मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तसे देव मोकळेच असतात..!!

प्रकाश१११ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सध्या देव एकटेच असतात काल सहज त्याची आठवण आली तिला आणि ती अशी येथे दूर ...दूरदेशी आणले तिने जुजबी देव नाही असे नाही लंगडा बाळकृष्ण एकटाच घरी सोबत विठ्ठल रुखमाई आणि शंकराची पिंड त्याच्या समोर नंदी तेवढीच एकमेकाची एकमेकाला सोबत नाही असे नाही रात्रीच्या अंधारात त्याना दिसणार मात्र काहीच नाही कालच कशी कुणास ठाऊक आभाळातील ढग बघून तीही उदास ,खिन्न आणि आली आठवण देवाची दिसून गेले उदास देवघर किती दिवस प्रसाद सोडा किती महिन्यात त्याना कोणी आंघोळ देखील घातली नाही कसे करमत असेन त्यांना..? रात्रीचा गच्च अंधार काय वाटत असेन त्यांना...? सगळ्यांची हालहवाल विचारीत असते ती देव तेवढे राहून जातात करमत नसेन त्यांना तसे ती दोघे घरी एकटीच असतात सुख दुख्ख शेयर करायला तसे देव मोकळेच असतात .... प्रकाश

वाचने 2103 वाचनखूण प्रतिक्रिया 7

आयुर्हित 29/10/2014 - 01:46
तसे Boss आणि देव मोकळेच असतात..!! एक year end ला आणि दुसरे life end ला apraisal घ्यायला मोकळेच असतात..!!

एस 04/11/2014 - 19:08
कविता आवडली. मानसिकता अचूक व्यक्त झालीये.