Skip to main content

बाटली आणि ग्लास

लेखक प्रमोद देर्देकर यांनी सोमवार, 01/12/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

मी असते बंद कॉर्कने बांधलेली, टेबलावर तोर्‍यात एकटी,
तु मात्र मोकळा ढाकळा, पण भाऊबंधांसोबत रांगेतला गडी,

मी तुझ्यातच रिक्त होते, कधी स्मॉलने तर कधी लार्जने ,
तु मात्र उतरतोस दर्दभर्‍या गळ्यात, घुटक्या घुटक्याने,

मी असते संपृक्त, विविध रंगाने नटलेली नेहमीच नीट,
कधी बर्फ, कधी सोड्याने तु मात्र पचपचीSSत ,

कधी क्रिस्टील, कधी प्लास्टिक, कधी धातु. काय तुझे नखरे?
बॉटम-अपच्या नादात विसरतात तुला सगळे हेच सत्य खरे,

हेच सत्य खरे.

लेखनविषय:

वाचने 1859
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया