छगनलालांचे सापळे (भाग ८)
आधीचा भाग : http://misalpav.com/node/29328
==========================================================================
किरण हा साहेबांचा तिसरा मुलगा.आला तोच मुळी तोंडात पानाचा तोबरा भरून.त्याने स्वतःहून काहीच न विचारल्याने, मी पण जास्त लक्ष न देता, स्वतःला कामात जुंपून घेतले.तो त्याच्या मनाचा राजा तर मी माझ्या मनाचा बादशा.गेला उडत.
साधारण पणे १च्या सुमारास साहेबांचा फोन आला.त्यांना रिपोर्ट केला आणि जेवायला बसलो.सुदैवाने माझ्या जेवणाच्या डब्याची जबाबदारी आमच्या एका शेजार्याने घेतल्याने, ती चिंता न्हवती.पहिल्या दिवसापासूनच मी एक धोरण ठेवले होते, की कामगारांना जास्त दडपण द्यायचे नाही.त्यांना विश्र्वासांत घेवून रोजच्या कामाचे ध्येय ठरवले आणि ते साध्य होईपर्यंत घरी न जायचे ठरवले.जेवण होते न होते इतक्यात फोन वाजला.समजले की साहेबांना चेकच्या फ्रॉड संदर्भात अटक झाली.(आज ना उद्या, हे होणारच होते.)
किरण लगेच संधीचा फायदी घेवून मुंबईला पळाला.तो गेला ते बरेच झाले.नाहीतरी दिवसभर नुसता टाइमपासच करत होता.सतत पान खाणे आणि चहा सिगरेट प्यायला बाहेर जाणे.एक ३/४ तासांतच ह्या मुलाचे गुण आम्ही सगळ्यांनीच जोखले.
एक तीन-चार दिवस झाले असतील नसतील, तोच साहेब स्वतःच सकाळी सकाळी फॅक्टरीत हजर झाले.ह्यावेळी किरण पण बरोबर होता.बिन तोबर्याचा किरण मी प्रथमच बघत होतो.
आल्या आल्या साहेबांनी मला आणि किरणला केबीनमध्ये बोलावले.माझ्या समोर त्यांनी किरणला फैलावर घेतले.किरणला फार काही त्रास होत न्हवता.त्याचा चेहराच त्याच्या मनांतील कोडगेपणा सांगत होता.हा मानसिक कोडगेपणा फार घातक, साला एकदा चिकटला की चिकटला.लवकर जात पण नाही आणि कुटुंबियांची फार दारूण अवस्था करून टाकतो.
साहेबांनी आता दमणलाच मुक्काम ठोकला.एक ४/५ दिवस गेले असतील.एक दिवस दुपारी अहमदाबादच्या ऑफीसमधून बोलावणे आल्याने साहेब अहमदाबादला निघून गेले.साहेब असे पर्यंत किरण एकदम सुता सारखा होता पण साहेब जाताच त्याचा ताळतंत्र सुटला.साहेब गाडीत बसतायत न बसतायत तोच किरण गायब झाला.तो आला त्यावेळी रात्रीचे ८ वाजले होते आणि आमचे काम जवळपास संपत आले होते.टेबलावर अजून ३/४ मशीन्स होती.
माझे टेस्टींगचे काम तात्पुरते संपल्याने मी थोडा रिकामाच होतो.किरणने मला केबीनमध्ये येण्याची खूण केली.त्याने माझ्या समोर आज रात्रीच्या जेवणाचा प्रस्ताव ठेवला.एक क्षण भर विचार करून मी होकार दिला.
रात्री ९च्या सुमारास इतर सगळी मशीन्स पण हातावेगळी केली.पॅकींग आणि स्टँपिंगसाठी इतर कामगारांना सुचना दिली आणि मी किरण बरोबर निघालो.
ठरल्याप्रमाणे गुरुक्रुपालाच बसलो.किरणने ऑर्डर दिली.मी ह्यावेळी कूठलेही मद्य न प्यायचे ठरवले होते.घरी आमची बायको आमच्यासाठी वाट बघत असतांना इथे जेवण्याची हौस कुणाला? काही काही गोष्टी टाळता येत नाहीत तर काही गोष्टी नक्कीच टाळाता येतात.
किरण हे एक वेगळेच आहे, हे मला त्या दिवशी समजले.जेमतेम १ क्वार्टर पिवून होतेय न होतेय, तोच त्याने वेटर बरोबर वाद उकरून काढला.कारण काय तर म्हणे वेटरने त्याला खून्नस दिला.कुठल्याच बार मधील कुठलाच वेटर खून्नस देत नाही.सुदैवाने मालक चांगला असल्याने प्रकरण जास्त न वाढवता, त्याला घरी घेवून गेलो.जातांना सरळ रिक्षा केली.सुदैवाने रिक्षावाला ओलखीचा होता.दमणला एक-दीड वर्ष रहात असल्याने आणि गांव तसे छोटेच असल्याने बरेच जण निदान तोंड-ओळख दाखवण्यापुरते तरी ओळखीचे होतच.वाटेतच किरणने रिक्षात उलटी केली.रिक्षावाला जाम वैतागला होता.पण मी त्याला थांब अशी खूण केली. बेल वाजवली आणि दार उघडायची वाट बघत बसलो.
दार उघडले तेच मुळी साहेबांच्या बायकोने.तिच्या मदतीने किरणला त्याच्या रुममधील बेडवर झोपवून मी निघालो.सहज म्हणून पँट कडे बघीतले, तर त्यावर उलटीचे कण उडलेले.साहेबांच्या बायकोला बाथरूम कुठे आहे असे विचारले.तिच्या मार्गदर्शनानुसार बाथरूम मध्ये जावून पँट धूतली.बाहेर आलो.
बाथरूम मधून बाहेर येताच, साहेबांच्या बायकोने चहा घेणार का? अशी खूण केली.खरे तर मला नकार द्यायची तीव्र इच्छा झाली.पण सकाळ पासून काम आणि साहेबाच्या मुलाच्या पराक्रमांनी इतका त्रासलो होतो की, चहा घ्यावासा वाटलाच.चहा झाला आणि मी निघालो.साहेबांच्या बायकोने मी रात्री तिथेच थांबावे अशी मुक्याने सुचना केली.पण तिला नम्रपणे नकार देवून मी सरळ घरी निघालो.(आमचा वेडेपणा दुसरे काय्?वेड्या बायकोला वेडाच नवरा मिळाणार ना?)
घरी पोहोचता पोहोचता रात्रीचे ११ वाजले होते, कदाचित १२ पण असतील.घड्याळ घ्यायची ऐपत तेंव्हा तर अजिबात न्हवती आणि आज ऐपत असून पण त्या दिवसांची आठवण रहावी म्हणून घड्याळ वापरत नाही.
बायको जेवायला थांबली होती.तिच्या बरोबर जेवतांना आजचे सगळे रामायण तिला सांगीतले.सकाळी उठल्या नंतर तिने शांतपणे दुसरी नौकरी शोधा, असा सल्ला दिला.म्हणाली, तुमच्या साहेबाच्या संपर्कात जितकी माणसे येतात, तितकी सगळी काही-तरी कारणांमुळे वाया तरी जातात किंवा त्यांचे आयुष्य तरी खराब होते.
मनांत हा विचार घोळवतच मी कामावर गेलो....आणि काय योगा-योग त्याच दिवशी हे काम लवकरांत लवकर सोडायचा निर्णय मला घ्यावाच लागला.
Book traversal links for छगनलालांचे सापळे (भाग ८)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला!
कंपू जॉईन करता का???
काल मीच पयला लेख वाचला होता
मुवि, उत्कंठा वाढतीये...
खूप दिवस बंद पडलेली मालिका
++++११११
गमतीदार घटना.
सगळे भाग एकदम वाचले. मस्त
छान!
वा !! पढचा भाग येउ द्य
वाचतोय. सापळे पहिल्यापासुन
आता ब्रेक लाऊ नका.
प्रमाणीकरण देखील बनावट असेल !