✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<<<पंगत नव मीपाकराचीं- भाग २

ज
जेपी यांनी
Sun, 11/16/2014 - 16:22  ·  लेख
लेख
मागील भाग व्यनी वाचुन मी बसल्या जागी उड्या मारायला चालु केल्या. हुर्रे !! मला संपादक मंडळावर तर घेत नाहीत , निदान पंगतीच्या आयोजन मंडळावर तर घेत आहेत. संधि का सोडा ? लगे हात मुविंना होकार कळवला आणी संध्याकाळची वाट पाहु लागलो. ============================================================================= हे व्हिसी ( व्हिडीओ कॉन्फरन्स) करण म्हणजे आवघड काम होत. कारण ते आमच्या मोबल्यावर होणार नाही. त्यासाठी एखादा चांगला सायबर कॅफे गाठणे भाग होत.मग लक्षात आल अरे आपला मित्र शेखरच सायबर कॅफे आहे की,त्याच्या कॅफेत व्हिसीची सोय आहे.सांच्याला त्याच्या कॅफेकडे निघालो.दुरुनच आधी पाहिल ति बया (नेहा) आहे का ? तिच काय सांगता येत नाय,आधी फक्त मालकीचेच सर्मपण करायची,आजकाल कुणाचही 'सर्मपण' करते. आत जाऊन केबीन मधे बसलो आणी पिसी चालु करुन मुवि यायची वाट पाहु लागलो. स्क्रीन वर अचानक सगळा धुर दिसु लागला.हे नक्कीच अआ आसणार.भितीपोटी थंड्गार केबिन मधे घामाचा एक ओघळ पाठीवरुन खाली का वरी गेला. पण तिथे मुवि प्रकटले.यांच प्रकटन आस होईल वाटल नव्हत.त्यांनी काय तर नवी सवय चालु केली आहे. दुसर्या खिडकीत सातमजली हास्याच्या स्मायल्या टाकत अआ आले.सोबत आतेरेकी छाप मशीनगन होती. मला दोघानीहि पाहीलेले नव्हते.त्यामुळे आधी परवलीचा शब्द विचारुन खात्री करुन घेतली आणी नमस्कार-चमत्कार करुन आमचा संवाद आखेर चालु झाला. मुवि "मंडळी, तुम्हाला तर माहीत आहे की मला सत्यनारायण घालयची किती आवड आहे. या वेळेस मी ठरवल आहे की त्यासोबत एक पंगत हि भरवायची. माझे काम मीपाकरांच्या मदतीशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. आता मी एक एक मुद्दा मांडतो. सगळे मिळुन काथ्था कुटु या. आणी हि पंगत पुर्ण करु या." यावर मी आणी गुरुजी दोघानीं माना डोलावल्या ( गुरुजी स्मायली शिवाय काहीच करत नाहित.त्या मुळे ईथे मान हलवणारी स्मायली कल्पावी). मुवी"तर पहिला मुद्दा आसा आहे की पंगत कुठे भरवायची ? आता मध्यवरर्ती ठिकाण आमचे डोंबिवली आहे ते चालेल का ?" गुरुजि "पंगती भरवणे हा पुण्यनगरीचा इतिहास आहे. त्यामुळे पंगत पुण्यातच होणार.( त वर जास्त जोर होता) मुवी"आहो पण मला तिथे सगळी तयारी करणे जड जाईल ना ?" गुरुजी"घाबरु नका सगळी व्यवस्था मी करतो. जागा,सामान सगळ पुरवतो." आता मुविचांहि नाईलाज झाला.मला हि पुणे जवळ पडल आसत. ठराव २-१ ने पास झाला. मुवी "आता दुसरा मुद्दा मेनु काय ठेवायचा. माझ्यामते जेपी ने काही काळापुर्वी मस्त शाकाहारी थाळी बनवली होती तिच ठेवुया. जेपी करेल बल्लवाच काम. काय जेपी ? मी शॉक.आँ मंजे मला कामाला लावायचा विचार आहे काय नाही नाही विरोध करायलाच हवा. " ओ ते नाय जमणार आपल्याला.एवढ्या लोकांसाठी थाळी बनवने मंजे खायच काम नाही " गुरुजी" घाबरु नको जेपी मी तुझ्या हाता खाली दोन तिन मुल देतो.त्याच्यां मदतीने करुन टाक. त्यात काय आवघड आहे.पुरणाच्या पोळी पेक्षा दुसरा एक गोड पदार्थ मी बनवतो" शेवटी माझा नाईलाज झाला.ठराव २-१ ने पास. मुवि"आता तिसरा मुद्दा आसा आहे की कुणाकुणाला बोलवायचे ?पुर्वीच्या पंगतित फक्त सिद्धहस्त लेखकांना बोलवले होते.पण आता सिद्धहस्त कुणाला म्हणायचे हे कळत नाही" यावर बराच काथ्था कुटला पण काय सुचना गेल.शेवटी गुरुजी म्हणाले आपण पहिल्या पंगतीला जे आले होते त्यांना सल्ला विचारु या. मुवि नि शोध चालु केला.जुन्या पंगतीला जे हजर होत त्यापेकी पिवळा डांबिस काका आजकाल येतात बाकीचे नाही. मग मुवि नें संपर्क करुन पिडां काकाला व्हिसी मधे पाचारण केले.काका आले, नमस्कार करुन झाला आणी संवाद सुरु. काका "बोला नवमिपाकरांनो काय काम काढलत ?" मुवि"काका आम्हाला नवमिपाकराचीं पंगत भरवायची आहे.यावर काही काथ्था कुटत आहोत. एका मुद्दावर आडकलो आहोत तर जरा सल्ला हवा आहे." काका" हम्म,बघु काय काथ्था कुटला आहे." आमी कुटलेला काथ्थ्य काकाकडे सरकवला. काका निं काथ्था पाहीला आणी भडकले " शिंच्यानो आसला कसला काथ्था कुटला आहे.यात तर कायच मसालाच नाय" आम्ही घाबरलो एका सुरात ओरडलो " काका ,नया हय हम" काका"क्या नया हय तुम.चला उठा आणी आंगठे पकडा" आता मुविचं वय पाहता आणी गुरुजींचि बंदुक पाहता.हे काम मलाच कराव लागणार.मी हाताचा अगंठा पकडुन उभा राहीलो. काका "अरे, हाताचे नाय मेल्या.पायाचे पकड" मुवि " काका नया हय वह" काका" अरे फिर नया हय वह.मय क्या बोल रहा हु तुम क्या बोल रहे हो.मय शिकणे के बारे मे बोल रहा हु" मी "आहो काका जाऊ द्यानां. शिकतो आहे हळुहळु." बर्याच वेळाने काका शांत झाले.म्हनाले" बर बोला काय सल्ला हवा ?" मुवि" काका पंगतिला सिद्धहस्त लेखकानां बोलवायचे आहे.पण कुणाला सिद्धहस्त म्हणावे ते कळत नाही. काही लोक आपला सिद्धस्तपणा लेखातुन दाखवतात,तर काही प्रतिसादातुन.मग आता कुणाला सिद्ध्हस्त लेखक म्हणावे." काका" बस्स आसला छोटा प्रश्न! साला तुम्हा नव्यामिपाकरांना मिसळपाव कश्याशी खातात ते माहित नाही का ? सिद्धहस्तपणा मारा फाट्यावर आणी बोलवा ज्यांना बोलवायचे आहे ते. हॅ हॅ हॅ." काकानीं एका फट्क्यात मुद्दा सोडवला. ठराव सर्वानुंमते पास. मुवि"धन्यवाद काका.आपले आभारी" काका"ते आभार घाला चुलीत.मला एक शिवास रिगल पाठवा.सल्याची फिस म्हणुन.काय हॅ हॅ हॅ !." मुविनिं ति जबाबदारी घेतली. आता सगळे मुद्दे संपले होते.पंगतीची तारीख ठरली. गुरुजीनीं निरोपाचे विडे दिले आणी निरोप घेतला. मी कुटलेला काथ्था पोत्यात भरला.वाया जायला नको.घरी जाऊन दोर वळत बसलो. भेटु आता पंगतीत. क्रमशः

Book traversal links for <<<पंगत नव मीपाकराचीं- भाग २

  • ‹ << पंगत- नवमीपाकरांची - भाग १>>>
  • Up
  • <<<<<पंगत-नवमिपाकरांची-भाग ३(अंतीम)>>>>>> ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
विडंबन
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
संदर्भ
चौकशी
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6898 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

,

स्वप्नज
Sun, 11/16/2014 - 16:27 नवीन
जेपींच्या धाग्यावर पहिला येण्याचे भाग्य लाभले... धन्य जाहलो....
  • Log in or register to post comments

लै भारी.

प्रचेतस
Sun, 11/16/2014 - 16:47 नवीन
लै भारी. मजा आली वाचून. बाकी अ आ यांचे तोंडी दु दु न घाताल्याबद्दल निषेध.
  • Log in or register to post comments

वल्लीदा-गुरुजींनी आमच्यावर

जेपी
Sun, 11/16/2014 - 21:05 नवीन
वल्लीदा-गुरुजींनी आमच्यावर बंदुक उगारली होती, भिती पोटी लिवल नाय. आता ग्रिन सिग्नल मिळालय.उद्या पुन्हा वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अ आ यांचे तोंडी दु दु न

सतिश गावडे
Sun, 11/16/2014 - 22:44 नवीन
अ आ यांचे तोंडी दु दु न घाताल्याबद्दल निषेध.
अ आ यांच्या तोंडात अजुनही दुदु घालावं लागतं? कमालच आहे म्हणायची. ;) जेप्या, लय भारी लिवलंय. मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पंगतीची पूर्वतयारी जोरात चालू

आतिवास
Sun, 11/16/2014 - 17:37 नवीन
पंगतीची पूर्वतयारी जोरात चालू आहे तर!
  • Log in or register to post comments

एक सुचना-

जेपी
Sun, 11/16/2014 - 17:51 नवीन
एक सुचना- पंगती साठी ड्रेस कोड आहे.ऐनवेळी धोतर नाही मिळाल,माझ्याकडे नववारी नाही. हे नेसता येत नाही. आयते घेऊ का शिवलेले आसले प्रश्न मला विचारु नका.
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
Sun, 11/16/2014 - 18:04 नवीन
मस्त! मजेशीर, हलकंफुलकं!
  • Log in or register to post comments

मिसळीचं मी बघतो .

कंजूस
Sun, 11/16/2014 - 18:28 नवीन
मिसळीचं मी बघतो .
  • Log in or register to post comments

आवडते आहे

रामदास
Sun, 11/16/2014 - 18:55 नवीन
पण फोडणीचा ठसका लागत नाहीय्ये. (रिक्तहस्त) रामदास
  • Log in or register to post comments

मस्त...

मुक्त विहारि
Sun, 11/16/2014 - 22:38 नवीन
झक्कास... आवडले.... तुर्तास इतकेच...आज काम जरा जास्तच आहे....
  • Log in or register to post comments

पैचान कौन???

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/16/2014 - 22:57 नवीन
Image removed. ================================== Image removed. ================================== Image removed. ==================================

पैचान कौन???

  • Log in or register to post comments

पहिल्या भागापेक्षा लेखनाचं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/17/2014 - 06:58 नवीन
पहिल्या भागापेक्षा लेखनाचं स्ट्रक्चर (इकडचं तिकडचं पाहुन) सुधारलंय. बाकी, पंगतीत अजून काय मजा नाय बघा. असं लेखन कसं खुसखुशीत झालं पाहिजे. च्यायला, ज्या माणसाचं नाव घेऊ नये सकाळी सकाळी त्यांची आठवण होते, या निमित्तानं त्यांच्या खयाली पुलावांची आठवण झाली. :) -दिलीप बिरुटे (स्पष्ट)
  • Log in or register to post comments

आयला,

पिवळा डांबिस
Mon, 11/17/2014 - 13:10 नवीन
हा खयाली पुलाव पहाण्यात आलाच नव्हता.रेसेपी जरा (सहाजिकच) झणझणीत! धन्यवाद!!! आता जेपीची पंगत कधी बसतेय ते पाहू (स्वगत: साधा 'काका तुमीसुद्धा कट्ट्याक या' इतकापण बोलूक गावला नाय हेंका, आणि हे मेले माकां शिवास धाडतले! उगीच देखल्या देवाक दंडवत! इतको काय खुळो नाय मी!!!) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झक्कास!

अजया
Mon, 11/17/2014 - 07:22 नवीन
पण केवढी ही पूर्वतयारी.पंगत बसवुन टाका आता लवकर!!
  • Log in or register to post comments

ह्म्म्म!!

सूड
Mon, 11/17/2014 - 15:26 नवीन
ह्म्म्म!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा