मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी बायको

आंबट चिंच · · काथ्याकूट
ढुषक्लेमेरः- सदर कविता ही ज्यांची बायको आयटी क्षेत्रात काम कराणारी पण नवरा बिगर आयटीवाला आहे अश्यां करीता आहे अशी कोणी समजुत करुन घेवु नये. तसेच ज्यांना हे वर्णन आपल्या बायकोशी मिळतेजुळते असे वाटत असेल तर तो निव्वळ योगायोग समजु नये. द्या मला एक झाडु आणुनी घर लक्ख करेन मी बायको ती येई कामावरुनी द्या मला एक फुंकणी आणुनी जेवण असे फक्कड करेन बायकोचा दास मी गुणी द्या मला एक पान आणुनी लवंग काथ केवडा घालुनी विडा बायकोला देईन दशगुणी द्या मला एक पावा आणुनी गाइन सुरेल गाणी बायको जाईल झोपुनी

वाचने 16641 वाचनखूण प्रतिक्रिया 16

नावातकायआहे 30/10/2014 - 16:32
आणि बहुतेक शे..चा

तिमा 30/10/2014 - 16:58
बायकोला काथ्याकुटांत? मुरलीचाच मोठेपणी पावा होतो, असे दादा कोंडक्यांनी सांगून ठेवले आहे.

विवेकपटाईत 30/10/2014 - 20:02
एका दिल्लीकाराचा झाडू हरविलेला आहे, सापडला का कुणाला? घर पूर्ण स्वच्छ करणारा झाडू आहे. बाकी बायको या प्राण्याला (?) मूर्ख बनविणे सोपी नाही

In reply to by मराठीप्रेमी

पदार्पणातच शतक मारणारा तो धागा लिहिणारे लेखक एका लिखाणातच मिपावरून गायब झालेले आहेत असं लक्षात आलं... निदान त्या आय डी ने तरी पुन्हा लिहिलेलं दिसत नाही, पुनर्जन्म घेऊन आले असतील तर माहीत नाही :-)

विजुभाऊ 31/10/2014 - 15:06
धाग्याचे नाव बदला हो भौ. असल्या नावमुळे गैरसमज होतो. कोणीतरी अनवधानाने विचारले की तुम्ही "माझी बायको" वाचली का तर घोटाला व्हायचा

चौथा कोनाडा 03/11/2014 - 12:54
भारीच की ! शेवटंचं कडवं . . . . . . "द्या मला एक पावा आणुनी गाइन सुरेल गाणी बायको जाईल झोपुनी" तुमचा पावा कुटं ग्येला ?