✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी व्याकरण

प
पालव यांनी
Fri, 11/14/2014 - 23:57  ·  लेख
लेख
काल मुलाला इन्ग्रजी चे ग्रामर शीकवत असताना त्याने मला मराठीत पन असे काही ग्रामर असते का विचारले. मराठी व्याकरण शीकुन आता २०-२५ वर्शे लोटली आहेत. आता फार थोडे आठवते. शाद्रुल्वीक्रीडीत, गण, यमक, अलन्कार, अनुप्रास भुजन्ग्प्रयाअस असे बरेच काही होते. ह्या वीषयावर काहि काथ्याकूट ह्यापुर्वी मी. पा वर झाला आहे का? काही दुवा असला तर जाणकारानी शेअर करावा. मला आठवनारी काही अपुर्न उदाहरने ....व्रुत्ते/अलन्कार नववधु---- नववधु प्रीया मी बावरते लाजते पुधे सरते मागे फीरते कले मला तु प्रन सखा जरी कले तुच आधार सुख जरी मन्दारमाला--- सतत करीत मन्दारमाला गुरु एक त्याचाही अन्ती वसे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17255 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

पालव साब !

धर्मराजमुटके
Sat, 11/15/2014 - 00:32 नवीन
पालव साब ! आपने तो व्याकरणकी शिकरण कर दी ! :) पण हरकत नाही. यानिमित्ताने माझ्या आवडीच्या विषयाला फिरुन नवीन पालवी फुटेल. मागे मिपावर एक धागा निघाला होता खरा यासंदर्भात. कुणीतरी दुवा द्या रे प्लीज . बाय द वे हे काही पहा. ओळखा पाहू जरा. १. मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त हे मंद चाले | ज्याच्या पादीं म भ न त त हे, आणि ग दोन आले | एका पादी गणती सतरा अक्षरांचीच होते | काढी रामा भवनदीतूनी खातसे फार गोते | २. गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी | आणि मनाशीच म्हणायचा या जागेवर मी बांधीन माडी | मिचकावूनी मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई | भिरकावून ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई ! ३. म्हणावे तयाला भुजंगप्रयात | क्रमानेच येती य चारी जयात | पदी ज्याचिया अक्षरे येति बारा | रमानायका, दु:ख माझे निवारा | वरील सर्व उतारे स्मरणातून लिहिले आहेत. जाणकारांनी चुका दुरुस्त कराव्यात आणि एका दगडात दोन पक्षी मारल्याचा आनंद घ्यावा ही विनंती. :)
  • Log in or register to post comments

धर्मराजमुटके साहेब,

पालव
Sat, 11/15/2014 - 01:02 नवीन
धर्मराजमुटके साहेब, धन्यवाद..पहीलाच प्रयत्न होता काही लीहायचा. पण हा वीषय त्यावेळेस़ खुप आवडायचा. आता गणपत वाणी आठ्वला. एकदा उजळ्णी झली की आठ्वेल. १७ अक्षारान्च एक गण असे काहीतरी होते. गण, मात्रा, व्रुत्ते, असे खुप काही होते
  • Log in or register to post comments

एकदा मास्तरान अलंकार इचारला.

जेपी
Sat, 11/15/2014 - 06:51 नवीन
एकदा मास्तरान अलंकार इचारला. आला नाय. मास्तरान 14 छड्या मारत मारत समजावुन सांगितला. व्याकरणाचा नादच सोडुन दिला.
  • Log in or register to post comments

व्याकरण आणि वृत्ते ह्यांत घोळ

मिहिर
Sat, 11/15/2014 - 10:31 नवीन
व्याकरण आणि वृत्ते ह्यांत घोळ घातलेला दिसतोय. असो.
  • Log in or register to post comments

सहमत

पिवळा डांबिस
Sat, 11/15/2014 - 10:43 नवीन
ओ पालवशेठ, तुम्ही म्हणताय ती वृत्तं आहेत हो. आणि तुमच्या लेकाच्या इंग्रजी व्याकरणाचं माहिती नाही पण तुम्ही इथे लिहिलेल्या धाग्यावरुन तुमचं स्वतःचं मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन अगदी गोल दिसतंय, ते आधी सुधारा!!! आणि "मी नवीन आहे' किंवा "हा पहिलाच प्रयत्न आहे" वगैरे सबबी यावेळेस इथे चालणार नाहीत. बाकी प्रकटन ठीक आहे पण मराठी व्याकरणावर धागा काढणार्‍याला किमान शुद्ध मराठी हे लिहिता यायलाच हवं!!!! (काय संपादकमंडलींनू, मी बोलतंय तां खरां का खोटां?) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

एकदम सहमत काका.

पाषाणभेद
Sat, 11/15/2014 - 20:00 नवीन
एकदम सहमत काका. एकदम ठरवून केलेल्या चुका धडधडीत दिसत आहेत. लेखकमहोदय आपल्यासारख्यानी या असल्या ट्रिका आधीही केलेल्या आहेत अन मिपाकर सरावलेले आहेत. आपण असले मराठी लिहून मराठी भाषेचा अपमान करताय असे वाटत नाही काय? र्‍हस्व दीर्घ याबाबत एवढ्या ढोबळ चुका अजिबात क्षम्य नाही. संपादक महोदय, याबाबत लेखकरावांना समज देवून त्यांच्याकडूनच चुकांची दुरूस्ती करवून घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

भुजन्ग्प्रयाअस ???

सस्नेह
Sat, 11/15/2014 - 12:41 नवीन
भुजन्ग्प्रयाअस ??? नका हो इतके प्रयास घेऊ *lol*
  • Log in or register to post comments

.

hitesh
Sat, 11/15/2014 - 13:27 नवीन
भुजंगप्रयात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

"शुद्ध कसे लिहावे आणि शुद्ध

चित्रगुप्त
Sat, 11/15/2014 - 18:15 नवीन
"शुद्ध कसे लिहावे आणि शुद्ध कसे बोलावे, हे व्याकरण शिकल्याने समजते" तस्मात वृत्ते, अलंकार, गण, यमक वगैरेंचे आधी इतके साधता आले, तरी पुष्कळ.
  • Log in or register to post comments

"मी नवीन आहे' किंवा "हा

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 11/15/2014 - 18:24 नवीन
"मी नवीन आहे' किंवा "हा पहिलाच प्रयत्न आहे" वगैरे सबबी सांगितल्या असल्या तरी अशुद्धलेखन करण्यात घेतलेले प्रचंड प्रयास स्पष्ट दिसत आहेत. "मिपाकरांच्या हुशारीबद्दलच्या अश्या गैरसमजूतीमुळे भूतकालात अनेक जणांनी केवळ बोटेच नाही तर पूर्ण हात जाळून घेतले आहेत" हे केवळ तुमच्या प्रकृतीच्या काळजीसाठी सांगावेसे वाटते... बाकी तुमची इच्छा. अर्थात, स्वानुभवासारखा दुसरा शिक्षक नाही असे म्हणतात. :)
  • Log in or register to post comments

@लाजते पुधे सरते मागे फीरते

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/15/2014 - 18:31 नवीन
@लाजते पुधे =))))) सरते मागे फीरते कले मला तु प्रन =))))) सखा जरी =================== लेख्नात असुद्द लेकन! आं........... :-/ परत किच्चु तै ची अठवण आली! :(
  • Log in or register to post comments

मिपाकरांच्या हुशारीबद्दल शंका

पालव
Sat, 11/15/2014 - 19:14 नवीन
मिपाकरांच्या हुशारीबद्दल शंका नाहीत एक्का साहेब.. पण वरील ८-१० ओळी लीहायला ४५ मि. लागली. कळत होते की चुकी चे आणी अशुद्धलेखन आहे पण खोडण्यासाठी मागे यावे तर सगळे च चुकीचे होवुन जात होते. मग परत पहील्यापासुन सुरुवात... मी. पा. वर रोज काहीतरी वाचत होतो पण लीहीण्याचा प्रयत्न प्रथमच केला. मला वाटले मी. पा. कर समजुन घेतील असो....आता टंकलेखन सहाय्य घेवुन लीहीत आहे. मराठी व्याकरणावर धागा काढणार्‍याला किमान शुद्ध मराठी हे लिहिता यायलाच हवं हे पिवळा डांबिस साहेबांचे अगदि बरोबर आहे, पण गोची झाली ती टाइप करतांना. टंकलेखन सहाय्य आता दिसले आम्हाला. हे समजुन मी. पा. करांनी माफ करावे... धन्यवाद चुका दुरुस्त केल्याबद्दल....
  • Log in or register to post comments

नो वरीज!

पिवळा डांबिस
Sat, 11/15/2014 - 19:41 नवीन
आता जमलं ना टंकलेखन सहाय्य घेऊन शुद्ध लिहायला? अतिशय छान! आता येऊ द्यात तुमचं लिखाण भरभरून! स्वागत आहे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालव

गमभन शिका.

जेपी
Sat, 11/15/2014 - 19:21 नवीन
गमभन शिका.
  • Log in or register to post comments

भुजंगप्रयात या वरुन आठवले

सिरुसेरि
Sat, 11/15/2014 - 21:23 नवीन
या वरुन आठवले --- मना सज्जना तू कडेनेच जावे न् होऊन कोणासही दुखवावे कुणी दुष्ट लाविल अंगासी हात तरी दाखवावा भुजंगप्रयात
  • Log in or register to post comments

ते व्याकरणात

प्यारे१
Sat, 11/15/2014 - 22:22 नवीन
ते व्याकरणात 'स, ला, ते' 'स,ला ना,ते' ... 'ने ए शी' , 'नी ई या शी'... त ई आ, त ई आ प्रथमा... ते सप्तमीचे प्रत्यय वगैरे असलं काही काही होतं एवढं आठवतंय.
  • Log in or register to post comments

आचार्य अत्रे ह्यांची एक कवीता

पालव
Sat, 11/15/2014 - 23:26 नवीन
आचार्य अत्रे ह्यांची एक कवीता होती "आजीचे घड्याळ" नावाची...ती बहुतेक शार्दुलविक्रीडीत ह्या व्रुत्तात होती असे आठवते. लग्नाच्या मंगलाष्ट्के ह्या देखील शार्दुलविक्रीडीत व्रुत्ताचे एक उदाहरण होते असे आठवते. ''आहे व्रुत्त विशाल त्यास म्हणती शार्दुलविक्रीडीत '' वरील नववधु चे उदाहरण परत एकदा लिहीत आहे नववधु: नववधु प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते, मागे फीरते || कळे मला तु प्राण सखा जरी कळे तुच आधार सुख जरी मना जवळ यावया गांगरते नववधु प्रिया मी बावरते.... गडद निळे गडद निळे आकाश आणी हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार व्रुक्षापरी हे दोन उदाहरणे कसली.. कोणाला आठ्वतात का?
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

सस्नेह
Sun, 11/16/2014 - 14:28 नवीन
एक दिवसात टंकनातील लक्षणीय घोडदौड पाहून अतीव आश्चर्य वाटल्या गेले आहे. अशीच प्रगती याकरणात होवो ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालव

>>> अशीच प्रगती याकरणात होवो

प्यारे१
Sun, 11/16/2014 - 15:01 नवीन
>>> अशीच प्रगती याकरणात होवो ही सदिच्छा. याकरण असो की त्याकरण, खायला उसळ आणि शिकरण! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

धन्यवाद...

पालव
Wed, 11/19/2014 - 21:11 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

"याकरन" ? ह्यां काय असता ?

खटपट्या
Sun, 11/16/2014 - 01:29 नवीन
"याकरन" ? ह्यां काय असता ? ल्हानपनी शालंत कायतरी आयकला व्हता. मेलो मास्तरबी मालवनीच, त्यामुळे ह्यां काय ता याकरन पुस्तकातच रवला. पुस्तकातली भाषा आमी कदी बोललंव नाय. कदी दशावतारात बोललो तर. आनी ते सुद्द्लेकन..... जावदे... वशाडी ईली... माका जमा नाय...Image removed.
  • Log in or register to post comments

१)मामाची बायको सुगरण,

कंजूस
Sun, 11/16/2014 - 19:28 नवीन
१)मामाची बायको सुगरण, रोजरोज पोळी शिकरण. २)रस्ता अजगरासारखा सुस्त पडला होता. ३)चंद्रमा आज का रुसला ? ४)बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. ५)तुमच्या चिरंजिवांचा प्रताप!
  • Log in or register to post comments

अवांतर

सुनील
Tue, 11/18/2014 - 14:26 नवीन
ह्या निमित्ताने एक जुनाट शंका विचारून घेतो - मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी-शिकरण ह्या ओळींतून, मामीला तिच्या स्वयंपाकाबद्दल 'सुगरण' असे संबोधून, शाल-जोडीतील दिले गेले आहेत काय? कारण शिकरण करण्यासाठी काही खास पाककौशल्य लागते, असे नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हा हा हा, अगदी अगदी..

बॅटमॅन
Tue, 11/18/2014 - 14:32 नवीन
हा हा हा, अगदी अगदी.. परंतु मामा अन मामी हे पारंपरिकरीत्या पाहता प्रेमळ नाते मानले गेलेय. सासू-सून, नणंद-भावजय, इ. सारखा प्रकार नाहीये त्यात. त्यामुळे शालजोडी नसावीसे वाटते. तदुपरि- पोळी-शिकरण हे यमकासाठी असावेसे वाटते, ते सुबत्तेचे निर्देशक मानता येईल काय? अतिअवांतरः लहानपणी शिकरण हा प्रचंड नावडता प्रकार. अजूनही आवडत नाही. उलटी दाबून दडपायची कला बाकी अवगत झालीय आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

सुगरण!

सुनील
Tue, 11/18/2014 - 14:57 नवीन
तदुपरि- पोळी-शिकरण हे यमकासाठी असावेसे वाटते
शक्य आहे.
ते सुबत्तेचे निर्देशक मानता येईल काय?
अगदी!! विशेषतः मामा-मामी जर एखाद्या विशिष्ठ नगराचे (खास करून त्याच्या तिसाव्या उपनगराचे) रहिवासी असतील, तर नक्कीच! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शालजोडीतलाच आहे.

आदूबाळ
Tue, 11/18/2014 - 21:49 नवीन
शालजोडीतलाच आहे. मामा हे प्रेमाचं नातं. मामी (भावजय) आली आणि मामाच्या प्रेमाचं विभाजन झालं, याची चिडचिड अनेक आई-प्रणीत बालगीतांतून मामीला व्हिलन ठरवून व्यक्त होत असते. उदा. लव लव साळूबाई, मामा येतो हाती खोबर्‍याची वाटी देतो मामी येते, हिसकून घेते हज्जार वार रेशीम सहज घेऊ शकणार्‍या मामाला शिकरण हा सुग्रणतेचा बेंचमार्क असणारी मामी मिळावी हा केवढा दैवदुर्विलास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओह अच्छा, तेबी खरंच म्हना!

बॅटमॅन
Tue, 11/18/2014 - 22:44 नवीन
ओह अच्छा, तेबी खरंच म्हना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

रोज रोज पोळी शिकरण नंतरच्या

प्यारे१
Tue, 11/18/2014 - 23:54 नवीन
रोज रोज पोळी शिकरण नंतरच्या वाक्यात काय आहे? चिरंजीवांसाठी युट्युबवर ऐकलेल्या गाण्यात 'गुलाबजामुन खाऊया, मामाच्या गावाला जाऊ या असं आहे'. मामी 'बरी' असावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

पण पोळी करण्यासाठी लागते ना !

सस्नेह
Tue, 11/18/2014 - 14:33 नवीन
पण पोळी करण्यासाठी लागते ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ऐन वेळी आलेल्या पाहुण्यांना

पिशी अबोली
Tue, 11/18/2014 - 22:29 नवीन
ऐन वेळी आलेल्या पाहुण्यांना वाटेला लावण्यासाठी केलेली शिकरण वेगळी.. खास बेत करून केलेली शिकरण वेगळी. नारळाचा रस, वेलची वगैरे घालून केली जाते ती ही असावी असं वाटतं.. कारण 'रोज रोज पोळी' हा आता उपहास आहे. रोज पोळी म्हणजे आधी अप्रूप असावं असं जुन्या लोकांच्या गोष्टींवरून वाटतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अगो बाय पोळी म्हणजे पुरणपोळी

सस्नेह
Wed, 11/19/2014 - 07:20 नवीन
अगो बाय पोळी म्हणजे पुरणपोळी ! ग्रामीण भागात पोळी आणि चपाती असे भेद आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

अगो बाय पोळी म्हणजे पुरणपोळी !

मुक्त विहारि
Wed, 11/19/2014 - 07:52 नवीन
हेच योग्य वाटते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

+१

बॅटमॅन
Wed, 11/19/2014 - 16:18 नवीन
यद्यपि अनेकजण विशेषतः ब्राह्मण समाजातील लोक पोळी = चपाती हे समीकरण वापरतात. अन हे पुण्यातच चालतं असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

+१

पिशी अबोली
गुरुवार, 11/20/2014 - 00:26 नवीन
+१ परफेक्ट.. हे अजिबातच लक्षात नव्हतं आलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ही काय भानगड आहे

विटेकर
Tue, 11/18/2014 - 12:20 नवीन
वरिल ठऴक अक्षरात लिहिलेल्या शब्दांचे व्याकरण चालवायचे आहे काय ?
  • Log in or register to post comments

हा हा !उपमा उत्प्रेक्षा रुपक

कंजूस
Tue, 11/18/2014 - 14:17 नवीन
हा हा !उपमा उत्प्रेक्षा रुपक यमक वगैरे आहेत.
  • Log in or register to post comments

तुम्हाला सुचलेली उदाहरणे टाका

कंजूस
Tue, 11/18/2014 - 21:23 नवीन
तुम्हाला सुचलेली उदाहरणे टाका हसत खेळत मिपावर व्याकरणाची उजळणी होईल. मामा मोठा तालेवार आहे त्याला भाच्यांचे लाड करावेसे वाटताहेत. सुटिला पुण्यात मामाकडे आल्यावर चंगळ नको का ?मामीही प्रेमळपणे रोज पौष्टिक शिकरण पोळी खाऊ घालतेय. दीड महिन्याने गालाची गुलाबी सफरचंदे होतील.अतिशयोक्ति हा अलंकार हल्ली नवजोत सिध्दू वापरतो.
  • Log in or register to post comments

येवु देत मंड्ळी...अजुन एक

पालव
Wed, 11/19/2014 - 21:09 नवीन
येवु देत मंड्ळी...अजुन एक उदाहरण... मातीत ते पसरले अतीरम्य पंख केले वरी उदर पांढुर निष्कलंक चंचु तशीच उघडी पद लांबवले नीष्प्राण देह पडला श्रमही नीघाले ह्या उदाहरणात मेलेल्या पाखराचे चित्रण आहे.. बहुदा एखाद्या वस्तुचे/जागेचे हुबेहुब चित्रण केलेले असते ...कोणाची कविता आहे आता आठवत नाही.
  • Log in or register to post comments

नीष्प्राण देह पडला श्रमही नीघाले

धर्मराजमुटके
Wed, 11/19/2014 - 21:11 नवीन
नीष्प्राण देह पडला श्रमही निमाले. बाकी सुद्द्लेकन सुदारण्याचा कंटाला आलाय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा