एक दिवा इवलासा
रोज रात्री पेटायचा
अंधार ठेऊन स्वतः खाली
प्रकाश मात्र वाटायचा
मला नवल वाटायचे
अन नाही कळायचे
असे काही वागुन याला
नेमके काय भेटायचे?
मी त्याच्या जवळ गेलो
आणि हा प्रश्न केला
त्याने एका ओळीतच
मला 'ब्रह्मोपदेश' दिला
दुसर्यांसाठी जळण्यातलं
सुख जेव्हा तुला कळेल
"बुध्द" तेव्हा होशील तू
अन तुला मोक्ष मिळेल....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8932
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुपच छान
+१
In reply to खुपच छान by स्वाती राजेश
वा!
झकास!
धन्यवाद मनिष
In reply to झकास! by मनिष
वा वा...
कविता आवडली
कविता
सुंदर
धन्यवाद
In reply to सुंदर by पुष्कर
आपुलकीबद्दल
In reply to धन्यवाद by मनोज
सुंदर कल्पना!
पुन्हा संपादित केली
माझ्या चार ओळी
कवी मन जागे ठेवा -
In reply to माझ्या चार ओळी by सागर
बुद्ध हसला...