ठेवले तर आपण ठरवलेले फळ मिळेलच याची काय शाश्वती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

एका मर्यादेपर्यंत श्लोकाचा

बाळ सप्रे
Tue, 12/09/2014 - 10:58 नवीन
एका मर्यादेपर्यंत श्लोकाचा सारांश ठीक वाटतो, बाह्यपरिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण कोणाचेच असु शकत नाही त्यामुळे अपेक्षित फळ न मिळाल्यास कर्मविन्मुख होउ नये. परंतु फळाची अपेक्षाच न करणे (शब्दशः अर्थ) तितकासा योग्य वाटत नाही. कारण दुसर्‍या अंगाने विचार केल्यास ध्येय (GOAL) ठरवून त्याप्रमाणे काय आणि कसे कर्म करावे हे ठरवणे (plan n execution) या काम करण्याच्या पध्दतीलाच हा शब्दशः अर्थ छेद देतो. बाह्यपरिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण नसले तरी अनिश्चितता ओळखून त्यावरही काही प्रमाणात उपाययोजना (Risk management) करता येतात.
  • Log in or register to post comments

तसा अर्थ अभिप्रेतही नाही

क्लिंटन
Tue, 12/09/2014 - 11:32 नवीन
परंतु फळाची अपेक्षाच न करणे (शब्दशः अर्थ) तितकासा योग्य वाटत नाही.
तसा अर्थ अभिप्रेतही नाही. फळाची अपेक्षा न करता कर्म करणे म्हणजे शुध्द शब्दात सांगायचे तर पाट्या टाकण्यासारखे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

क्लिंटनभाऊ, श्लोकाचा शाब्दिक

सतिश गावडे
Tue, 12/09/2014 - 11:41 नवीन
क्लिंटनभाऊ, श्लोकाचा शाब्दिक अर्थ तोच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

हेच म्हणतो..

बाळ सप्रे
Tue, 12/09/2014 - 11:48 नवीन
हेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

शाब्बास!

संजय क्षीरसागर
Tue, 12/09/2014 - 11:51 नवीन
फळाची अपेक्षा न करता कर्म करणे म्हणजे शुध्द शब्दात सांगायचे तर पाट्या टाकण्यासारखे झाले.
म्हणजे मूळ श्लोकालाच सुरुंग लागला! आधी म्हणायचं R = f (A*B*C) ! त्याचा अर्थ असा काढायचा :
ते म्हणजे तुझा कर्म करण्यापुरताच अधिकार आहे आणि मा फलेषु कदाचन म्हणजे तुझ्या कर्माची फळे काय हे ठरवायचा नाही. यात ठरवायचा हा शब्द मुद्दामून अधोरेखित केला आहे.
फळाची अपेक्षा ठेवायची नाही म्हणजे फळ काय मिळावं हे (आपण) ठरवायचं नाही, ते कोण करणार ? तर देवबाप्पा ! मग अपेक्षा तर आलीच आणि पुन्हा देवावर हवाला टाकून मोकळे. हाच तर भारतीय मानसिकतेचा गोंधळ आहे आणि तो प्रत्येक प्रतिसादातून सुयोग्यपणे दाखवला जातोयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

धागा तद्दन फालतु

प्रसाद गोडबोले
Tue, 12/09/2014 - 11:53 नवीन
हा आमचा शेवटचा गंभीर प्रतिसाद किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः । तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६ ॥ भले भले दमले हा काथ्या कुटुन ... म्हणुनच तुम्हाला परत एकदा शेवटचे सांगतोय ... सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज:। अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:।| ह्या असल्या सगळ्या फालतु चर्चा सोडुन तुम्ही मला शरण या , मी तुम्हाला सर्व कर्मफलातुन मग ते पाप असो की पुण्य ,मी तुम्हाला ह्या सगळ्यातुन मुक्त करेन , लय टेन्शन घेवु नका . ___________________________________________________ अवांतर : सगा , तब्बल ९ प्रतिसाद ! आज तुला ब्यॅटींगला बेळ आहे असे दिसते :D
  • Log in or register to post comments

मी तुम्हाला ह्या सगळ्यातुन मुक्त करेन , लय टेन्शन घेवु नका .

संजय क्षीरसागर
Tue, 12/09/2014 - 12:10 नवीन
ही सिद्धी संपादकत्व प्राप्त झाल्यावरच मिळते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ही सिद्धी संपादकत्व प्राप्त

मदनबाण
Tue, 12/09/2014 - 12:14 नवीन
ही सिद्धी संपादकत्व प्राप्त झाल्यावरच मिळते! हॅहॅहॅ... याचा अर्थ इथले संपादक "दयाळु" आहेत नाहीतर कित्येक "आयडीज" कधीच मोक्ष प्राप्त करुन बसले असते ! :D

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सर्वधर्मान परित्यज्य मामेकं

सतिश गावडे
Tue, 12/09/2014 - 12:17 नवीन
सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज:। अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:।|
अरे तो अर्जून सारे "योग" सांगून झाले तरी त्याचे लढण्याचे "विहीत कर्म" करायला तयार होईना . अशा वेळी कुणीही वैतागून "खडडयात जाऊ दे ते सारं. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. मग मी सांगतो ते कर." असं म्हणणारंच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मीही

प्रसाद गोडबोले
Tue, 12/09/2014 - 12:23 नवीन
मी तुम्हाला इथं त्च सांगतोय ..." कशाला काथ्याकुटत बसलाय ? मला शरण ह्या , मी सांगतो ते करा , माझ्यावर विश्वास ठेवा ". लवकरच रामपालबाबा सारखा एक आश्रम स्थापन करावा असा विचार आहे , धन्या फेज २ मधे जागा बघुन ठेव रे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

यावर मिपावरच कोणीतरी धागा

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 12:28 नवीन
यावर मिपावरच कोणीतरी धागा काढलेला...फुल्टू प्लानींग झालेली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ह्या निमित्तने काही प्रश्न ...

sagarparadkar
Tue, 12/09/2014 - 12:03 नवीन
१) ही असली सर्व तत्वज्ञानं भारतासारख्या 'समशीतोष्ण' कटिबंधातील प्रदेशातच का उदयाला आली ? २) अलास्का किंवा एखाद्या नॉर्डिक किंवा पराकोटीच्या हवामानाच्या प्रदेशात उदयाला आलेलं असं एखादं तत्वज्ञान कोणी निदर्शनास आणून देईल का ? ३) भारतीय उपखंडात भाषा आणि वाङ्ग्मय आणि उच्चारशास्त्र ह्यावर जेवढे किचकट विकसन झाले तेवढे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या शाखेत का झाले नाही? ह्या सर्वांवर माझे स्वत:चे उत्तर एकाच आहे, कि पूर्वीपासून ह्या भागात जमीन बर्यापैकी सुपीक, आणि हवामान फारच क्षमाशील (काही थोडे भाग वगळता) राहिलेले आहे. त्यामुळे ह्या विद्वत्वर्ग व तत्वज्ञ लोकांना कधी दोन वेळची खायची भ्रांत पडलीच नाही, म्हणून ते भरल्यापोटी असले वाङ्ग्मय-विस्तार करत राहिले.
  • Log in or register to post comments

तत्वज्ञान हे असं कापड आहे जे

सतिश गावडे
Tue, 12/09/2014 - 12:49 नवीन
तत्वज्ञान हे असं कापड आहे जे कधी सत्य झाकण्यासाठी तर कधी सत्याचे ज्ञान नाही हे वास्तव झाकण्यासाठी तर कधी स्वार्थ झाकण्यासाठी वापरलं जातं. कधी कधी सत्य कळूनही त्याचा स्विकार करण्यात अहंकार आडवा येतो अशा वेळीही तत्वज्ञान मदतीला येते. क्वचित कधी तत्वज्ञानाचा वापर माणसाला खोटा का होईना आधार देण्यासाठीही केला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

कर्माचे फल नव्हे तर "कर्म हेच फल"

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 12/09/2014 - 12:13 नवीन
कर्म केले म्हणुन फलाची अपेक्षा करण्यापेक्षा "कर्म हेच फल" अशा भावनेने जर आपण कर्म करीत राहिलो तर वरील वादाचे मुद्दे उपस्थित होणारच नाही. हाच या श्लोकाचा खरा अर्थ आहे असे मला वाटते. कर्मफलाची आसक्ती सोडून,"आपण मोठे भाग्यवान आहोत म्हणुन आपल्याला कर्म करायची संधी मिळते आहे, या मिळालेल्या संधीचे मी सोने करेन", या भावनेने कर्म केले तर डोक्यातले प्रश्र्णांचे जाळे साफ होईल आणि कर्माचा आवष्यक तो दर्जा सुद्धा राखला जाईल. अर्थात हे लिहायला सोपे असले तरी आचरणात आणायला प्रचंड कठीण आहे. पण असा विचार करुन बघायला तरी काय हरकत आहे? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

हाच अर्थ योग्य आहे!

संजय क्षीरसागर
Tue, 12/09/2014 - 12:22 नवीन
प्रवास हीच मौज आहे, कारण गंतव्य अनिश्चित आहे. तस्मात, फोकस ऑन द अ‍ॅक्शन अँड द एंजॉयमंट वील फॉलो, रिझल्ट कॅन बी एनीथींग! अर्थात, श्लोकाचा तसा अर्थ नाही कारण श्लोकाचा फोकस कर्मफलावर आहे. फलाकांक्षारहित कर्म कर, फलाचा हेतू न धरता कर्म कर आणि (तरीही) कर्मविन्मुख होऊ नकोस असा उपदेश आहे, तो कुणालाही सहजी पटणारा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अजून पुरेसा पेटला नाही धागा.

कवितानागेश
Tue, 12/09/2014 - 12:57 नवीन
अजून पुरेसा पेटला नाही धागा. कर्म कमी पडताय........ =))
  • Log in or register to post comments

नेफळे अन माईसाहेब आले तर

प्रसाद गोडबोले
Tue, 12/09/2014 - 14:13 नवीन
नेफळे अन माईसाहेब आले तर जोरदार वणवा पेटेल , त्यांना आवाज द्या की माऊली ताई ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कोण?

बॅटमॅन
Tue, 12/09/2014 - 14:15 नवीन
कोण? माई नेफळे की नाना कुरसुंदीकर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तिथे शुध्द अद्वैत आहे .

प्रसाद गोडबोले
Tue, 12/09/2014 - 20:27 नवीन
तिथे शुध्द अद्वैत आहे . एकं नान्या विप्रा: बहुधा वदन्ति :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी

बॅटमॅन
Wed, 12/10/2014 - 12:54 नवीन
हा हा हा, अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मज्जंय. चालू द्या. तो पर्यंत

यसवायजी
Tue, 12/09/2014 - 13:40 नवीन
मज्जंय. चालू द्या. तो पर्यंत म्या count your chickens before they hatch वाचून येतो.
  • Log in or register to post comments

काही ठरलं का?

प्यारे१
Tue, 12/09/2014 - 13:57 नवीन
काही ठरलं का?
  • Log in or register to post comments

अहो तुमचीच वाट बघताहेत सगळे

प्रसाद गोडबोले
Tue, 12/09/2014 - 14:04 नवीन
अहो तुमचीच वाट बघताहेत सगळे ;) या आता डायस वर ... हा ग्या माईक ... अन होवुन जाऊद्या एक फक्कड प्रवचन :D बोला पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ ... हं , करा आता सुरु :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आमची आधीची प्रवचनं अभ्यासा.

प्यारे१
Tue, 12/09/2014 - 14:10 नवीन
आमची आधीची प्रवचनं अभ्यासा. उत्तरं तयार मिळतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

जिलब्या त्याच त्या असतात हो.

बॅटमॅन
Tue, 12/09/2014 - 14:15 नवीन
जिलब्या त्याच त्या असतात हो. कृष्णानेही नाही का सांगितलं की हा योग इतका भारी असला तरी टाईम टु टाईम रिव्हिजन करावी लागते म्हणून? तेव्हा नवीन जिलबीस्मरण करून पाडा प्रवचन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आगे जाओ आगे जाओ!

प्यारे१
Tue, 12/09/2014 - 14:17 नवीन
आगे जाओ आगे जाओ! ;) बाकी सीरियसली रिव्हीजन आवश्यक ह्याबाबत सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खी:खी:

प्रसाद गोडबोले
Tue, 12/09/2014 - 14:17 नवीन
विवेक्पटाईत , प्लीज नोट . (ह.भ.प. की स.भ ? ) प्यारेबुवांची प्रवचन वाचा , उत्तरे मिळतील :) अवांतरः काय बुवा , यंदा कीही लिहिली नाहीत दत्त जयंतीला ... त्रिगुणात्मक त्रैमुर्ती एक विचार हा धागा आम्हाला शोधुन शोधुन वाचावा लागला परत ... नाही म्हणलं तर इथे चांगला योग जमुन आलाय , जरा करा सत्स्तंगाचा क्वोटा पुर्ण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

(No subject)

प्यारे१
Tue, 12/09/2014 - 14:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

जरा करा सत्स्तंगाचा क्वोटा

बॅटमॅन
Tue, 12/09/2014 - 14:19 नवीन
जरा करा सत्स्तंगाचा क्वोटा पुर्ण
एक 'कॉटर' सत्संग तरी बाकी आहे असं दिसतंय, नै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

(No subject)

प्यारे१
Tue, 12/09/2014 - 14:22 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

विवेकभौ, कर्म, फळ सब घपला है

सस्नेह
Tue, 12/09/2014 - 14:42 नवीन
विवेकभौ, कर्म, फळ सब घपला है 'मामेकं शरणं..' हेच खरं ! तस्मात, ....
  • Log in or register to post comments

कुणाला शरण जाऊ ताई, आसारामजी

विवेकपटाईत
Tue, 12/09/2014 - 20:26 नवीन
कुणाला शरण जाऊ ताई, आसारामजी आणि रामपाल महाराज तर सरकारी पाहुणे झाले आहे. आशुतोष महाराज समाधी अवस्थेत आहे. कुणी मिसळपाव वाला पुण्यात आश्रम उघडत असेल तर शरण जाण्याचा विचार करता येईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

इतका वेळ कसा मिळतो कोणाला

सूड
Tue, 12/09/2014 - 14:53 नवीन
इतका वेळ कसा मिळतो कोणाला याचं अप्रूप वाटतं.
  • Log in or register to post comments

दॅत्झ मा फ्रेंद

स्पा
Tue, 12/09/2014 - 17:06 नवीन
दॅत्झ मा फ्रेंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ते कर्म करत नसावेत! :प

कवितानागेश
Tue, 12/09/2014 - 18:20 नवीन
ते कर्म करत नसावेत! :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अधिकार...

अर्धवटराव
Tue, 12/09/2014 - 22:59 नवीन
कर्माचा उद्देश आणि फळाची अपेक्षा या भिन्न गोष्टी आहेत. फळाची अपेक्षा म्हणजे त्यात इन्व्हॉल्व होणं... व कर्म करताना प्रत्यक्ष कर्मात इन्व्हॉल्व्ह व्हावं, फळात नाहि हा साधा अर्थ आहे. याचं उदाहरण शोधायला फार काहि इकडे तिकडे बघायला नको. आपल्या शालेय जीवनात प्रत्येकाने एक तरी चितळे मास्तर पाहिले असतील. त्यांचं कार्य पुष्कळसं याच पठडीतलं असतं.
  • Log in or register to post comments

श्या!!

कवितानागेश
Tue, 12/09/2014 - 23:26 नवीन
श्या!! सगळी मजाच घालवतो हा मनुष्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

सॉरी अतिशक्तीमाऊ

अर्धवटराव
Tue, 12/09/2014 - 23:42 नवीन
:P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा