तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना
मीच अथांग होऊन जातो...
तुझ्या हसण्याचा आनंद घेताना
मीच आनंदून जातो ...
तुझ्या गुंतण्याचा आवेग पाहताना
मीच गुंतून जातो ...
तुला स्वप्नांमध्ये हरवलेलं पाहताना
मीच हरवून जातो ...
तुझ्या हाताला स्पर्श करताना
मलाच तुझा स्पर्श होतो ...
तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना
मीच त्यांत विरघळून जातो...
- सागर
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
13612
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रे !!!
दुसरा स्पर्श आंतरिक
In reply to मस्त रे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाटत तर नाही, पण.....
In reply to दुसरा स्पर्श आंतरिक by धनंजय
जसे, की........ डोळ्याचा थांग घेतांना कवीचे अथांग होऊन जाणे.
तिच्या हसण्याने कवीस आनंद होणे.
तिच्या गुंतण्याने कवीने गुंतून जाणे.
तिच्या स्वप्नात कवीचे हरवणे.
तिच्या स्पर्शात कवीला स्पर्श होणे (हे जरा जमले नाही असे वाटते.) किंवा आपण म्हणता तसे कवीला दुसरे काही सुचवायचे तरी असेल.
तिच्या अश्रुत कवीचे विरघळणे. या सर्व भावना तिच्याशी एकरुप होण्यासाठी कवी व्यक्त करतो असे वाटते. अर्थात कवीला काय वाटते, त्याची उत्सुकता आम्हालाही लागली आहे.
धनंजय यांचा निष्कर्ष योग्य आहे...
In reply to वाटत तर नाही, पण..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या मते
In reply to वाटत तर नाही, पण..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्हाला पण मार्ग दाखवा
In reply to माझ्या मते by राघव
कवी तिला
In reply to आम्हाला पण मार्ग दाखवा by सागर
आयडिया लई भारी आहे
In reply to कवी तिला by राघव
तेरे आँखो मे डूब जाऊ ..........
सुरुवात करो (छोटा) डॉन ...
In reply to तेरे आँखो मे डूब जाऊ .......... by छोटा डॉन
अपने बस की बात नही है !!!
In reply to सुरुवात करो (छोटा) डॉन ... by सागर
वा!
होऊन जाऊ दे २ पेग अजून जास्त ...
In reply to वा! by विसोबा खेचर
खुप छान
लवकरच अजून लिहिन...
In reply to खुप छान by मनोज
सुरेख. आनंद मिळाला. सागरजी व धनंजय दोघांना धन्यवाद. तसेच
वा...
छान
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद