सकाळी सकाळी कोठे वेळ असतो ....!!
लेखनविषय:
सकाळी सकाळी कोठे वेळ असतो
थोडाही मोकळा मोकळा ...?
ठेवायचा असतो चहा
कधी कमी कधी जास्त
साखर मात्र
थोडी इकडे थोडी तिकडे
नंतर असतोच स्वयंपाक
नव-याचा भरायचा असतो डबा
डब्यात थोडेसे हे थोडेसे ते
निघता निघता खिडकीतून बघत बसते
कोप-यावर वळले की मात्र थोडा दम खाते
मग मुलांचे -
थोडे थोडे दटावते मुलाना
कधी धम्मक लाडू देते पाठीला
सुतासारखे होतात सरळ
स्वताला आवरून घेण्यासाठी
थोडी थोडी मदत मात्र घेतात
पोरांचे करता करता जीव मात्र हैराण होतो
त्यांच्या डब्यात त्याना हवे
तेच हवे असते
रोज रोज बटाटा त्यांचे
अगदी फेव्हरेट असते ….
मुले गेली तरी सुटका होते कोठे ..?
सासू सासरे
खाणे कमी असले तरी त्यांनाही चवीचे लागते
कशी बशी मोकळी होते
मग बसते कॉम्प्यूटरवर
काही प्रतिक्रिया आल्याका
कवितेला
तेवढे बघून घेते
बस तेवढेच
घरातला पडलेला पसरा
मग त्याच्याकडेही बघते ….
प्रकाश
वाचने
1598
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
पका काका ही मात्र नेहमीसारखी
सकाळी सकाळी कोठे वेळ असतो ...
सकाळी सकाळी कोठे वेळ असतो....
कवितेची सुरुवात छान झाली,