Skip to main content

एकांत

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 17/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या विना सांज सखे, जीव ओशाळला गच्च नभी हे चांदणे, अंधार मंद जाहला ll १ ll सोसतो विरह मी, माझ्या श्वासा श्वासातला अंतर श्वासा श्वासातले, एकांत कुंद जाहला ll २ ll चंद्र शोधती तारका, सवे घेउनी अंबराला तुझा पौर्णिमेचा चंद्र, माझा छंद जाहला ll ३ ll कधी नीज लागली, न कळे मुळी मला सहवास विचार तुझा, स्वप्नात धुंद जाहला ll ४ ll जरी असेल स्वप्न, पाहिले असे तुला श्वास हर एक माझा, तुझा गंध जाहला ll ५ ll -सार्थबोध http://www.saarthbodh.com/2014/09/blog-post_85.html

वाचने 1306
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

धन्यवाद प्रकश१११ - :-)

सुरेख :) सुंदर.