✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छगनलालांचे सापळे (भाग ७)

म
मुक्त विहारि यांनी
Tue, 11/04/2014 - 18:14  ·  लेख
लेख
लेख थोडे लहान आहेत, हा आरोप मान्य आहे...पण मला थोडा-थोडाच भाग टाकणे शक्य होत आहे.तसदीबद्दल क्षमस्व. आधीचा भाग : http://misalpav.com/node/29327 ============================================================== थोड्याच वेळात अशोक आला.त्याचा चेहरा बराच उतरलेला दिसत होता.त्याने मला सांगीतले की, साहेब माझी लॉबी मध्ये वाट बघत आहेत. लॉबीत गेलो आणि साहेबांची भेट घेतली.साहेबांनी मला पुढील कामाच्या सुचना दिल्या.त्यात "माणिकलाल" नावाच्या माणसाला २ नंबरच्या चेक-बूक मधून ९० हजाराचा चेक द्यायला सांगीतले.खरे तर मागच्याच महिन्यात ह्या माणिकलालला दहा हजाराचा चेक, एक नंबरच्या चेक-बुकातून दिला होता. ह्या माणिकलालची आणि साहिबांची गांठ पडली ती अशोक मुळेच. कारण, माणिकलाल हे अशोकचेच नातेवाईक.माणिकलालचा खरा व्यवसाय हिर्‍यांना पॉलीश करण्याचा.त्यांना अजून एका धंद्यांत पैसे गुंतवायचे होते असे साहेबांच्या कानावर आले आणि त्यांनी अशोकच्या मार्फत माणिकलालला जाळ्यात ओढले.माणिकलालची आमच्या कं.त भागीदारी न्हवती पण सुरुवातीच्या मशीन खरेदीच्या वेळी ह्यांनीच साहेबांना भांडवल पुरवले होते.साहेबांनी ह्याच्या जीवावर धंदा तर सुरु केला आणि आता तर धंद्यात चांगलाच जम पण बसला होता.तरी पण साहेब माणिकलालचे पैसे द्यायला कांकू करत होता.साहेब पैशांच्या बाबतीत तसे कंजूस पण न्हवते कारण आमची हॉटेलची बिले तर सूडून द्या पण आमचा पगार पण वेळेवर मिळत होता.पण काही-काही लोकांच्या बाबतीत मात्र साहेब वेगळेच धोरण अवलंबत होते. साहेबांकडून इतर कामाच्या पण सुचना घेतल्या आणि मी रूम वर आलो. अशोकची अवस्था फारच वाईट झाली होती.आमच्या घरात माझ्या शिवाय कुणीच दारूला शिवत नाही आणि मी पण बियर शिवाय इतर कुणाच्या वाटेला जात नसल्याने, मला अल्कोहोलिक व्यक्तींचा काहीच अनुभव न्हवता.त्यामुळे आता अशोकला सामान्य स्थितीत कसे आणायचे? हा एक नविनच प्रश्र्न मनांत आला. अशोकचे सामान पण मीच पॅक केले आणि आम्ही मुंबईची बस पकडली.प्रवासभर अशोकने मला दारूसाठी पैसे मागीतले.पण मी दिलेच नाहीत.साहेबांची तशी मला स्पष्ट सुचना होती.मुंबईला आलो आणि अशोकला त्याच्या नातेवाईकांकडे सोपवून मी दमणला रवाना झालो. दुसर्‍या दिवशी माणिकलाल स्वतः फॅक्टरीत आले.ते येताच ९० हजाराचा चेक त्यांच्या स्वाधीन केला.माणुस चेहर्‍यावरून बराच सोज्वळ वाटला. पुढच्याच आठ्वड्यांत साहेब दमणला आले.आल्या आल्या त्यांनी सर्व कामगारांची मीटींग बोलावली.सगळ्यांना एक रकमी ३ महिन्यांचा बोनस दिला आणि सांगीतले की आज सुट्टी.उद्या पासून भरपूर काम करायचे आहे.आज काय ती मज्जा करून घ्या.पण उद्या पासून पुढील ३ महिने फक्त काम एके काम.सुट्टी पण नाही आणि ओव्हर टाइम पण नाही.गोव्यातील एक हजार मशीन्सची ऑर्डर पुर्ण करायची आहे.मीटींग संपली आणि साहेबांनी मला त्यांच्या बरोबर थांबवून घेतले. साहेबांबरोबर त्यांच्या दमणच्या घरी गेलो.घर एकदम मस्त होते.बाहेरून एकदम जुनेसे वाटणारे घर.एक मध्यम आकाराचा पोर्तुगीज स्टाइल बंगलाच होता.आतून मात्र साहेबांनी त्याला छान सजवले होते.घरांत जाताच, एका २०-२२ वर्षांच्या अजाण तरूणाने बाल हास्य करत स्वागत केले.मला दिवाणखान्यातील सोफ्यावर बसवून साहेब फ्रेश व्हायला म्हणून गेले.मी आता निवांतपणे दिवाणखान्याचे निरीक्षण करायला लागलो.अपेक्षेप्रमाणे तिथेच एका भिंतीवर साहेबांचा आणि त्यांच्या पत्नीचा फोटो दिसला आणि त्याच बरोबर एक बाल-हास्य करणारा २ वर्षांचा मुलगा देखील.साहेबांच्या मानाने त्यांची पत्नी फारच बेढब दिसत होती आणि थोराड पण.बहूदा साहेबांनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्री बरोबर लग्न केले असावे. फोटो निरखत असतांनाच अजून एक फोटो पण दिसला.ह्या फोटोत साहेबांबरोबर तीच गोव्यातील मुलगी पण होती.इथे मात्र साहेब थोडेसे वयस्क आणि ती तरूण दिसत होती. फोटो निरखत असतांनाच साहेब आले. गोवा प्रोजेक्ट संदर्भात बर्‍याच गोष्टींची बांधणी करण्यात आली.वेळ येताच मी अशोक बद्दल विचारले.साहेबांना ह्या प्रश्र्नाची कल्पना होतीच.कारण गेले १ ते दीड वर्ष मी आणि अशोक एकत्रच काम करत होतो.साहेबांनी सांगीतले की, अशोकची मानसिक स्थिती आता बरी नाही, त्यामुळे त्याला मानिसिक रोग्यांच्या रुग्णालयात दाखल केले आहे आणि अशोकच्या जागी आता त्यांचा मुलगा काम करायला येईल. गोवा प्रोजेक्टचे काम करता करताच संध्याकाळचे ६ वाजले.शेवटी साहेबांचा निरोप घेवून मी घरी गेलो.बायकोला रात्री कामसंदर्भात बर्‍याच गोष्टी सांगीतल्या.तिच्या सहभागाशिवाय मला पण मनापासून कंपनीत काम करता आले नसते.तिने समजावून घेतले.मी विचारले की, आता उद्यापासून मी फक्त झोपायलाच घरी येत जाईन.जेवणाचा डबा न्यायला कुणाला तरी पाठवीन.तू भूक लागली की जेवत जा.माझी वाट बघत बसू नकोस.(त्याचे काय आहे, आमची बायको अद्याप १९व्या शतकांतलीच आहे.मी रात्री कितीही उशीरा गेलो तरी माझी वाट बघत बसते.वेडीच आहे ती.) दुसर्‍या दिवसापासून आमची कामाला सुरुवात झाली आणि तिसर्‍याच दिवशी साहेब पुत्र हजर झाले.

Book traversal links for छगनलालांचे सापळे (भाग ७)

  • ‹ छगनलालांचे सापळे (भाग ६)
  • Up
  • छगनलालांचे सापळे (भाग ८) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4663 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

जोरात

श्रीरंग_जोशी
Tue, 11/04/2014 - 19:05 नवीन
कथामालिकेची गाडी पुन्हा जोरात धावू लागली आहे. दोन्ही नवे भाग वाचले. अत्यंत रोचक घटनाक्रम आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

रोचक कथा ! पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/05/2014 - 00:01 नवीन
रोचक कथा ! पुभाप्र.
  • Log in or register to post comments

आता काय होणार ?

चौथा कोनाडा
Tue, 08/07/2018 - 16:15 नवीन
आता काय होणार ? खुप उत्सुकता !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा