Skip to main content

नको ..

लेखक गवि यांनी शनिवार, 15/11/2014 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
मागे नको वळू कारण पुढे ठेच लागेल मग निघेल जिभाळी अन जिव्हारी लागेल.. मागे नको वळू कारण मन वेडझवं मागे वळून म्हणेल त्याला पुन्हा सगळं हवं.. मागे नको वळू कारण खोळंबत राहशील सुकलेल्या पळांशी उगा झळंबत राहशील.. मागे नको वळू कारण मागे रस्ते नसतील मागे नको वळू तुला माझे डोळे दिसतील..
लेखनविषय:

वाचने 6113
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

वाय इ एस - येस म्हणजे हो =================================== एकदा तरी वळुन बघ, पुढे तसंही जायचं आहे. एव्हढा वेळ मथलेलं लोणि आत्ताच तर खायचं आहे. एकदा तरी वळुन बघ मनाला दे दिलासा स्मृतीला काय माहित कधि क्षण येईल असा एकदा तरी वळुन बघ घडी दोन घडी मग तर करायचीच आहे जिंदगीची नासाडी एकदा तरी वळुन बघ दिसतील परत वाटा मी तरी केला नाहि तुला कधिच टाटा ================================= स्वारी बर्का गविशेठ... शीघ्रकाव्याची स्फूर्ती आलि तुमची कविता वाचुन :)

नको.. :(

मस्त कविता आवडली मागे वळू नकोस हरवलेली युती दिसेल पंधरा वर्षांचा वनवास दिसेल पुढेच बघ पुढे पवार दिसेल सत्तेचा पावर दिसेल

__/\__!

रचना आवडली. पण तो 'कारण' शब्द मात्र - विशेषतः इतक्या वेळा - जरा खटकला - म्हणजे भलताच गद्य वाटला तो!

गवि जी किक बरळप्रहर वाचुन बसली ती यात नाही बसली. कविचा अंदाज आल्याने असेल मात्र येडझव शब्द प्रचंड खटकला ( अश्लील वगैरे कारणासाठी अजिबात नाही ) तो कृत्रिम रंगवलेला वाटला

शेवटचं कडवं विशेष