✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संभाषण

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Wed, 10/29/2014 - 15:39  ·  लेख
लेख
ब-याच लोकाना संभाषण करताना एखादे वाक्य वा शब्द वारंवार वापरण्याची सवय असते. ते वाक्य वा शब्द आल्याशिवाय त्यांचे संभाषण वा गप्पा पुर्ण होत नाहित.. एम.आय.डी सी. त असे अनेक नमुने होते.. एकाला बोलताना.." पण मी काय म्हणतो" असे म्हणायची सवय होति.. एकाला " मला एकच कळत" तर एकाच्या वाक्यात "च्यायला" शब्द आलाच पाहिजे असा नियम होता.. एक जण कायम "हरी हरी" म्हणत असे काहिना "शिट यार" तर काहिन फ** इट" अशी ईंग्रजीत म्हणायची सवय असते १ ना २ असे अनेक नमुने आपणास हि माहित असतिल.. एव्हढेच नव्हे तर आपणहि एखाद्या शब्दाचा वा वाक्याचा कायम उपयोग करत असतोच म्हणा...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा

प्रतिक्रिया द्या
11246 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

धन्य हो प्रभू...

माम्लेदारचा पन्खा
Wed, 10/29/2014 - 15:43 नवीन
कुठुन प्रसवता ह्या विषयांना ?
  • Log in or register to post comments

अश्लील अश्लील : )

पिंपातला उंदीर
Wed, 10/29/2014 - 15:47 नवीन
अश्लील अश्लील : )
  • Log in or register to post comments

काय

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 10/29/2014 - 16:33 नवीन
काय रे हे अवी? आंतरजालिय मराठी लिखाण उच्च दर्जाचे असले पाहिजे असे तू नेहमी म्हणतोस त्याचे काय?
  • Log in or register to post comments

धनंजय माने इथेच राहतात का ?

मदनबाण
Wed, 10/29/2014 - 16:42 नवीन
धनंजय माने इथेच राहतात का ? :p

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsen
  • Log in or register to post comments

च्यामारी....

अर्धवटराव
Wed, 10/29/2014 - 20:54 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मागचा एक धागा फार चवदार होता.

पाषाणभेद
गुरुवार, 10/30/2014 - 10:26 नवीन
मागचा एक धागा फार चवदार होता. पण गेलाच तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

धनंजय माने इथेच राहतात का ?

मदनबाण
Wed, 09/23/2020 - 16:52 नवीन
धनंजय माने इथेच राहतात का ? आज या अमर संवादाला आणि चित्रपट अशी ही बनवाबनवी ज्या मध्ये हा संवाद आहे, त्या चित्रपटाला ३२ वर्ष पूर्ण झाली ! २३ सप्टेंबर १९८८ साली ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पाहता पाहता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला. ‘अशी ही बनवाबनवी’चे ‘हे’ दहा संवाद आजही खदखदून हसवतात

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ३२ वर्षांपासून गाजणारी, 'अशी ही बनवाबनवी'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ऊंssssssssss!!!!!

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/29/2014 - 17:00 नवीन
ऊंssssssssss!!!!! :-D
  • Log in or register to post comments

फिलर...

योगी९००
Wed, 10/29/2014 - 17:16 नवीन
ब-याच लोकाना संभाषण करताना एखादे वाक्य वा शब्द वारंवार वापरण्याची सवय असते. त्यांना Filler असे म्हणतात. बर्‍याच वेळेला फिलर शब्द वा वाक्य बोलताना आपण विचार करत असतो की पुढे काय बोलावे ते.
  • Log in or register to post comments

विषय सँभाँषंण असा हवा होता.

काळा पहाड
Wed, 10/29/2014 - 17:27 नवीन
विषय सँभाँषंण असा हवा होता.
  • Log in or register to post comments

यालाच पादपूरके म्हणतात.

बॅटमॅन
Wed, 10/29/2014 - 17:45 नवीन
यालाच पादपूरके म्हणतात. संस्कृतातले पादपूरक 'तु, हि, च, स्म, ह, वै' हे होत. त्यातही चवैतुहि जास्त वापरतात. संस्कृत शिक्षणाचा प्रभाव असलेले जुन्या काळातले लोक पादपूरकांनाच चवैतुहि असेही म्हणत. या संबंधाने एक श्लोक आठवला. उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेन्द्र मुखं प्रक्षालयस्व टः | प्रभाते कूजते कुक्कु चवैतुहि चवैतुहि || यामागील कथा येणेप्रमाणे: कोणे एके काळी एका राजाश्रित कवीने एक श्लोक रचला, 'उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद' च्या थाटात. गोविंदचे झाले राजेंद्र. तो त्याला सांगतोय, हे राजेंद्रा, ऊठ. बरं, उठून करायचं काय? 'मुखं प्रक्षालयस्व', तोंड धू. पण 'मुखं प्रक्षालयस्व' मध्ये ७ अक्षरे आहेत अन वृत्तात बसायला टोटल ८ म्हणजे अजून एक अक्षर पाहिजे. कवी चांगला जिलबीपाडू होता, त्याने एक 'ट' जोडला उगीच. पुढे मग 'प्रभाते कूजते कुक्कु', सकाळी कोकिळा कूजन करते. काय कूजन करते? तर 'चवैतुहि चवैतुहि'. उगा जागा भरायची म्हणून पादपूरणासाठी (पाद = कवितेतला श्लोकाचा पाव भाग, दुसरा प्राकृत अर्थ न घेणे.) कायपण! अकुंच्या धाग्याच्या निमित्ताने हा श्लोकही आठवला, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आपले पाद कोठे आहेत?

योगी९००
Wed, 10/29/2014 - 18:27 नवीन
__/\___ आपले पाद कोठे आहेत? (पाद=पाय, दुसरा प्राकृत अर्थ न घेणे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/30/2014 - 11:04 नवीन
आपले पाद कोठे आहेत? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

बॅटुक नाथा धन्य धन्य झालो !!!

मारवा
Wed, 10/29/2014 - 18:48 नवीन
बॅटु हे आपली असामान्य प्रतिभा केवळ केवळ प्रतिसादात व्यर्थ घालविता त्यासाठी त्यांचा तीव्र निषेध त्रिवार निषेध ! त्यांनी तत्काळ एक दमदार लेख संस्कृत भाषे वर लिहावा ही अत्यंत आग्रहाची मागणी तारस्वरात करत आहे. स्वर्गात इंद्र केंद्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र मिसळपावीवर बॅटेंद् !!!! बंधु आपले संस्कृत चे ज्ञानकण कुठे कुठे विखुरलेले आहेत कृपया लिंका पुरवाव्यात. आपली वचने वेचण्यास उत्सुक मारवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

"बाहेरुन शरदचन्द्र"

अविनाश पांढरकर
गुरुवार, 10/30/2014 - 11:38 नवीन
स्वर्गात इंद्र केंद्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र बाहेरुन शरदचन्द्र मिसळपावीवर बॅटेंद् !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

(No subject)

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/30/2014 - 11:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश पांढरकर

भयानक सुंदर दिलखेचक माहिती!

बोका-ए-आझम
Wed, 10/29/2014 - 18:57 नवीन
भयानक सुंदर दिलखेचक माहिती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

छान माहिती

समीरसूर
गुरुवार, 10/30/2014 - 09:42 नवीन
आवडली. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पादपूरके

पुष्कर
Tue, 01/27/2015 - 15:51 नवीन
मी ह्या श्लोकाची जी दोन व्हर्जन्स ऐकली आहेत, त्यात 'प्रभाते रटते कुक्कु' आणि 'एष आह्वयते कुक्कु' असे होते. ते असो. कुक्कुटः चा अर्थ कोंबडा असा होतो ना? पिक म्हणजे कोकिळ असा माझा समज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खतरनाक किस्सा !

चौथा कोनाडा
Wed, 09/23/2020 - 17:37 नवीन
खतरनाक किस्सा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लकबी

सुनील
गुरुवार, 10/30/2014 - 08:44 नवीन
बॅटमन यांनी दिलेली माहिती रोचक! पूर्वीचे मराठी कवीदेखिल 'अन्' इत्यादी शब्दांचा असाच उपयोग करीत. संस्कृत काय किंवा मराठी कवी काय, दोहोंना आपल्या रचना वृतात बसवण्यासाठी अशा फिलर्सची आवश्यकता वाटत असावी. परंतु, अकु म्हणताहेत ते थोडे वेगळे आहे. ते विविध लोकांच्या बोलण्याच्या लकबींविषयी विचारताहेत. अशा लकबी सहसा दुसर्‍यांकडून उचलल्या जात असतात. आमचा एक जुना साहेब असाच कुठलाश्या आम्रविकावारीत 'डाउन द लाईन' हा शब्दसम्मुच्चय शिकून आला आणि अक्षरशः कुठेही वापरू लागला!
  • Log in or register to post comments

आउट

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 10/30/2014 - 09:56 नवीन
आउट ऑफ द बॉक्स , इट्स नॉट रॉकेट सायन्स हे शब्दसमुच्चय अधून मधून ऐकू येतात.तुमचे ते आय टी वाले बोलताना डीझाईन्,लॉजिक्,पॅटर्न हे शब्द पर्त्येक वाक्यात घुसवतात असे हे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ये बंदेको ईश्शु समझाही नही

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/30/2014 - 10:00 नवीन
ये बंदेको ईश्शु समझाही नही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मस्त....

मुक्त विहारि
गुरुवार, 10/30/2014 - 10:09 नवीन
झक्कास..... लेखन....विचार्मंथन आवडले...
  • Log in or register to post comments

बेसिकली...... यु नो.....?

खटपट्या
गुरुवार, 10/30/2014 - 10:58 नवीन
बेसिकली...... यु नो.....?
  • Log in or register to post comments

तुम्हाला म्हणुन सांगतो. अगदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/30/2014 - 11:52 नवीन
तुम्हाला म्हणुन सांगतो. अगदी बरोबर, करेक्ट, अ‍ॅक्च्युअली, द्याट्सइट्, आय शप्पथ, मी कधीच खोटं बोलत नै, लिगल मत, राग येईल पण बोलतो. असंय तर ते, आयसी, वाट्स रॉंग यार,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अ‍ॅक्चुली कायै न.... बेसिकली.

वेल्लाभट
गुरुवार, 10/30/2014 - 11:06 नवीन
अ‍ॅक्चुली कायै न.... बेसिकली..... सी; असं आहे की.... असो. बाकी?
  • Log in or register to post comments

पर्कोलेट

समीरसूर
गुरुवार, 10/30/2014 - 11:14 नवीन
आमची एक सहकारी नेहमी 'पर्कोलेट' हा शब्द वापरायची. कुठून तरी ओढून ताणून संदर्भ आणायची आणि 'इट वुईल पर्कोलेट टू अ लार्जर ऑडियन्स...' सुरू व्हायची. आजकाल 'इंप्रूव्ह' साठी भारी शब्दपर्याय म्हणून बरेच लोकं 'इंम्प्रोवाईज' वापरतात. :-) माझा एक मित्र हाच शब्द वापरायचा मग मी त्याला 'इम्प्रूव्ह' आणि 'इम्प्रोवाईज' मधला फरक समजावून सांगीतला...
  • Log in or register to post comments

हा लेख वाचून यू नो.. आय वॉज

गवि
गुरुवार, 10/30/2014 - 11:53 नवीन
हा लेख वाचून यू नो.. आय वॉज लाईक.. आय वॉज लाईक ..वाऊ..आय मीन ..आय मीन इट्स लाईक वॉव.. आय वॉज लाईक..इज धिस अकु? आय मीन धिस इज ऑस्सम मॅन..
  • Log in or register to post comments

+१

आदूबाळ
गुरुवार, 10/30/2014 - 12:46 नवीन
+१ "आय वॉज लाईक" हे "आय सेड" चं नव-इंग्रजी रूप आहे हा प्रकाश टकु-यात पडायला वेळ लागला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आला आला अकुंचा धागा आला ,

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 10/30/2014 - 12:10 नवीन
आला आला अकुंचा धागा आला , पण अकु गेले गावाला ह्या अकुंचे असेच असते ते कधी परत धाग्यावर हजेरी लावतच नाहीत. आता लेखन विषयी .... आमच्या ऑफिसमधले नग आहेत त्यांना अशा सवई आहेत एकजण म्हणत असतो " यु नो " " यु नो " तर दुसरा म्हणत असतो "बेसिकली आय थिन्क / बेसिकली व्हॉट हाप्पन्ड यु नो "
  • Log in or register to post comments

तरुण तूर्क म्हातारे अर्क नाट्का मध्ये

सिरुसेरि
गुरुवार, 10/30/2014 - 15:20 नवीन
तरुण तूर्क म्हातारे अर्क नाटका मध्ये प्राध्यापक बारटक्के हे पात्र ( मधुकर तोरडमल ) असेच बोलते - ह्याच्य ह्याच्यामध्ये हेच नाहि .
  • Log in or register to post comments

बर्र

नीलस्वप्निल
Wed, 09/23/2020 - 18:20 नवीन
बर ....मोथे साहेब वापरायचे... आता मनसे साहेब वापरतात
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा