Skip to main content

शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही हरले

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 12/11/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्‍यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै. गोपीनाथ मुंड्यांनी जाहीररित्या सांगितले होते. केंद्रात सेनेला अत्यंत बिनमहत्त्वाचं फक्त १ मंत्रीपद देऊन भाजपने आपलं भविष्यातील धोरण स्पष्ट केलं होतं. भाजपचे धोरण ओळखूनच शिवसेनेने आपल्या चाली आखायला हव्या होत्या. परंतु सेना नेते आपल्याच अहंकारात, भ्रमात व नसलेल्या ताकदीच्या जोषात राहिले. भाजप जास्त जागा लढविण्यासाठी दबाव आणणार हे मे २०१४ मध्येच स्पष्ट झाले होते. अशावेळी मे ते सप्टेंबर या काळात शिवसेनेने धोरणीपणे विचारमंथन करून आपले डावपेच आखायला हवे होते. ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन भाजपचे समाधान करावे, आपण कधीच निवडून आलो नाही व ज्या जागा भाजपलाही जिंकणे अशक्य आहे अशा जागा देऊन त्याग केल्याचा आव आणावा, ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन त्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे देण्याचे जाहीर आश्वासन भाजपकडून घ्यावे व त्या बदल्यात केंद्रात जास्त व महत्त्वाची मंत्रिपदे मागून घ्यावीत, हे सुरू असतानाच मनसे व इतर काही स्थानिक पक्षांशी बोलणी करून भाजपविरूद्ध पर्यायी आघाडी तयार करावी असे अनेक पर्यात शिवसेनेला उपलब्ध असताना शिवसेना नेते गाफील राहिले. भाजप कदापिही युती तोडणार नाही, ज्या भाजपला आपण २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले आहे तो भाजप यापुढेही आपल्याच तालावर नाचत राहील, आपण म्हणू तसेच होईल या भ्रमात शिवसेना नेते राहिले. सुरेश प्रभू, मनोहर जोशी इ. समंजस नेत्यांना वाळीत टाकून उद्धव ठाकरे अत्यंत उथळ, वाचाळ, अविचारी असलेल्या व अजिबात दूरदृष्टी नसलेल्या संजय राऊत, रामदास कदम, रावते, प्रेम शुक्ला इ. नेत्यांवर विसंबून राहिले व त्याची फळे शिवसेनेला मिळाली. ४ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत येणार होते. त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर येऊन आपली भेट घ्यावी अशी उद्धव ठाकर्‍यांची इच्छा होती. परंतु त्यांनी अमित शहा व मोदी या जोडगोळीला ओळखण्यात चूक केली. हे दोघे भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांप्रमाणे प्रादेशिक पक्षांपुढे झुकणारे नसून अत्यंत धोरणी व प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व सहन न करणारे आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाहीत. अमित शहा मुंबईत येऊन उद्धव ठाकर्‍यांना भेटणार नाहीत हे समजल्यावर तिळपापड होऊन शिवसेनेने 'शहाणा हो' ही पोस्टर्स सोशल मिडियातून पाठवायला सुरूवात करून त्यांना डिवचले. अमित शहांना डिवचणे म्हणजे थेट मोदींनाच डिवचण्यासारखं होतं हे सेना नेतृत्वाला कधी समजलंच नाही. अमित शहांनी शहाणपणा दाखवून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यावर शेवटी उद्धव ठाकर्‍यांना अमित शहांना मातोश्री भेटीचे सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवावं लागलं आणि इथेच शिवसेना झुकायला आणि डाव हरायला सुरूवात झाली. नंतर प्रत्यक्ष जागावाटपाची बोलणी सुरू असताना सुरवातीला भाजपने १३५-१३५-१८ असा फॉर्म्युला सुचविला होता. भाजपची ताकद शिवसेनेच्या तुलनेत दीडपट होती. त्यानुसार भाजप १६०-१७०, शिवसेना १००-११० व मित्रपक्ष १८ असेच जागावाटप हवे होते. असे असतानाही भाजपची मागणी जास्तीत जास्त १३५ जागांची होती. नंतरच्या चर्चेत भाजप १३०-१४०-१८ व त्यानंतर १२५-१४५-१८ इतका खाली उतरला होती. शिवसेनेला ही उत्कृष्ट संधी होती. भाजप १२५ जागा लढवत असल्याने भाजपला जास्तीत जास्त १०० जागा जिंकता आल्या असत्या व त्यामुळे भाजप बहुमतापासून खूप दूर राहिला असता (आता भाजपने १२२ जागा जिंकल्याने फार थोड्या जागांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज आहे.). शिवसेनेला १४५ जागा लढवून कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची व पर्यायाने मुख्यमंत्रीपद मिळविण्याची संधी होती. जरी भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तरी उपमुख्यमंत्रीपद व इतर अनेक महत्त्वाची मंत्रिपदे मिळाली असती. युती करून एकत्र लढल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी ला प्रत्येकी ३० पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या व राष्ट्रवादीला खूप कमी जागा मिळाल्यामुळे भाजपला पाठिंबा देउन उपयोगच झाला नसता. पर्यायाने भाजपला सर्वार्थाने शिवसेनेवरच अवलंबून रहावे लागले असते. दुर्दैवाने उद्धव ठाकरे स्वतःच्या अहंकाराचे बळी ठरले. युती तुटल्यावर सुद्धा स्वतःच्या अहंकारामुळे मनसेबरोबर नवीन आघाडी त्यांना करता आली नाही. भाजपने आधीच योजना आखून सर्व मित्रपक्षांना स्वतःच्या बाजूला वळवून शिवसेनेला पूर्ण एकाकी पाडले. युती तुटली ही वस्तुस्थिती मान्य करून हे वास्तव समंजसपणे स्वीकारण्याऐवजी शिवसेनेने प्रचारात असभ्य पातळी गाठली. सामनातून व सभांमधून सातत्याने अमित शहा व मोदींना लक्ष्य करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत असभ्य व नकारात्मक प्रचार केला गेला. त्यांच्याबरोबरीने मित्रपक्षांचे राजू शेट्टी, रामदास आठवले, जानकर इ. ना ही लक्ष्य केले. शेवटी खडसेंविरूद्धही अत्यंत नकारात्मक प्रचार केला. महाराष्ट्रातील लोकांना मोदी हवे आहेत व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारातून मुक्ती हवी आहे हे सेनेने न ओळखता काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी भाजपलाच आपला मुख्य शत्रू मानण्याची घोडचूक केली. मोदींना अफझलखानाची उपमा देणे, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहाची उपमा देणे, मोदींच्या तीर्थरूपांचा उद्धार करणे, आदित्य ठाकरे सारख्या पोराला चर्चेसाठी पाठविणे अशा अनेक घोडचुका सेनेने केल्या. याउलट भाजपने समंजसपणे शिवसेनेच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करून आपला सकारात्मक प्रचार सुरू ठेवला व सेनेचे आपोआप खच्चीकरण होत गेले. त्याचेच परीणाम निकालात दिसले. भाजपच्या तुलनेत जेमतेम निम्म्या जागा मिळवून युतीतला मोठा भाऊ खरोखर कोण होता याचे जनतेनेच उत्तर दिले. तरीही भाजपला स्पष्ट बहुमत न मिळणे व आपल्याकडे तब्बल ६३ आमदार असणे हे शिवसेनेकडे हुकमी एक्के होते. त्यांनी आपली पाने नीट खेळली असती तर त्यांना बर्‍याच गोष्टी मिळविता आल्या असत्या. कदाचित सेनेला अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपदही मिळविता आले असते. ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी सेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करून सर्वप्रथम भाजपला मिळू शकणारी राष्ट्रवादीची रसद रोखायला हवी होती. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे एकदा नक्की करून नंतर भाजपकडून आपल्याला हवे ते सेनेला मिळविता आले असते. एकदा सेनेचा पाठिंबा घेतल्यावर त्यांना लाथाडून नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला अत्यंत अवघड झाले असते. हे न करता शिवसेना पुन्हा एकदा गाफील राहिली. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही व शेवटी त्यांना आपलेच पाय धरावे लागतील या भ्रमात सेना नेते राहिले. भाजपने चातुर्याने सेनेला बोलण्यात गुंतवून अपक्ष व इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आपली गरज जेमतेम ७-८ आमदारांवर आणली व राज्यपाल व सभापती आपल्याच पाठीशी राहणार असे धोरण आखून शिवसेनेच्या मदतीशिवात विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेऊन शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरविले. भारतीय मतदार व्यक्तिगत असभ्य टीका व नकारात्मक प्रचार कायमच नाकारतो हे शिवसेनेच्या पराभवामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनेच्या जागी मायावती असती तर तिने अत्यंत चातुर्याने पत्ते खेळून स्वत:च्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. किंवा राकाँ, काँ बरोबर मोट बांधून स्वतःचाच मुख्यमंत्री बनविला असता. दुर्दैवाने शिवसेना नेत्यांकडे धोरणीपणाचा संपूर्ण अभाव व अहंकार, स्वतःच्या नसलेल्या ताकदीबद्दल भ्रम, उर्मटपणा, अविचारीपणा, प्रक्षोभक शब्द, उथळ्पणा व असंमजपणा याशिवाय दुसरे काहीच नसल्याने शिवसेना युद्ध हरलीच पण तहातही हरली. ही निवडणुक शिवसेनेच्या अंताचा प्रारंभ ठरणार असे आता वाटत आहे.

वाचने 122342
प्रतिक्रिया 256

प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेसाठी तडजोडी करणाऱ्या भाजप सरकारचे मी तरी समर्थन करू शकणार नाही.तरीही यानिमित्ताने एक गोष्ट लिहावीशी वाटत आहे.पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे होते नाना फडणवीस.आपल्या मुत्सद्दीपणाने, बुध्दीमत्तेने आणि धूर्तपणाने अनेक राजकारणे त्यांनी लिलया पार पाडली. त्या नानांच्याच वंशजांपैकी देवेंद्र फडणवीस आहेत की नाही हे माहित नाही पण असेच धूर्त राजकारण खेळायची संधी त्यांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या निमित्ताने आली आहे. पडद्यामागे काय झाले ते माहित नाही पण फडणवीसांनी किंवा अन्य कोणा भाजप नेत्यानेही राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला नाही की त्यांच्यात काही बोलणी चालू आहेत असेही नाही.तर राष्ट्रवादीने पाठिंबा आपण होऊन देऊ केला आहे.त्यातून शिवसेनेकडील बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहेच.विश्वासमत संमत व्हायच्या आधीच फडणवीसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे १७० कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करायचा.तालुका पातळीवरील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे या समित्या म्हणजे पैसे खायचे कुरण होत्या हे सर्वमान्य आहेच.जर का सिंचन घोटाळा आणि राष्ट्रवादीच्या कुकर्मांवर फडणवीसांनी कारवाई सुरू केली तर राष्ट्रवादीचे हात दगडाखाली येतील हे नक्कीच.कारण त्या कारणावरून फडणवीसांचा पाठिंबा कसा काढणार? (१९९६-९७ मध्ये देवेगौडांनीही काँग्रेसचा पाठिंबा असतानाही काँग्रेसलाच अडचणीत आणायची खेळी केली होती त्याला समांतर खेळी करायची फडणवीसांकडे संधी आहे). आणि जर राष्ट्रवादीने पाठिंबा काढला आणि सरकार पडायची वेळ आली तर शिवसेनेची अवस्था त्या परिस्थितीत आणखी बिकट होईल. एकतर सरकारविरोधी मत देणे म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूने मत देणे आणि सरकारच्या बाजूने मत देणे म्हणजे भाजपपुढे आणखी नमते घेणे असा त्याचा अर्थ होईल. आणि फडणवीस परत ताठ मानेने निवडणुकांना सामोरे जाऊ शकतील. फडणवीसांना पाठिंबा शरद पवार का देत आहेत? कारण सहा महिन्यात परत निवडणुका झाल्या तर आपली खैर नाही हे त्यांना समजून चुकले आहे.हा पाठिंबा त्यांच्यासाठी फाशीचा दोर ठरवायची संधी फडणवीसांकडे आहे.
१००% सहमत. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेउन त्यांचीच चांगली पाचर मारली आणि याला व्यवस्थित प्रसिद्धी दिली गेली तर याचा मोठा फायदा भाजपला होइल असे मलाही वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

In reply to by मदनबाण

एवढं किचकट राजकारण आहे हे? पण जनतेला इतकं नाही कळत. आज तरी भाजप आणि शिवसेना जनतेच्या रोषाचे धनी झालेले आहेत. उद्या जर पुन्हा निवडणूका झाल्या तर असंच काही होईल असं ठामपणे सांगता येत नाही. जनता कसा विचार करते हे राजकारण्यांचं राजकारण नाही ठरवत. एवढं सगळं कुटील कारस्थान रचण्यापेक्षा आधीच थोडा समंजसपणा दाखवला असता तर... मटामध्ये एक लेख आला होता. त्यात लेखकाने म्हटले होते की शरद पवारांना आपण एवढे धोरणी, मुत्सद्दी, मुरलेले राजकारणी म्हणतो. जे काही चाललं आहे त्यामागे शरद पवारांचाच हात आहे असं सगळे म्हणतात. शरद पवार जर एवढे पॉवरफुल आहेत तर त्यांना राष्ट्रवादीच्या ५० देखील जागा का नाही मिळवता येत? दर निवडणुकीला त्यांच्या जागा लक्षणीयरीत्या कमी कशा काय होत जातात? अजून एकदाही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का नाही होऊ शकला? त्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्वाकांक्षेचं सोडून द्या. आता ते ही म्हणतील की मला कधीच पंतप्रधान व्हायचं नव्हतं म्हणून. :-) त्या लेखाचा रोख असा होता की प्रत्येक राजकीय घटनेचं विश्लेषण हे बरोबर असतंच असं नाही. मला वाटतं अतिकिचकट राजकारण खेळण्याच्या नादात पक्ष आपलं नुकसानच करून घेतात. शरद पवारांनी ते नेहमीच करून घेतलंय. म्हणून आजकाल स्वतःचा पक्ष नव्याने उभारण्यापेक्षा त्यांना नको त्या युक्त्या वापरून केवळ स्वार्थ साधण्यासाठी तग धरून रहावं लागतंय. पण हे फार काळ टिकणार नाही. अशा एक-दोन काड्यांवर फार काळ तरंगता येत नसतं. ही शेवटची स्वार्थ साधण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे. भाजप-शिवसेनेच्या मूर्खपणामुळे ती जनतेवर लादली गेली आहे इतकंच.

In reply to by समीरसूर

खरे तर ते राजकारण तेवढे किचकट नसतेच. शरद्चे म्हणतोस ते खरे आहे.पुलोदच्या स्थापनेच्यावेळी (१९७८ साली) अनेकांनी त्याचे मुत्सद्दी म्हणून तोंड भरून प्रशंसा केली होती. पण सध्याच्या राजकारण्यांची जातकुळी पाहिलीस तर तो अनेक बाबतीत उजवा ठरतो.देशाच्या राजकारणात मात्र राष्ट्रवादीचे राजकारण सपशेल फसले.

सध्याच्या या घडामोडी पाहुन मला खव्यासाठी भांडणार्‍या बोक्यांची आणि माकडाची गोष्ट आठवली होती ! ;) CAT & Monkey {चित्र जालावरुन घेतले आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

एकतर, भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितलेला नाही. राष्ट्रवादीने स्वतःहून तो घोषित केला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही राष्ट्रवादीने भाजपाच्या बाजूने मतदान केलेले नाही. राष्ट्रवादी त्यांच्या स्वघोषित पाठींब्याच्या धोरणानुसार 'तटस्थ' राहिले. बिजेपीच्या सांगण्यावरून नाही. राष्ट्रवादीचा पाठींबा आम्ही स्विकारला आहे असे अजून तरी भाजपने घोषित केलेले नाही. आता भाजपकडे ६ महिने आहेत आणि ८-१० आमदारांची गरज आहे. फोडतीलही ते एखाद्या पक्षातून.

भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत. राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये. जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे. ज्या मतदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस्च्या विरोधत मतदान केले हा त्या मतदारांचा विश्वासघात आहे. प्रादेशिक पक्ष : याबद्दलची मोदी शहा यांची भुमिका स्पष्ट आहे . हरयाणा , महाराष्ट्र आणि पंजाब मधे त्यांनी युती तोडली आहे. गोव्या मधे पण युती तोडली पाहिजे असे चालू आहे. त्यामुळे शिवसेनेने समंजसपणा दाखवूनही भाजपा ने युती टिकवलीच असती असे समजणे चुकीचे आहे. आता प्रश्न कालच्या गोंधळाचा : राजकीय समीकरणे काहीही असो , मी ज्यांच्या सोबत बोललो , चेपु वर, वैयक्तीक , किंवा आंजावर , सर्व सामान्य ( नमोरूग्ण नव्हे सामान्य !) लोकांचे एकच मत होते , भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायला नको होता . यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे.

In reply to by कपिलमुनी

शिवसेना कितीका मूर्ख असेना, भाजप रडीचा डाव खेळली यात शंका नाही. आवाजी मतदान काय, मूग गिळून गप्प राहणे काय, अगदीच तांत्रिक बाबींचा आधार घेऊन कार्यभाग साधणे काय...मोदींच्या डरकाळी फोडून कामाला लागण्याच्या अगदीच विपरित असे हे महाराष्ट्र भाजपचे वर्तन होते. खेळतांना लहान मुले कशी बोटावरची थुंकी बदलतात तसा पोरखेळ केला भाजपने. आणि याचे नुकसान भाजपला भोगावेच लागणार. शिवसेनेइतकीच गोंधळाची अवस्था भाजपची होती. राष्ट्रवादीने काहीही केले तरी आश्चर्य वाटत नाही; सत्तेसाठी अक्षरशः 'काहीही' करणे हा त्यांचा धर्मच आहे. पण भाजपने हा जो रडीचा डाव खेळला तो काही पचनी पडला नाही. अजय जडेजाने फिक्सिंग केले तर काही विशेष वाटत नाही; सचिनने केले तर कसे वाटेल?

In reply to by समीरसूर

अगदी हेच ! अ पार्टी विथ डिफरन्स आणि विपरीत वागणूक.

In reply to by कपिलमुनी

ह्म्म.. काल माझ्या मनात देखील असेच विचार होते.. पण नंतर मी शांतपणे विचार केला की तसेही दगडापेक्षा वीट मऊ. त्यांनी सत्ता कशी मिळवली यापेक्षा ती कशी राबवली हे जास्त महत्वाचे आहे. तसेही त्यांनी केले ते नैतिकतेला धरून नसेलही, पण बाकीचे जे वागत होते ती कोणती नैतिकता होती? त्यामुळे सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉच असे ठरवले आहे, तसेही माझ्या दॄष्टीने ते याच्या पुढे कसे काम करतात हे महत्वाचे. आत्ता नेमके काय तोडपाणी झाले आहे ते पुढच्या निवडणूकीच्या वेळेसच बाहेर येईल. तोपर्यंत वाट पाहणे एव्हढेच आपल्या हातात आहे. आणि मुख्य म्हणजे, आत्ता अश्या प्रकारे सत्ता मिळवल्यामुळे त्यांच्यावर अधिक दडपण असणार आहे. जर काम नाही केले तर त्यांचा मफलरवाल होईलच, त्यामुळे मला वाटते भाजपा यावेळेस अधिक प्रामाणिकपणे सत्ता राबवेल.

In reply to by समीरसूर

रडीच्या डावाचा प्रश्नच उद्भवत नाही. आवाजी मतदान हे पूर्णपणे कायदेशीर व घटनेला धरून आहे. यापूर्वी अनेकवेळा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला गेला आहे. भाजपने आवाजी मतदान प्रक्रिया वापरली तर तो रडीचा डाव कसा होतो? >>> शिवसेनेइतकीच गोंधळाची अवस्था भाजपची होती. भाजप मुळीच गोंधळलेला नव्हता. अगदी व्यवस्थित योजना आखून व आपल्याला हवी ती कायदेशीर व घटनात्मक प्रक्रिया वापरून भाजपने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतलेला आहे. >>> अजय जडेजाने फिक्सिंग केले तर काही विशेष वाटत नाही; सचिनने केले तर कसे वाटेल? ही तुलना चुकीची आहे. फिक्सिंग हे मुळातच बेकायदेशीर आहे व फिक्सिंग हा फौजदारी गुन्हा आहे. आवाजी मतदान हे कायदेशीर व घटनेला धरून आहे.

श्रीगुरुजी - श्री गणेशा - श्री क्लिंटन वरिल सर्व प्रभुतींना माझा __/\/\__/\. वरिल सर्व प्रतिसादांचे वाचन करुन आमच्या राजकरणाविषयी ज्ञानात खुप भर पडत आहे. मला वाटते आज पर्यंत एकमेकांच्या विषयी मनात कसलेही किल्मिष न ठेवता फक्त ऊहापोह करण्याच्या उद्देशाने चाललेला प्रतिसादाला विनम्र प्रतिसाद देवुन आपले मुद्दे मांडत आहेत हा मि.पा च्या इतिसासात पहिल्यांदाच ठरतोय. इतर कोणी ही ह्या धाग्यावर उगाच भरकटवुन त्याची खिल्ली उडवु नये. स.पा मंडाळाला विनंती की अशा प्रतिसादाला पंख लावावेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

मराठी माणसाच्या आवडीच्या क्षेत्रापैकी एक म्हणजे राजकारण. आजच्या राजकारणातील इतके असंख्य कंगोरे असू शकतात आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध उलगडून सांगण्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन. माझ्याही ज्ञानात भर पडली आहे हे मी नमूद करु इच्छितो.

>>> भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत. राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये. स्वत:ची ताकद भाजपच्या तुलनेत खूप कमी असताना स्वतः जास्त जागा लढविण्याचा हट्टाग्रह धरून बसणे आणि एकदा युती तुटल्यावर व्यक्तिगत पातळीवर उतरून असभ्य व नकारात्मक प्रचार करणे ही कोणाची चूक होती? राजधर्म पाळणे म्हणजे नक्की काय? एकदा युती तुटल्यावर भाजपने समंजसपणे शिवसेनेवर टीका न करता युतीधर्म पाळला होता. उलट शिवसेनेलाच युती तुटल्याचे वास्तव मानवले नाही व त्यांनी भाजपला मुख्य शत्रू मानून असभ्य व व्यक्तिगत टीका सुरू केली. राजधर्म भाजपनेच पाळला. शिवसेनेला ते जमले नाही. >>> जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे. त्यावर भाजपने भूमिका घेण्यासारखे काहीही नव्हते. एखाद्या सज्जन उमेदवाराला निवडणुकीत गावातल्या गुंडांनी स्वतःहून मत दिले म्हणजे त्या माणसाने त्यांचा पाठिंबा घेतला असा अर्थ होत नाही. राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या एकतर्फी पाठिंब्याचा भाजपने अधिकृत स्वीकार न करता किंवा अधिकृतपणे न नाकारता शिवसेनेला नमविण्यासाठी योग्य तो उपयोग करून घेतला. >>> प्रादेशिक पक्ष : याबद्दलची मोदी शहा यांची भुमिका स्पष्ट आहे . हरयाणा , महाराष्ट्र आणि पंजाब मधे त्यांनी युती तोडली आहे. गोव्या मधे पण युती तोडली पाहिजे असे चालू आहे. पंजाब व गोव्यात प्रादेशिक पक्षांबरोबर युती शाबूत आहे. >>> त्यामुळे शिवसेनेने समंजसपणा दाखवूनही भाजपा ने युती टिकवलीच असती असे समजणे चुकीचे आहे. शिवसेनेने समंजसपणा दाखवून भाजपची १२५-१३० जागांची मागणी मान्य केली असती तर युती १०० टक्के टिकली असती. >>> राजकीय समीकरणे काहीही असो , मी ज्यांच्या सोबत बोललो , चेपु वर, वैयक्तीक , किंवा आंजावर , सर्व सामान्य ( नमोरूग्ण नव्हे सामान्य !) लोकांचे एकच मत होते , भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायला नको होता . यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे. भाजपला शिवसेना पाठिंबा देणार नाही, भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा नाही अशा परिस्थितीत सरकार स्थापन न करणे हा एकच पर्याय शिल्लक होता. भाजपने राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या पाठिंब्याची कमीतकमी गरज पडावी या दृष्टीने ९ अपक्ष व इतर लहान पक्षांच्या ५-६ आमदारांचा आधीच पाठिंबा मिळविला आहे. राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा दिलेला आहे. भाजपने तो मागितलेला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आता तुम्ही भाजपाचे अधिकृत प्रभारी होण्याच्या मार्गावर आहे. थोडा अजुन लांगुलचालन करा. टिव्हीवर संधी मिळेल कारण इतकी भक्ती सध्या असणारे प्रभारी देखील दाखवत नाही.

In reply to by दिवाकर देशमुख

>>>लांगुलचालन करा अत्यंत चुकीचा आणि हीन पातळीवरील शब्दप्रयोग. समंने लक्ष द्यावे ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

हा शब्द तर पेपरात देखील असतो पेपर वाचत नाहीत का ? कैच्याकै खुसपट काढुन राहिले राव.

In reply to by दिवाकर देशमुख

>>>>>हा शब्द तर पेपरात देखील असतो पेपर वाचत नाहीत का ? 'लांगूलचालन' हा शब्द मी कधी ऐकला नाही असा अर्थ तुम्ही काढता आहात. माझं वाक्य नीट वाचलंत तर कळेल, शब्द पहिल्यांदाच ऐकला असे म्हंटलेले नाही तर ह्या शब्दाचा 'प्रयोग' इथे अप्रस्तुत आहे असे म्हंटलेले आहे. 'लांगूलचालन' स्वार्थासाठी, सर्व लाजलज्जा सोडून, केले जाते. इथे तसे दिसत नाही. श्री. गुरुजी ह्यांचा एकूण घटनाक्रमाच्या विश्लेषणात कांही स्वार्थ दिसत नाही. म्हणून शब्दप्रयोग चुकीचा आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

आता अर्थ नेमका बसला. ज्यापद्दतीने डिफेंस करत आहेत त्यावर हा अतिउत्कृष्ट शब्द आहे

In reply to by श्रीगुरुजी

राजधर्म पाळणे म्हणजे नक्की काय ? १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. >>राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. >>>राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या एकतर्फी पाठिंब्याचा भाजपने अधिकृत स्वीकार न करता किंवा अधिकृतपणे न नाकारता शिवसेनेला नमविण्यासाठी योग्य तो उपयोग करून घेतला. शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे .

In reply to by कपिलमुनी

>>> १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. याची गरजच नव्हती. घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत. >>> २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. सत्य म्हणजे नक्की काय सांगायचं आहे? >>> ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते. >> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही. >>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा. >>> शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले. ठाणे (राम कापसे), शिवाजीनगर (अण्णा जोशी) अशा अनेक मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत करून आपला पक्ष वाढविला. पण युती झाल्यावर शिवसेनेने दांडगाई करून हे मतदारसंघ लाटले. भाजपने संधी मिळताच आपले सामर्थ्य वाढवून सेनेचे जोखड मानेवरून उतरविले. >>> मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे. सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

>> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही.
याच्याशी असहमत. बाकी ठीक आहे. भाजपाने तो पाठिंबा स्वीकरला आहे की नाही हे लवकरच कळेल, स्वीकारला नसेल तर तसे त्यांना आता कृतीतून सिद्ध करावे लागेल...

In reply to by श्रीगुरुजी

>>घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत. मला याबद्दल माहीती नाही . पण पूर्वी स्पष्ट बहुमत नसताना अशी यादी कीम्वा पाठिंब्याचे पत्र दिल्याचे स्मरते . विदा शोधून देतो. >>> २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. सत्य म्हणजे नक्की काय सांगायचं आहे? तुमच्याकडे नक्की किती आमदार आहेत , कोण तटस्थ आणि कोण विरोधी आहे. >>> ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते. >>> अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते. आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई. हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्‍यांसाठी , चलाखी करणार्‍यांसाठी या अपेक्षा नाहीतच . >> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही. >> तुम्हाला गरज वाटत नसेल पण या धाग्यावर आणि इतर अनेक लोकांना ती वाटत आहे . आणि पारदशिकतेच्या मुद्द्यावर ते कळालेच पाहिजे. >>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा. >> पूर्वी ज्या आरक्षणांना भाजप विरोध करत होती त्याला राज्य सरकार आज सपोर्ट करत आहे. आणि बाकी अजित पवार , भुजबळ , तटकरे यांच्या अटके नंतर बोलूच ( कोण हसतय रे तिकडे ;) ) >>> शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले. ठाणे (राम कापसे), शिवाजीनगर (अण्णा जोशी) अशा अनेक मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत करून आपला पक्ष वाढविला. पण युती झाल्यावर शिवसेनेने दांडगाई करून हे मतदारसंघ लाटले. भाजपने संधी मिळताच आपले सामर्थ्य वाढवून सेनेचे जोखड मानेवरून उतरविले. >> भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती .. याचे उत्तर शेवटपर्यंत दिलेच नहीत . आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा . >>> मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे. सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत. अहो हेच तर अजून कोणी बोलला नाहिये ना ! राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असे ते सांगत आहेत . फडणवीस यांनी आम्ही तो स्वीकारला नाहीये असा स्टेट्मेंट दिला नाहिये अजून. ठरावानंतर असे स्टेट्मेंट दिले असेल तर दाखवा . आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ?

In reply to by कपिलमुनी

वरील प्रतिसादात बर्‍याच गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे वाटते.
मला याबद्दल माहीती नाही . पण पूर्वी स्पष्ट बहुमत नसताना अशी यादी कीम्वा पाठिंब्याचे पत्र दिल्याचे स्मरते . विदा शोधून देतो.
कोणाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करायचे हा राष्ट्रपतींचा/राज्यपालांचा विशेषाधिकार असतो. के.आर.नारायणन यांनी १९९८ मध्ये सरकार स्थापन करायला वाजपेयींना आमंत्रित केले त्यापूर्वी समर्थनाची पत्रे घेतली होती.हा मार्ग नारायणन यांना योग्य वाटला.पण तसे राष्ट्रपती/राज्यपालांनी केलेच पाहिजे असा घटनात्मक दंडक अजिबात नाही.
जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते.
हे नक्की कोणत्या आधारावर लिहिता?तो रेफरन्स सांगा मग पुढील चर्चा (गरज पडल्यास) करता येईल.
अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते. आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई. हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्‍यांसाठी , चलाखी करणार्‍यांसाठी या अपेक्षा नाहीतच .
एक गोष्ट समजत नाही आवाजी मतदान या गोष्टीविषयी परवापासून अचानक आक्षेप का उफाळून आले आहेत? आवाजी मतदान ही पूर्णपणे संकेतांना आणि लोकशाहीच्या स्पिरीटला धरूनच असलेली संकल्पना आहे.
आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा .
शिवसेनेचे जोखड भाजपने फेकून द्यायला हवे होते का? असल्यास कधी? या प्रश्नाची उत्तरे भाजपच्या नेतृत्वावरच सोडलेली बरी नाही का? एक गोष्ट समजत नाही.भाजपने काय करायला हवे याची इतरांनाच काळजी फार जास्त असते. मागच्या वर्षीही मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले तेव्हा सुषमा स्वराज का नाहीत, शिवराजसिंग चौहान का नाहीत, उत्तर प्रदेशातील कोणी नेता का नाही, अमका का नाही, तमका का नाही असे एकना दोन हजार प्रश्न भाजप बाहेरच्यांनाच पडलेले होते.आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवाणींच्या घरासमोर निदर्शने करून सांगितलेच की आणि तो सिग्नल पक्ष नेतृत्वाने मान्य केला. तुम्हाला मोदी मान्य नसतील तर मत देऊ नका.भाजपाने काय करावे याची फुकटची चिंता इतरांना कशाला? त्याचप्रमाणे शिवसेनेशी युती तोडायला हवी होती का नाही, कधी याची चिंता इतरांना कशाला?
आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ?
ठिक आहे ना. १३५ हे बहुमत नसेल तरी अल्पमतातील सरकार तर आहेच ना. नरसिंह रावांचेही सरकार पहिले अडीच वर्षे अल्पमतात होते.

In reply to by क्लिंटन

आणि हो. फडणवीसांनी अल्पमतातले सरकार चालविले आणि ते चालले आणि सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादीशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी केल्या नाहीत तर माझे स्वतःचे तरी या सरकारविषयी आक्षेप राहणार नाही.पण तशा कोणत्याही तडजोडी केल्या जात नाहीत हे दाखवून द्यायची जबाबदारी मात्र फडणवीसांचीच.

In reply to by क्लिंटन

+१ .. क्लिंटन, आपली मते बर्‍याच अंशी पटतायत. जरी भाजपबद्दल आदर एवढा नसला तरी या घटनाक्रमाने तो थोडा कमीच झलाय असे म्हणेन. याउप्पर आपण म्हणता तसे फडणवीस सरकार कसे ही जबाब्दारी (तडजोडी करत नाही आहोत हे दाखवण्याची) त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. (जाता जाता थोडे अवांतर : याच प्रकारच्या प्रसंगातून केजरिवाल पण गेले होते, तेव्हा त्यांनी आवाजी मतदानाचा सेफ मार्ग घ्यायला हवा होता असे वाटतेय, पण ते राजकीय चातुर्यात कमी पडले असावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जे लोक आत्ता या सरकारसाठी वाट बघायला तयार आहेत तेच लोक मात्र तेव्हा 'काँग्रेसची बी-टीम' म्हणायला दोन दिवस पण थांबले नव्हते असे निरिक्षण नोंदवतो. ;) 'शेवटी आपला तो बाब्या' हे अभ्यासू विश्लेषकांनाही सुटलेले नाही तर.. )

In reply to by हाडक्या

आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जे लोक आत्ता या सरकारसाठी वाट बघायला तयार आहेत तेच लोक मात्र तेव्हा 'काँग्रेसची बी-टीम' म्हणायला दोन दिवस पण थांबले नव्हते असे निरिक्षण नोंदवतो. Wink 'शेवटी आपला तो बाब्या' हे अभ्यासू विश्लेषकांनाही सुटलेले नाही तर..
नाही हो इतरांचे माहित नाही. आणि मी अभ्यासू आहे की विश्लेषक आहे की दोन्ही नाही हे मला माहित नाही.तरीही हा उपप्रतिसाद माझ्या प्रतिसादावर दिला आहे तेव्हा माझ्यापुरते तरी सांगतो.कोणत्याही पक्षाविषयीची मते बनविताना तो पक्ष नक्की कोणते पॅकेज देत आहे आणि त्या पॅकेजची अंमलबजावणी करायची त्या पक्षाची आणि नेत्याची क्षमता आहे की नाही या गोष्टी बघून मी माझी मते ठरवत असतो.पॅकेजमधील सगळ्या गोष्टी मला मान्य असतीलच असे नाही आणि एखाद्या पक्षाच्या पॅकेजमधल्या चार गोष्टी मला आवडल्या नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षाच्या पॅकेजमधल्या ४० गोष्टी आवडत नसतानाही त्या दुसऱ्या पक्षाचे समर्थन मला तरी करता येत नाही. मुळातच अण्णांचे आंदोलन आणि जनलोकपालची स्वप्नाळू मागणी या दोन्ही गोष्टींचा अगदी मी पहिल्या दिवसापासून विरोधक होतो.ते त्यावेळी मी मिसळपाववरही लिहिले होते.त्याच आंदोलनातून पुढे आलेल्या आम आदमी पक्षाविषयी माझे तरी चांगले मत असायचा संबंधच नव्हता.तसेच प्रशांत भूषण सारख्यांनी काश्मीरवरती उधळलेली मुक्ताफळे मला तरी अजिबात मान्य नव्हती.आणि मुळातल्या नव्या पक्षात त्याच प्रशांत भूषण सारख्यांना महत्वाचे नेतेपद दिले गेल्यामुळे आआपचे समर्थन मी करूच शकत नव्हतो.आणि त्यातून वीजेची बिलेच भरू नका, तोडलेले मीटर स्वत: जोडणे अशा अराजकतावादी प्रकारामुळे त्या पक्षाविषयी मत आणखी वाईट झाले.तेव्हा त्या पक्षाचे पॅकेज मला मुळातच आवडलेले नव्हते. तेव्हा माझे मत ज्या पक्षाविषयी मुळातच वाईट मत होते त्या पक्षाने परत कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला हा एक ट्रिगर होता असे म्हणता येईल फारतर. कदाचित आआप जर आर्थिकदृष्ट्या उजवा आणि राष्ट्रवादी असता आणि नंबर मिळवायला कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला असता तर कदाचित मी त्या पक्षाला कॉंग्रेसची बी टिम असे म्हटलेही नसते. आणि समजा आआपला स्वबळावर बहुमत मिळाले असते आणि कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला नसता तरी त्या पक्षाचे पॅकेज मला मुळातच मान्य नसल्यामुळे त्या परिस्थितीतही त्या पक्षावर मी टिकाच केली असती--कॉंग्रेसची बी टिम असे म्हटले नसते तर दुसरे काही म्हटले असते.हे आत्याबाईला मिशा असत्या तर अशा टाइपचे झाले तरीही मला वाटते माझा मुद्दा मी स्पष्ट केला आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीशी तुलना केल्यावर असे दिसते की भाजपच्या पॅकेजमध्ये राष्ट्रवादी ही मोठी पोखरणारी अळी आली आहे ती सगळ्या गोष्टींचा सत्यानाश करू शकेल.त्यामुळे महाराष्ट्र लेव्हलवर तरी वरकरणी कितीही चांगले वाटणारे पॅकेज भाजप देत असेल तरीही ती अळी आहे तोपर्यंत त्या पॅकेजवर विश्वास वाटणार नाही.तरीही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर नक्कीच विश्वास आहे.त्यामुळे पक्ष म्हणून अजून तरी माझे मत विधानसभा लेव्हलला भाजपला समर्थन न द्यायचे असले तरी लोकसभा निवडणुकांसाठी नक्कीच तसे नाही. आता हा प्रकार म्हणजे 'आपला तो बाब्या' असा होतो की नाही मला माहित नाही आणि ते माहित करून घेण्यात फारसा रसही नाही.

In reply to by क्लिंटन

+१ मला भाजपा + राष्ट्रवादी हि युती फारच अनैसर्गिक वाटते (अजूनही). सुबोध खरे यांचा "भाजपा कडे याच्या पेक्षा चांगला पर्याय उपलब्ध पर्याय नाही" हे विश्लेषण पटले. जोवर सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादीशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी केल्या नाहीत तर माझे स्वतःचे तरी या सरकारविषयी आक्षेप राहणार नाही.

In reply to by अनन्त अवधुत

एवढाच साधक बाधक विचार 'आप' साठी का बरे कोणी केला नसावा असा प्रश्न पडतो. ते ही अशाच अगदी अश्शाच प्रसंगातून गेले होते ना ?

In reply to by क्लिंटन

>>> १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. याची गरजच नव्हती. घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत.
असे श्रीगुरुजींनी लिहिले होते. मला नक्की रेफरन्स ( १९९८ चा ) आठवत नव्हता.
पण तसे राष्ट्रपती/राज्यपालांनी केलेच पाहिजे असा घटनात्मक दंडक अजिबात नाही.
तसे असेल तर ठीकच आहे . पण शेवटी मुद्दा तोच येतो सध्याचे सरकार तांत्रिक द्रूष्ट्या बहुमतात आहे पण नैतिकतेचे काय ? ( ती बासनात गुंडाळली आहेच ) सध्या पवारांनी राष्ट्रवादी तटस्थ होती असे सांगून संभ्रम दूर केला . पण मुख्यमंत्र्यांचे हे काम होते की नक्की किती आमदार त्यांच्या सोबत आहेत ते जनतेला सांगितले पाहिजे.
जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते.
हे श्रीगुरुजींनी लिहिले आहे . त्याचे स्पष्टीकरण ते देतीलच !
एक गोष्ट समजत नाही आवाजी मतदान या गोष्टीविषयी परवापासून अचानक आक्षेप का उफाळून आले आहेत? आवाजी मतदान ही पूर्णपणे संकेतांना आणि लोकशाहीच्या स्पिरीटला धरूनच असलेली संकल्पना आहे.
आवाजी मतदानाला आक्षेप मुळीच नाहिये. आ़क्षेप संभ्रमावस्थेला, अपारदर्शकतेला आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याबद्दल आहे . मतदानाच्या अगोदर किंवा मतदानानंतर मुख्यमंत्र्यांनी / अध्यक्षांनी सांगितला असता , राष्ट्रवादी तटस्थ राहिली आहे तर ते एव्ढा गदारोळ झालाच नसता. लोकसभेमधे पण आवाजी मतदानच झाले तेव्हा कोणीच आक्षेप घेतला नाही. कारण स्पष्ट बहुमत होते. सरकार निवडण्याची प्रक्रिया शक्यतो संशयातीत असावी एवढीच अपेक्षा . एक्दा बहुमत सिद्ध झाले की पुढे ५ वर्ष आवाजी मतदान चालतेच.
आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा
शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले.
श्रीगुरुजींचा शिवसेनेबद्दल बराच त्रागा चालला होता, आता ते अधिकृत प्रवक्ते असल्याने विचारले , एव्ढा त्रास , मानहानी होती तर अगोदरच जोखड फेकायचा . भाजपाने काय करावे हा पक्षाचा प्रश्न आसला तरी ते आमच्याकडे मत मागायला येतात , त्यामुळे त्यांच्या भुमिकेवर मतप्रदर्शन करणे ( आवडली तर आवडली , नाही आवडली तर नाही ) हा मतदारांचा हक्कच आहे.
शिवसेनेशी युती तोडायला हवी होती का नाही, कधी याची चिंता इतरांना कशाला?
कारण लोकसभेला यांनी सेनेशी लग्न लावल्याने आमच्याकडे सेनेचा खासदार आहे आणि आता भाजपाचा आमदार म्हणून चिंता , यांच्या कोलांट्याउड्यामुळे लोकांचा नुकसान होतय .
१३५ हे बहुमत नसेल तरी अल्पमतातील सरकार तर आहेच ना
अल्पमतातील सरकारला मुळीच विरोध नाही. कित्येक अल्पमतातील सरकारांनी आपले कालखंड यशस्वी पूर्ण केले अहेत. पण मग फडणवीस बहुमताचा दावा का करत होते ? त्यांनी कुठेही सांगितला नाही , माझे सरकार अल्पमतातील आहे किंवा राष्त्रवादी तटस्थ आहे. बादवे , तुमचा अभ्यास खूप आहे म्हणून एक शंका, काँग्रेसचे ५ आमदार निलंबित आहेत, समजा अजून ५ म्हणजे एकूण १० आमदार निलंबित झाले तर २७७ पैकी १३९ आमदारांचे मत मिळाले तर बहुमत सिद्ध होउ शकते का ? निलंबित आमदारांस मतदानाचा हक्क असतो का

In reply to by कपिलमुनी

पण शेवटी मुद्दा तोच येतो सध्याचे सरकार तांत्रिक द्रूष्ट्या बहुमतात आहे पण नैतिकतेचे काय ? ( ती बासनात गुंडाळली आहेच )
भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे.आणि सगळे पक्ष त्या गुन्ह्यात कमीअधिक प्रमाणात सहभागी आहेत. लोकसभा आणि राज्यसभा मिळून सुमारे ८०० तर विविध विधानसभांमध्ये मिळून ३००० असे ३८०० शत प्रतिशत स्वच्छ चारित्र्याचे निस्पृह प्रतिनिधी आपल्याला १२० कोटींच्या भारतात मिळत नाहीत याचा अर्थ आपणही त्या गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे सामील आहोत.असो.
सध्या पवारांनी राष्ट्रवादी तटस्थ होती असे सांगून संभ्रम दूर केला . पण मुख्यमंत्र्यांचे हे काम होते की नक्की किती आमदार त्यांच्या सोबत आहेत ते जनतेला सांगितले पाहिजे.
तांत्रिकदृष्या अल्पमतातील सरकारही पराभव होत नाही तोपर्यंत सत्तेत राहू शकते. १९९१ ते १९९३ या काळात नरसिंह रावांकडे बहुमत नव्हते तरीही त्यांच्या सरकारचा पराभव झाला नव्हता म्हणून ते अल्पमतातील सरकारही सत्तेत टिकून होते.
कारण लोकसभेला यांनी सेनेशी लग्न लावल्याने आमच्याकडे सेनेचा खासदार आहे आणि आता भाजपाचा आमदार म्हणून चिंता , यांच्या कोलांट्याउड्यामुळे लोकांचा नुकसान होतय .
असे कधीही होऊ शकते.सांगलीत प्रथमच भाजपने लोकसभेची जागा जिंकली पण तासगावमधून आर.आर आबाच निवडून गेले.
पण मग फडणवीस बहुमताचा दावा का करत होते ? त्यांनी कुठेही सांगितला नाही , माझे सरकार अल्पमतातील आहे किंवा राष्त्रवादी तटस्थ आहे.
हा राजकारणाचाच भाग असायची शक्यता जास्त. अशा अनेक गोष्टी राजकारणी उघड करत नसतात. १९९८ मध्ये तेलुगु देसमचे जी.एम.सी बालयोगी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडून गेले त्यावेळी तेलुगु देसम भाजपप्रणीत आघाडीचा भाग बनणार की नाही हे दोन्ही पक्षांनी उघड केले नव्हते. पहिल्यांदा तेलुगु देसम तटस्थ राहणार असे सांगितले जात होते. वाजपेयींच्या विश्वासदर्शक ठरावावर सरकारला २७४ आणि विरोधात २६१ मते मिळाली. सरकारला २७४ हा आकडा आला याचाच अर्थ तेलुगु देसमच्या इतर ११ (अध्यक्ष वगळून) खासदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले हे स्पष्ट झाले.त्यावेळीच पक्षाची भूमिका कळली. १९९९ मध्ये वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी मतदान झाले होते शनीवार १७ एप्रिल १९९९ रोजी. त्याच्या आधल्या दिवशी रात्री उशीरा मायावतींनी त्यांच्या पक्षाचे पाच खासदार तटस्थ राहतील असे लोकसभेत जाहिर केले होते (यह लडाई सापनाथ और नागनाथ के बीच मै है. हम इस लडाई मै किसी का पक्ष नही ले सकते). तरीही आयत्या वेळी मायावतींच्या पाच खासदारांनी सरकारविरोधी मत दिले. प्रत्येक वेळी नेत्यांनी जे काही ठरले असेल ते जगजाहीर करावे ही अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. प्रतिपक्षाची दिशाभूल करायला असे कात्रजचे घाट मधूनमधून दाखविले जातातच.
काँग्रेसचे ५ आमदार निलंबित आहेत, समजा अजून ५ म्हणजे एकूण १० आमदार निलंबित झाले तर २७७ पैकी १३९ आमदारांचे मत मिळाले तर बहुमत सिद्ध होउ शकते का ? निलंबित आमदारांस मतदानाचा हक्क असतो का
नाही निलंबित आमदारांना मतदानाचा हक्क नसतो. बहुमत म्हणजे सभागृहात हजर असलेल्या सदस्यांपैकी जितके सदस्य मत देतात त्यात सरकारच्या बाजूने जास्त मते मिळणे. ही मते एकूण सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असतीलच असे नाही.

In reply to by कपिलमुनी

>>> अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते. आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई. कार्यक्रम पत्रिकेवरील पहिला विषय सभापतींची निवड हा होता. तो त्या क्रमानुसारच पार पडला. आपले उमेदवार मागे घेऊन शिवसेना व काँग्रेसने भाजपकडे पुरेसे बहुमत आहे हे मान्य केले होते. दुसरा विषय हा विरोधी पक्षनेत्याची निवड होता व तिसरा विषय विश्वासदर्शक ठरावावरील मतदान होता. जोपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने कोण व विरोधात कोण हे नक्की होत नाही तो पर्यंत अधिकृत विरोधी पक्ष कोण हे ठरू शकत नव्हते. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानानंतरच अधिकृत विरोधी पक्ष कोणता हे ठरणार होते. त्यामुळे दुसर्‍या व तिसर्‍या विषयांची अदलाबदल हा योग्य निर्णय होता. >>> हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्‍यांसाठी , चलाखी करणार्‍यांसाठी या अपेक्षा नाहीतच . नैतिक/अनैतिक या सापेक्ष कल्पना आहेत. घटनेत नैतिक/अनैतिकतेची व्याख्या नाही. __________________________________________________________________________ >> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही. >> तुम्हाला गरज वाटत नसेल पण या धाग्यावर आणि इतर अनेक लोकांना ती वाटत आहे . आणि पारदशिकतेच्या मुद्द्यावर ते कळालेच पाहिजे. राष्ट्रवादीचा पाठिंबा दुर्लक्षिलेला आहे. _________________________________________________________________________ ____________________________________________________________________________ >>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा. >> पूर्वी ज्या आरक्षणांना भाजप विरोध करत होती त्याला राज्य सरकार आज सपोर्ट करत आहे. आणि बाकी अजित पवार , भुजबळ , तटकरे यांच्या अटके नंतर बोलूच ( कोण हसतय रे तिकडे ) कोणती आरक्षणे? ____________________________________________________________________________ >> भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती .. याचे उत्तर शेवटपर्यंत दिलेच नहीत . भाजप मला विचारून इतरांना मंत्रीपदे देत नाही किंवा इतरांच्या मंत्रीपदांची संख्या मी ठरवित नाही. >>> आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा . हे भाजपलाच ठरवू द्यात. >>> सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत. > अहो हेच तर अजून कोणी बोलला नाहिये ना ! राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असे ते सांगत आहेत . फडणवीस यांनी आम्ही तो स्वीकारला नाहीये असा स्टेट्मेंट दिला नाहिये अजून. ठरावानंतर असे स्टेट्मेंट दिले असेल तर दाखवा . आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ? बाजूने १३५ व विरोधात १०४ म्हणजे बहुमतच आहे. विश्वासदर्शक/अविश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सभागृहाच्या एकून सदस्य संख्येपेक्षा एकूण मतदानात ज्या बाजूने ५० टक्क्यांहून अधिक मतदान होते तो ठराव जिंकतो. उद्या २८८ पैकी फक्त २९ सदस्यांनी मतदान केले तर ठराव जिंकण्यासाठी १५ मते मिळाली तरी चालते.

In reply to by श्रीगुरुजी

नैतिक/अनैतिक या सापेक्ष कल्पना आहेत. घटनेत नैतिक/अनैतिकतेची व्याख्या नाही.
याला आमच्याकडे बोटावरची थुंकी बदलणे म्हणतात.
जोपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने कोण व विरोधात कोण हे नक्की होत नाही तो पर्यंत अधिकृत विरोधी पक्ष कोण हे ठरू शकत नव्हते. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानानंतरच अधिकृत विरोधी पक्ष कोणता हे ठरणार होते. त्यामुळे दुसर्‍या व तिसर्‍या विषयांची अदलाबदल हा योग्य निर्णय होता.
मग अगोदरच ही गोष्ट ध्यानात आली नव्हती का ?
भाजप मला विचारून इतरांना मंत्रीपदे देत नाही किंवा इतरांच्या मंत्रीपदांची संख्या मी ठरवित नाही.
तुम्ही त्याच पद्धतीने डीफेंड करत आहात
हे भाजपलाच ठरवू द्यात.
तुम्हाला त्रास होत होता सेनेचा म्हणोन तुम्हालाच विचारला
बाजूने १३५ व विरोधात १०४ म्हणजे बहुमतच आहे.
हे राष्ट्रवादी तटस्थ होती तेव्हा कळाला फडणवीस किंवा कोणीही याचा स्पष्टीकरण दिला नव्हता

In reply to by श्रीगुरुजी

अशा परिस्थितीत भाजपने सत्तास्थापनेचा विचार सोडून द्यायला हवा होता. त्यात त्यांचेच भले झाले असते. राष्ट्रवादीचा कुचकामी आणि बिनभरवशाचा आधार घेऊन निंदानालस्ती सहन करण्यापेक्षा ठामपणे सत्तेला नकार दिला असता तर नवीन निवडणुकीत (जर शिवसेनेला तोपर्यंतदेखील समज आली नसती तर) त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले असते. आज नाही तर उद्या निवडणुक पुन्हा होणारच आहे. हे असलं बेंगरुळ आणि बालिश खेळ खेळून स्थापलेलं सरकार किती टिकणार हा प्रश्नच आहे. आणि ते देखील काकांच्या भरवशावर उभं राहिलेलं? मग तर प्रश्न आणखीनच जटील आणि कुटील होतो. :-) काका केव्हा सतरंजी ओढून घेतील ते खाली आदळणार्‍यांना देखील कळणार नाही. :-)

In reply to by समीरसूर

भाजपने सत्ता स्थापनच करायला नको होती
नाही, भाजप ने शिवसेने बरोबर सत्ता स्थापन करावयास हवी होती. जर शिवसेनेला तोडायचेच होते म्हंटल्यावर तीने चुका करु नाहितर काही करु, भाजप ने त्या चुकांचे भांडवल का करावे ? त्यांना शिवसेना जड जात आहे असे वाटत होते तर त्यांनी राष्ट्रवादी बरोबर संधान करुन आपला मार्ग आखला. शिवसेने बरोबर युती तुटली होती, आणि आठवले, जानकर शेट्टी मंडळी भाजप बरोबर गेली (कारण केंद्रात त्यांची सत्ता होती, आणि वातावरण ही) पण मग भाजप ने राज ठाकरें बरोबर का नाही युती केली ? कारण त्यांना माहिती होते राज ठाकरे त्यांना काही जास्त मदत करु शकणार नाही, उगाच १०-५ जागा आणि त्या ही मुंबई मधील काही सोडाव्या लागतील. त्या पेक्षा राष्ट्रवादी त्यांना जवळाचा वाटला. आणि ही सरासर धुळफेक होती बाकी जनतेला. हे आधीच ठरल्या मुळे असे झाले. जर आवाजी मतदानात जर राष्ट्रवादी भाजप बरोबर होती तर तो आधीचा डाव होता, आम्ही त्यांचा पाठिंबा मागितला नव्हता अशी ही धुळफेकच आहे. मग असे असेन तर कुठल्या तोंडाने दिल्लीत तुम्ही सर्वात मोठा पक्ष असुनही, आप अणि कॉन्ग्रेस ला एकाच नाण्याच्या दोन बाजु बोलता, तेथेही आपने पाठिंबा मागितलेला नव्हता. जर तेथे नाण्याच्या त्या २ बाजु असु शकतात, तर येथे ही ह्या नाण्याच्या २ बाजुच का नाही ? अमित शहा-मोदी यां मध्ये उद्धव भरडले गेले. स्वता त्यांनाच काय भाजपा च्याच कीती तरी लोकांना राष्ट्रवादी बरोबर आपण जाणार आहोत हे वाटत नव्हते. मला वाटते देवेंद्र पण त्याच जनात होते. तरीही एकत्र भाजप ने बहुमत आनायचे आणि नाही जमले तर शिवसेने बरोबर जायचे असेच करायचे होते. राष्ट्रवादी हा धुर्त आहे तर भाजपा हा धोरणी पक्ष आहे आणि शिवसेना ह्या दोन्ही गोष्टीत फेल असला तरी तो चुकीचा असा जो सूर उमटत आहे तो त्यांची रणनिती चुकली असा पाहिजे त्यांची निती चुकीची नव्हती असे नमुद करावेशे वाटते. आता आनखिन एक सांगतो.. (कृपया हे कोन म्हणाले होते हे विचारु नये, एक बारामतीकर असल्या कारणाने बर्याच गोष्टी ऐकलेल्या असतात.. उगाचच) जर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे मिळुन १४४ आमदार झाले असते ( कॉग्रेस ला ही दूर ठेवुनच) तर शरद पवारांनी भाजपा बरोबर झालेली बोलणी विसरुन शिवसेने बरोबर जाण्याचे योजीले असते. आधीही हा पर्यत्न झाला होता पण तो त्यावेळेस फसला गेला होता. मला वाटते जोशींनी हे सांगितले आहे कुठल्याशा मुलाखतीमध्ये. मला वयक्तिक रित्या राष्ट्रीय राजकारणात अटल बिहारी वाजपेयी आवडायचे, राजकारणी असा असावा सर्व पक्षात त्याला मान असावा, मोदी यांचे विकासाचे धोरण आहे पण त्या मध्ये साधे व्यापारी.. सामान्य धंदे बुडुन जातील अशी शंका मला आहे, परंतु हे परिनाम १० वर्षांनंतर दिसतील. आताच मला वाटते FDI बांधकाम क्षेत्रात आण इतर बर्याच क्षेत्रात येण्यास त्यांनी पुर्ण संमत्ती दिलेली आहे. आणि अश्याच रिटेल FDI बद्दल त्यांनी कॉन्ग्रेस ला चुकीचे धरले आहे. रीटेल मध्ये ही लवकरच FDI आल्या शिवाय राहणार नाही. विकास म्हणजे काय ? फक्त चकाचक जिवन शैली, चकाचक रस्ते पुल मॉल म्हणजे विकास ? तर नाही, प्रत्येकाचे दरडोयी उत्पन्न वाढल्या नंतर त्याच्या गरजा भागल्या नंतर जे जे गरजेचे आहे ते देणे म्हणजे विकास. तसे नसते तर मग पिंपरी चिंचवड चा विकास डोळ्यात भरणारा आहे. कोणीही या आणि रस्ते-पुल औद्योकीकरण बघावे आणि सांगावे. आता ५० हजार पगार असला तरी येथे साधा १ BHK फ्लॅट सामान्य माणसाला घेता येत नाही, हा विकास त्याच्या कामाचा नाही. विषय राजकारणावरुन भरकटायला लागला असल्याने थांबतो

In reply to by समीरसूर

>>> अशा परिस्थितीत भाजपने सत्तास्थापनेचा विचार सोडून द्यायला हवा होता. त्यात त्यांचेच भले झाले असते. भाजपचे भले झाले असते का ते माहित नाही, पण भाजपने सरकार स्थापन केले नसते तर विधानसभा बरखास्त होऊन पुन्हा एकदा निवडणुका होऊन अब्जावधी रूपयांचा चुराडा झाला असता व तोपर्यंत महाराष्ट्रात निर्नायकी अवस्था येऊन वाईट परीणाम झाला असता. >>> हे असलं बेंगरुळ आणि बालिश खेळ खेळून स्थापलेलं सरकार किती टिकणार हा प्रश्नच आहे. आणि ते देखील काकांच्या भरवशावर उभं राहिलेलं? मग तर प्रश्न आणखीनच जटील आणि कुटील होतो. काका केव्हा सतरंजी ओढून घेतील ते खाली आदळणार्‍यांना देखील कळणार नाही. भाजप काही बोळ्याने दूध पीत नाही किंवा शिवसेनेसारखा भ्रमात राहणारा गाफील पक्ष नाही. १९९९ ला वाजपेयी सरकार केवळ १ मताने पडले होते. त्या अनुभवातून भाजप खूप काही शिकला आहे. भाजपने कर्नाटकात (२००८-१३), राजस्थानात (१९९३-९८), उ.प्र. मध्ये (१९९७-२००३) अल्पमतातील सरकारे टिकविली आहेत. काकांनी सतरंजी ओढली तरीसुद्धा हे सरकार टिकेल याची खात्री बाळगा.

In reply to by श्रीगुरुजी

अल्पमतातील सरकारे टिकविली आहेत
कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल .

In reply to by कपिलमुनी

>>> कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल . कायदेशीर व घटनात्मक मार्गाने ही अल्पमतातील सरकारे चालविली गेली होती. माहिती नसल्यास इतिहासाची पाने चाळा.

In reply to by श्रीगुरुजी

आवाजी मतदान आधी जे झालेले तेव्हा आमदारांनी आधीच समर्थन पत्रे दिलेली.

गुरुजी ही गोष्ट का लपवत आहेत. सुधरणार नाहीच म्हणा तुम्ही. भाजपाने रडीचाच डाव खेळला आहे सत्तेसाठी कोणत्याही थरावर जातात आणि भक्तांना सोशल मिडीयावर वार्‍यावर सोडतात :)

In reply to by दिवाकर देशमुख

भाजपाने रडीचाच डाव खेळला आहे सत्तेसाठी कोणत्याही थरावर जातात आणि भक्तांना सोशल मिडीयावर वार्‍यावर सोडतात
आणि काही काही आय.डी मिसळपाववर उच्छाद मांडायचाच म्हणून बॅन केले तरी लोचटासारखे परतपरत वेगवेगळ्या नावाने येतात.त्यातूनच कधीतरी उदयचा दिवाकर होतो. काय करणार? चालायचच :)

In reply to by कपिलमुनी

>>> कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल . विरोधकांमध्ये एकी नसली व त्यांच्यात फाटाफूट आणि वैचारीक विरोधाभास असला की सरकार अल्पमतात असले तरी ते टिकून आपला कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करते. अल्पमतातील सरकार टिकविण्यासाठी सोवळे सोडून ओवळे नेसावेच लागते असे नाही.

वर थत्ते यांनी नमूद केल्याप्रमाणे त्या त्या पक्षाचे समर्थक काही झाले तरी आपल्या च पक्षाला मत देतात किंवा पक्षाने कितीही खालची पातळी गाठली तरी पक्षाचे समर्थन करतात . वर भाजप चे अनेक समर्थक तेच करत आहेत . आपल्या पक्षाने अनेक भर्श्टाचारि नेत्याच टोळक असणारया पक्षाच समर्थन घेतलं आहे हि खंत जर त्याना मनातून पण (दाखवायचे दात काहीही वेगळ असले तरी ) वाटत नसली तर या पक्षाच कॉंग्रेस सारखच वेगाने अधपतन का होत आहे याच उत्तर मिळेल . दुर्दैवम्हणजे हेच भाजप समर्थक टोळक इथ कॉंग्रेस कशी नैतिक दृष्ट्या अधपतित आहे , राष्ट्रवादी कशी भ्रष्ट आहे , मनसे नाशिक मध्ये राष्ट्रवादीचा पाठींबा घेणे कसे चूक आहे यावर इतर लोकाना प्रवचन देत होती . बाकी एवढी आंधळी भक्ती असणारे कार्यकर्ते पाहून इतर पक्षांना नक्कीच भाजप चा हेवा वाटत असेल . बाकी झोपलेल्याला जाग करता येत पण झोपेच सोंग घेतलेल्याला कस जाग करणार हा चिरंतन प्रश्नच आहे आंधळ्या समर्थकांची हि वृत्ती पाहून लालू , गडकरी , पवार अशा भ्रष्ट नेत्यांमागे कार्यकर्ते कसे उभे असतात ह्या मध्यमवर्गीय प्रश्नाचे उत्तर पण मिळाले . बाकी चालू द्या . राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाऊन या राज्याचे अजून वाटोळे करू नका म्हणजे झाल

भाजपने शेवटी एनसीपीशी संग करण्याचा आपला मनसुबा पूर्ण केला वर ते पटलावर येवू नये म्हणून आवजी मतदानाची चलाखी करून पाहिली पण परिणाम काय झाला? सगळीकडे भाजप आणि देवेंद्र यांची निर्भत्सना, टवाळी चालू आहे. भाजप आणि एनसीपीचे सेटिंग खूप आधीपासून सुरु होते ते आता उघड झाले आहे. भाजपचा मतदार नाराज आहे पवारांना काही फरक पडत नाही. भाजपकडे बहुमत नसतानाही सेनेला आधी विश्वासदर्शक ठराव पास होवू दे मग सत्तेत सामील व्हायचं बघू अस म्हणणे म्हणजे तुमची मुलगी आमच्या घरी द्या मात्र मुलगा कसा आहे वगैरे आत्ता काही बोलू नका ते लग्नानंतर पहा असे म्हणण्यासारखे झाले. केंद्रात एखाद फुटकळ मंत्रिपद दिल आणि राज्यात अशीच ४ खाती दिली तर सेना लगेच फरफटत आपल्या मागे येईल या भ्रमात भाजप राहिली. मात्र सेनेने केंद्रात विस्तारत येणार पद सोडून दिल आणि राज्यात पण विरोधात बसली हे बरच झाल. आता आवजी मतदान घेवून पवारांच्या कृपेने सरकार तरल मात्र जी अब्रू जायची ती गेलीच आहे. पुढे कधी तरी मतदान घ्यावच लागणार आहे, एनसीपी कधीही दगा देवू शकते ते होणार नाही तोवर हे 'पवारालंबी' सरकार चालणार आहे. एकंदरीत भाजपची लोकांत छी थु झाली आहे.यांचे खरे रूप समोर आले ते बरेच झाले.ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप उठवून सत्तेत आले त्यांच्याशी असलेली यांची मिलीभगत उघड झाली. सेनेने विरोधात बसून चांगले काम केले.

मग भाजपाने राष्ट्रवादीसोबत जे काही केलंय त्याला काय म्हणायचं? शय्यासोबत की मधुर प्रेमसंबंध? (गुरुजींना उत्तर माहीत असेलच.)

In reply to by आजानुकर्ण

http://www.misalpav.com/comment/627525#comment-627525 इथे गुरुजी ना वाटते कि राज ने राष्ट्रवादी शी 'साटलोट' केल त्यामुळे जनते ने त्याना लाथ दिली . बहुतेक राष्ट्रवादी आणि भाजप उच्च नैतिक मुल्य आणि महाराष्ट्राच हित जपण्यासाठी 'शय्यासोबत ' करत आहेत असा काहीसा त्यांचा ग्रह झाला असावा . राज चाच (राष्ट्रवादीचा बाहेरून पाठींबा ) नाशिक फ़ोर्मुला त्याना महाराष्ट्राच्या हिताचा वाटत आहे .

In reply to by आजानुकर्ण

दोन्हीपैकी काहीही नाही. 'दिल तो पागल है' हा चित्रपट आठवला. या चित्रपटात लोलो शाहरूखच्या मागे लागलेली असते. परंतु शाहरूख माधूरी दिक्षितच्या प्रेमात असतो. परंतु तो लोलोचे प्रेम स्वीकारत नाही व तिला झिडकारतही नाही. असे करण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही.सद्यस्थितीत असेच झाले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असल 'अफलातून ' उत्तर वाचून आजानुकर्ण झीट येउन पडले आहेत असे चित्र डोळ्यापुढे उभे राहिले . भाजप - शाहरुख खान (दोन दोन मुली (पक्षी -शिवसेना व राष्ट्रवादी ) ज्याच्यामागे आहेत असा बाका छोरा ) राष्ट्रवादी - माधुरी दीक्षित (शाहरुख च प्रेम पात्र ) शिवसेना -करिश्मा कपूर ( कॉंग्रेस -अक्षय कुमार (राष्ट्रवादी कडून नाकारलेले गेलेले ) दिल तो पागल है च्या शेवट च्या सीन मध्ये नाईलाजाने अक्षय आणि करिश्मा (दोघेही नाकारलेले गेलेलं ) एकत्र येण्याची शक्यता दाखवली आहे . जसे काल विधानभवनात कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येउन धिंगाणा घालताना पाहून अनेकाना तो सीन आठवला असेल . बाकी राज आणि माया (बाकी माया हे नाव मोठे साहेब पक्षी राष्ट्रवादी याना लई शोभून दिसत म्हणा ) याचं मिलन काल अख्ख्या राज्याने पाहिलेच . जमली का हो गुरुजी casting ?

In reply to by पिंपातला उंदीर

शाहरुख खान (भाजपा) माधुरीच्या प्रेमात आहेत म्हणजे माधुरी ही राष्ट्रवादी नसून महाराष्ट्राची सत्ता आहे असे वाटते.

भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत. राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये. जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे. ज्या मतदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस्च्या विरोधत मतदान केले हा त्या मतदारांचा विश्वासघात आहे. +१ बाहेर लोकं भाजप आणि फडणवीसांची भयंक टवाळी करत आहेत, इथे बोलता येत नाही अश्या भाषेत त्यांचा उद्धर चालू आहे.खिंड लढवणारे काही तुरळक भक्त सोडले तर बहुतांशी लोकं भाजपवर नाराज आहेत.

In reply to by दुश्यन्त

खिंड लढवणारे काही तुरळक भक्त सोडले तर बहुतांशी लोकं भाजपवर नाराज आहेत.
असेच म्हणतो. (पश्चात्तप्त) बॅटमॅन.

In reply to by हाडक्या

बरोबर आहे... बॅटमन भाजपच्या कारवाई पश्चात् तप्त (रागाने गरम) झालेला आहे... तेव्हा सांभाळून...... असे म्हणायचे असेल ;) :)

वरील मुद्द्यावर भाजप आपल्या धोरणाचे समर्थन करत आहे. मूळ मुद्दा हा की शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीची साथ घेऊन भाजप ने काय मिळवले? वेगळे पणा जपणारा पक्ष हा दावा ते आता कितीही करतील तरी ही त्याला आता तेव्हढा आधार राहणार नाही त्यांचे पक्के समर्थक तसे मानत राहतील तरीही सामान्य मतदार जो भाजप किंवा मोदीं कडे ज्या आशेने बघत होता त्यावर नक्कीच परिणाम होइल. मुळात राष्ट्रवादीची साथ घेण्याची गरजच काय होती? हरियाणात बहुमताचा आकडा गाठण्या साठी दहा पाच आमदार कमी पडले असते तेव्हा आय. एन. एल. डी. ची साथ घ्यावी लागली असती तर ते समर्थनीय तरी होते पण तिथे तशी परिस्थिती आली नाही तितका नशीबवान भाजप ह्या दोन राज्यांच्या निवडणुकां मध्ये होता महाराष्ट्रात ही तशी परिस्थिती नव्हती मग कशा साठी स्वत:च्या तथाकथीत स्वच्छ प्रतिमेला ला धक्का पोहचवला. अन तों ही इतक्या लवकर. केंद्र सरकार अजूनही लोकप्रिय आहे न खाउंगा न खाने दुंगा ह्यावर लोकांनी विश्वास ठेऊन मते दिली होती आता ह्या कृतीचे समर्थन काय? मी भाजपचा किंवा शिवसेनेचा समर्थक नाही त्या दोन्ही पक्षां बद्दल कुठलीही सहानुभूती नाही अन भाजप जे बोलतो त्यावर माझा काडीचाही विश्वास कधीच नव्हता तो इतकेच काय तर ह्याही पुढे जातील ह्यात काही शंका कधीच नव्हती पण इतक्या लवकर अन कसलीही गरज नसतांना ते असे करतील ह्याचे मात्र अतिशय आश्चर्य वाटले. भाजपला शिवसेनेची अडचण होत होती शत प्रतिशत भाजप पाहिजे होता म्हणून त्यांनी असे केले. हे जागावाटपां च्या वेळे पासून ठरवून केल्या जात आहे. मग कारणे काहीही सांगितल्या गेली आता भाजप १२१ अन शिवसेना ६३ ही परिस्थिती असतांना त्यांनी शिवसेनेनी उपमुख्य मंत्री अन एक तृतीयांश मंत्रीपदे ही मागू नयेत त्यांनी नाक घासून जे मिळेल ते गोड मानून घ्यावे कारण ते आमच्या मुळे जिंकलेत हा अहंकार काय सांगतो? अन त्या अहंकाराला ही काय आधार आहे हरियाणाच्या पक्षाने एकटे लढून आपली शक्ती किती पटीने वाढवली अन इथे आधी पासून भाजपचे चांगले अस्तित्व असतांना चार पक्षांशी युती करूनही बहुमाताचा आकड्याचा इतके दूर रहावे लागले तरीही आम्हीच सारे निर्णय घेणार तुम्ही मान्य करा हा हेका मात्र जात नाही. भाजपची शक्ती शिवसेने पेक्षा जास्त होती हे मान्य त्यांनी जास्त जागा मागितल्या अन त्यासाठे वेगळे लढले इथपर्यंत ही ठीक पण नंतर मात्र आहे ती परिस्थिती मान्य करून पुढे जायला हवे होते. पण तसे केले नाही. शिवसेनेला ज्या अठरा जागा लोकसभेच्या निवडणुकीत मिळाल्या होत्या ते काही भाजपचे उपकार नव्हते हे ही सिद्ध झालेच की. १८ लोकसभेचा मतदार संघात ६ प्रमाणे १०८ जागा होतात शिवसेनेने मिळवल्या ६३ म्हणजे हिशोब लावला की प्रत्येक लोकसभा मतदार संघातल्या साडे तीन मतदार संघात त्यांनी आघाडी घेतली असे मान्य करावे लागते. (हे काही निवडणूक पूर्व अंदाज नसून सिद्ध झालेली आकडेवारी आहे ) पण थोड्या फार यशाने डोळे आंधळे झाली की ती कशी दिसणार?

In reply to by जयनीत

म्हणजे असे बघा केळीवाला बुट्टीभर केळी घेऊन बसला आहे. तुम्ही किती केळी घ्याल ? तुमच्या गरजेपुरतीच ना ? भाजपाला बहुमताला १५ लोकांचीच गरज आहे. सेनेने फक्त १५ च लोक द्यावेत की.. सेनेचे साठ असले तरी तितके केळी भाजपाला नकोचआहेय्त. म्हणजे भाजपाच १२० व सेनेचे १५. ... म्हणजे भाजपाची ताकद सेनेच्या आठपट भरते. उरलेली केळी सेनेने फेकुन द्यावीत.

In reply to by hitesh

अहो पण उद्धव सुटी केळी विकत नाही ना .. घ्यायची तर बुट्टीभर घ्या नाहीतर काहीच नाही.

In reply to by कपिलमुनी

तो सगळी केळी विकेल तरीही त्याला १५ केळ्याचेच पैसे घ्यावे लागतील. उरलेली केळी बुट्टीत घालुन घरी न्यायची नसतील तरीही ती केळी त्याला फुकटच घालावी लागतील. त्यामुळे २ : १ चा बालहट्ट सोडुन ८ : १ हे कटू सत्य त्यांनी स्वीकारले असते तर निदान केळ्रे कुजली तरी नसती. आमचे पवार बघा.. सत्यनारायण घालायला केळी उसनीही दिली आणि पुजाही त्यानी स्वतःच सांगितल्याने पुजा संपल्यावर आपलीच केळी हक्काने घेऊनही गेले

In reply to by hitesh

मला तर शंका आहे केळीच नव्हे भाजपा जी बाकीच्या खारका सुपार्‍या आमच्या म्हणुन सांगते त्याहीपवारांच्याच आहेत.

In reply to by hitesh

केळ्यांचे उदाहरण नको. नुकतेच मिपावर "वसईची पिवळी केळी" यावर आवाजी मत-प्रदर्शन झाले आहे.

राजकारण हा माझा प्रांत नाही. सर्व लोक भाजपचे चुकले म्हणताहेत. त्यांनी साधन शुचिता पाळायला पाहिजे होती. ते बरोबरही असेल पण माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मतदाराला असे वाटते कि भाजपने काय करायला पाहिजे होते. शिवसेनेपुढे लोटांगण घालायला पाहिजे होते? शिवसेनेने किती ताठरपणा निवडणुकीच्या अगोदर दाखवला होता हे आपण पाहिलेच आहे मग त्यांना झुकते माप देऊन त्यांच्या दुप्पट आमदार निवडून येउन सुद्धा त्यांच्या तालावर नाचायला पाहिजे होते. आज कितीही म्हणालात तरी भाजप ला ४२ टक्के जागा महाराष्ट्राच्या जनतेने दिल्या आहेत. बाकी लोकांना २१ टक्के किंवा त्याहूनही कमी जागा आहेत याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला जनादेश दिला आहे. अशा परिस्थितीत भाजप ने काय करायला हवे होते? का विश्वास दर्शक ठरावात नापास होऊन लगेच निवडणुका परत घेऊन कर्जाच्या खाईत असलेल्या महाराष्ट्राला अजून काही शे कोटी रुपयाच्या खर्चात टाकायला हवे होते? किंवा राज्यावर ६ महिने राष्ट्रपती राजवट आणायला हवी होती? लोकांना नक्की काय हवे आहे? प्राप्त परिस्थितीत त्यांनी जे केले ते कदाचित साधन्शुचीतेच्या दृष्टीने बरोबर नसेल पण याच्या पेक्षा चांगला पर्याय त्यांना उपलब्ध होता असे मला वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मित्रा,सध्याच्या राजकारणात चालू घडामोडींची घडामोडींचीसुंदर व मार्मिक रेखाटने 'ढिंग टांग' मधून ब्रिटिश नंदी करतात. ती पहिल्या चहा बरोबर कुरकुरीत क्रम्स प्रमाणे खुसखुशीत वाटतात. मामला म्हणून एक... त्यातील शेपटीचा फटकारा मान डोलायला लावतो. (नंतर डकवतो.)

In reply to by श्रीगुरुजी

काँग्रेसचा तो भ्रष्टाचार आणि भाजपाची ती अपरिहार्यता! युक्तिवाद छान आहे. खरंच. इथूनपुढं पानभर निबंध लिहायच्या ऐवजी एवढाच युक्तिवाद केलेला पुरे!

In reply to by सुबोध खरे

सहमत आहे, काल ह सगळा घटनाक्रम पाहिल्यावर मी देखील निराश झालो होतो, पण कालांतराने विचार करता असे लक्षात आले की शिवसेना काय आणि राष्ट्रवादी काय, खाणार नाहीत असे कोणी सांगितले आहे? अगदी फॉर दॅट मॅटर भाजपा देखील. आपल्याला सुशासनाशी मतलब. जर भाजपाने चांगले काम केले तर काय फरक पडतो त्यांनी असे बहुमत सिद्ध केले म्हणून? माझ्याड्रुष्टीने साधन नव्हे, तर साध्य महत्वाचे.

In reply to by सुबोध खरे

प्राप्त परिस्थितीत त्यांनी जे केले ते कदाचित साधन्शुचीतेच्या दृष्टीने बरोबर नसेल पण याच्या पेक्षा चांगला पर्याय त्यांना उपलब्ध होता असे मला वाटत नाही.
-- प्रश्न केवळ साधनशुचीतेचा असेल तर भाजपने संपूर्ण सभागृहाला सरकारला पाठिंबा द्यायचे आवाहन करायला हवे होते. भाजपचे रूडी साहेब म्हणाले कि एक काँग्रेस सोडुन आम्हि कोणाचेही समर्थन घेऊ. त्यापेक्षा महायुती सरकार बनवत आहे, स्थिर सरकारसाठी ज्याला वाटेल त्याने पाठिंबा द्यावा, असा स्टॅण्ड घेतला असता तर बहुमत देखील मिळवता आले असते व चारित्र्यावर डाग देखील लागले नसते. अर्थात, हे सगळं जर-तर आणि भावनांचा खेळ आहे. जे झालं ते व्यवस्थीत गणित मांडुन केलं गेलं असणार.