बेडूक आणि सर्प
लेखनप्रकार
फार जुनी कथा आहे, आटपाट नगरीत एका विहिरीत शेंकडो बेडूक राहत होते. त्यांच्यात आपसांत भांडण झाले. एका बेडकाने तावातावाने विहीर सोडली. रागाच्या भरात जात असताना, एका सर्पाने त्यास पकडले. बेडकाने सर्पास त्याला सोडून देण्याची विनंती केली. सर्प म्हणाला, बेडूक हे माझे भोजन आहे, त्या मुळे तुला मी खाणारच. त्याही परिस्थितीत बेडूकाला एक भन्नाट कल्पना सुचली, तो सर्पास म्हणाला, तू मला खाईल, तर आज तुझे पोट भरेल, उद्या तुला पुन्हा भूक लागेल. मला सोडेल तर महिन्या भराच्या तुझ्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. सर्पाने विचारले, ते कसें शक्य आहे? बेडूक म्हणाला इथे जवळच एक विहीर आहे, त्यात शेंकडो बेडूक राहतात, त्यात काही माझे वैरी आहेत. मी तुला विहिरी पर्यंत घेऊन जातो. महिना भर विहिरीत राहून, मी दाखविलेल्या माझ्या सर्व विरोधकांना तू खाऊन टाक. पण अट एकच, महिन्याभरा नंतर तुला विहीर सोडावी लागेल.
सर्पाला काय, आनंद झाला, त्याने पटकन बेडूकाची अट मान्य केली. तो बेडूक सर्पाला घेऊन विहिरीत आला. महिन्याभरात सर्पाने त्याच्या सर्व विरोधकांचा फडशा पाडला. आता बेडूकाने पूर्वीच्या अटीप्रमाणे सर्पास विहीर सोडण्याची विनंती केली. सर्प म्हणाला, अटी वैगरे जुनी गोष्ट झाली, बेडूक माझे जेवण आहे, विहिरीतल्या सर्व बेडूकांचा फडशा पडल्या शिवाय मी काही विहीर सोडणार नाही. सर्पाला विहिरीत आमंत्रित करण्याचा हा परिणाम होणारच.
वाचने
2910
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
मी पयला!!!!!!!
असे काही सुचवायचे आहे का ?
खाईल ?
In reply to खाईल ? by तिमा
शुद्ध मराठीचा आग्रह? म्हणजे
ठेवला का सापाच्या शेपटीवर पाय....
साप म्हटल्यावर अक्षरशहा आठवणच
कथा छानच आहे. वास्तवातल्या
प्रतिसादाबाबत सर्वाना धन्यवाद