सामान्य काक (कार्यकर्ता, कावळा नाही) : केंद्रात नरेंद्र .. महाराष्ट्रात देवेंद्र , आठवले का काही .
राम (अयोध्याचा नाही, आठवलेंचा) : आणि दूरुन स्मित हसतोय शरदचंद्र .. जमलेना मस्त ?
काक : जमले आहे, पण उठा बाबा आता ?
राम : का हो उठू ?
काक : अहो उ. ठा. आणि बाबा यांचे काय ? असे बोललो.
राम : थांबा मोदी नी त्या बद्दल काय बोलायचे सांगितले आहे ते पाहतो आणि मग बोलतो ..
दादा : विसरू नका , आम्ही सर्व घड्याळामध्ये पाहून आणि तारखेनुसार काम करतो .
काक : .ऑ ?
दादा : आज तारीख १२. त्यात ११/१२/२०१४ बेरीज बघा बरोबर १२. बारामतीच्या १२ व्या महिन्यात १२ तारखेला जनमलेल्या साहेबानी सगळे आधीच फिक्स केलेले होते.
काक : म्हणजे बाराव्या महिन्यात बारा तारखेला हे देवाबरोबर पण फिक्स ?
दादा : उचला रे ह्या भडव्याला. .
देवा( आता देव नाही देवेंद्र) : नाही नाही नाही, अजिबात नाही
काक : अहो पण आम्ही तुम्हाला काही विचारलेच कोठे ?
देवा : तेच ना, उत्तरे वरून येत असतील हो , पण निदान प्रश्न तरी मला विचारा , तेव्हडे तरी माझे नाव घ्या ..
श्या काय दिवस आणलेत ?
शहा : मी काय कुठे केले, उठा ला बसवले फक्त .आम्ही आपले भाजपचे गडकरी बाकी काही नाही.
का क (मध्येच दादांना): आम्हाला कळुद्या तरी काय झाले होते आधी फिक्स
दादा : आम्ही बोलत नसतो करून दाखवतो ...
काक : अहो हे उद्धव जी बोलतात ..
दादा : बर आम्ही बोलत नसतो आणि काही करत पण नसतो....
काक: ऑ ?
दादा : अहो पुढचे पण पुर्ण ऐका की
आम्ही बोलत नसतो आणि काही करत पण नसतो....तरी सत्तेत बसतो.
राम : हे नमो .. कुठ नेव्हून ठेवलाय महाराष्ट्रात मला.
काक : सांगा ना दादा .
दादा: कोणी तरी द्या रे उत्तर :
शिका: (काहीतरी शिका नाही , शिवसेनेचा कार्यकर्ता)
ऐका एक कहाणी ... शरदाच चांदनं आकाशी
भेट झाली होती कधी त्याची मोदिशी
सांगितले तेंव्हा, कमळाबाई .. करू नका घाई..
धरा घड्याळ नंतर तुमच्यापाशी..
तोडुन सेनेला करा सामना जनतेशी
देतो आमचे बावीस शिलेदार हाताशी
उरलेले काम .. जनतेच्या हातात देवूनी
उभे राहू आम्ही तुमच्या पाठीशी ...
जनतेच्या दरबारात.. खोट्या चेहऱ्यात
भास निर्माण केला बाई ने बोलण्याचा
सोबत निभवायाच्या नाटकाला
फसला आमचा मर्द गडी सेनेचा
का क : मग आता काय परिस्थिती आहे ...
शिका :
उभा आता एकटा देवेंद्र
असला जरी मागे नरेंद्र
परावलंबी हा महाराष्ट्र
तेथे फक्त नाव .. शरदचंद्र
महाराष्ट्र जेंव्हा अंधारात
चंद्र मजेत तेंव्हा आकाशात
जनतेस खरा प्रश्न पडला
राम अखेर का वनवासात ?
वाचने
4771
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
ह्म्म !! वोटिंग न केल्याचं
+१
In reply to ह्म्म !! वोटिंग न केल्याचं by सूड
त्रास
In reply to ह्म्म !! वोटिंग न केल्याचं by सूड
+१००
In reply to ह्म्म !! वोटिंग न केल्याचं by सूड
करा! करा!! त्याच्या अक्कडबाज
In reply to +१०० by अर्धवटराव
जनतेला दिलय कि...
In reply to करा! करा!! त्याच्या अक्कडबाज by स्पंदना
अस कस ! भाजप नेहमीच बरोबर
येक नंबर जमलय मालक.
+१
In reply to येक नंबर जमलय मालक. by जयनीत
नोटा वापरल्या आज आनंद आहे.
झकास...
साभार: फेसबूक
.
समयोचित...
खरपुस
एकांगी चावडी..
पुरते जमले आहे