✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कारी...

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
गुरुवार, 10/30/2008 - 17:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10129 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

अ
अवलिया गुरुवार, 10/30/2008 - 17:16 नवीन

खुपच

खुपच अस्वस्थ केले या कथेने. मध्यपुर्वेतील अनेक कुप्रथांना एकच गोष्ट जबाबदार आहे. पण त्या गोष्टीला वेसण घालण्याची आज तरी कोणाकडे ताकद नाही. लवकरात लवकर सुसंस्कृतीचा उदय होवो असेच फख्त आपण म्हणु शकतो नाना
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 10/30/2008 - 17:18 नवीन

अमानुषता व क्रौर्य

बिपिनराव, माणुस अशी कृत्ये कशी काय करू शकतो? अशा भयानक कृत्यांना अनेक देशात 'रितीरिवाज' ठरवले गेले आहे. सैतानाला धर्म नसतो हे खरे पण मुस्लिम देशात हे प्रकार सर्रास घडतात. किंबहुना अजुनही मुस्लिम समाजावर मुल्ला-मौलवींचा जबरदस्त पगडा आहे आणि स्त्री ही अजुनही गुलामच नव्हे तर नगण्य वा दखल न घेण्याजोगी वस्तू आहे. आवाज उठविणार्‍या मुस्लिम स्त्रीला परागंदा व्हावे लागते याचे तस्लिमा हे उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 10/30/2008 - 17:31 नवीन

अमानुषपणा

मन दुखावल गेल वाचून.चिड आली.असहाय्य वाटल. मला वाटत हिंदु माणूस अस करू शकणार नाहीत. ते हाल हाल करून मारलेले हलाल मांस ही नाकरतात.म्हणजे नाकारत असतील.नसतील नाकारत ,तर नाकारावे. हिंदु काय मुसलमान काय! शेवटी माणसचं. जर आपल्याला जन्म देण्याची पूर्णतः क्षमता नाही तर देवाने दिलेले एखाद्याचे जिवन घायचा अधिकार तर नाहीच नाही. कुणालाच नाही. मीनल.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 10/30/2008 - 18:40 नवीन

मला वाटत

मला वाटत हिंदु माणूस अस करू शकणार नाहीत. काळ बदलला म्हणून आता करत नसतील.. पण सती जाण्याची किंवा सती जायला लावायची रित हिंदुं समजातलीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
य
यशोधरा गुरुवार, 10/30/2008 - 18:42 नवीन

खरय, परवा

खरय, परवा परवा पर्यंत रुपकुंवर सती गेलीच की.. किंवा तिला जायला लावलं म्हणता येईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
म
मीनल गुरुवार, 10/30/2008 - 19:01 नवीन

खर

खर आहे मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्राजु गुरुवार, 10/30/2008 - 20:15 नवीन

आईगं..

डोकं बधीर झालं बिपिनदा.. इतका क्रूरपणा?? बापरे!!!!!!!!!!! माणुसकी नावाचा संबंध नाहीच का?? काय म्हणायचं या लोकांना?? त्या बापाला तरी कसं बघवलं आपलं तान्हं पोर कुत्रं लचके तोडून खातं आहे हे????? आई गं... कुठे फेडतील हे पाप?? वाचताना गळा दाटून आला माझा... कशाला जन्माला घालयचं असंच मारायचं होतं बाळाला त्या तर?? माणुसकीच्या अंत झालाय का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
श
शेणगोळा गुरुवार, 10/30/2008 - 17:35 नवीन

सुन्न.

बिपिन, सुन्नच झालो वाचून. सर्वांचाच लाडका, शेणगोळा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/30/2008 - 18:35 नवीन

बापरे!

बापरे! सुन्न व्हायला झालं बिपिनदा हे वाचून... किती भयानक हो... :(
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 10/30/2008 - 18:47 नवीन

कारी - तरकारी

पालापाचोळा सारखी वागणूक कोण म्हणते स्वर्ग, नरक वेगळा आहे. एकाच वेळी एकाच ठीकाणी एकच जागा कोणासाठी स्वर्ग, कोणासाठी नर्क. "औरतने जनम दिया मर्दो को..." "देवा, लक्ष्मी येईल जाईल, तू मात्र माझं बोट सोडू नकोस. माझी सद्सदविवेक बुद्धी बनून माझ्या बरोबर रहा. आज मी जे काही ऐकलं तसं परत कोणाच्याच बाबतीत न घडो. आणि घडलंच तर मी जसा सुन्न झालो तशीच प्रत्येक व्यक्ति होऊ दे म्हणजे हे चित्र पालटायला वेळ लागणार नाही." तथास्तु!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 10/30/2008 - 20:49 नवीन

सहमत!

ऐकून हतबुद्ध झालो. बाकी सहजरावांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
श
शितल गुरुवार, 10/30/2008 - 18:50 नवीन

खरच मन सुन्न झाल.

किती भयानक आहे हा प्रकार. माणुस तरी कसे म्हणावे असे कृत्य जे करतात त्यांना. हे वाचुन आमच्या मनाला वेदना झाल्या तर तीच्या आई-वडिलांनी प्तत्यक्षरित्या पाहिले त्याचे काय झाले असेल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/30/2008 - 18:56 नवीन

भयानक !!!

बीपीन, तस्लीमला एका खोलीत कोंडून पिसाळलेली कुत्रे तिच्या आणि लहान बाळाच्या अंगावर सोडून त्यानंतर तिला गोळ्या घालण्यात आल्या. किती हा कृरपणा, काय म्हणावे याला सुचत नाही. धर्मांध मुस्लीम देशात अशी अनेक प्रकरणे आपण ऐकतो. त्या तुलनेत आपल्याकडे असे प्रमाण कमी असावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 10/30/2008 - 19:32 नवीन

प्रबोधन

पोटात ढवळण्याइतकी घृणा वाटावी असा प्रसंग. घोडा का अडला ? भाकरी का करपली ? पान का सडले ? फिरवली नाहीत म्हणून. हिंसाचार , दहशतवाद, अमानुष क्रौर्य, शोषण , जातीयवाद, धार्मिक कडवेपणा या वरचे उत्तर काय ? : "प्रबोधन". प्रबोधनाला पर्याय नाही. मध्यपूर्वेतल्या दुर्दैवी लोकांना ज्ञानाचा सूर्य कधी दिसेल कुणास ठाऊक , आपल्या भारतातल्या , आपल्या महाराष्ट्रातल्या तरी लोकांपर्यंत प्रकाश पोचावा म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काहीतरी करणे शक्य आहे. स्त्रियांना शिकवणे सगळ्यात महत्त्वाचे. बाई शिकेल, घरच्याना शिकवेल. घरचे उलटले तर मदत घ्यायचा धीर तिच्याकडे येऊ शकेल. जितके शिक्षण तळागाळातल्या बायकांपर्यंत पोचेल, असे घृणास्पद प्रकार होण्याची शक्यता तितकी कमी होईल.
  • Log in or register to post comments
स
सूर्य गुरुवार, 10/30/2008 - 19:37 नवीन

बिपिनराव

बिपिनराव काय लिहीले आहे तुम्ही. डोळयासमोर उभे राहीले सगळे. "देवा, लक्ष्मी येईल जाईल, तू मात्र माझं बोट सोडू नकोस. माझी सद्सदविवेक बुद्धी बनून माझ्या बरोबर रहा. आज मी जे काही ऐकलं तसं परत कोणाच्याच बाबतीत न घडो. आणि घडलंच तर मी जसा सुन्न झालो तशीच प्रत्येक व्यक्ति होऊ दे म्हणजे हे चित्र पालटायला वेळ लागणार नाही." पुर्णतः सहमत. - सूर्य.
  • Log in or register to post comments
ल
ललिता गुरुवार, 10/30/2008 - 19:44 नवीन

भयंकर

भयंकर प्रथा आणि भीषण क्रूर समाज! तस्लिमाला तेव्हा काय यातना झाल्या असतील याचा विचार करुनच अंगावर काटा आला. X( जिवंत स्त्रीला गुलाम म्हणून नरकयातना द्यायच्या.... दुसरीकडे स्वर्गातल्या अप्सरा मिळवायला जिहादच्या नावाखाली लाखो निरपराध जीव घ्यायचे, यातून कोणता पुरुषार्थ साधतात ते मुल्ला-मौलवीच जाणे! :D
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/30/2008 - 19:54 नवीन

माणुस

माणुस का घाणूस
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/30/2008 - 20:30 नवीन

अमानुष

वाचूनच अंगावर काटा आला! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/30/2008 - 20:36 नवीन

काहीही

मत नाही ह्या आणि असल्या प्रकरणांवर. माणूसपण नसलेल्यांबद्दल काय बोलायचे? रेवती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 10/30/2008 - 20:55 नवीन

केवळ अमानुष!

पोटात ढवळून आले आणि मी ऑफिसातून बाहेर मोकळ्या हवेत जाऊन आलो दोन मिनिटे आणि मूक श्रद्धांजली वाहिली त्या तस्लीमाला! जगात ठिकठिकाणी अजूनही ह्या मध्ययुगीन हत्या चालूच आहेच ह्याचे फार वाईट वाटते. मग ते खैरलांजी असूदे किंवा आताचे हे तस्लीमाचे कारी प्रकरण! माध्यमांच्या प्रबळ ताकदीमुळे निदान हे प्रकार दडपले जाणे कमी होते आहे आणि न्याय मिळण्याची शक्यता वाढते आहे हाच काय तो आशेचा किरण! स्त्रियांचे शिक्षण आणि स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहेच त्याखेरीज पुरुषी मनोवृत्ती बदलणे आणि वेळोवेळी स्त्रियांना दुय्यम वागणूक देणार्‍या मनोवृत्तीला सरळ केल्याखेरीज हे प्रकार थांबणार नाहीत. बिपिनदा, काय झाली असेल रे तुझी अवस्था समजू शकतो मी! पण तू हे लिहिलंस त्यामुळे हे समजलं आणि प्रबोधनाचा पहिला धडा गिरवला गेला. माहीती समजलीच नाही तर पुढची वाटच बंद होते. त्यामुळे तुझे मी आभार मानतो. मलाही ह्या धक्क्यातून सावरायला कितीतरी दिवस लागतील. केवढा खिन्नपणा आला आहे मनाला. चतुरंग
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 10/30/2008 - 21:07 नवीन

वाचलं

कसंबसं पूर्ण वाचलं काय बोलणार! काहि सुचतच नाहिए! :( -(!!!!!!!!)ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 10/30/2008 - 21:27 नवीन

अस्वस्थ

अस्वस्थ व्हायला झाले. दुर्दैवी तस्लिम. लहानपणीच गावातील काही हिंदू-मुस्लिम मुलींना अशा प्रकारे लहानपणीच घरच्यांच्या मानपानाचे बळी होताना पाहिले आहे - त्यातील कोणी प्रत्यक्ष मेल्या नाहीत, पण सगळ्या आयुष्याची "घडी" घरच्यांनीच ठरवली. मुलीच्या इच्छेला कसलाही मान नाही. पण वरचे तस्लिमचे उदाहरण म्हणजे अधमपणाचा कळस आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/30/2008 - 22:02 नवीन

मी अशीच

अस्वस्थ झाले होते चित्राताई, जेंव्हा माझ्या मैत्रिणिला तिच्या सासरी भेटायला गेले होते. माझ्याबरोबरच कॉलेजला असलेली ती, तिच्या नवर्‍याला "साहेब "म्हणत होती. गमतीने माझे बाबा मला आणि माझ्या मैत्रिणिंना "कायम स्त्रीमुक्ती मोर्चा म्हणायचे". आता बदलेल्या तीला पाहताना अशीच मनात कालवाकालव झाली होती. ती म्हणाली कि हे सगळं ठीकच चाललय म्हणायचं. ती माहेरी फोन करू शकते, गावाकडून सासूबाईंनी एक कायमस्वरूपी मोलकरीण पाठवलीये. ह्या सगळ्याचे कारण म्हणजे तीला मुलगा झाला म्हणून हा एवढा मान तरी आहे. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
च
चित्रा Fri, 10/31/2008 - 18:14 नवीन

खरे आहे

माझ्याबरोबरच कॉलेजला असलेली ती, तिच्या नवर्‍याला "साहेब "म्हणत होती. मीदेखील घरच्यांनी मुलींची बहिण तरूणपणी गेली म्हणून कोवळ्या, वयाची सोळाही न ओलांडलेल्या मुलींची "लग्ने" त्या बिजवरांशी लावून दिलेली पाहिली आहेत. मुली दोन्ही - हिंदू आणि मुसलमान. एक माझी खेळण्यातील मैत्रिण आणि दुसरी मुसलमान मैत्रिणीची बहिण. पहिली घराजवळ राहणारी हिंदू मुलगी. मोठी मुलगी बाळंतपणात गेली म्हणून जेमतेम दहावी पार केलेल्या या मुलीचे शिक्षण थांबवून तिला पुण्याजवळच्या खेड्यात तिच्याच मेव्हण्याशी लग्न करून नांदायला पाठवून दिले. ती नंतर सुखात आहे, पण लहानपणी खेळात, शाळेत रस घेणारी ही मुलगी, स्वतः बरेच काही करू शकली असती, आज तिचे आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे आखून देऊन घरच्या लोकांनी स्वतःची जबाबदारीतून सुटका करून घेतली आहे. दुसर्‍या मुसलमान मुलीचे शिक्षण एका दिवशी अचानक थांबले आणि अपघातात गेलेल्या मोठ्या बहिणीची "जागा" हिने ११ वीत असताना भरून काढण्याचा फतवा निघाला. आणि ती तिच्याहून किमान १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मेव्हण्याच्या आणि आता नवर्‍याच्या मागे स्कूटरवरून जाताना दिसायला लागली. अपघातात मरण पावलेल्या बहिणीला तर मूलबाळही नव्हते, त्यामुळे नक्की त्या घरातच तिचे लग्न का लावून दिले गेले कळले नाही. आता ती दु:खात आहे का सुखात हे मला माहिती नाही, पण मुलींची बौद्धिक, मानसिक सगळी वाढ खुंटवणे हे घरचे लोक इतक्या सहजपणे करताना बघून संताप होतो. असेच अजूनही काही बरेच पाहिलेले आहे, विस्तारभयास्तव इथे देत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मन गुरुवार, 10/30/2008 - 21:44 नवीन

धकादायक

आणि भयंकर. मनुष्य अजुनही मध्ययुगातच जगतोय हे पाहुन अत्यंत वाइट वाटतय. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 10/30/2008 - 22:42 नवीन

अरेरे!

अमानुष कृत्य! लेख वाचुन फार अस्वस्थ झालो!
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 10/31/2008 - 00:28 नवीन

बिपीन

या लेखाची शेवटची चार वाक्य फार पटली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/31/2008 - 08:19 नवीन

हा तर

हा तर रानटीपणाच झाला,,माणुस म्हणुन हे लोक जगतातच कसे ?? मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/31/2008 - 08:30 नवीन

............

............ (सुन्न) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Fri, 10/31/2008 - 09:13 नवीन

भयानक प्रकार

वाचताना अगदी काटा आला. मध्ययुगीन काळात (५वे ते १६वे शतक) युरोपात क्रौर्याच्या परिसीमा गाठणार्‍या यातनामय शिक्षांचा इतिहास आहे. अजूनही आफ्रिकेच्या दुर्गम भागात असेच भयानक प्रकार घडत असल्याच्या बातम्या वाचनात येतात. धर्माच्या किंवा सत्तेच्या पडद्याआड माजलेल्या कर्म-कांडांमधे हे प्रकार फोफावले. याला कोणतेच धर्म अपवाद नाहीत. पण, सामजिक प्रश्न जसजसे आधुनिक लोकशाही मार्गाने सोडवले जावु लागले आहेत तसतसे हे प्रकार कमी होताना दिसत आहेत. अवांतर - न्यूयॉर्कच्या 'रिपलीज.. ' म्युझियम मधे बघितलेली 'टॉर्चर गॅलरी' आठवली. यातनामय शिक्षा द्यायसाठी वापरण्यात आलेली विविध 'साधने' अगदी हारीने मांडून ठेवली आहेत!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 10/31/2008 - 11:07 नवीन

(विषय दिलेला नाही)

:( :( :( ................ बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 10/31/2008 - 12:54 नवीन

सुन्न.

सुन्न झालो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 10/31/2008 - 13:05 नवीन

भय॑कर आहे.

भय॑कर आहे. भारतातही अजुन हु॑डाबळी आहेतच की! प्रबोधन म्हणाल तर उच्च विद्या विभूषित म॑डळी आन॑दाने व हक्काने डब्बल हु॑डा मागता॑ना दिसतात. स्त्री भ्रूण हत्त्या करणारेपण त्यातलेच.. आणि मग शेगावला कि॑वा शिर्डीला अभिषेक केला की पाप॑ फिटतातच
  • Log in or register to post comments
स
सुहास कार्यकर्ते Fri, 10/31/2008 - 17:41 नवीन

कारी

वाचुन मन् सुन्न होउन गेले.पण बहुतेक मध्य्य पुर्वेत सगळीकडे थोड्या फर् काने अशाच अघोरी प्रथा चालु आहेत, पण त्या बाहेर येत नाहीत. राजस्थानात भ्रुण हत्त्येचे प्रमाण अजुनही कही कमी नाही.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 10/31/2008 - 18:16 नवीन

भयानक

अघोरी प्रकार! सुन्न झालो. हा सगळा 'कार्यक्रम' ऐकल्यावर त्या पठाण टॅक्सी ड्रायव्हरची प्रतिक्रिया काय होती?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/03/2008 - 15:41 नवीन

धक्का...

तो पण हे ऐकत होता. त्याची प्रतिक्रिया पण जवळजवळ माझ्यासारखीच होती. हे कृत्य करणार्‍या लोकांना तो 'शैतानकी अवलाद' असे म्हणत होता. इथे 'जवळजवळ' असे म्हणायचे कारण की मला जेवढा धक्का बसला तेवढा त्याला बसला असे नाही वाटले. कदाचित, असे प्रकार त्याला पसंत नसले तरी त्याने याआधीपण असे प्रकार घडतात हे ऐकलं / पाहिलं असणार. त्यामुळे त्याला पसंत नसेल तरी धक्का बसला नसेल. किंवा तो अतिशय मितभाषी / संयत असेल. मी पाहिलेले बहुतेक पठाण एकदम टोकाचे बोलघेवडे नाहीतर टोकाचे मुखदुर्बळतरी असतात. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
ल
लिखाळ Fri, 10/31/2008 - 20:33 नवीन

अस्वस्थ

अस्वस्थ करणारा प्रकार आहे.. ऑनर किलिंग हा भयंकर प्रकार अजूनही चालू आहे हे त्याहून भयंकर ! यासारख्या अजून काही बातम्या बिबिसी-सिएनएन वर सुद्धा मध्यंतरी बघितल्या होत्या. देव सर्वांना सद् बुद्धी देवो ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/03/2008 - 15:48 नवीन

बलुचिस्तान...

या लेखात अजून एक लिहायचं राहून गेलं होतं. त्याच रेडिओ कार्यक्रमात अजून एक घटना उल्लेखिलेली होती. बलुचिस्तानमधे 'ऑनर किलिंग' म्हणून ५ बायकांना जिवंत पुरण्यात आले आहे. पण ही घटना मात्र बहुतेक दबते आहे. कारण सरकार असे काही झालेच नाही असे म्हणत आहे. आज तस्लीम साठी सुरू केलेला हा ब्लॉग नजरेस पडला. http://wordpress.com/tag/shaheed-bibi-tasleem-solangi/ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Fri, 11/14/2008 - 20:30 नवीन

मित्रहो...

मित्रहो... असेच प्रकार अजुनही सो कोल्ड प्रगत राष्ट्रांतही घडतात. फक्त ते पद्धतशीर्पणे दाबले जातात. मला अजुनही लख्ख आठवतय..जेव्हा तालीबान चे राज्य होते तेव्हा एका कुठल्यातरी वेब्साईट वरुन आमच्या एका यड्या मित्राने काही चित्रफिती डौनलोड करुन आम्हाला पाठवलेल्या... अक्षरशः आमचं ऑफिस जेवलं नव्हतं ते २ दिवस...तो होता सौदी मधे तेव्हा...भारतातही असले प्रकार होतात फक्त समोर काहीच येतात. एक आंध्र प्रदेशात जा म्हणजे कळेल तिथले लोक आपल्या आया-बहिणींना कशी वागणुक देतात ते... परमेश्वराचे आभार मानावे तितके थोडेच की मी सुसंस्क्रुत मराठी घरात जन्माला आलो... बिपीनदा...परत एकदा चांगला लेख व माणसातलं माणुसपण जागवणारा लेख लिहील्याबद्दल अभिनंदन... आपला... मुकुल...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा