✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मला आवडलेली पुस्तके:विनोदी साहित्य

प
पुस्तकमित्र यांनी
Wed, 11/12/2014 - 16:45  ·  लेख
लेख
रामराम मंडळी! अात्मचरित्रांच्या धाग्याला तुम्ही दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!या भागात अापल्या अावडत्या विनोदी पुस्तकांबद्दल बोलुया. जगण्याची मजा घ्यायची असेल,ताणतणाव विसरायचे असतील तर विनोदी साहित्य वाचण्यासारखा इलाज नाही.सूचक,मार्मिक विनोद,रोजच्या जगण्यातल्या विसंगतींवर बोट ठेवुन स्मितहास्य निर्माण करणा-या विनोदापासुन पोट धरुन हसायला लावणारे विनोद अशा सर्व प्रकारचं विनोदी साहित्य विविध पुस्तकांतुन अापण वाचलं असेल.त्याबद्दल इथे लिहुया!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
19994 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

धागा इंटेन्शनल विनोदाविषयी

आदूबाळ
Wed, 11/12/2014 - 16:52 नवीन
धागा इंटेन्शनल विनोदाविषयी आहे असं गृहित धरतो. अनइंटेन्शनल विनोदासाठी मुक्तपीठ, मोकलाया, मोजी, सनातन प्रभात, असे बरेच ऑप्शन्स असतात.
  • Log in or register to post comments

सुहास शिरवळकर यांची जाता.

प्रचेतस
Wed, 11/12/2014 - 16:56 नवीन
सुहास शिरवळकर यांची जाता..येता... आणि बरसात चांदण्यांची ह्या दोन धमाल विनोदी कादंबर्या प्रचंड आवडतात. मिरासदार, चिं. वि. जोशी, शंकर पाटील यांचे सर्वच विनोदी साहित्य आवडीचे आहे. पु. ल. देशपांडे यांचे विनोदी लेखन मात्र आवडत नाही.
  • Log in or register to post comments

वल्लीशेठ

संदीप डांगे
Wed, 11/12/2014 - 17:20 नवीन
वल्लीशेठ कुणास काय आवडावे न आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण बरेचदा विशिष्ट असा उल्लेख करून पु. ल. यांचे लेखन आवडत नाही असे सांगण्यामागे काय कारण असेल? फार प्रांजळपणे विचारतो आहे, गैरसमज करू नये. पण दुसरी बाजू किंवा पुल न आवडणाऱ्यांची बाजू काय असेल हा प्रश्न बरेच दिवस पडलेला आहे. तुम्ही विषय मांडला आहेच तर उत्तर द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला मुकुंद टांकसाळे, अशोक

प्रचेतस
Wed, 11/12/2014 - 17:32 नवीन
मला मुकुंद टांकसाळे, अशोक पाटोळे, चंद्रकांत महामिने, मंगला गोडबोले यांचेही विनोदी लेखन आवडत नाही पण हे लेखक तुलनेने अदखलपात्र आहेत. तसे पु. लं चे नाही. महाराष्ट्रातील थोर लेखक ते. मला मात्र त्यांचे लेखन बाळबोध आणि काहीसे एकसुरी वाटते. मला जे वाटते तसे इतरांनाही वाटायला हवे असा माझा आग्रह नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

उत्तराबद्दल धन्यवाद!

संदीप डांगे
Wed, 11/12/2014 - 19:11 नवीन
उत्तराबद्दल धन्यवाद! कुणास काय आवडते ते त्याचा वैयक्तिक प्रश्न असे तर मी आधीच म्हटले आहे. फक्त ह्या दुसऱ्या दृष्टीकोनाची उत्सुकता होती. अशी एकाच वस्तूबद्दल ची वेगवेगळी मते कळल्याने जाणीवेत भर पडते आणि वाचन अजून प्रगल्भ होते. अजून दुसरा काही हेतू नव्हता ह्या प्रश्नामागे. तुम्ही "बाळबोध व एकसुरी" असे म्हटले आहे, अजून कुणी वेगळे काही मत मांडेल. ह्यातून अजून सकस व उच्च प्रतीचे काय असते ह्याची माहिती मिळत जाते. कुणी जर म्हणेल कि विनोदी लेखन म्हणजे पु ल च फक्त बाकी कोण नाही तर त्यासम मूर्खपणा दुजा नाही. वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या शैलीतून वेगवेगळ्या लेखकांनी आम्हाला हसवत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

झकास धागा पुमि.

विजुभाऊ
Wed, 11/12/2014 - 17:05 नवीन
झकास धागा पुमि. आत्तापर्यन्त वाचलेल्यात सर्वात इनोदी पुस्तक म्हणजे बुधकौशिक ऋषी यानी लिहीलेले "रामरक्षा" हे.
  • Log in or register to post comments

विनोदी का हे पण सांगा ना

प्रचेतस
Wed, 11/12/2014 - 17:16 नवीन
विनोदी का हे पण सांगा ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

तुम्ही वाच्ले असेलच ना ते.!

विजुभाऊ
Wed, 11/12/2014 - 17:17 नवीन
तुम्ही वाच्ले असेलच ना ते.!
  • Log in or register to post comments

मी वाचलेय पण ते पुस्तक नसून

प्रचेतस
Wed, 11/12/2014 - 17:18 नवीन
मी वाचलेय पण ते पुस्तक नसून लहानसे स्तोत्र आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मी ते एक लहानसे पुस्तक

विजुभाऊ
Wed, 11/12/2014 - 17:25 नवीन
मी ते एक लहानसे पुस्तक म्हणूनच वाचलेय. त्याचा अर्थ वाचून भलतेच इनोदी वाटले बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पण विनोदी का वाटले ते सांगा

प्रचेतस
Wed, 11/12/2014 - 17:29 नवीन
पण विनोदी का वाटले ते सांगा ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

होय

वॉल्टर व्हाईट
गुरुवार, 11/13/2014 - 03:06 नवीन
होय. हे जाणण्याची उत्सुकता मलाही वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+1

असंका
गुरुवार, 11/13/2014 - 11:42 नवीन
+1 त्यात काय विनोदी आहे सांगा. आम्ही पण मग त्या विनोदांचा आस्वाद घेउ शकू...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट

मोजी कथा,खरडफळा आणी काही

जेपी
Wed, 11/12/2014 - 17:18 नवीन
मोजी कथा,खरडफळा आणी काही मिपाकरांच्या खरडवह्या सध्या जाम हसवतात. अवांतर-काहि पुस्तके आहेत पण त्यांची नावे आठवत नाहित. फक्त वाचन आठवत. दिसल पुस्तक की पाड फडशा अस वाचतो
  • Log in or register to post comments

दिलीप प्रभावळकरांची 'गुगली'

रंगोजी
Wed, 11/12/2014 - 17:32 नवीन
दिलीप प्रभावळकरांची 'गुगली' आणि 'नवी गुगली'. ८५ च्या सुमारास ते षटकार साप्ताहिकात क्रिकेटवर लेखन करीत. त्याचा संग्रह. तत्कालीन खेळाडू आणि नियामक मंडळ यांची खुसखुशीत शब्दात फिरकी घेताना वापरलेल्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीच लगेल. जयवंत दळवी यांचे 'सारे प्रवासी घडीचे' - कोकणाचे, तिथल्या लोकांचे, आपापसातील भांडणांचे फार सुरेख वर्णन आहे
  • Log in or register to post comments

एकदम हेच लिहायला आलो होतो.

सौंदाळा
गुरुवार, 11/13/2014 - 16:45 नवीन
एकदम हेच लिहायला आलो होतो. दिलीप प्रभावळकर : गुगली, हसगत जयवंत दळवी : सारे प्रवासी घडीचे मधु मंगेश कर्णिक : गावाकडच्या गजाली. द मा मिरासदार : मिरासदारी, भोकरवाडीच्या सगळ्या कथा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगोजी

एक लंबरी धागा!

अजया
Wed, 11/12/2014 - 18:30 नवीन
एक लंबरी धागा! मिरासदारी ____/\____ अजरामर व्यंकुची शिकवण,,भूताचा जन्म,माझ्या बापाची पेंड! मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास-पुलं,यावर तर स्वतंत्र धागा येऊन गेलाय. चिमणरावाचे च-हाट-चिंवि जोशी त्यांचं१च ओसाडवाडीचे देव,त्यातली गणपती हनुमानाची क्रिकेट मॅच! गंगाधर गाडगिळांचा बंडु तर अजरामर आहे!त्याची पत्नी स्नेहलता अाणि चावरा मुलगा जकु उर्फ जकरंद!!सर्वच कथा हहपुवा आहेत!! विंग्रजीमध्ये द वुडहाऊस_/\_ लाफ विथ लिकाॅक पण आवडतं.रस्किन बाॅण्ड कधीकधी हसवुन जातात. अजून लिहतेच पुढे!!धन्स पुस्तकमित्रा!
  • Log in or register to post comments

Mr. Feynman

विशाखा पाटील
Wed, 11/12/2014 - 19:33 नवीन
आत्ता एकच आठवतंय - "Surely You're Joking, Mr. Feynman!" हे भौतिकशास्त्रातल्या नोबेल पारितोषिक विजेत्या Richard Feynman ह्यांचं आत्मचरित्र आहे. ह्यात एका भन्नाट व्यक्तिमत्वाचे भन्नाट किस्से आहेत. त्यांची कथनशैली साधीसरळ आणि मस्त विनोदी आहे.
  • Log in or register to post comments

-१

बॅटमॅन
Wed, 11/12/2014 - 19:36 नवीन
काही असलं तरी ते पुस्तक विनोदी म्हणवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

खिक्क्क

रामपुरी
गुरुवार, 11/13/2014 - 01:55 नवीन
अहो त्यांना एकच पुस्तक आठवलंय ते पण इंग्लिश.. तुम्ही कशाला त्यावर पाणी ओतताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

संपूर्ण पु.ल. रामनगरी अनुदिनी

टवाळ कार्टा
Wed, 11/12/2014 - 19:40 नवीन
संपूर्ण पु.ल. रामनगरी अनुदिनी
  • Log in or register to post comments

रामनगरी+१०००!

अजया
Wed, 11/12/2014 - 20:51 नवीन
राम गणेश गडकरींचं संपूर्ण बाळकराम.त्यातलं ठकीचं लग्न !
  • Log in or register to post comments

एखाद्या भाषेतला विनोद समजला

आदूबाळ
Wed, 11/12/2014 - 21:38 नवीन
एखाद्या भाषेतला विनोद समजला याचा अर्थ त्या भाषेची समज चांगली आहे. कारण विनोद हा त्या त्या भाषेचं, संस्कृतीचं लेणं घेऊन येतो. उदा. पुलंच्या "वीट येणं कशाला म्हणतात, ते त्या दिवशी मला समजलं" साठी "वीट येणं" हा वाक्प्रचार माहीत असायला पाहिजे. वुडहाऊसच्या "फुल मून" मधल्या "I thought for a moment of saying “My mate!”, but decided against it because it seemed to me to have too nautical a ring." या वाक्यातला विनोद समजायला आरमाराच्या इंग्रजी परिभाषेत बोटीवरच्या अधिकार्‍याला mate म्हणतात याची जाणीव हवी. मला मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा येतात. (आमचं हिंदी म्हणजे..ह्या ह्या ह्या...) इंग्रजी विनोदी साहित्याची ओळख - वरील कारणामुळे - फार उशीरा झाली. तर हा प्रतिसाद इंग्रजीतल्या प्रचंड आवडलेल्या विनोदी पुस्तकांबद्दल आणि लेखकांबद्दल. १. वुडहाऊस पेल्हम ग्रेनविल वुडहाऊस हा लेखक इंग्रजीतल्या विनोदी लेखनाचा बादशा. जीव्ज-वूस्टर, ब्लँडिंग्ज कासल, गोल्फ-कथा असं त्याने विपुल लिहिलेलं आहे. कधीही कोणतंही पुस्तक उचलावं आणि रंगून जावं. २. सू टाउन्सेंडच्या "आद्रियन मोल" कादंबर्‍या आद्रियन मोल हा स्वतःला भारी समजतो. आपण मोठे साहित्यिक बुद्धिजीवी वगैरे आहोत असं त्याला उगाचच वाटतं. त्याच्या आसपासचे लोक मात्र त्याला पूर्णपणे ओळखून असतात. (लखू रिसबूडची इंग्रजी आवृत्ती.) ३. हिचहायकर्स गाईड टू गॅलेक्सी (सीरीज) विज्ञानकथा-कादंबर्‍यांची उडवलेली रेवडी. ४. फ्लॅशमॅन कादंबर्‍या फ्लॅशमॅन हा विक्टोरियन ब्रिटनमधला एक सैनिक असतो. तो अत्यंत भित्रट आणि पेद्रट असतो, पण घटना अश्या घडतात की त्याच्या शौर्याचा बोलबाला सगळीकडे होतो. इंग्रजीत विनोदी साहित्य लिहिणार्‍या भारतीय उपखंडातल्या लेखकांमध्ये - सिदीन वादुकूटने लिहिलेल्या "रॉबिन 'आईन्स्टाईन' वर्गीस" या कथानायकाच्या तीन कादंबर्‍या - तार्किन हॉलने लिहिलेल्या "विश पुरी" या प्रायवेट डिटेक्टिवच्या नर्मविनोदी रहस्यकथा - मोहम्मद हनीफ या पाकिस्तानी लेखकाचं "अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज" नावाचं कमाल पुस्तक. (हे नक्की वाचा अशी आवर्जून शिफारस करतो.)
  • Log in or register to post comments

सहमत आहे!

पिवळा डांबिस
गुरुवार, 11/13/2014 - 00:23 नवीन
पुलंच्या "वीट येणं कशाला म्हणतात, ते त्या दिवशी मला समजलं" साठी "वीट येणं" हा वाक्प्रचार माहीत असायला पाहिजे.
आणि त्याच पुलंच्या अपूर्वाईमध्ये श्रीलंकेतल्या एका हॉस्पिटलचं सुरू असलेलं बांधकाम बघतांना, "मी तितक्यात हळूच विटा पाहून घेतल्या. हल्ली लंकेत सोन्याच्या विटा नाहीत!" हे समजायला देखील ती म्हण नेमकी आठवावी लागते. भाषिक (शब्दजन्य) विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी (उदा. टिपिकल इंग्लिश ह्यूमर) मुळात ती भाषा चांगली अवगत असणं हे अतिशय आवश्यक असतं. पुलंच्या बाबतीत म्हणाल तर त्यांचं पुस्तक वाचायला घेऊन चालत्या आगगाडीच्या डब्यात ठो ठो हसून अख्खा डबा डोक्यावर घेणारे आणि त्याचबरोबर पुलंचं पुस्तक वाचताना चेहर्‍यावरची रेषाही न हलणारे असे दोन्ही प्रकारचे लोक पाहण्यात आलेले आहेत. प्राक्तन आपलं आपलं!! :) आंबा न आवडणारे लोकही जगात असतीलच की!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

@आंबा न आवडणारे लोकही जगात

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/13/2014 - 00:39 नवीन
@आंबा न आवडणारे लोकही जगात असतीलच की!!!>>> *YES* य्ये कही ना बात! *good*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

श्रेयअव्हेर

पिवळा डांबिस
गुरुवार, 11/13/2014 - 00:44 नवीन
तेही माझं नही. पुलंच्याच हसवणूक या पुस्तकातलं आहे!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अादुबाळ आणि पिडांकाकांशी सहमत

अजया
गुरुवार, 11/13/2014 - 12:11 नवीन
अादुबाळ आणि पिडांकाकांशी सहमत. पुलं कोळुन प्यायलेल्यासमोर पुलं न वाचलेला माणूस समोर येण्यासारखा वैताग नाही.नकळत पुलंनी आपल्या भाषेवर त्यांचं गारुड केलंय.एखादं मुल उगाच कानफटीत मारावेसे वाटणारे कार्टे दिसतं!अमूक मनुष्य एक नंबर गटणे असतो.फुळकवणी चा प्यायल्यावर रत्नांग्रीच्या समस्त म्हैशी आपोआप आठवतात.माझ्या कामात दाताचा अण्णु गोगटे झालेले पेशंट असतात!! प्रत्येकाला आपले मत असतेच.असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अवांतर

बॅटमॅन
गुरुवार, 11/13/2014 - 12:55 नवीन
आंबा न आवडणार्‍यांवर लोक इतके खार खाऊन का असतात ते कळत नाही. लहानपणी मलाही आंबा आवडत नसे, पेरू जास्त आवडायचा. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अजून अवांतर

पिवळा डांबिस
Fri, 11/14/2014 - 01:06 नवीन
लहानपणी मलाही आंबा आवडत नसे,
पण आता आवडतो ना, झालं तर मग!!! शालेय लहानपणी मलाही पोरी आवडत नसत. पण आता..... असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@शालेय लहानपणी मलाही पोरी

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/14/2014 - 10:46 नवीन
@शालेय लहानपणी मलाही पोरी आवडत नसत. पण आता.....>>> =)) चावट्ट पिडाकाका! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हिचहायकर्स गाईड टू गॅलेक्सी (सीरीज)

बोबो
गुरुवार, 11/13/2014 - 04:06 नवीन
हिचहाइकर्सची चार प्रकरणे वाचली, पन इनोद म्हनून काय सापडून न्हाय र्हायला भौ :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

वुडहाऊस __/\__

पिशी अबोली
गुरुवार, 11/13/2014 - 11:53 नवीन
वुडहाऊस __/\__ निखळ विनोद.. बाकी
हिचहायकर्स गाईड टू गॅलेक्सी (सीरीज) विज्ञानकथा-कादंबर्‍यांची उडवलेली रेवडी.
हे एवढंच वाटत नाही मला.. इतकं असंबद्ध पण तरीही सुसूत्र लिहायला काय ताकद पाहिजे(असं आपलं मला वाटतं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

पु.ल.

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/12/2014 - 22:01 नवीन
पु.ल. शंकर पाटील मंगेश पाडगावकर..... वात्रटिका
  • Log in or register to post comments

सूर्यकांत खोकले यांनी

प्रचेतस
Wed, 11/12/2014 - 22:17 नवीन
सूर्यकांत खोकले यांनी चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या चारोळी संग्रहाचे ' मी माझा..मग माझा कुणाचा' ह्या नावाने केलेले धमाल विडंबनांचे पुस्तक संग्रही आहे. एकापेक्षा एक जबरदस्त विनोदी चारोळ्य़ा ह्या संग्रहात आहेत. सध्या हे पुस्तक आवृत्ती संपल्यामुळे मिळत नाही पण मजजवळ खुद्द कवीची स्वाक्षरी असलेले हे पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments

मी माझा..मग माझा कुणाचा'

गणेशा
गुरुवार, 11/13/2014 - 13:31 नवीन
मी माझा..मग माझा कुणाचा' नावच जबराट आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

रमेश मंत्री

बोबो
Wed, 11/12/2014 - 23:53 नवीन
रमेश मंत्री यांचे विनोदी लिखाणसुद्धा छान आहे. ते जेम्स बॉन्डचे विडंबन जनू बांडे साठी प्रसिद्ध आहेत. पण त्यांची बाकीची विनोदी पुस्तके सुद्धा मला आवडली होती.
  • Log in or register to post comments

एक नंबर पु.ल. कधीही कुठलंही

रामपुरी
गुरुवार, 11/13/2014 - 02:01 नवीन
एक नंबर पु.ल. कधीही कुठलंही पुस्तक काढून वाचत बसावं. नंतर मिरासदार, शंकर पाटील, चिं वि जोशी
  • Log in or register to post comments

पु.ल. देशपांडे...

मुक्त विहारि
गुरुवार, 11/13/2014 - 02:11 नवीन
पु.भा.भावे द.मा.मिरासदार शंकर पाटील मंगला गोडबोले प्र.के.अत्रे मुकुंद टांकसाळे
  • Log in or register to post comments

भावे

पिवळा डांबिस
गुरुवार, 11/13/2014 - 12:02 नवीन
भाव्यांचं जळजळीत लिखाण वाचून मिसळीची तर्री प्याल्यासारखं वाटतं. पण त्यांचा तो "नसीमबानूने चड्डी चोरली" तो लेख मात्र अप्रतिम!!!! ;) (अधिक माहितीसाठी पिडांकाकांना मस्का लावण्याची बोली आता सुरू करीत आहोत! बोला एक हजार!!) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हा हा हा

पप्पु अंकल
गुरुवार, 11/13/2014 - 12:13 नवीन
वर्तमानपत्र व एक विचार मंच वाला तुफान विनोदी ब्लोग
  • Log in or register to post comments

विशिष्ट लेखकांचे सर्व विनोदी

सस्नेह
गुरुवार, 11/13/2014 - 13:24 नवीन
विशिष्ट लेखकांचे सर्व विनोदी लेखन आवडते. म्ह्णून पुस्तकाचे नाव न देता लेखकांची यादी दिलीय पु.ल. जयवंत दळवी गंगाधर गाडगीळ द. मा. रमेश मंत्री
  • Log in or register to post comments

ब्रम्हे आणि ज्यु.ब्रम्हे

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/13/2014 - 13:39 नवीन
ब्रम्हे आणि ज्यु.ब्रम्हे
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/13/2014 - 14:27 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ज्यु ब्रह्मे खरोखरच कहर आहेत.

आदूबाळ
गुरुवार, 11/13/2014 - 15:24 नवीन
ज्यु ब्रह्मे खरोखरच कहर आहेत. मी लैच मोठा पंखा आहे त्यांचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मीही!!!! लैच मोठा पंखा आहे,

बॅटमॅन
गुरुवार, 11/13/2014 - 15:32 नवीन
मीही!!!! लैच मोठा पंखा आहे, गरगरां गरगरां फुल्ल स्पीड ५ वर फिरणारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

एका हाताने पेरु खात आणि दुसर्

पिशी अबोली
गुरुवार, 11/13/2014 - 15:46 नवीन
एका हाताने पेरु खात आणि दुसर्‍या हातात ब्रह्मेचा लेख घेऊन वाचत गरागरा फिरणारा बॅटमॅन डोळ्यांसमोर दिसला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

गरागरा फिरायला आम्ही आमच्या

बॅटमॅन
गुरुवार, 11/13/2014 - 16:40 नवीन
गरागरा फिरायला आम्ही आमच्या 'बॅट' नामक उडनपंखी खटोल्यात बसलो होतो ते सांगायचें विसरलांत बरें? नुस्तेच गरगरां फिरावयास आम्ही तें काय शक्तिमान की कवण समजलांत कायें ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

बादवे शक्तिमान स्वतःभोवती

बॅटमॅन
गुरुवार, 11/13/2014 - 16:41 नवीन
बादवे शक्तिमान स्वतःभोवती प्रकाशवेगाने प्रदक्षिणा घालत असतानाचा आवाजही अतिशय रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ज्यु.ब्रम्हे _/\_

अजया
गुरुवार, 11/13/2014 - 16:12 नवीन
ज्यु.ब्रम्हे _/\_ =)) पोपा मॅडम आणि मुक्तपिठावरचे हिरव्या देशाला जाऊन आल्यावर लेख लिहिणारे यांची पण पंखी आहे मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी एक

असंका
गुरुवार, 11/13/2014 - 15:55 नवीन
पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी एक अफाट विनोदी पुस्तक वाचले होते. लेखक नक्कीच वसंत सबनीस होते. पुस्तकाचे नाव बहुतेक 'सबनिशी'. मी 'मसाप'च्या वाचनालयात हे पुस्तक घेतले वाचायला. पण मला इतकं हसणं आवरीना की शेवटी मी टेबलावरून उठून कपाटांच्या आडोशाला जाऊन वाचायला लागलो. इतकी वर्ष झाल्यामुळे त्या पुस्तकात काय होते ते काही आता आठवत नाहिये. फक्त आवाज खाली ठेवून हसण्याची माझी खटपट लक्षात आहे.... सर्वात आवडते मात्र श्री कृ कोल्हटकरांचे 'सुदाम्याचे पोहे'.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा