तिची साधीशी कविता
तिची साधीशी कविता
माझा अर्थाचा गोंधळ
काळेसावळे ते ढग
तिचा सखा घननीळ |
तिची साधीशी कविता
शोध अंतरीचा घेई
खोल विरहाचे दु:ख
अलगद वर येई |
तिची साधीशी कविता
म्हणे तुझी माझी भेट
आज वसंत बहर
पुढे वैशाखाची वाट |
तिची साधीशी कविता
थोडे डोळे पाणावती
दोन मोतियांचे अश्रु
तिच्या गाली ओघळती |
तिची साधीशी कविता
माझ्या गळा एक मिठी
शब्द विरुनिया गेले
अर्थ एक दोघा ओठी !!
( पुर्वप्रकाशित )
सखा घननीळ
मस्त..
झक्कास...! ए१
मस्तच रे प्रगो
अतिशय सुंदर!
वा रे डॉन. लयच भारी!
आवडली
सुरेख कविता.आवडली.
सुंदर कविता !!!
सुंदर!
कडक
किती गोड लिहिलय....
सुरेख...
लोटे, तांब्ये, धोतरांच्या
सुंदर !
खूप सुंदर!
साधीशी आहे म्हणूनच आवडली.
आधी कविता सुचायची... रादर आधी
ताई काय म्हणता?
सुंदर
सुंदर
या शीर्षकाशी साधर्म्य असलेली एक कविता
हायला गिर्जा भारी लिव्हतो.
Kiti surekh lihile Aahes
मस्त! पुन्हा लिहा कविता!
फार हळवी कविता!
या एका कवितेसाठी, १००अपराध
मस्तच!
सुरेख..
साधी सुंदर रचना