Skip to main content

वोल्क्सवॅगन वेंटो बद्दल मत

लेखक देशपांडे अमोल यांनी रविवार, 23/11/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, प्रथमच आपली मते जाणून घेण्यासाठी हा धागा टाकतोय. मी माझी सध्याची ह्युंदाई वेरणा पेट्रोल 2008 मॉडेल चेंज करून वोल्क्सवॅगन वेंटो 1.6 हाइलाइन एम टी पेट्रोल घेण्याचा विचार करतोय. ह्या गाडी बद्दल कुणाला अनुभव आहे का? एकूणात कशी आहे? कंपेर्ड टू वेरणा कशी? किंवा माइलेज च्या दृष्टीने कशी? पॉवर? ड्राइविंग कंफर्ट? लॉँग रन साठी? किंवा डेली वापर 60 की मी असेल विविध ठिकाणी फिरण्यासाठी तर कंफर्ट च्या दृष्टीने कशी? ए सी बद्दल ? तसं मी बर्‍या पैकी अभ्यास व कंपॅरिज़न्स केले आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या पैकी कुणाची मते कळावी म्हणून प्रयोजन. आपली मते जाणण्यास उत्सुक. कळावे.आभारी.

वाचने 30051
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

In reply to by वामन देशमुख

प्री ओन्ड नॅनो..... वेल्ल्ल....... शक्यतो नको. नवी कोरी घेतलीत तर गाडी वाईट नाहीये. अतिशय प्रॅक्टिकल आहे माझ्या मते. बसून चालवून बघितलंय. मागे पुढे उत्तम लेग व हेड रूम. ८० ९० पर्यंत व्यवस्थित जाते, सिटी ड्राईव्ह साठी उत्तम. अर्थात त्या गाडीच्या मर्यादा आहेतच व हायवेला त्या प्रकर्षाने जाणवतात. लगेज स्पेस न के बराबर. गाडी आवाज खूप करते. एसी बरे आहे. टर्निंग रेडियस, मायलेज उत्तम. आफ्टर सेल्स ठीकठाकच. नवीन के१० घ्या. दी बेस्ट एन्ट्री लेव्हल हॅचबॅक. स्वतः वापरतोय. तक्रार नाही. चालवायला सुसाट. ६८पीएस विथ ८०० किग्रॅ कर्ब वेट.... अर्र.... काय उसळते राव गाडी..... प्रेमात.... थोडं बजेट वाढवता आलं, तर ग्रँड आय१० खल्लास गाडी आहे.

मस्त आहे VENTO. अत्यंत दणकट सेफ.मस्त पिक अप, stable माझ्यासाठी VENTO का CITY असा प्रश्न होता. CITY च्या प्रेमात पडल्यामुळे VENTO सोडली.

हे वाचा लोकसत्ताचा लेख आहे. यात लिहील्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी झालेल्या सुरक्षा चाचणीत फोक्सवागन ची पोलोही सपशेल नापास झाली होती म्हणे ! आता बोला. आणि भारतातल्या वेडझव्या ड्रायव्हिंगला जोवर ताळ्यावर आणलं जात नाही (जे व्हर्च्युअली इम्पॉसिबल आहे) तोपर्यंत एअरबॅगच काय, आणखी कुठलंही सेफटी फीचर दिलं तरी अपघाताचा धोका टळणार नाही. तरीही आशा; की नव्या वाहन कायद्याच्या नियमांची चोख आणि प्रामाणिक अंमलबजावणी झाली तर कदाचित थोड्डीशी शिस्त यावी ड्रयव्हर्स ना.

In reply to by वेल्लाभट

आजच १ सेदान (बहुतेक होंडा अमेझ) काहीही सिग्नल (हॉर्न, लाईटसची उघडझाप, इ.) न देता डावीकडून फक्त १-१.५ फूट अंतर ठेउन ओव्हरटेक करून गेली... स्पीड ७०+ आरामात असावा तिचा (मीच ५०+ ला होतो) रस्ता ५ लेनचा एक्स्प्रेस्स हायवे...जेमतेम २ गाड्या टेंपो पॅरलल जात असतानाची वेळ :(

सुरक्षा चाचणीत फोक्सवागन ची पोलोही सपशेल नापास झाली होती म्हणे !
गोर्या लोकांनी चाचण्या घेतल्या म्हणजे अंतिम? ह्यांचा मित्र म्हणतो की गाडी २०० किमी वेगाने आदळली तर काय होईल अशा प्रकरच्या चाचण्या असतात. येथे पवन पुत्र मारूतीच नव्हे तर चार बांगड्या मिरवणारी भारतात विकली जाणारी ऑडी पण कदाचित नापास होईल. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खडे, बेपर्वा चालक्,सगळा रस्ता माझाच असे समजून चालवनारे चालक्,दर १५ सेकण्दांनी हॉर्न वाजवायचाच असा पण केलेले चालक, मागे कितीही रहदारी होवू दे, मी माझी गाडी मला पाहिजे तशीच चालवणार... हे सुधारत नाही तोवर सा़क्षात हेन्री फोर्ड जरी येथे अवतरले तरी अपघात होतच राहतील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गाडी २०० किमी वेगाने आदळली तर काय होईल
नाही हो, माईसाहेब.. गाडी आदळतांना तिचा वेग जर ६०-८० किमी प्रति तास असेल (धोका कळून पॅनिक ब्रेकींग केल्यास आदळण्याच्या वेळी जनरली वेग ह्यापेक्षा कमीच रहात असेल..) तर गाडीचं काय होतं ह्याच्या टेस्ट्स असतात ह्या.. गाडीची "स्ट्रक्चरल इंटीग्रिटी" महत्त्वाची असते म्हणे, ब्वॉ.. फक्त एअरबॅग्स असल्यानी गाडी सुरक्षित होत नाही. बाकी, सीट बेल्ट लावत चला, हां..

In reply to by चिगो

Polo ani Ford Figo chi structural integrity tikali mhane. Mhanoon tya air bag lawoon safe hotat. Pan bakichya air bag lawoon pan titakya safe honar nahit mhane. Pan tyat Hyundai i20 ani Swift baddal kay mhatale ahe mahit nahi. Mhanaje structural integrity tikali ka nahi te mahit nahi.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

छान. हे तज्ञ लोक गाडीचे दरवाजे उघडून structural integrity पासून ते तुमच्या त्या थर्मोडायनॅमिक्सपर्यंत पोचले नाहीत म्हणजे मिळवली. पुंटो,सियाझ,सिटी? त्या टिकल्या का त्यात?

Celerio बद्दल काय मत आहे ? गाडी चान्गली आहे असे ऐकले आहे.

In reply to by टिलू

बजेट कमी असेल तर मस्त गाडी आहे. मी ऑटो गाडी चालवली आहे. चांगली आहे. ५ लाखात ऑटो गाडी म्हणजे स्वस्त आहे.

In reply to by प्रसाद१९७१

सहमत. चालवलेली नाही. रिव्ह्यूज आणि स्पेक्स वरून सांगू शकतो की उत्तम पर्याय आहे. थोडं अधिक बजेट असल्यास झेस्ट बघू शकता.

वेंटो नक्कीच चांगली आहे पण टाटा झेस्ट (Zest) चालवून पहा अफालूत्न गाडी आहे म्हणतात ना खेळ-बदलू ...कमीत कमी बजेट मध्ये जबरस्त !!!!

In reply to by माझीही शॅम्पेन

टाटा झेस्ट (Zest) चालवून पहा अफालूत्न गाडी आहे
मान्य आणि धन्यवाद.. धन्यवाद कारण की मी ही गाडी घेतोय आणि मिपावर ह्या गाडीला "अंगठा वर" देणारे आहेत, ह्याचा आनंद..

सध्या भारतात बेस्ट इंजिनीयर्ड कार्स कोरियन आहेत. जर्मन आपल्याकडे कचर्‍याखेरीज काहीच विकत नाहीत, विशेषतः मास मार्केटात (चांदणी, बांगड्यांबद्दल हे विधान नाही.(म्हटलं तर आहे. खरं तर एक्स-१, क्यू-३, ए-क्लास ही याचीच उदाहरणे आहेत)). परत फोवेच्या डीलर्सचा माज, कंपनीचा माज (वॉरंटी आणि इतर क्लेम बाबत)आणि एकुणच आफ्टर सेल्स सर्व्हिसची अवस्था बघता सध्या फोक्सवॅगनच्या वाटेला न गेलेलंच बरं.

नुकतीच अमेझ गाडी माझ्या पहाण्यात आली..(माझ्या चुलत भावाने घेतली म्हणून....त्याने त्याची स्विफ्ट डिझेल विकली आणि अमेझ पेट्रोल घेतली). डिझायर बुक केल्यानंतर ही अमेझ लाँच झाली होती. त्यामुळे होंडा गाडी घेऊ शकलो नाही अशी चुटपुट वाटली. पण नवीन अमेझ बघीतल्यावर डिझायरचा निर्णय चांगला होता हे पटलं. अमेझच्या पत्रा एकदम तकलादू वाटला आणि workmanship सुद्धा सो सो वाटली. आणि अमेझचा डॅशबोर्ड कमालीचा outdated वाटला. डिझायर किंवा असेंन्ट च्या डॅशबोर्ड्च्या तुलनेत होंडा अमेझ फारच डावी वाटली. गाडी चालवताना केबीन मध्ये थोडा जास्त ईंजीनचा आवाज येतोय असे वाटले पण पिक-अप्/ब्रेकींग मात्र व्यवस्थित वाटले. अमेझ गाडी launch करण्यात होंडाने थोडी घाई केली असे वाटते. डिझायरला टक्कर देण्यासाठी आणि किंमत कमी ठेवण्यासाठी कमी गुणवत्तेचे मटेरीयल वापरेले असावे अशी शंका आली. होंडाकडून ही अपेक्षा नव्हती. (पण होंडा सिटी मात्र खुपच छान आहे).

होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे. डिझायरचा पत्रा जेमतेम. फोक्स्वॅगन व फियाट गाड्या जास्त मजबूत वाटतात. दुर्दैवाने फोकस्वॅगन्चे लोक विमान विकल्याच्या थाटात बोलत असतात.त्यामुळे तेथे जाणारे लोक कमी. टाटांच्या गाड्यांबद्दल न बोललेलेच बरे.

होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे. डिझायरचा पत्रा जेमतेम.>>>>> अहो पत्र्याच्या जाडीवर काही नसते अवलंबुन. फ्रेम कशी आहे आणि कीती चांगली डीझाइन केली आहे ते महत्वाचे असते. फ्रेम नुसती मजबुत, जाडजुड असुन पण उपयोग नाही, लवचिक पण पाहीजे. शॉक शोषुन घेइल अशी पाहीजे. पत्रा नुस्ते झाकण्याचे काम करतो, बाकी काही नाही.

In reply to by प्रसाद१९७१

मागून टेम्पोने वा रि़क्षाने धडक दिली तर अमेझचे सगळे डिझाइन मागून बाहेर येइल असे हे म्हणतात. फक्त जाडीवर नसते हे मान्य पण भारतात तरी ते म्हत्वाचे आहे.