मला पडलेले काही (गहन) प्रश्न
आपणा सर्वांना प्रत्यही अनेक प्रश्न पडत असतात. काही प्रश्नांची उत्तरे मिळून जातात तर काही तसेच मनात पडून राहतात. माझ्या मनात पडून राहिलेल्या अशाच काही प्रश्नांची ही जंत्री.
मी त्यांचे वर्गीकरण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे (जित्याची खोड!).
वर्ग १ - वर-खाली
शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे ही वरून खाली लावीत जावीत की खालून वर?
एखाद्या देशातील बहुसंख्य जनतेच्या ह्या सवयीचा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काही संबंध जोडता येईल काय? म्हणजे एखाद्या देशातील बहुसंख्य लोक जर शर्टाची बटणे खाऊन वर लावीत जात असतील तर त्या देशाची अर्थव्यवस्था सुधारत जाते इत्यादी...
वर्ग २ - डावे-उजवे
पायतणे घालताना प्रथम डाव्या पायाचे घालावे की उजव्या. की दोन्ही पायांची एकाच वेळेस?
प्रथम डाव्या पायात पायतणे घालणारी मंडळी डाव्या विचारसरणीची आणि उजव्या पायात घालणारी उजव्या विचारसरणीची, असे निरीक्षण कुणाच्या पाहण्यात आहे काय? असल्यास, दोन्ही पायात एकाच वेळेस पायतणे घालणारी मंडळी कोणत्या विचारसणीची म्हणावीत?
वर्ग २ अ - डावे-उजवे गोंधळ
लोक डाव्या आणि उजव्या मोजांतील फरक कसा ओळखतात? ;)
मोजे उत्पादक त्यावर काही खूण का करून ठेवीत नाहीत?
इयरफोनवर तशी सोय असते. परंतु त्यावरील L आणि R ही अक्षरे इतकी बारीक असतात की बर्याचदा डाव्या कानाचा इयरफोन उजव्या कानात घातला जातो (अर्थात, त्यामुळे फार काही बिघडते असे नाही! पण असो)
वर्ग ३ - रंग
लाल शाईने चेक लिहिला तर तो वैध ठरतो काय?
चेक लिहिताना निळी किंवा काळी शाई वापरणे ही प्रथा आहे. परंतु, लाल शाई वापरण्यावर काही कायदेशीर निर्बंध आहेत काय? (चेक बाऊन्स झाल्यास दंडाची रक्कम भरण्याची हमी देत असणारांनीच कृपया 'वापरून पहा' असा (आगाऊ) सल्ला द्यावा!)
(क्रमशः)
याद्या
3100
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रश्न अंत्यत गहन आहेत.विचार
शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे
मस्त
In reply to शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे by टवाळ कार्टा
ठ्यांकू
In reply to मस्त by स्वीत स्वाति
शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे
इयरफोनवर तशी सोय असते. परंतु
सोनीच्या इअरफोनमध्ये फरक पडतो
+१
In reply to सोनीच्या इअरफोनमध्ये फरक पडतो by कंजूस
पण मी म्हणतो...
गोल भागाकडे समोरून पाहिलेत तर
आयला...
In reply to गोल भागाकडे समोरून पाहिलेत तर by कंजूस
:-)
(No subject)
In reply to :-) by आतिवास
अद्याप अनुत्तरीत
शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे
शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे ही वरून खाली लावीत जावीत की खालून वर?जमेल तस करा.पायतणे घालताना प्रथम डाव्या पायाचे घालावे की उजव्या. की दोन्ही पायांची एकाच वेळेस?पायतणे कुठली आहेत त्यावरुन ठरवाव.मंदीराबाहेची आसतिल तर दोनी पायात एकदाच घालुन निघावे.लोक डाव्या आणि उजव्या मोजांतील फरक कसा ओळखतात?मोजा मोजी करण्यात वेळ जातो. चप्पल वापरावी.लाल शाईने चेक लिहिला तर तो वैध ठरतो काय?होय.(बँकेत विचारुन विचारुन खात्री केली आहे.)