Skip to main content

शब्द

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/11/2014 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या बोलण्यातले शब्द तोंडून बाहेर पडताच गोठून गेले... माझ्या कानात अजून ते गुंजतात अगदी झाडावरल्या ताज्या गुलाबासारखे... मला नकळत माझा त्यांना स्पर्श होतो तू जवळ असतांना तुझा हात हाती असतो तसा
लेखनविषय:

वाचने 1739
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by विवेकपटाईत

आपले तसेच इतरांचेही आभार. आपल्यासारखे काव्यमय मनाचे रसीक असल्यावर हुरूप येतो. असो. आपली शंका रास्त आहे. पण तिचे निरसन करणे मला शक्य नाही कारण मी कोणत्यातरी तंद्रीत लिहून गेलो. ते लिखाण परिष्कृत करणे मला शक्य झाले नाही. वरील लिखाणाचे दोन तिन अर्थ निघावेत/ निघतात. स्री-पुरूष कल्पून आणखीन अर्थ वाढू-बदलू शकतात. आपण जास्त जाणकार आहात. मला त्याचा आदर आहे.

In reply to by पाषाणभेद

कवितेपेक्षा प्रतिसाद जास्त भावला... >>>>मी कोणत्यातरी तंद्रीत लिहून गेलो. या तंद्रीबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.. ह.घ्या. पाषाणभेदजी...