Skip to main content

पवारावलंबी

लेखक गणेशा यांनी बुधवार, 12/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य काक (कार्यकर्ता, कावळा नाही) : केंद्रात नरेंद्र .. महाराष्ट्रात देवेंद्र , आठवले का काही . राम (अयोध्याचा नाही, आठवलेंचा) : आणि दूरुन स्मित हसतोय शरदचंद्र .. जमलेना मस्त ? काक : जमले आहे, पण उठा बाबा आता ? राम : का हो उठू ? काक : अहो उ. ठा. आणि बाबा यांचे काय ? असे बोललो. राम : थांबा मोदी नी त्या बद्दल काय बोलायचे सांगितले आहे ते पाहतो आणि मग बोलतो .. दादा : विसरू नका , आम्ही सर्व घड्याळामध्ये पाहून आणि तारखेनुसार काम करतो . काक : .ऑ ? दादा : आज तारीख १२. त्यात ११/१२/२०१४ बेरीज बघा बरोबर १२. बारामतीच्या १२ व्या महिन्यात १२ तारखेला जनमलेल्या साहेबानी सगळे आधीच फिक्स केलेले होते. काक : म्हणजे बाराव्या महिन्यात बारा तारखेला हे देवाबरोबर पण फिक्स ? दादा : उचला रे ह्या भडव्याला. . देवा( आता देव नाही देवेंद्र) : नाही नाही नाही, अजिबात नाही काक : अहो पण आम्ही तुम्हाला काही विचारलेच कोठे ? देवा : तेच ना, उत्तरे वरून येत असतील हो , पण निदान प्रश्न तरी मला विचारा , तेव्हडे तरी माझे नाव घ्या .. श्या काय दिवस आणलेत ? शहा : मी काय कुठे केले, उठा ला बसवले फक्त .आम्ही आपले भाजपचे गडकरी बाकी काही नाही. का क (मध्येच दादांना): आम्हाला कळुद्या तरी काय झाले होते आधी फिक्स दादा : आम्ही बोलत नसतो करून दाखवतो ... काक : अहो हे उद्धव जी बोलतात .. दादा : बर आम्ही बोलत नसतो आणि काही करत पण नसतो.... काक: ऑ ? दादा : अहो पुढचे पण पुर्ण ऐका की आम्ही बोलत नसतो आणि काही करत पण नसतो....तरी सत्तेत बसतो. राम : हे नमो .. कुठ नेव्हून ठेवलाय महाराष्ट्रात मला. काक : सांगा ना दादा . दादा: कोणी तरी द्या रे उत्तर : शिका: (काहीतरी शिका नाही , शिवसेनेचा कार्यकर्ता) ऐका एक कहाणी ... शरदाच चांदनं आकाशी भेट झाली होती कधी त्याची मोदिशी सांगितले तेंव्हा, कमळाबाई .. करू नका घाई.. धरा घड्याळ नंतर तुमच्यापाशी.. तोडुन सेनेला करा सामना जनतेशी देतो आमचे बावीस शिलेदार हाताशी उरलेले काम .. जनतेच्या हातात देवूनी उभे राहू आम्ही तुमच्या पाठीशी ... जनतेच्या दरबारात.. खोट्या चेहऱ्यात भास निर्माण केला बाई ने बोलण्याचा सोबत निभवायाच्या नाटकाला फसला आमचा मर्द गडी सेनेचा का क : मग आता काय परिस्थिती आहे ... शिका : उभा आता एकटा देवेंद्र असला जरी मागे नरेंद्र परावलंबी हा महाराष्ट्र तेथे फक्त नाव .. शरदचंद्र महाराष्ट्र जेंव्हा अंधारात चंद्र मजेत तेंव्हा आकाशात जनतेस खरा प्रश्न पडला राम अखेर का वनवासात ?

वाचने 4771
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

ह्म्म !! वोटिंग न केल्याचं समाधान वाटलं. देऊन भाजपालाच दिलं असतं तर ही अवस्था बघून फार त्रास झाला असता.

In reply to by सूड

ह्म्म !! वोटिंग न केल्याचं समाधान वाटलं. देऊन भाजपालाच दिलं असतं तर ही अवस्था बघून फार त्रास झाला असता.
अगदी असेच

अस कस ! भाजप नेहमीच बरोबर असत . मोदी जे काही करतात ते नेहमीच सत्याच्या बाजूने असत . मग ती काळ्या पैशा च्या मुद्द्यावर मारलेली कोलांटी उडी असो , सीमेवर सैनिक शहीद होत असताना नवाझ शरीफ यांची आई ला साडी पाठवणे असो वा राष्ट्रवादी सोबत ची शय्यासोबत असो . मोदी जे करतात ते नेहमीच बरोबर असत . भ्रष्टाचार , समाजात दुही माजवण , दंगली बद्दल काय म्हणता ? छे छे ? ते पाप कॉंग्रेस , शिवसेना , समाजवादी , साम्यवादी यांच . दाखले देऊ का ? भाजप च कॉन्ग्रेस्सीकरण झाल ? अरे जिभेला काही हाड ? संघ आणि त्याची पुण्याई आहे भाजप मागे . फडतूस कॉंग्रेस च अनुकरण भाजप कसे करेल ? तेंव्हा भाजप बद्दल आमच मत बदलण्याच पातक करू नका . मंदिर वही बनायेंगे , दावूद ला फरफटत आणू , ३७० कलम रद्द करू , जय श्री राम वैगेरे वैगेरे

झकास जमलाय तडका,,.. दिल्लीचा 'वाल' महाराष्ट्रातील 'घेवड्यां'पुढे फिका पडलाय..... महाराष्ट्र कुठं निऊन ठेवींग राव....

खरडफळ्यावर डकवलेला फोटो येथे सुद्धा डकवत आहे. 1 अगोदर घड्याळ बांधण्यासाठी हाताची गरज लागायची पण आता परीस्थिती अशी आली आहे (की आणली गेली आहे) की घड्याळ अलगदपणे कमळाच्या कुशीत जाऊन विसावलं आहे.

अच्छे दिन आ गये

लेखन समयोचित आहेच पण भाष्य एकदम खरपुस झाले आहे.

नसल्याबद्द्ल विशेष अभिनंदन.. नेमक्या व्यथा आणि व्य्थेच्या कथा दोन बोके,लोणी आणी माकड याची गोष्ट चित्ररूपात आता दोन्ही मुख्यालयात लावावी!!!