✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

स
स्पा यांनी
Tue, 04/02/2013 - 15:28  ·  लेख
लेख
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं. बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते. बाकी इतरही बरेच प्रश्न असतात उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे. ५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या. पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून) २. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे ३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो ४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक . माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती. पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.) अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात . आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता. नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते . गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई. याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल . आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे . अजून एक दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल . बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच धन्यवाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
149495 वाचन

💬 प्रतिसाद (358)

प्रतिक्रिया

रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५०

मोदक
Sat, 09/27/2014 - 14:28 नवीन
रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५० च्या एकंदर अनुभवावरती एक वेगळा धागा काढा. ३५० का घेतली? Classic vrs Thunderbird गाडी घेताना व नंतर काय माहिती जमा केली? गाडी घेताना काय काळजी घ्यावी? शक्य तितके विस्तृत लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

engine oil

अद्द्या
Sat, 11/29/2014 - 17:03 नवीन
डिसकव्हर टी (१०० सीसी) हाये माझी . गेल्या वर्षभरात साधारण १८००० किमी फिरलीये . . पिकप मध्ये बाप सेग्मेंट मध्ये . . असो . प्रश्न हा . कि आतापर्यंत प्रत्येक सर्विसिंग च्या वेळेस बजाज DTS 100 engine oil टाकतोय . एक मित्र म्हणाला. ते बदलून दुसरं कुठलं घातलं तर इंजून अजून चांगलं चालेल . . कुठलं वापरावं ? स्पोर्ट्स बाइक नाहीये . पण तरीही . बाइक तर आहे .
  • Log in or register to post comments

शेल

तुषार काळभोर
Sat, 11/29/2014 - 17:33 नवीन
शेलचं ऑईल (३) अन् शेलचं पेट्रोल... (नाय मिळालं तर कॅस्ट्रॉल ४टी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

motul

कपिलमुनी
Mon, 12/01/2014 - 10:49 नवीन
motul वापरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

एक मित्र म्हणाला. ते बदलून

प्रसाद१९७१
Mon, 12/01/2014 - 18:19 नवीन
एक मित्र म्हणाला. ते बदलून दुसरं कुठलं घातलं तर इंजून अजून चांगलं चालेल . .>>>>>> जो मित्र हा सल्ला देतोय त्याला तर दुसर्‍या ऑइल चे नाव माहीती असणार ना. अशी अर्धवट माहीती का देतोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

पूर्ण मित्र असते तर इथे कशाला

अद्द्या
Wed, 12/03/2014 - 13:52 नवीन
पूर्ण मित्र असते तर इथे कशाला विचारलं असतं . =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

पूर्ण माहिती देणारे मित्र

अद्द्या
Wed, 12/03/2014 - 15:12 नवीन
पूर्ण माहिती देणारे मित्र असते तर इथे कशाला विचारलं असतं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

नवीन डिस्कवर १५० बद्दल काय

स्पा
Wed, 12/03/2014 - 13:54 नवीन
नवीन डिस्कवर १५० बद्दल काय रिव्यू आहेत?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा