काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत.
सर्वात महत्त्वाचे ..
मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही. मी मिपावर येतो ते एक मिपाकर म्हणूनच, चार मित्र भेटावेत ,त्यांच्याशी जीवाभावाच्या गप्पा व्हाव्यात, थोडी माफक करमणुक व्हावी , थोडसं वास्तव इतरांना ज्ञात करुन द्यावे ( अर्थात दुसरं काही येत ही नाही मला, ग्रास रूट लाच काम करु शकतो मी ! ) या शुध्द हेतुने येतो ! हा धाग्या काढण्याचे कारण म्हणजे L0 लेव्हलच्या काही प्रश्नांना उत्तरे देणे. L1, L2 आणि L3 प्रश्नांकरिता कृपया मला व्यनी, मेल , फोन करावा. मिपाचा युएसपी, मान राखावा हि नम्र विनंती ! अर्थात , ऑफीस काम, प्रचार, वैयक्तीक कामे ही मागे आहेत ..जस जमेल तसे उत्तर देईन ..आणी शिव्या ही खाईल ( तेव्हढा हक्क मनसेवर अपेक्षा ठेवणार्यांचा आहेच, अर्थात we are not superman हे ही लक्षात ठेवावे ) अर्थात अभ्यास नसलेले, केवळ बातम्या बघुन स्फुरण चढलेल्यांनी, टवाळ, पुर्वग्रहदुषितांनी कृपया दुर रहावे ही पुन्हा विनंती करतो....
माझा हेतु - पाच वर्षांत एक चान्स मिळतो आपल्या सर्वांना ! त्यानंतर साधारण १८२५ दिवस , ४४४४८ तास हात चरफरत बसावं लागत ! योग्य तो निर्णय घ्या..मनसे असो वा ईतर कुठला ही पक्ष !!
तु कोण रे बाजीराव...
माझ नाव सुहास , होय फक्त सुहास ..मी आडनाव सांगत नाही आणि जे आवर्जुन सांगतात त्यांना फाट्यावर मारतो. त्याला कारण आहे आणी कारण सर्वपरिचित आहे. मी कॉलेजला असतानापासुनच राजच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो. एकुण चार कॉलेज अंडर मध्ये होती सक्रीय राजकारणात आहे ( मला बाहेर उभ राहुन वा एसी त बसुन राजकारण वा समाजकारण करता येत नाही ) तेव्हापासुन ते आजपावेतो म्हणजे एक महिन्यापुर्वी नौकरी धरल्याने मला सध्याचा पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. सध्या मी हॉरीजॉन्टल मध्ये आहे . काय आहे हॉरिजॉन्टल ते ही सागंतोच आहे !! इतर परिचय माझ्या लेखांवरुन आजवर झाला असेल असे मी गृहीत धरतो ( स्वतः ची लाल नव्हे परिचय )
who the hell is Raj Thakare ?
हाच प्रश्न जया भादुरी ला पडला काही वर्षांपुर्वी ...असो ....सेनेशी कट्टर असताना हळु हळु सेनेच विभाजन व्हायला लागल्यावर बाळासाहेबांपर्यंत पोहोचायची मुष्किली आमच्यासारख्यांवर आली, रस्त्यात बरेच खड्डे लागायला लागले, पहिला सर्वात मोठा खड्डा होता संजय, इतर तर काही विचारुच नका दोन अडीज वर्षे एक ही अॅन्डॉसमेंट ( बाळासाहेबांच सही असलेले शिफारस पत्र ) आली नाही..तेव्हा कार्यकर्ते झुंडीने राज ठाकरेंकडे जात होते, एव्हाना राज ठाकरे राजकीय सन्यास घ्यायच्या तयारीत होते. अध्यक्ष म्हणुन उध्दवांच नाव ही त्यांनीच सुचविले..त्यांना विनंती करत होते, तेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या, कार्यकर्त्यांना समजावयचे , अरे त्याला थोडा वेळ द्या करेल तो ..बरच नंतर बिघडत गेलं ..राज ठाकरेंनी शेवटी पक्ष बनवायचा निर्णय घेतला. ( त्यावेळी त्यांच्या कडे स्वतःसाठी काहीतरी करायच असतं तर गप एखाद्या लिडींग पार्टीमध्ये जावुन मंत्रीपद घेवुन आयुष्यभराची सोय लावुन घेतली असती )...पाठीहुन राजकारण !!
मनसे आणि ईतर पक्ष
कम्पेर मांडतो आहे, हे खेदकारक आहे माझ्यासाठी ही ! मोठ्या पवांरानी हातान घालवुन घेतलय , हे कोणी ही मान्य करेल, महाराष्ट्राची (जी आहे ती ) प्रगती आणि अधोगती दोन्ही पण या राजकारणी घराण्यामुळे आहे, जितके प्लॅनींग त्याच्या दुप्पट पैसै खाणे आणि अंगात असलेली मुसद्दीगिरी ..एक उदाहरण सांगतो , मागच्या वर्षी देशमुख साहेब सोलापुरसाठी प्यायला पाणी मागत होते, तो मुद्दा सफाईदार पणे कोर्टात ढकलला गेला , जेणे करुन उजनी पर्यंत पाणी पोचण्यास वेळ लागावा ! खर तर एका सही मध्ये तो पास करत आला असता ..कारण घडले नंतर जेव्हा पाणी सोडले गेले..तेव्हा ते दौंड च्या धरणात अडले) अडणारच होते. त्यांनतर चा त्यातले १० % उजनी पर्यंत पोचले आणी ते पोचेपर्यंत पाउस ही पडला ..चांदी झाली ती दौंड च्या शेतकर्यांची !! राज्याला प्यायला पाणी नव्हते आणि तिथे शेतकर्यांना उसाला देखील पाणी , यातुनच समजा कसा चालतो तो पक्ष ..मुंबईत या पक्षाच्याकार्यालयात सहा एका पाठी एक अश्या सहा रुम्स आहेत..यामध्ये शेवटच्या खोलीत पैशाचे व्यवहार मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत. दुसरा त्यांचा सहकारी पक्षातली मॅडम आली होती दुष्काळी भागाचा दौरा करायला , तिला डांबरी रोड दिसला ओला झालेला, तिच्या त्या इटालियन-हिन्दी अॅक्सेन्ट मध्ये " पाऊस तर आहे इथे " ऐकताना वाटल एक सट्टदिशी ....असो .....ढेकळ फुटली की नाही कळत नाही....प्रश्न च कळत नाही..उत्तर कधी शोधणार ? ..अजुन आहे भाजपा आणी सेनेविषयी ..पण ते कदाचित नंतर आता नाही ..
मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे गी ..हा विभाग विचार देतो ..टोल विषयक आधी अभ्यास या विभागानेच मांडला सुरु केला. अर्थात देवेंद्र आणी सोमय्या आरोप करत होते , पण तसा अभ्यास नव्हता तिथे...केवळ एक दोन कार्यकत्यांची पत्र आणि त्यानंतर जनजागृती सक्रीय गटाकडे आली ..त्यांचा आडत्यांमुळे निर्माण झालेले प्रश्न आणी त्याच सोल्युशन बघुन मी खुप ईम्प्रेस झालो होतो, सरकार येवो न येवो , हा मुद्दा डिसेंबर च्या सुमारास सुरु करणार आहोत ( डिसेंबर का ? आत्ताशी कुठ सक्रीय गटाकडे निवेदनाच्या कॉप्या गेल्यात , विभागवार )
पक्ष बांधायला आणि Blue Print ला वेळ का ?
..पक्ष स्थापनेचा ज्या दिवशी विचार पक्का झाला त्यानंतर दोन वर्षांनी पक्ष स्थापन झाला, स्वतः राजच्या भाषेत सांगायचे तर ..काय तमाशाचा फड काढत होतो का गणेश मंडळ स्थापन करत होतो ? असो ...जेव्हा पक्षबांधणीच काम सुरु झालं तेव्हा त्याचे सरसकट दोन भाग केले गेल , सक्रीय आणि असक्रीय ( यालाच हॉरिझॉन्टल म्हणतात ) ..असक्रीय हा केवळ वैचारिक बाजु संभाळणार असे ठरले..खुप नामवंत मंडळी आहेत यात, उद्योगपतीही आहेत ..हि लोक्स सदोदित राज ला सल्ले ,फॅक्स संवाद आणी वेळ पडली की कानपिचक्या ही देत असतात, हा विकास आराखडा मांडणारे तेच !! Primary Blue Print त्या आधी एक वर्षे ..होय वेळ लागतो , इतका कचरा आणि कॉम्प्लिकेशस करून ठेवलं आहे की विचारु नका ..बर झाल ते आरटीआय तरी आल , नाहीतर घोळच होता ..एक साधी माहीती ...माझ्या वार्डामध्ये दरिद्री रेषेखाली किती जनता आहे ? हे माझ्यापर्यंत पोचण्यासाठी पंधरा दिवस लागावेत असा लेखी नियम आहे फक्त .. वास्तवात तीन ते चार महीने लागतात , ते ही दहा वेळा फॉलो-अप केल्यावर !! काल ती Blue Print रिलीज होईपर्यंत त्यात आजवर साधारण १०२ वेळा सुधारणा झाल्यात. बरेच जण म्हणताहेत की ती विकास आयोजन आराखड्याची कॉपी आहे , त्यांना दंडवत सांगा आमचा ..या सरकारी (तेच आयोजन वाले) कर्मचार्यांशी भेट घालुन देतो मी ! ( पुण्यात इथं मागं लाल देवळापाशी ' राजधानी बार ' मध्ये भर दुपारचे सापडतील तुम्हाला !! ) प्रत्येकाला एक कागद द्या आणी म्हणा की माझ्या इथुन गटार आहे ते शाळेच्या गेट मधुन जाते, शाळेतल्या विद्यार्थांना तिथल्या ड्रेनेज चा त्रास होतो, ते तिथुन दुसरीकडे हलवण्यासाठी व शाळा ड्रेनेज मुक्त करण्यासाठी दहा बुलेट पाँईंट्स लिहुन द्या ...शप्पथ्थ ! लिहीले तर मी राजकारण हा शब्द देखील काढणार नाही तोंडातुन !!
बर्याच सुचना आल्या आहेत त्यात , मी स्वता: मागच्या वर्षी पुणे ग्रामीण फिरुन माहीती आणुन पोचवली आहे ..हा केवळ आराखडा आहे .बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे ..केवळ मुंबईच शांघाय करु, मेट्रो २००१ ते २०१० ते २०२० ते २०३० पर्यंत करूच अशी काही प्रतिज्ञा नाही ..विश्वास ठेवा ती पुर्ण अभ्यासाअंतीच मांडलेली आहे माझ सरळ-सरळ मत अस आहे की .
राज्य कारभार करता येत नसेल तर तो किमान पारदर्शक ठेवावा ..
चुका ...
होय ! गंभीर चुका झाल्यात मनसे कडुन , पण कार्यकर्ते ते पोचवत नाहीत असे काही नाही राज कडे , व्हेरी फ्रॅन्कली !! ..पोचवितात ...अगदी आता जी महापौरपदासाठी राष्ट्रवादीची मदत ई. ..उत्तर मिळतात ...ज्यांनी मदत केली ते पक्ष बदलुन मनसे मध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत. आता राजिनामा देवुन, पुन्हा निवडुन येवुन मग पांठिबा देण्यापेक्षा तिथल्या स्थानिक मनसेने त्याला होकार दिला. निवडणुका पाठिशी लावायच्या नव्हत्या .
आणि दुसर काय ते खासदारकीच्या निवडणुका ...त्यावेळी माझ्यासकट एक खुप मोठा गट होता जो म्हणत की खासदारकी ला उमेदवार देवुच नका. मोदींना पांठिबा द्या आणि संपवा ..दुसरा गट मात्र , विषेशतः मुंबईवाले त्यांनी मात्र पारंपारिक सेनेच्या किमान उभ रहाण्यासाठी तरी उमेदवार द्याच असा आग्रह धरला , मत विरोधात गेली ..माझ मत अस आहे की ती गेली मोदींमुळे, सेनेमुळे नाही .असो ..ही खरोखरच घोडचुक होती .... अर्थात त्यातुन ही बाहेर येवु ...मात्र पुन्हा एकदा सांगतो ..तुमच मत मग ते कोणत्याही पक्षाला असो ..देताना फक्त विचार करा ...चेपुवर आंजावर दोन चार विनोदांचा आधारावर जावु नका ..अगदी आप चं असल तरी ...
अरे हो, Blue Print बद्दल अजुन ही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला बिनधोक पणे p9373991526@gmail.com वा 9665185564 ( हा व्हाट्स अॅप चा पण नंबर आहे ) विचारु शकता वा मिपावर व्यनी करा ...इथे उत्तर देवु शकणार नाही, देणार नाही ( मी इथे एक मिपाकर म्हणुनच वावरू इच्छीतो ) धन्यवाद !
वाचने
51372
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
In reply to ऋषि आता काय मत आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान :)
In reply to :) by क्लिंटन
:)
In reply to छान :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मत अजूनही तसेच
In reply to ऋषि आता काय मत आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा हा हा , लय शोधुन- शोधुन
In reply to माझे विचार आणि कल इथे by ऋषिकेश
लोल !
In reply to हा हा हा हा , लय शोधुन- शोधुन by सुहास..
खिक्क
In reply to लोल ! by सिद्धार्थ ४
आज जर मी मनसे चा काम करत नसतो
In reply to खिक्क by सुहास..
बापरे !
In reply to आज जर मी मनसे चा काम करत नसतो by सुहास..
आमची चा आमची नोट पाचची होती
In reply to हा हा हा हा , लय शोधुन- शोधुन by सुहास..
आमची चा आमची नोट पाचची होती हो ! मान्य करतो, फाटली ती नोट , पण तुमची तर १००० ची नवी कोरी होती............... प्रिय सुहास आत्तापर्यंतचे तुमचे सर्व प्रतिसाद वाचतोय त्यात तुम्ही जे मनसेचं सोडुन दुस-बद्दल बोलताय तेच मुळात चुकतंय. मनसेबद्दल तुम्ही स्वत:च बोलायला धागा काढलाय तेव्हा दुस-याने काय केले ते मुद्दे गैरलागु आहेत. मनसेनं काय केलं ? मनसेच्या पनिपताचं योग्य कारण ? मनसेच्या भविष्यातल्य वाटा ? मनसेची अवस्था ? नेतृत्त्व ? विश्वास ? ब्ल्युप्रिंट ? भाषा ? उणिवा, प्रचारातील मुद्दे याबद्दल अजुनही तुम्ही मोकळेपणाने बोललेला नाहीत आणि कार्यकर्ता म्हणुन तुम्हाला ते जमणारही नाही, असं वाटतं. आणि तुमच्याकडुन तशी अपेक्षा करणं आता जवळ जवळ मी सोडुन दिलंय. मनसेला विकासाचं एक उत्तम मॉडेल बनविण्याची नाश्कात संधी होती. संपूर्ण महाराष्ट्र नाश्कात काय घडतं त्यावर लक्ष ठेवून होतं तुमच्या नेतृत्वाला तिथे विकासाचा कोणताही कस लावता आला नाही. महाराष्ट्रात सर्वात अगोदर नजरेत भरवणारी साथ मनसेला कोणी दिली असेल तर ती नाश्काने दिली तिथेच तुम्ही पहिली बाजी हरलात. महानगरपालिकेत तुम्ही काही पदांच्या मोहापाई तुम्ही शिवसेना- भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. ( महिला व बालकल्याण उपसभापतीपद ) मुळात पक्षाला अजुन कळलंच नव्हतं की आपण स्वतंत्र राह्यचं की कोणाकडे जाऊन भांडीकुंडी घासायची. आणि मनसेचे पाय असे चिखलात रुतत गेले. नगरलाही तुम्ही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपक्षाशी घरोबा केला. औरंगाबादमधे जिल्हापरिषदेत तुम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर संसार थाटला. कोणतीही स्वत:बद्दल ठोस भूमिका न घेता सत्तेशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात मनसेने स्वत:चे अस्तित्व असे हळुहळु गमावले अतिशय बेसलेस भूमिका गेल्या काही वर्षा बघायला मिळाली आणि तुमची ब्ल्यु प्रिंटही तुम्हाला कुठेच वाचवू शकली नाही. त्याचा निकाल संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. सत्तेसाठी राष्ट्रवादीबरोबर घरोबा करायचा आणि जाहीर भाषणात शिवसेनेला नावं ठेवतांना आपलं नेतृत्व लोकसभेच्या भाषणात म्हणत होतं '' एकीकडे शरद पवार यांच्याशी चुंबाचुंबी करायची, तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून लाई चना आणि उत्तर प्रदेश दिन साजरे करायचे, हा मराठी माणसांचा विश्वासघात नाही का? '' अरे सत्तेसाठी चुंबाचुंबी कोणी केली, हे आता सर्वांना कळलं आहे. बाकी राहीली आमच्या अभ्यास वाढवायची गोष्ट. आमचा अभ्यास जेमतेमच आहे पण मनसेबाबत आता चांगला झाला आहे. आपल्या मनसेने राज्यात एकूण ४० ठिकाणी टोलबाबत माहिती संकलन केली काही मुद्दे आजही आपल्या सायटीवर बघायला मिळतात एकच मला सांगा मनसेने आणि त्यांच्या आमदारांनी विधानसभेत टोलबाबत भूमिका बदलली पाहिजे यासाठी नजरेत भरतील अशी कृती केली. (आमच्या आमदारांनी प्रशांत बंब यांनी लासुर रोडावरील रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे स्वतः तुरुंगात गेले आणि कागदोपत्री अभ्यास करुन तो टोल बंदच केला) आपल्या मनसेच्या आमदारांनी अशा किती अनाधिकृत टोल बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. मनसेची गाडी आहे म्हणुन कितीतरी कार्यकर्त्यांनी टोल चुकवला हेच आपल्या आंदोलनाचे यश म्हणायचे का ? लोक साटं लोटं झालं म्हणतात त्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही, त्याबद्दल मला बोलायचं नाही. कोणत्याही प्रशासकीय आंदोलनासाठी अभ्यास करावा लागतो ही गोष्ट मान्य. मनसेने किती आंदोलनाचा अभ्यास केला आणि किती आंदोलने यशस्वी केलीत. माझं निरिक्षण असं आहे, कोणत्याही आंदोलनाची हवा करायची आणि ते आंदोलन अर्धवट सोडायचं हाच एकमेव उद्योग मनसेने केला. दुकानाच्या पाट्या मराठीत लावा. (काही दिवस हवा केली सोडलं अर्धवट), मराठी भाषा अभ्यासक्रमात आवश्यक विषय असावा म्हणुन आपण शाळा महाविद्यालयांच्या संस्थाचालकांना पत्रे लिहिलीत. शाळा आणि महाविद्यालयामधे भाषा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी अभ्यास मंडळे असतात आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांना शासनाने असा विषय अभ्यासक्रमात समावेश करावा असे शासनाने निर्णय घेतला पाहिजे त्यासाठी आमदारांनी मुख्यमंत्र्यावर दबाव आणला पाहिजे, यातली कोणती कृती आपल्या आमदारांनी केली. मुळात भाषा अभ्यासक्रमात समावेश करावी यासाठी संस्थाचालकांना पत्रे लिहिणे हेच मुळी हास्यास्पद होतं. हा मुद्दाही नंतर बाजुला पडला. रेशनकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, टॅक्सी-रिक्षाचे परवाने या बाबत बाहेरच्या लोंढ्याला रोखून नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी नुसती भाषणं केली. मला वाटतं टॅक्सी रिक्षा परवाने स्थानिकांना दिलं पाहिजे यासाठी काही दिवस आंदोलने केली आणि तेही अर्धवट सोडलं. सुहास एक नै शंबर गोष्टी मनसेने अशा अर्धवट सोडल्या. अजून एक गोष्ट सांगतो साहेबांना वाट्तं आपलं भाषण उत्तम होतं. लोक ऐकायला येतात. लोक ऐकायला येतात म्हणुन तुम्ही त्यांना काहीही बोललं पाहिजे का ? लोक गर्दी करतात, घोषणा देतात ते त्यांच्यावरील प्रेमाने त्यांच्यवर राग व्यक्त करण्यासाठी नाही. अतिशय मगरुरी वागण्यात दिसते. एक उदाहरण आठवलं आमच्या संभाजीनगरात कै. बाळासाहेबांचं भाषण होतं. सभेला ही गर्दी, नुसत्या घोषणा, साहेब भाषणाला उभे लोक आवरेचना. साहेब काहीच बोलले नाहीत नुसते शेतकर्यासारखी जागीच बैठक मारली दहा मिनिटे साहेब बोलले नाहीत आणि नंतर ते मैदान टाळ्यांनी दनाणुन गेलं. आपल्या साहेबांसारखे पाच मिनिटात व्यासपीठ सोडून गेले नाहीत. जाऊ द्या मनसेवर किती अन काय बोलणार. आणि आपल्याकडून कोणतही अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण येणार नाही, हे मला एव्हाना कळलं आहे. आता आडात नै तर पोहर्यात कुठून येणार. असो, लिहिण्यासारखं खुप आहे पण थांबतो. -दिलीप बिरुटे
+११११ सहमत !!!
In reply to आमची चा आमची नोट पाचची होती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर, एक नंबर प्रतिसाद!!
In reply to आमची चा आमची नोट पाचची होती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर... एकदम क ड क
In reply to बिरुटे सर, एक नंबर प्रतिसाद!! by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }एक मिनीट !!
In reply to आमची चा आमची नोट पाचची होती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि हे माझे नवीन प्रश्न !!
In reply to एक मिनीट !! by सुहास..
धन्यवाद.
In reply to आणि हे माझे नवीन प्रश्न !! by सुहास..
२४ नोव्हेंबर पासुन हिवाळी
In reply to आणि हे माझे नवीन प्रश्न !! by सुहास..
सुहास साहेब, या वेळी मनसेची
In reply to २४ नोव्हेंबर पासुन हिवाळी by काळा पहाड
सुहास साहेब, तुम्ही खरच काही
In reply to आणि हे माझे नवीन प्रश्न !! by सुहास..
मग तर लिहाच
In reply to सुहास साहेब, तुम्ही खरच काही by प्रसाद१९७१
पाच ...केवळ बारा - हजार आणी
In reply to मग तर लिहाच by क्लिंटन
एक... हे अदानींना २६० एकर
In reply to आणि हे माझे नवीन प्रश्न !! by सुहास..
सर्व व्यक्तिगत तरीही...
In reply to एक मिनीट !! by सुहास..
तयार रहा !
In reply to सर्व व्यक्तिगत तरीही... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो हो तयार आहे.
In reply to तयार रहा ! by सुहास..
हा प्रतिसाद कधी प्रकाशित करणार आहात?
In reply to तयार रहा ! by सुहास..
बाकीच्या धाग्यांवर प्रतिसाद
In reply to हा प्रतिसाद कधी प्रकाशित करणार आहात? by लंबूटांग
>>> आधी पोट निवडणुका झाल्या
In reply to हा हा हा हा , लय शोधुन- शोधुन by सुहास..
मनसेला एक महापालिका धड
सहमत.
In reply to मनसेला एक महापालिका धड by श्रीगुरुजी
मस्त लेख,
.
In reply to मस्त लेख, by मालोजीराव
.
शून्यहाती सत्ता
In reply to . by hitesh
.
In reply to शून्यहाती सत्ता by क्लिंटन
.
आधी हे वाचलं.
राज आणि मनसे यांची खिल्ली
मनसे विषयी काही गंभीर आक्षेप
राठांचे एक नशिक मधले भाषण
.
In reply to राठांचे एक नशिक मधले भाषण by प्रसाद१९७१
आय बि एन लोकमतवर याच विषयावर
Wed, 22/10/2014 - 15:50 -
+१ अतिशय सकारात्मक प्रतिसाद
In reply to Wed, 22/10/2014 - 15:50 - by मोदक
.
अगदी
In reply to . by hitesh
.
In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर
अहो असले प्रश्न विचारणे
In reply to . by hitesh
.
निवडणुकीचा खर्च भरुन निघायला
In reply to . by hitesh