मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काजू अ‍ॅपल मिठाई

सानिकास्वप्निल · · पाककृती
. साहित्यः १ वाटी काजू पावडर १/२ वाटी साखर १/४ वाटी पाणी सजावटीसाठी लवंगा खायचा रंग (मी केशर सिरपमध्ये थोडा खायचा रंग मिसळला आहे) . पाकृ: नॉन-स्टीक पॅनमध्ये साखर्+पाणी एकत्र करून त्याचा एकतारी पाक तयार करावा. पाक तयार झाल्यावर त्यात काजू पावडर घालून मिश्रण एकत्र गोळा होईपर्यंत ढवळावे. मिश्रण कडेने सुटू लागले व त्याचा गोळा होऊ लागला की ताटात काढून थोडे गार होऊ द्यावे. सधारण कोमट झाले की त्याचे गोळे करुन घ्यावे. (इथे थंड वातावरण असल्यामुळे मिश्रण लगेच गार झाले त्यामुळे मला लगेच त्याचे गोळे करावे लागले) छोटे गोळे तयार करुन वरुन हलके दाबून घ्यावे. आता एक न वापरातला रंगाचा ब्रश स्वच्छ धुवून घ्यावा. खायच्या रंगात बुडवून तयार गोळ्यावर त्याचे स्ट्रोक्स मारुन घ्यावे. दाबलेल्या भागात लवंग देठ म्हणून रोवून ठेवावी. (तुम्ही देठासाठी पिस्त्याचे काप ही वापरू शकता) . काजू अ‍ॅपल तयार आहे. दिवाळीला मिठाई म्हणून तुम्ही खाऊ शकता , खिलवू शकता :) . तुम्हा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!.

वाचने 11463 वाचनखूण प्रतिक्रिया 27

रेवती 21/10/2014 - 22:00
अच्छा.....असे करतात काय हे प्रकार! मिठाईच्या दुकानात सफरचंदे, कलिंगडे बनवून ठेवलेली बघितलीत पण ते प्रकार कसे बनत असतील हे माहित नव्हते. छान दिसतायत अ‍ॅपल्स.

स्वाती दिनेश 21/10/2014 - 22:24
छान दिसते आहे मिठाई.. स्वाती

शिद 21/10/2014 - 22:27
आहाहा...काय ती पाकृ, काय ते फोटो, काय ते सादरीकरण...डोळे निवले अगदी.

भिंगरी 21/10/2014 - 22:58
मला सफरचंद आवडत नाही,पण हे नक्की आवडेल.

मदनबाण 22/10/2014 - 09:38
एक खोका { या अ‍ॅपल मिठाईचाच बरंका... ;) } इकडे माझ्याकडे पाठवुन द्या बरे ! :) {मॅंगो काजुकतली प्रेमी} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rajan gets his way on RBI's restructuring plan

अनन्न्या 22/10/2014 - 10:33
हेच प्रमाण मी काजूच्या फुलांसाठी वापरते.

सस्नेह 23/10/2014 - 06:50
असल्या हुच्चभ्रू ऐटमची पाकृ इतकी सोपी ! फार्फार धन्यवाद सानिकाताई.

इशा१२३ 23/10/2014 - 16:07
मस्तच आणि तुझ्या सादरिकरणाच्या कौशल्यामुळे कोणतिहि रेसेपी सोपीच वाटते. नक्की करुन पाहिन.आत्तापर्यंत आयतीच दुकानातली खाल्ली होती. फोटो...जाउदे...तु छळ चालुच ठेवणार आमचा. :'(

प्यारे१ 25/10/2014 - 18:04
___/\___ पाकृमधली सचिन तेंडुलकर. कन्सिस्ट्न्टली अबोव्ह द क्लास.

सुखी जीव 29/10/2014 - 13:48
पहिला फोटो काय कातील !! आणि हे घरी करता येत हि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कमाल आहे तुमची