नवीन ठिकाणी राहायला आलो होतो, नेहमीची आवरा-आवरी, केर काढणे, वस्तू जागेवर लावणे, दुध , वर्तमानपत्र वाल्याची चौकशी करणे अशी कामे करत होतो. हात-पाय धुवायला गेलो तर नळ गच्च बसला होता, आता पंचाईत झाली. बाजूला फरशीपासून कमी उंचीवर छोटा नळ होता; तात्पुरते काम भागले, पण मुख्य नळ दुरुस्त करणे गरजेचे होते. अंधार पडायला लागला होता, बाहेर पडलो सुरक्षा रक्षकाकडून नळ दुरुस्त करणाऱ्या प्लंबरचा मोबाईल क्रमांक घेतला ; त्याचे नाव नंदू. कल्पना नव्हती मला… असा विलक्षण संवाद झाला… वेळ संध्याकाळी ७ ची .
मी- फोन केला पूर्ण वेळ रिंग वाजली पलीकडून फोन उचलला नाही, अशा वेळी आपण जरा जास्तच उतावीळ आणि अस्वस्थ होतो, क्षणाचा विलंब न करता परत फोन केला ...पलीकडून फोन उचलला.
नंदू- ह SS ह ख SSख घशात आवाज काढत … मंद्या किती वेळ वाट बघतोय … कुठायस …असा प्रश्न झाला , मी गोंधळलो …अहो मी मंद्या नाही . सचिन बोलतोय, तुमचा नंबर त्या सिक्युरिटी वाल्या विकास कडून घेतला … आता पलीकडे एकदम शांतता झाली. नंदू म्हणाला साला मिष्टेक झाली काय साहेब? मला; तो विचारतोय कि सांगतोय हेच कळेना. असो. मी म्हणालो अहो माझ्या घरातला एक नळ दुरुस्त करायचा आहे , मी नवीन राहायला आलो आहे नंदन गार्डन मध्ये तुम्ही कराल का? नंदू म्हणाला, अहो नळ दुरुस्त करायचा तर एकांदा पलंबर गाठा ना राव, मला कशाला फोन केला? या वक्ताला !!!. मी चपापलो. म्हणालो आपल्याला सिक्युरिटी ने गंडवला का काय !!!. ओके ओके. मला त्या विकास ने नंबर दिला हो. नंदू म्हणाला आओ ! विकास उद्या माझा नंबर डॉक्टरचा म्हणून देईल. तुम्ही काय तब्येत दाखवायला याल का मला , काय पण राव विंटेलीजंट माणूस, न बघता फोन करता … मी- सॉरी तुम्हाला त्रास दिला. फोन कट.
म्हणलो आता जाऊन त्या सिक्युरिटी वर कट काढू. मी बाहेर जेवलो, एक दोन वस्तू घेऊन परत चाललो , तेवढ्यात मला नंदूच्या फोन वरून फोन आला, मनात म्हणले आता काय त्रास आहे यार याचा. फोन उचलला. पुन्हा घशातली खर खर ऐकू आली. साह्येब मगाशी मिष्टेक झाली काय!!. साला परत तेच… विचारतोय का सांगतोय हेच कळेना. मी म्हणालो अहो सॉरी तुम्हाला चुकून फोन केल. तो म्हणाला तुम्ही नाही सॉरी … म्या सॉरी. मी नंदू पलंबर बोलतोय. मी म्हणालो अहो मग मगाशी नाही का म्हणाला? ते काय मगाशी माझ्या भावाने, मंद्याने फोन उचलला. एकंदरीत आवाज ऐकून पलीकडे तार छेडली गेली आहे, हे मी ओळखले, एव्हाना ८ वाजून गेले होते. नंदू बोलला भावाने फोन घेतला हो, बोला काय काम आहे. मी म्हणलो अहो आवाज तर हाच होता, नंदू बोलला जुळे… आम्ही दोघे जुळे आहोत, म्हणून तसे वाटले असेल तुम्हाला. मगाशी, मी फोन केला तेंव्हा मंद्या आला नसावा, आणि खेळ सुरु झाला नसावा आणि आत्ता घसा ओला झालाय्मुळे हि सगळी लिंक लागली आहे, हे माझ्या लक्षात एव्हाना आलेच होते.
हम्म म्हणालो… चला ठीक आहे. , नंदू - बोला साहेब काय काम आहे. मी म्हणलो नळ बसवायचा आहे. नंदू - ओके बसवला आणि काय काम आहे. मी म्हणलो अहो बघायला लागेल ना आधी, नंदू - ओके बघितला; पुढे ? मी -अहो कसला नळ आहे ठरवायला नको का?, नंदू -ओके ठरवला , आणि काय काम? मी - अहो नंदू शेठ … (त्याच्या या तत्पर उत्तरांना कंटाळून मी त्याचा शेठ केला होता).
अहो मला सांगा पैसे किती ? तो बोलला ६५ , असली आड-नीड किंमत ऐकून मी वेडा झालो. अहो पण नवा नळ लावायचा असेल तर, तो म्हणे १६५. आणि पाईप खराब असेल तर , तो म्हणे २६५. मी म्हणलो अरे हे दर वेळी ६५ काय आहे? तो म्हणाला साहेब आमची चपटी संत्रा ६५ ला येते , उरलेले कामाचे पैसे. मी म्हणलो अरे !! दारू का पिता?, फळाचा ज्यूस वगैरे प्या.
नंदू बोलला, मग संत्र काय आहे?, फळच आहे ना .. काय मजाक करता काय गरीबाची !!! साहेब.
मी काय समजायचे ते समजलो, उद्या या मग बोलू असे म्हणून फोन ठेवला.
- सार्थबोध
www.saarthbod.com
वाचने
22741
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
विभाग काथ्थाकुट.गल्ली चुकली
नळ दुरुस्ती
होय कपिलमुनी
In reply to नळ दुरुस्ती by कपिलमुनी
असला टूल
In reply to होय कपिलमुनी by सार्थबोध
माझ्याकडे हे आहे
In reply to होय कपिलमुनी by सार्थबोध
आसले सगळं कीट मिळत्यात हो
In reply to माझ्याकडे हे आहे by कपिलमुनी
प्लंबरला जगवायचा ठेका लोकांनी
In reply to आसले सगळं कीट मिळत्यात हो by वैभव जाधव
च्यारिटी आता नसति ओ सायेब.
In reply to प्लंबरला जगवायचा ठेका लोकांनी by बॅटमॅन
वाद घालून मला काय मिळणारे
In reply to च्यारिटी आता नसति ओ सायेब. by वैभव जाधव
एकदा बोलावल्यावर "येतो"
In reply to च्यारिटी आता नसति ओ सायेब. by वैभव जाधव
अगदी असेच म्हणतो. त्यामुळे
In reply to एकदा बोलावल्यावर "येतो" by रेवती
+१
In reply to अगदी असेच म्हणतो. त्यामुळे by बॅटमॅन
मुनिश्वर, कुठ्ले व्हर्जन
In reply to माझ्याकडे हे आहे by कपिलमुनी
तूर्भ्याला जाउन घ्या.
In reply to मुनिश्वर, कुठ्ले व्हर्जन by काळा पहाड
धन्यवाद. पुण्याबद्दल माहीती
In reply to तूर्भ्याला जाउन घ्या. by वारा
प्लंबर आणि डॉक्टरच्या
In reply to नळ दुरुस्ती by कपिलमुनी
ज ब रा !!!
In reply to प्लंबर आणि डॉक्टरच्या by सुबोध खरे
होय जेपी
@सार्थबोध-विभाग पाहुन आणी
In reply to होय जेपी by सार्थबोध
अस्सं...
In reply to @सार्थबोध-विभाग पाहुन आणी by जेपी
असेच काहिसे पण उद्धट अनुभव
हा हा हा
ख्या, ख्या, ख्या... हल्लीच्या
हा हा हा
हाच अनुभव.
In reply to हा हा हा by कपिलेश
एकाने 'तुकाराम प्लंबर'...
हा हा हा...
In reply to एकाने 'तुकाराम प्लंबर'... by Targat Porga
अश्लील अश्लील
In reply to हा हा हा... by योगी९००
तुझी घागर नळाला लाव हा
In reply to अश्लील अश्लील by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to तुझी घागर नळाला लाव हा by पाषाणभेद
तुझी घागर नळाला लाव
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
एक असाही कट्टा होउन जाउदे...
In reply to तुझी घागर नळाला लाव by हाडक्या
बिचार्याची निरागसताच लोप
In reply to तुझी घागर नळाला लाव by हाडक्या
.
In reply to बिचार्याची निरागसताच लोप by खटपट्या
काही लोकं या वाक्याला सुध्ध्य
In reply to . by hitesh
अगागा
In reply to काही लोकं या वाक्याला सुध्ध्य by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to अगागा by हाडक्या
हा हा घरच्यांच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी हो फक्त.
In reply to हा हा हा... by योगी९००
हॅ हॅ हॅ
In reply to हा हा घरच्यांच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी हो फक्त. by Targat Porga
(No subject)
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
अगागागागा
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
मेलो मेलो.. . .
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
जबरा
In reply to मेलो मेलो.. . . by हाडक्या
सांगतो नंदूला.
ह्यो गावला मंद्या!!!
In reply to सांगतो नंदूला. by लॉरी टांगटूंगकर
चांगलंय नंदू, मंद्या.....
घरगुती बारीक सारीक कामावर मी
लिहा की ओ मग. लय लोकांचे दुवे
In reply to घरगुती बारीक सारीक कामावर मी by जेपी
लिहा की मग..
In reply to घरगुती बारीक सारीक कामावर मी by जेपी
ह्म्म...
-१
In reply to ह्म्म... by विटेकर
योगीराज +१
In reply to -१ by योगी९००
आता विषय नीघालाच आहे तर माझा
+१
In reply to आता विषय नीघालाच आहे तर माझा by खटपट्या
योगी साहेब
In reply to +१ by योगी९००
+१
In reply to योगी साहेब by सुबोध खरे
तुम्ही घ्या आणि इथे कळवा..
In reply to +१ by योगी९००
सिरीयसली घेतले आहे...
In reply to तुम्ही घ्या आणि इथे कळवा.. by टवाळ कार्टा
(** ५० रु पर भोक हा १० mm
In reply to सिरीयसली घेतले आहे... by योगी९००
नाय हो...
In reply to (** ५० रु पर भोक हा १० mm by टवाळ कार्टा
विचारणारे पुण्याचे असू शकतील
In reply to नाय हो... by योगी९००
हॅन्ड ड्रिल मशिन घ्या 200 रु
In reply to +१ by योगी९००
योगी साहेब
In reply to +१ by योगी९००
कार पासून
In reply to योगी साहेब by सुबोध खरे
"एलन की "
In reply to योगी साहेब by सुबोध खरे
नाही मोटर सायकलवाले
In reply to "एलन की " by टवाळ कार्टा
विटेकर साहेब
रविवारी केलेल्या फोनवरील
In reply to विटेकर साहेब by सुबोध खरे
रविवारी केलेल्या फोनवरील सल्ल्याची किंमत शून्य.( फोनवर च्या सल्ल्याची काय किमत असते?)यावरून आमच्या वैद्यकिय महाविद्यालयातले एक अत्यंत नावाजलेले आणि बक्कळ खाजगी प्रॅक्टीस असलेले ऑनररी फिजिशियन शिक्षकांचे म्हणणे आठवले. ते म्हणायचे : "आपण डॉक्टर हे शेवटी बौधिक हुशारी बरोबर शारिरिक कष्ट करणारे हमालच (फिजिकल लेबरर). आपल्याला प्रत्यक्ष हजर राहून आणि पेशंटच्या अंगाला हात लावल्याशिवाय केवळ सल्ल्यासाठी फी देणे लोकांना पटत नाही. खरे बौधिक तज्ञ म्हणजे जे केवळ प्रत्यक्ष अथवा फोनवरच्या सल्ल्यासाठी हक्काने ठोकून फी घेऊ शकतात, उदा. वकील, सीए, सीएस, इ."वकील!
In reply to रविवारी केलेल्या फोनवरील by डॉ सुहास म्हात्रे
टाईमशीट..
In reply to वकील! by बोका-ए-आझम
डोक्टर साहेब
तत्वतः गल्लत
माझ्या मते 'हजेरी'वर काम
'अंगावर' काम
In reply to माझ्या मते 'हजेरी'वर काम by प्यारे१
ह्ये बाकी येकदम खरं बोल्ला
In reply to 'अंगावर' काम by कपिलमुनी
ईलेक्ट्रीकल सामान ए पी एम सी पशी घ्या.
घरगुती कामे
घराला रंग सुद्धा स्वतःच
In reply to घरगुती कामे by कपिलमुनी
उत्तम
In reply to घरगुती कामे by कपिलमुनी
जमेल तितकी घरची कामे मी करतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वेडोंबोलीत रहात असल्याने म्हणा किंवा...