युरेका
लेखनविषय:
न्यूटन पास्कल Bohr सारे शाळेमध्ये भेटले होते
काही कळले काही घोकले तर काही बिनधास्त ठोकले होते .
पुन्हा कधी भेटतील असे स्वप्नी देखील नव्हते वाटले
पण नको तेव्हा नको तिथे माझ्या आठवणींचे तारु सुटले
तिच्याभोवती पोरांची झुंड जेव्हा फिरत असे
bohr चे मॉडेल माझ्या डोळ्यासमोर तरळत असे
आपणहून जरी हसली नाही तरी cadbury ची जादू चाले
न्यूटन चा inertia तेव्हा मनामध्ये घोळू लागे
तास तास तिच्यासंगे मिण्टा मध्ये सरून जाई
माझ्या चक्रम डोक्यामध्ये आइन्स्टाईन स्मरून जाई
स्पर्श झाला तिचा जेव्हा वीज अश्शी चमकून गेली
conductivity ची theory एका क्षणात समजून गेली
ओठांवरती ओठ दाबता … विसरलो पुढचं सारं
पस्कलच्या नियमाचं दुसरं उदाहरण कुठचं बरं
पण
एक दिवस तिनं मात्र सॉलिड बॉम्ब टाकला
म्हणे जुना कुणी तिचा मित्र तिला भेटला
'"एकाच वेळी का नाही मी तुझी आणि त्याची " ?
तिच्या निरागस प्रश्नाने झाली माझी गोची
वाद विनवण्या भांडण, even होतो रडलो
शप्पथ सांगतो, तेव्हा मी पुरा पुरा मोडलो.
अजूनही डोळ्यामध्ये एक अश्रू लपला आहे
पण श्रोडींगरच्या मांजराचा अर्थ मला कळला आहे
वाचने
2288
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
व्वा
(No subject)
(Yes subject)
श्रोडींगरच्या मांजर
भारी !
एक दोन गोष्टी सोडल्या
'"एकाच वेळी का नाही मी तुझी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे.मला श्रोडिंगरचे मांजर ही काय
In reply to मला श्रोडिंगरचे मांजर ही काय by प्रसाद गोडबोले
तसं पहायला गेलं तर ही एक भन्नाट ऑफर होती भाऊ!
;;;);));;) तीन तिघाडा 'काम'
In reply to ;;;);));;) तीन तिघाडा 'काम' by चुकलामाकला
जमले नाही की अशा म्हणी तयार