अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या . वाजपेयी यांच्यासोबत एका घरात त्या अनेक वर्षांपासून राहात होत्या .ज्या दिवशी कौल वारल्या त्यादिवशी सोनिया गांधी वाजपेयी यांच सांत्वन करायला त्याना भेटल्या . मनमोहन सिंग यांनी पण दूरध्वनी वरून संपर्क साधला . नंतर बदनाम झालेले वाजपेयी यांचे 'मानलेले' जावई रंजन भट्टाचार्य हे कौल यांच्या मुलीचे श्रीमान . Indian Express ने 'Mrs Kaul, Delhi’s most famous unknown other half, passes away' असा मथळा देऊन हि बातमी छापली . वाजपेयी यांनी 'मै कुंवारा हु , ब्रम्हचारी नही ' असे विधान केले होते तरी हे संबंध कायम सर्व सामान्य लोकांसाठी 'under the wraps ' होते किंबहुना जाणून बुजून ठेवण्यात आले होते . अटलजी ची सर्वसामान्य लोकांमध्ये जी प्रतिमा होती ती ढासळू न देण्यासाठी हा खटाटोप होता .
दुसरा प्रसंग - १४ नोव्हे . ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो . पण त्यादिवशी 'कुजबुज ब्रिगेड ' च्या लोकांनी फेसबुक वर नेहरूंचे सिगरेट शिल्गाव्णारे , मद्याचा चषक हातात असणारे , महिलांसोबत जवळीक दाखवणारे (त्यातले बरेचसे Photo Shopped ) फोटो पसरवायला सुरुवात केली . उद्देश अर्थात नेहरू कसे बदफैली होते हे सिद्ध करण्याचा होता हे उघड होते . पण लेखाचा मुख्य मुद्दा हा नाही . नेहरूंचे सिगारेट पितानाचे फोटो टाकणारे अनेक परिचित स्वतः सिगारेट ओढतात . नेहरूंचे स्त्रियांसोबत फोटो टाकणारे अनेकजण स्त्रियांबद्दल काय 'नजरिया ' बाळगतात हे पण माहित होत . पण त्यांची अपेक्षा नेहरू हे आपले पंतप्रधान होते म्हणून त्यांनी काही गोष्टी करू नये अशी बालिश होती .
राजकारणी हि पण माणस असतात आणि सर्वसामान्य लोकांसारखी स्खलनशील असतात हे भारतीय जनमानस का मान्य करत नाही ? धुम्रपान व मद्यपान ह्या जगातले अनेक लोक सहज करत असणारया गोष्टी पण राजकारण्याना चार चौघात करण्याची मुभा नसावी ? काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांचा एका पार्टी मध्ये हातात कॉकटेल चा ग्लास असणारा फोटो आल्यावर एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने त्यावर गहजब केला होता . म्हणजे वाजपेयी यांनी आजन्म ब्रम्हचारी राहील पाहिजे किंवा कुठल्या मोठ्या पदावरच्या माणसाने धुम्रपान करू नये अशा भाबड्या अपेक्षांचे काय करायचे हा प्रश्न आहे . कुठल्याही नेत्याचे मूल्यमापन करण्याचे निकष काय असावेत ? वैयक्तिक चारित्र्य का तो /ती त्याचे काम किती कुशलतेने करतो हा ? देश अस्थिरतेच्या गर्तेत असताना देशाला एक स्थिर सरकार
देणे असो वा अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढवणे ; वाजपेयी यांचे हे कर्तुत्व ते एका महिलेसोबत राहतात यामुळे कमी होईल असे तत्कालीन भाजप नेतृत्वाला का वाटले असावे ? देशात लोकशाही रुजवणे , अनेक मुलभूत बदल घडवणे आणि स्वातंत्र्य लढ्यातल कर्तुत्व हे नेहरूंचे 'तसले ' फोटो टाकल्याने झाकोळून जाइल हा आत्मविश्वास त्यांच्या विरोधकांमध्ये कसा येतो .
बिल क्लिंटन यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या पहिल्या टर्म मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरण उघड झाले आणि मोठा गहजब उडाला . पण अमेरिकन जनतेने दुसऱ्यांदा पुन्हा बिल यांना निवडून दिले कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले , अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला . अमेरिकन जनतेने त्यांच्या देश चालवण्याच्या कौशल्याला दिलेली हि दादच होती . त्यासाठी त्यांनी क्लिंटन यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या 'प्रकरणाकडे ' कानाडोळा' केला . दुटप्पी पणाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात असे होईल ?
भारतीय नेते पण आपली 'Holier than cow ' अशी प्रतिमा बनावी यासाठी धडपडत करत असतात . आपण धुम्रपान /मद्यपान / सुंदर स्त्रियां सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असते . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एखादा दिलदार नेता त्याला अपवाद . आपले हेनिकेन बीअर चे प्रेम बाळासाहेब यांनी कधी लपवले नाही . त्याना सतत ओढायला पाईप लागायचा . तुमच्या आवडी निवडी बद्दल तुम्ही unapologetic असाल तर तुमचे अनुयायी पण तुम्हाला स्वीकारतात ह्याचे बाळासाहेब ठाकरे हे उदाहरण . पण बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून राहण्यातच धन्यता मानतात .
राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यात येणार्या स्त्रिया हा विषय राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चवीने चघळला जाणारा विषय . नेहरू आणि लेडी Mountbatten हे याचे उदाहरण . त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबध होते याची चर्चा आपण चवीने करणे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आपण करत असलेले आक्रमण नाही का ? सध्या मोदींच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा चालू आहे . त्यांनी सोडलेल्या त्यांच्या बायकोपासून ते 'पाठलाग ' करत असणारया स्त्रीपर्यंत अनेक विषयावर चवीने चर्वित चर्वण चालू आहे . हे सगळे जरी खरे आहे असे मानले तरी 'पंतप्रधान ' मोदी यांचे मूल्यमापन करण्याचा हा निकष असू शकतो का ? त्यांचे मूल्यमापन करण्याचा निकष त्यांनी महागाई कशी नियंत्रित केली , परराष्ट्र धोरण कसे राबवले , भ्रष्टाचार कसा नियंत्रित केला हा असायला नको का ? नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे . (एन . डी . तिवारी सारख्या नेत्याला अपवाद ठेवावे काय ?)
अर्थातच हे अवघड आहे . लोकांना मोठ्या लोकांबद्दल आणि एकूणच gossiping करायला आणि ऐकायला आवडत . पण जेंव्हा नेता निवडीची वेळ येते तेंव्हा कुठल्या निकषांना जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे लोकांनी ठरवायचे आहे . राजकारणी हि कितीही तिरस्करणीय जमात बनली असली तरी त्याना एवढा favor भारतीय जनते ने करावा .
(लेखात थोडा preaching चा टोन आला असल्यास क्षमस्व )
वाचने
31061
प्रतिक्रिया
143
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके.
उत्तम
Holier than "cow"!!
मोनिका लेवेन्स्की प्रकरणानंतर
.
गांधीजींचे ब्रह्मचर्य
रा. स्व. सोंग ?
In reply to गांधीजींचे ब्रह्मचर्य by विश्वजीत भोसले पाटील
विकृत मानसिकता असणारेच अश्या
अगदी बरोबर... गांधीद्वेषाने
In reply to विकृत मानसिकता असणारेच अश्या by दिवाकर देशमुख
खर बोलल्यावर मिर्ची लागते.
In reply to अगदी बरोबर... गांधीद्वेषाने by धडपड्या
अरे वा! आपल्याला दिसतेही का?
In reply to खर बोलल्यावर मिर्ची लागते. by दिवाकर देशमुख
तुमची अपेक्षा काय असते
In reply to अरे वा! आपल्याला दिसतेही का? by धडपड्या
छत्तीसगढ़मध्ये जे झाले, त्या
In reply to तुमची अपेक्षा काय असते by दिवाकर देशमुख
अवांतराबाबतः
In reply to छत्तीसगढ़मध्ये जे झाले, त्या by धडपड्या
अवांतराबाबत क्षमस्व..
In reply to अवांतराबाबतः by प्यारे१
तेच मोदी कडुन काय अपेक्षा आहे
In reply to छत्तीसगढ़मध्ये जे झाले, त्या by धडपड्या
असुद्यात हो... आहोत आम्हि
In reply to तेच मोदी कडुन काय अपेक्षा आहे by दिवाकर देशमुख
ट्विट का आले नाही त्यावर
In reply to असुद्यात हो... आहोत आम्हि by धडपड्या
ट्विटर वापरता, की केवळ
In reply to ट्विट का आले नाही त्यावर by दिवाकर देशमुख
आणि अजून एक, ४ दिवसांपूर्वी
In reply to ट्विटर वापरता, की केवळ by धडपड्या
आढावा घेतला आणि फिरायला निघुन
In reply to आणि अजून एक, ४ दिवसांपूर्वी by आनन्दा
ह्म्म.. म्हणजे तुमची अशी
In reply to आढावा घेतला आणि फिरायला निघुन by दिवाकर देशमुख
मोदी फिरायला गेले तरी त्यांचे
In reply to आढावा घेतला आणि फिरायला निघुन by दिवाकर देशमुख
.
In reply to मोदी फिरायला गेले तरी त्यांचे by खटपट्या
ओके, मग तुमचे काय म्हणणे आहे.
In reply to . by hitesh
विदर्भातील एका नेत्याबद्दलचा किस्सा
@रामदास - भन्नाट किस्सा .
In reply to विदर्भातील एका नेत्याबद्दलचा किस्सा by रामदास
काका
In reply to विदर्भातील एका नेत्याबद्दलचा किस्सा by रामदास
मस्तच हो उंदीरमामा! फक्त एक
बोका काका - तपशिलात मोठीच
In reply to मस्तच हो उंदीरमामा! फक्त एक by बोका-ए-आझम
नुसता तपशील?
In reply to बोका काका - तपशिलात मोठीच by पिंपातला उंदीर
मान्य : )
In reply to नुसता तपशील? by पिवळा डांबिस
धन्यवाद
In reply to मान्य : ) by पिंपातला उंदीर
(कदाचीत) अजून एक दुरूस्ती...
In reply to नुसता तपशील? by पिवळा डांबिस
वा..वा..
In reply to बोका काका - तपशिलात मोठीच by पिंपातला उंदीर
चौफुला प्रकरण आठवता नाय का
वा
विसंगती
दणकून सहमती...
In reply to विसंगती by हुप्प्या
नेहुरुंचे संबद्ध
@आठवले - नेत्याने आपल्या
In reply to नेहुरुंचे संबद्ध by रमेश आठवले
हो.. जिथे नेता प्रामाणिकपणे
In reply to @आठवले - नेत्याने आपल्या by पिंपातला उंदीर
ब्रम्हचर्य?
In reply to हो.. जिथे नेता प्रामाणिकपणे by आनन्दा
अवांतर - वाजपेयी यांचे
In reply to @आठवले - नेत्याने आपल्या by पिंपातला उंदीर
जाहीर स्वीकृती म्हणजे काय रे
In reply to अवांतर - वाजपेयी यांचे by आनन्दा
इथेच वर आलेले आहे -
In reply to जाहीर स्वीकृती म्हणजे काय रे by दिवाकर देशमुख
मोदींनी सरकारी व्यवस्था
In reply to इथेच वर आलेले आहे - by आनन्दा
पुरावा
In reply to मोदींनी सरकारी व्यवस्था by दिवाकर देशमुख
इंग्रजी वाचता येते का हो ?
In reply to पुरावा by आनन्दा
हा हा हा. चूक झाली खरी. तुमचा
In reply to इंग्रजी वाचता येते का हो ? by दिवाकर देशमुख
मोदींचे पर्सनल इंटरेस्ट नसून राजकीय इंटरेस्ट होते.
In reply to हा हा हा. चूक झाली खरी. तुमचा by आनन्दा
नाटकावरील बंदी
In reply to मोदींचे पर्सनल इंटरेस्ट नसून राजकीय इंटरेस्ट होते. by दिवाकर देशमुख
मला वाटत इथे घटनाबाह्य
In reply to नाटकावरील बंदी by विकास
अस्स अस्स.. जरा हे पहा बर..
In reply to मोदींचे पर्सनल इंटरेस्ट नसून राजकीय इंटरेस्ट होते. by दिवाकर देशमुख
परत तेच
In reply to अस्स अस्स.. जरा हे पहा बर.. by आनन्दा
हायला, याचा अर्थ असा होतो होय
In reply to परत तेच by दिवाकर देशमुख
पूर्ण वाक्य तुमच्या माहितीसाठी
In reply to हायला, याचा अर्थ असा होतो होय by आनन्दा
सिंग बरोबर बोलले. उलट सिंग
In reply to पूर्ण वाक्य तुमच्या माहितीसाठी by आनन्दा
फॉर्म
In reply to सिंग बरोबर बोलले. उलट सिंग by दिवाकर देशमुख
.
In reply to फॉर्म by विकास
??
In reply to . by hitesh
हा नरो वा कुन्जरो वा चा
In reply to ?? by प्रदीप
वास्तवीक
In reply to हा नरो वा कुन्जरो वा चा by पिंपातला उंदीर
.
In reply to वास्तवीक by विकास
राष्ट्रहीत
In reply to . by hitesh
माझे प्रतिसाद selective
In reply to राष्ट्रहीत by विकास
वाजपेयी यांनी 'मी अविवाहित
In reply to अवांतर - वाजपेयी यांचे by आनन्दा
टीका व्हायलाच हवी.. चर्चा
In reply to वाजपेयी यांनी 'मी अविवाहित by दुश्यन्त
संघाचे बहुतेक सर्वत्र आपला तो
दुटप्पीपणा आणि निर्लज्जपणा
In reply to संघाचे बहुतेक सर्वत्र आपला तो by विजुभाऊ