राम राम मडळी,
मिपाचे आजपर्यंतचे मंत्री..
चतुरंग, केशवसुमार, धोडोपंत, विकास, नीलकांत, प्रा डॉ बिरुटे, प्रियालीदेवी.
मिपाचा रोजचा वाढता पसारा लक्षात घेता आम्ही मिपाच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करायचे ठरवले आहे... या संकेतस्थळाच्या मंत्रीमंडळात कोण मंडळी आहेत ही माहिती सर्वांना असावी या धोरणानुसार आम्ही हा मंत्रीमंडळाचा विस्तार जाहीर करत आहोत...
मंत्रीमंडळाचा विस्तार -
चतुरंग, केशवसुमार, धोडोपंत, विकास, नीलकांत, प्रा डॉ बिरुटे, प्रियालीदेवी, मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा.
आम्ही काही एका विश्वासाने या मंडळींना संपादनाचे अधिकार दिले आहेत आणि त्याचा ते योग्य तो वापर करतील अशी आम्हाला खात्री आहे..संपादक मंडळींनी घेतलेल्या निर्णयात आम्ही ढवळाढवळ करत नाही...
आजपर्यंत मिपावरच्या थट्टामस्करीच्या, खेळीमेळीच्या वातावरणाला धक्का लाग्णार नाही परंतु त्याचसोबत उगीच कुणावर वैयक्तिक चिखलफेक होणार नाही, हे या मंडळींनी पाहावे..
उगाचच्या उगाच वातावरण तापवणारे सामाजिक, राजकीय आशयाचे लेख आणि त्यावरील प्रतिसादात योग्य ते बदल करण्याचे अथवा ते अप्रकाशित करण्याच्या अधिकारांचाही या मंडळींनी योग्य तो वापर आवर्जून करावा...
ललितलेखनात, लेखन संदर्भानुसार शिव्या-ओव्या आल्यास त्याला संपादक मंडळाची हरकत नसावी.. :)
मिपाच्या या धोरणाचे कुठे उल्लंघन होते आहे असे वाटल्यास संपादन मंडळाने अवश्य हस्तक्षेप करून सदर लेखन त्वरीत अप्रकाशित करण्याची कडक कारवाई करावी...
हे ऑनलाईन संस्थळ आहे, परंतु सर्वच संपादक नेहमीच मिपावर ऑनलाईन असतील असे नाही. तरी मिपावर उगाचच्या उगाच चिखलफेक करणारा काही आक्षेपार्ह मजकूर हजर असलेल्या संपादकाने अप्रकाशित करावा...त्याकरता इतर संपादकांशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही...
मिपावरचे आजपर्यंतचे खेळीमेळीचे, माफक थट्टामस्करीचे, मजामस्तीचे वातावरण तसेच ठेऊन कुठला मजकूर आक्षेपार्ह आहे व कुठला नाही, हे ठरवण्याची पात्रता वरील सर्व मंडळीत आहे अशी आम्हाला खात्री आहे, विश्वास आहे...
कुणा सदस्याला काही अडचण आल्यास वरील मंडळींशी त्वरीत संपर्क साधावा...
मिपाचे आजवरचे तसेच विस्तारीत मंत्रीमंडळ मिपाची वाटचाल योग्य दिशेने करतील असा आम्हाला विश्वास आहे...
कळावे,
मिसळधर्म जागवावा,
मिसळधर्म वाढवावा..!
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर.
वाचने
12781
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेछा + सहकार्य
अरे वा!
असेच म्हणतो
In reply to अरे वा! by ऋषिकेश
नविन
१+
In reply to नविन by रेवती
झाला, झाला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला!
अभिनंदन!!
अभिनंदन
सर्वांचे
हाबीनंदण
ए ते
In reply to हाबीनंदण by झकासराव
शुभेच्छा
अभिनंदन!!!
अभिनंदन!!
अभिनंदन !!!
आग्गे बढो हम तुम्हारे सातै.
In reply to अभिनंदन !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यु :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
ह्या
In reply to धन्यु :) by नंदन
+१
In reply to धन्यु :) by नंदन
अभिनंदन
मुक्तसुनी
सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन!
माझे पोस्ट संपादित नाही हा करायचे
अभिनंदन
धोंडोपंत
धन्यवाद ...
In reply to धोंडोपंत by सरपंच
सहमत
In reply to धन्यवाद ... by छोटा डॉन
धन्यवाद!
In reply to धन्यवाद ... by छोटा डॉन
राजीनाम घेतला की दिला?
In reply to धोंडोपंत by सरपंच
मला
मंत्रीमंडळ विस्तार..