माझी बायको
ढुषक्लेमेरः- सदर कविता ही ज्यांची बायको आयटी क्षेत्रात काम कराणारी पण नवरा बिगर आयटीवाला आहे अश्यां करीता आहे अशी कोणी समजुत करुन घेवु नये. तसेच ज्यांना हे वर्णन आपल्या बायकोशी मिळतेजुळते असे वाटत असेल तर तो निव्वळ योगायोग समजु नये.
द्या मला एक झाडु आणुनी
घर लक्ख करेन मी
बायको ती येई कामावरुनी
द्या मला एक फुंकणी आणुनी
जेवण असे फक्कड करेन
बायकोचा दास मी गुणी
द्या मला एक पान आणुनी
लवंग काथ केवडा घालुनी
विडा बायकोला देईन दशगुणी
द्या मला एक पावा आणुनी
गाइन सुरेल गाणी
बायको जाईल झोपुनी
वाचने
16641
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
आणि बहुतेक शे..चा
बायकोला काथ्याकुटांत?
मुरलीचाच मोठेपणी पावा होतो, असे दादा कोंडक्यांनी सांगून ठेवले आहे.
इथे जेपी "पयले" कसे नाही आले हा प्रश्न मनाला हलकेच स्पर्शून गेला...
(टाकली काडी)
In reply to इथे जेपी "पयले" कसे नाही आले by आदूबाळ
ते तिकडे स्वतंत्र ख फ आन्दोलनात बिजि आहेत.
:)
एका दिल्लीकाराचा झाडू हरविलेला आहे, सापडला का कुणाला? घर पूर्ण स्वच्छ करणारा झाडू आहे. बाकी बायको या प्राण्याला (?) मूर्ख बनविणे सोपी नाही
मी पाचवा.....!
"आमचे हे काडीच्या कामाचे नाहीत"
आचिं चा धाग्यावर पयला प्रतिसाद हुकला यामुळे शरमेने ......
(हुकलेला) जेपी
मिपावरच्याच या प्रसिद्ध धाग्याची आठवण झाली.
http://www.misalpav.com/node/13469
In reply to मिपावरच्याच या प्रसिद्ध by मराठीप्रेमी
पदार्पणातच शतक मारणारा तो धागा लिहिणारे लेखक एका लिखाणातच मिपावरून गायब झालेले आहेत असं लक्षात आलं... निदान त्या आय डी ने तरी पुन्हा लिहिलेलं दिसत नाही, पुनर्जन्म घेऊन आले असतील तर माहीत नाही :-)
विडा बायकोला देईन दशगुणीदशगुणी नाय हो. त्रयोदशगुणी.
धाग्याचे नाव बदला हो भौ.
असल्या नावमुळे गैरसमज होतो. कोणीतरी अनवधानाने विचारले की तुम्ही "माझी बायको" वाचली का तर घोटाला व्हायचा
भारीच की ! शेवटंचं कडवं . . . . . .
"द्या मला एक पावा आणुनी
गाइन सुरेल गाणी
बायको जाईल झोपुनी"
तुमचा पावा कुटं ग्येला ?
सगळं दुसर्यांनीच आणून दिलं तर तुम्ही काय करणार??
In reply to सगळं दुसर्यांनीच आणून दिलं by सूड
कहर!!!
=)))))
:-)