Skip to main content

एक फक्कड लावणी

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 12/10/2008 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
"फक्कड" लावणी रेशमाच्या बाबांनी ... रेशमांच्या बाबांनी, काल लाथा, बुक्कयांनी बाकपुरा आहे, माझा, काढीला.... हात नगा लावू माझ्या बॉडीला... ।।धृ।। चूक झाली माझी, लाखमोलाची ... विचारल मी ही, पोर, कोणाची गं कोणाची विसरलो आहे कोण, आहे कोण जोडीला... हात नगा लावू, माझ्या बॉडीला...।।१।। जात होती वाटेनं ती तोऱ्यात ... अवचित आला, बाप, म्होऱ्यात गं म्होऱ्यात आणि माझ्या नरडीला, धरूनिया ओढीला हात नगा लावू माझ्या बॉडीला...।।२।। भीड नाही केली, आल्या गेल्याची... मागितली माफी, मी त्या, मेल्याची गं मेल्याची म्हणेन मी आता, 'ताई', तुमच्या या घोडीला हात नगा लावू , माझ्या बॉडीला...।।३।। कवी - श्री.अज्ञात
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4008
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

ही लावणी एकेकाळी आम्ही ज्यांना आमचे मित्र मानत होतो त्या केशवसुमारांनी लिहिलेली आहे.. तात्या.

:) फक्कड लावणी आहे. केसु म्हणजे केसुच!!! बर्‍याच दिवसांनी केसुचे विडंबन वाचून बरे वाटले.. धन्यवाद ओकसाहेब! :) बाकी "आणि माझ्या नरडीला, धरूनिया ओढीला" हे चुकुन "आणि माझ्या नाडीला , धरूनिया ओढीला" असे वाचले ;) ह. घ्यालच ! -('मिसळ'लेला) ऋषिकेश