"फक्कड" लावणी
रेशमाच्या बाबांनी ...
रेशमांच्या बाबांनी, काल लाथा, बुक्कयांनी
बाकपुरा आहे, माझा, काढीला....
हात नगा लावू माझ्या बॉडीला... ।।धृ।।
चूक झाली माझी, लाखमोलाची ...
विचारल मी ही, पोर, कोणाची गं कोणाची
विसरलो आहे कोण, आहे कोण जोडीला...
हात नगा लावू, माझ्या बॉडीला...।।१।।
जात होती वाटेनं ती तोऱ्यात ...
अवचित आला, बाप, म्होऱ्यात गं म्होऱ्यात
आणि माझ्या नरडीला, धरूनिया ओढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला...।।२।।
भीड नाही केली, आल्या गेल्याची...
मागितली माफी, मी त्या, मेल्याची गं मेल्याची
म्हणेन मी आता, 'ताई', तुमच्या या घोडीला
हात नगा लावू , माझ्या बॉडीला...।।३।।
कवी - श्री.अज्ञात
Taxonomy upgrade extras
वाचने
4008
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही लावणी
फक्कड लावणी
In reply to ही लावणी by विसोबा खेचर
केसु दी ग्रेट ची लावणी
लवणी
झक्कास